ADVERTISEMENT
home / Care
लांब केसांना नुकसान पोहचवतात तुमच्या ‘या’ 5 चुका!

लांब केसांना नुकसान पोहचवतात तुमच्या ‘या’ 5 चुका!

बऱ्याच मुलींना लांब केस आवडतात. लांब केस मिळवण्यासाठी मुली बऱ्याच घरगुती गोष्टींचे उपायही करत असतात. पण ज्या मुलींचे केस लांब असतात, त्यांना त्या केसांंची काळजी घेणं जमतंच असं नाही. बऱ्याचदा मुली आपल्या लांब केसांकडे दुर्लक्ष करतात. काही मुलींच्या बाबतीत त्यांची चूकही नसते. कारण जेव्हा तुमचे केस अगदी कमरेपेक्षा जास्त वाढतात तेव्हा त्याची काळजी घेणं नक्कीच कठीण होतं. त्यावेळी सुरु होतात तुमचे #longhairproblems. लांब केस असल्यानंतर मुली नक्की काय चुका करतात हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. तुम्ही पण बघा जर तुमचे केस लांब असतील तर तुम्हीही हे करता की, नाही हे तपासून घ्या. तुम्ही जर लांब केसांच्या खराब होण्यामुळे त्रस्त असाल तर हेअरकट हा उपाय तुम्ही करण्याआधी तुम्ही ज्या चुका करत आहात त्या टाळण्याचा प्रयत्न करा.

पहिली चूक #1: केसांना कायम बांधून ठेवणं

tight ponytail

जेव्हा तुमचे केस लांब असतात, तेव्हा तुम्ही जास्त वेळ केस बांधून ठेवण्याला प्राधान्य देता. तुम्ही ऑफिसमध्ये असलात किंवा वर्कआऊट करत असाल तर तुम्हाला केस सतत चेहऱ्यावर आणि मानेवर येत असल्यास त्रास होतो, त्यामुळे नेहमीच दूर ठेवण्यासाठी बांधून ठेवले जातात. पोनीटेल हा एकच पर्याय त्यावेळी असतो. पण तुम्हाला माहीत आहे का? केस जर नियमित स्वरूपात तुम्ही पोनी म्हणून बांधत असाल तर केसांचं मूळ हे कमकुवत होतं. कारण केसांचं वजन केसांच्या मुळांना खालच्या बाजूला खेचतं आणि त्यामुळेच केसगळतीचं प्रमाणही वाढू लागतं.

यावरील उपाय – यासाठी उत्कृष्ट पर्याय म्हणजे नॉट. जो अतिशय सोपा आणि सुपरस्टायलिशदेखील आहे. ही तर बऱ्याच सेलिब्रिटीची कायमस्वरूपी ऑफ ड्युटी स्टाईल आहे. याशिवाय तुम्ही फ्रेंच ब्रॅड अथवा लुज प्लॅडदेखील करू शकता. जे दिसायला अतिशय सुंदर दिसतं आणि तुमच्या लांब केसांना चांगलं संरक्षण देतं.

ADVERTISEMENT

दुसरी चूक #2: केसांचा गुंता

knots

आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की, लांब केसांमध्ये फारच लवकर गुंता होतो. त्यामुळे केसांमधून कंगवा फिरवणंदेखील अतिशय त्रासदायक असतं. हा गुंता सोडविण्यासाठी तुम्ही ओल्या केसांमधून ब्रश केल्यास, बरेचसे केस गळतात. मग अशावेळी नक्की काय करायचं असा प्रश्न तुम्हाला सतावणं हे साहजिक आहे.

यावरील उपाय – जेव्हा तुम्ही आंघोळ करता तेव्हा केसांना कंडिशनर लावलं असता, मोठ्या दाताच्या कंगव्याने तुम्ही कंडिशनर लावा. जेव्हा तुमचे केस व्यवस्थित सुटतील अर्थात त्यातील गुंता सुटेल तेव्हा व्यवस्थित कंडिशनर लावा. सुक्या केसातील गुंता सोडवताना मॉईस्चराईजिंग उत्पादन नसलेल्या वस्तूंचा वापर करा. गुंता असल्यास, केसांमधून कंगवा फिरवू नका. केसगळती थांबवण्यासाठी कंगवा करताना कोणत्याही डिटँगलिंग सिरम अथवा रेग्युलर सिरमचा वापर करणं अत्यंत गरजेचं आहे. लक्षात ठेवा की, ब्रशचा वापर नेहमी केसांच्या खालच्या बाजूने सुरु करा.

तिसरी चूक #3: ड्राय शँपूचा वापर कमी करणं

hairspray

ADVERTISEMENT

असं कोण म्हणतं की, ड्राय शँपू का केवळ दुसऱ्या अथवा तिसऱ्या दिवशी केस धुण्यासाठी वापरला जातो. जेव्हा तुम्हाला केस धुण्याचा मूड नसतो तेव्हा याचा वापर करणं योग्य आहे. पण याचा वापर तुम्ही केस धुतल्यानंतर केला तर तरीही चालू शकतं. तुम्ही स्टाईल अथवा केस ब्लो ड्राय केले असतील आणि त्यावर हेअरस्प्रेचा वापर केला असेल तर मात्र तुमच्या केसांना नुकसान पोहचू शकतं.

यावरील उपाय – हेअरस्प्रे हा अतिशय चिकट असतो आणि त्यामुळे तुमचे केस रूक्ष होतात. ब्लो ड्राय केल्यानंतर याच्याऐवजी तुम्ही ड्राय शँपूचा वापर करा. यामुळे तुमच्या केसांना चांगला व्हॉल्युम मिळतो आणि केसांचं टेक्स्चरदेखील छान होतं.

चौथी चूक #4: तेलाचा वापर न करणं

oil massage

तुम्ही केसांना कधी तेल लावलं होतं? आठवावं लागतंय का? आपल्या रोजच्या धावपळीच्या आयुष्यात नेहमीच तणाव असतो. त्यामुळे केसांच्या मुळांची ताकद कमी होते. तसंच तेल मालिश केल्यामुळे केसांना योग्य बुस्ट मिळतं. ज्याची केसांना अतिशय आवश्यकता असते.

ADVERTISEMENT

यावरील उपाय: मजबूत आणि चमकदार केसांसाठी जास्त  मॉईस्चरची गरज असते. याचबरोबर तेल मालिशमुळे ब्लड सर्क्युलेशनही वाढतं. रूक्ष केसांमध्ये अधिक चमक आणि मजबूती येते. स्काल्पवर तेलाने मसाज करणं हा यावरील योग्य उपाय आहे.

पाचवी चूक #5: केस मोकळे सोडून झोपणं

sleep with open hair

जास्तीत जास्त मुली या रात्री झोपताना केस मोकळे ठेऊन झोपतात. पण याविषयी कधीही त्यांच्या मनात विचार येत नाही. पण केसगळतीच्या मुख्य कारणांमधील हे एक कारण आहे. यामुळे आपले केस डॅमेज होतात. रात्री आपल्या नकळत केस उशीवर रगडले जाता, त्यामुळे फ्रिझी होऊन केसगळती जास्त प्रमाणात वाढते.

यावरील उपाय – तुमच्या केसगळतीचं हे मुख्य कारण आहे. त्यामुळे झोपण्यापूर्वी तुम्ही तुमचे केस अगदी हलकेच बांधून झोपा. सिल्क अथवा सॅटिनचं उशीला कव्हर तुम्ही वापरलं तरी ही अडचण दूर होऊ शकते.

ADVERTISEMENT

फोटो सौजन्य – Shutterstock

हेदेखील वाचा –

#DIY: झटपट केस वाढवायचेत तर जाणून घ्या घरगुती उपाय

सुंदर केसांसाठी या 8 क्लुप्त्या वापरा आणि बदला तुमचं जग

ADVERTISEMENT

केसांना फुटलेत फाटे, काय आहेत त्यावर घरगुती उपाय

13 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT