पिरेड्समध्ये तुम्ही तर करत नाही या 5 चुका (5 mistakes every girl do in her periods)

पिरेड्समध्ये तुम्ही तर करत नाही या  5 चुका (5 mistakes every girl do in her periods)

पिरेड्समध्ये दिवस अगदी नकोसे असतात. तुम्हाला काहीही करण्याचा अगदीच कंटाळा असतो. तुमच्या याच आळशीपणामुळे तुम्ही या दिवसात काही चुका करता ज्या तुम्ही करायला नको. तुम्ही अशा काही चुका करत असाल तर तुम्ही या चुका आताच टाळायला हव्यात म्हणजे तुम्हाला त्रास होणार नाही.


पिरेड्समध्ये फ्लो सुरळीत करण्यासाठी करा हे घरगुती उपाय


सॅनिटरी पॅड बदलण्याचा कंटाळाperiods mistakes fi %281%29


 काही जणांना सॅनिटरी पॅड बदलण्याचा फारच कंटाळा असतो. म्हणून ते एकच सॅनिटरी पॅड दिवसाला वापरतात. किंवा काही जण सॅनिटरी पॅड महाग असतात म्हणून ते बदलायला  पाहात नाही. पण तुमची ही एक सवय तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. तुम्ही दर 2 ते 3 तासांनी सॅनिटरी पॅड बदलायलाच हवे. जर तुमचा फ्लो हेवी असेल तर तुम्हाला पॅड बदलण्याची जास्त गरज आहे. जर तुम्ही सॅनिटरी पॅड बदललेले नाही तर तुम्हाला तुमच्या व्हजायना आणि नितंबाच्या जागेवर रॅश येऊ शकतात. तुम्ही कितीही चांगल्या प्रतीचे आणि कॉटन पॅड घातले तरी तुम्ही ते बदलायलाच हवे .


खूप खाण्याची इच्छा किंवा काहीही न खाणे


eating too much


पिरेड्समध्ये हा त्रास सर्रास अनेकांना होतो. काहींना सतत काहीना काही खावेसे वाटते. तर काहींना या दिवसात काहीच खायची इच्छा होत नाही. ज्यांना खूप खायची इच्छा होते ते या काळात सतत गोड म्हणजेच चॉकलेट किंवा चटपटीत खात राहतात. त्यांना भूक असतेच असे नाही तर त्यांना काहीतरी खावेसे वाटते म्हणून ते खात राहतात.


तर काहींना या दिवसात अगदी काहीच खाऊ नये असे वाटते म्हणून ते उपाशी राहतात. हे दोन्ही अगदीच टोकाचे वागणे आहे. म्हणून असे करु नका. या दिवसात अगदी लाईट जेवण असू द्या. वरण भात भाजी पोळी असा जितका शक्य असेल तितका आहाक असू द्या.


पिरेड्समध्ये दुखत पोट जाणवतो थकवा मग नक्की वाचा


जीन्सचा वापर


tight jeans


हे दिवस इतर दिवसांपेक्षा नक्कीच वेगळे आहेत. जाहिरातींमध्ये दाखवल्याप्रमाणे या दिवसात तुम्ही अगदी काहीही कपडे नक्कीच घालू शकता. पण जर तुम्ही या दिवसात जीन्स घातली तर तुम्हाला रॅश येण्याची शक्यता जास्त असते. तुम्ही तुमच्या व्हजायनाचा भाग जितका मोकळा ठेवाल तितके तुम्हाला कमी रॅश येतील. शिवाय तुम्हाला तुमचा तो भाग स्वच्छ करताना त्रास देखील होणार नाही. म्हणून या दिवसात वनपीस, कुडता-पायजमा असे कपडे घाला तुम्हाला बरे वाटेल.


प्रवासात लघवीला जाण्याची टाळाटाळ


washroom


या दिवसात अनेकांना बाहेर लघवीला जायला आवडत नाही. म्हणजे इतर कोणत्याही ठिकाणी त्यांना लघवीला जायला आवडत नाही. असे विशेषत: प्रवासात होते. प्रवासात लघवीला जाण्याचा या दिवसात अनेक जण कंटाळा करतात. लघवीला होऊ नये म्हणून पाणी पित नाही. त्यामुळे तुम्ही डिहायड्रेट होण्याची शक्यता ही जास्त असते. त्यामुळे जर तुम्हाला लघवीला जाण्याचा कंटाळा स्वच्छतेमुळे असेल. तर तुम्ही तुमच्यासोबत वाईप्स ठेवा. तुम्हाला तुमची ती जागा स्वच्छ करता येईल.


Female condom संदर्भात तुम्हाला नक्की काय माहीत आहे


थंड पदार्थ खाण्याची मोडा सवय


shutterstock 642062308


काहींना या दिवसात पोटदुखीचा त्रास होतो. त्यामुळे अनेक जण पोटाला थंडावा मिळण्यासाठी थंड पदार्थ खातात. थंड पदार्थ खाण्याची हीच चुकी तुम्ही कधीही करु नका. तुम्ही वरचेवर गरम पाणी पित राहाल तर तुम्हाला या दिवसात फ्लो सुरळीत राहण्यात अडथळा देखील येणार नाही.


या अशा काही चुका आहेत त्या सर्वसाधारणपणे सगळ्याच महिला करतात.ज्या तुम्ही करायला नकोत.


(फोटो सौजन्य-Shutterstock)


तुम्हाला कदाचित ही गोष्ट आवडेल:


PCOD Symptoms, Causes & Treatment In Marathi