home / Sex Advice
Sex बाबत तुमच्याही मनात येत असतील या 14 गोष्टी

Sex बाबत तुमच्याही मनात येत असतील या 14 गोष्टी

खरं तर सेक्स हा शब्द जरी उच्चारला तरी आजूबाजूचे लोक आपल्याकडे अशा तऱ्हेने बघतात जसं काही आपण चुकीचं केलं आहे. वास्तविक सेक्स हे एक प्रकारचं सुख आहे आणि त्याची गरज प्रत्येकाला भासते. बऱ्याचदा संकोचामुळे आपल्याला असलेले प्रश्न आपण कोणालाही विचारू शकत नाही. कारण आपल्या आजूबाजूला याबद्दल बिनधास्त बोललंच जात नाही. बऱ्याचदा आपण आपल्या मित्रमैत्रिणींशीही या गोष्टी बोलायला घाबरतो, कारण त्याला किंवा तिला कसं वाटेल हे आपल्याला नक्की कळत नसतं किंवा आपल्याबद्दल काही विचित्र गैरसमज तर नाही ना करून घेणार अशीही भीतीही मनात असते. पण शंकाचं निरसन तर हवं असतं. मग नक्की काय करणार? तेव्हा आपण गुगल करतो आणि तेव्हा समजतं की, आपल्यासारखे प्रश्न इतर लोकांनाही आहेत. त्यामुळे तुमच्या मनात सेक्सबाबत या 14 गोष्टी नक्की आल्या असतील –

1. पहिल्यांदा सेक्स केल्यावर दुखतं का?

first time sex

सेक्सबद्दल माहिती हवी असणाऱ्या प्रत्येक मुलीला या प्रश्नांचं उत्तर सर्वात पहिले हवं असतं. पहिल्यांदा सेक्स केल्यावर दुखतं हे खरं आहे. पण प्रत्येकाचं दुखणं हे वेगळं असतं. कदाचित तुम्ही त्या मुलींपैकी असू शकाल, ज्यांना पहिल्यांदा सेक्स करूनही दुखलं नाही. काही मुलींना पहिल्यांदा सेक्स केल्यानंतर खूप दुखतं. तुमचा जोडीदार तुमच्याबरोबर कसं सेक्स करतो यावर हे अवलंबून आहे. पण त्यामुळे पहिल्यापासून मनामध्ये कोणतीही भीती घालून घेणं योग्य नाही. तुम्हाला पहिल्यांदा सेक्स करत असताना जर दुखत असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी बोलून तिथेच सेक्स करायचं थांबवू शकता किंवा त्याला हळू सेक्स करायलाही सांगू शकता. त्यामुळे हा प्रश्न नक्कीच प्रत्येक मुलीच्या मनात सेक्स करण्याआधी येतोच.

2. सेक्स करताना प्रत्येक वेळी दुखतं का?

सेक्स करणाऱ्या आणि आरोग्याशी निगडीत हा सर्वात महत्त्वाचा प्रश्न आहे. सेक्स करणं हे तुमच्या आयुष्यात नुकतंच सुरु झालं असेल तर काही वेळा दुखू शकतं. पण प्रत्येकवेळी दुखेलच असं नाही. सेक्स करतेवेळी तुम्हाला पहिल्यांदा केलं त्याचप्रमाणे दुखत असेल तर त्या वेळेपुरतं सेक्स करणं थांबवा आणि आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण एकदा सवय झाल्यानंतर सेक्स करताना प्रत्येकवेळी दुखत नाही. तुम्हाला दुखत असल्यास, याचं नक्की कारण काय आहे हे डॉक्टरच योग्यरित्या सांगू शकतील. प्रत्येकवेळी दुःख सहन करण्यापेक्षा त्याचा इलाज करणं योग्य आहे. कारण सेक्सचा आनंद दुखत असल्यास, घेता येणार नाही. त्यामुळे वेळीच सल्ला घेऊन यावर उपचार करा.

3. खरंच साईजचा काही फरक पडतो का?

सेक्सच्या बाबतीत पडणाऱ्या या प्रश्नाचं सटीक असं कोणतंही उत्तर देता येत नाही. याचं उत्तर हो आणि नाही असं काहीच सांगता येत नाही. सेक्सदरम्यान आनंद देणारी नस ही व्हजायनाच्या सुरुवातीलाच असते. त्यामुळे साईज अर्थात पेनिसचा (penis) आकार किती मोठा आहे हा खरं तर जास्त महत्त्वाचा भाग नाही.

4. आकार खूप मोठा असल्यास

सेक्स करण्याआधी नेहमी प्रश्न पडतो की, पेनिसचा आकार मोठा असल्यास, काय होतं? पण त्यामुळे तुम्हाला घाबरण्याची अथवा याबद्दल विचार करून घाबरण्याची अजिबातच गरज नाही. तुम्ही याबाबत तुमच्या जोडीदाराबरोबर बोला, ल्युब्रिकंटचा वापर करा आणि सेक्स करण्यासाठी पूर्ण वेळ घ्या. प्रेम, म्युच्युअली बोलून आणि ल्युब्रिकंटच्या मदतीने तुम्ही यातून मार्ग काढू शकता. त्यासाठी अजिबातच घाबरून जाण्याची गरज नाही. यावर बोलून मार्ग काढणं हाच एक योग्य उपाय आहे.

5. आकार खूपच लहान असल्यास?

small

तुम्हाला जर वाटत असेल की, तुमच्या जोडीदाराच्या पेनिसचा आकार खूपच लहान आहे, तर तुम्ही सेक्सच्या विविध पोझिशन्स ट्राय करून सेक्सचा आनंद घेऊ शकता. उलट अशा परिस्थितीमध्ये तुम्ही सेक्सचा आनंद जास्त चांगल्या प्रकारे घेऊ शकता. सेक्स करण्याच्या अनेक पद्धती आहेत. आपल्या जोडीदाराबरोबर विविध पोझिशन्समध्ये सेक्स करण्याचा आनंद तुम्ही आकार लहान असल्यास घेऊ शकता. मनामध्ये कोणत्याही शंकाकुशंका न आणता मजेने आपल्या जोडीदाराबरोबर आनंद घ्या.

6. व्हजायनामधून येणाऱ्या वासाबद्दल त्याला काय वाटेल?

सेक्सच्या बाबतीत मुलींना पडणारा हा अतिशय कॉमन प्रश्न आहे. पण कदाचित तो हे नोटीसच करणार नाही. कारण सेक्स करताना त्याला फक्त तुमच्या शरीरावर लक्ष केंद्रीत करायचं असतं. त्यामुळे तुम्ही तुमचं शरीर आणि तुमच्या शरीराशी निगडीत प्रत्येक गोष्टीसह कम्फर्टेबल असणं गरजेचं आहे. तसंच तुम्ही व्हजायनाची स्वच्छता ही नेहमीच ठेवायला हवी. तुम्ही नेहमी रात्री झोपण्यापूर्वी नीट स्वच्छ धुवा आणि झोपताना कॉटन पँटीच घाला. जेणेकरून तुमची व्हजायना नेहमीच साफ राहील.

7. कधी सेक्स करू नये वाटल्यास, काही विचित्र आहे का?

तुमचा सेक्स करण्याचा मूड नसल्यास, यामध्ये काहीही विचित्र नाही. तसंच तुम्हाला ही गोष्ट सांगण्यामध्ये लाज वाटण्याचीही गरज नाही. कोणत्याही दबावाखाली येऊन सेक्स कधीही करणं योग्य नाही. तुमच्या मनात ती भावना असेल तरच सेक्स करणं योग्य आहे कारण तेव्हाच तुम्हाला सेक्सचा आनंद घेता येतो. केवळ तुमच्या जोडीदाराला वाटत असल्यास, सेक्स करू नका. कारण अशा परिस्थितीत तुम्ही योग्य साथ देऊ शकणार नाही आणि स्वतःला आणि जोडीदारालाही आनंद देऊ शकणार नाही.

8. जास्त सेक्स करत आहोत हे कळण्याचा काही मार्ग आहे का?

over sex

सेक्सच्या बाबतीत या प्रश्नाचं तसं तर काहीच उत्तर नाहीये. कारण प्रत्येक शरीराची गरज ही वेगवेगळी आहे. विचार करण्याची गरज तेव्हा भासते जेव्हा तुमचं रूटीन लाईफ सेक्सनेच सुरु होत असेल. जर रोज तुम्ही सेक्स करत असाल तर यावर विचार करण्याची गरज भासेल. तसंच तुमची तुमच्या जोडीदाराबरोबर केमिस्ट्री कशी आहे हेदेखील तितकंच महत्त्वाचं आहे. तुम्ही सेक्सशिवाय राहूच शकत नाही अशी परिस्थिती नसेल तर नक्कीच तुम्ही अति सेक्स करत नाही. त्यामुळे या गोष्टीचा विचार करण्याची तोपर्यंत गरज नाही.

9. असं केल्यास, गरोदर राहण्याची शक्यता आहे का?

सेक्सबाबत अभ्यासात सांगण्यात आलं आहे की, सेक्स करताना स्पर्म फ्लो झाल्यास, गरोदर होण्याची शक्यता नाही. पण तरीही तुम्हाला जर असं वाटत असेल की, तुम्ही गरोदर राहू शकता तर अशावेळी कोणतीही जोखीम न घेता 72 तासांच्या आता कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल घेणं कधीही चांगलं.

10. कंडोमशिवाय सेक्स करण्याच्या दुसऱ्या पद्धती आहेत का?

without condom

गर्भ निरोधक गोळी, आई.यू.डी आणि व्हजायनल रिंग्ज असे अनेक पर्याय उपलब्ध आहेत. कंडोमप्रमाणेच हे पर्याय अतिशय सहज उपलब्ध होतात. जर तुम्हाला यापैकी कोणत्याही गोष्टीचा वापर करायचा असेल तर तुम्ही स्वतःसाठी योग्य आणि ब्रँडेड वस्तूच निवडा. पण जर तुम्हाला कंडोम वापरायचं नसेल तर तुम्ही त्याआधी तुमची आणि तुमच्या जोडीदाराची एस.टी.डी. टेस्ट करून घ्यायला विसरू नका.

11. पहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येकाला ब्लिडिंग होतं का?

हा प्रश्न प्रत्येकाला हमखास मनात येतोच. पण पहिल्यांदा सेक्स करताना प्रत्येकाला ब्लिडिंग होईलच असं नाही. ब्लिडिंग होण्याचं कारण म्हणजे व्हजायनामधील हायमेन लेअर. इंटरकोर्स करत असाताना ही हायमेन लेअर तुटल्यास, ब्लिडिंग होतं. स्पोर्ट्स आणि दुसऱ्या फिजिकल अॅक्टिव्हिटीमुळे बऱ्याचदा हा लेअर आधीच तुटतो. त्यामुळे पहिल्यांदा सेक्स करताना ब्लिडिंग होईलच असं नाही. त्यामुळे आपल्याला पहिल्यांदा सेक्स करताना ब्लिडिंग का झालं नाही याचा विचार करू नका.

12. बॉयफ्रेंडशिवाय टर्न ऑन होणं विचित्र आहे का?

तुमचा बॉयफ्रेंड नसेल अर्थात कोणीही जोडीदार नसेल आणि तरीही तुम्ही टर्न ऑन होत असाल तर यामध्ये अजिबातच काहीही विचित्र नाही. कधीतरी तुमचा फेव्हरट अभिनेता अथवा चित्रपटातील इंटिमेट सीन बघूनही तुम्ही टर्न ऑन होऊ शकता. असं होणं हे तुम्ही हेल्दी असण्याचं लक्षण आहे आणि तुम्हाला सेक्स करावा वाटत आहे इतकाच अर्थ यातून निघतो.

13. टर्न ऑन झाल्यावरही व्हजायना ओली झाली नाही तर?

टर्न ऑन झाल्यावरही जर व्हजायना ओली झाली नाही तर यामागे तुम्ही ताणतणावाखाली आहात हे कारण आहे. त्यामुळे तुम्ही वेळेवर आपलं मन शांत करून रिलॅक्स होण्याची गरज आहे. तुम्ही सेक्स करताना फोरप्लेचा कालावधी वाढवा आणि स्वतःबरोबर ल्युब्रिकंट्सचा वापर करा. काही सेक्सबद्दल केलेल्या अभ्यासानुसार, सेक्सआधी अल्कोहोल घेतल्यास, असं होऊ शकतो. त्यामुळे अल्कोहोल घेणं टाळा.

14. सेक्स करताना इतर गोष्टींचा वापर करणं योग्य आहे का?

use for sex

सेक्स करताना तुम्ही कशाचा वापर करता ही तुमच्या शरीराची निवड आहे. कशाचाही वापर करणं हे सेक्सदरम्यान अतिशय नॉर्मल आहे. असा कोणताही निर्णय घेताना तुमचा जोडीदार कम्फर्टेबल आहे की नाही हे अतिशय महत्त्वाचं आहे. तुमच्या जोडीदारालादेखील तुमच्याबरोबर हे ट्राय करायचं असेल तर अतिउत्तम.

फोटो सौजन्य – giphy.com

तुम्हाला कदाचित या गोष्टी आवडतील – 

जगभरातील अशी शहरं जिथे सेक्स लपून नाही तर केला जातो खुलेआम

पहिल्या सेक्सचा अनुभव होता खास …वाचा महिलांना नेमकं काय वाटलं

*virgin असाल तर तुम्हाला या गोष्टी जाणून घेण्याची आहे गरज

सेक्स करताना मनात हमखास येतात ‘हे’ प्रश्न, तुम्हालाही पडतात का?

08 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this