आंघोळ करताना या गोष्टींचा वापर कराल तर त्वचेच्या विकारांपासून होईल सुटका

आंघोळ करताना या गोष्टींचा वापर कराल तर त्वचेच्या विकारांपासून होईल सुटका

ऑफिसला जाण्याच्या गडबडीत सगळ्यांनाच साग्रसंगीत आंघोळ करायला मिळतेच असे नाही.त्यामुळेच कावळ्याची आंघोळ करुनच कित्येकांना घराबाहेर पडावे लागते. या सगळ्या घाईमुळे शरीर स्वच्छ होतेच असे नाही. अशा वेळी शरीर स्वच्छ करण्यासाठी जर  तुम्ही तुमच्या आंघोळीच्या पाण्यात काही गोष्टी घातल्या आणि आंंघोळ केली तर तुम्हाला त्वचेसंदर्भातील कोणतेही विकार होणार नाहीत. या अशा गोष्टी आहेत ज्या घरात अगदी सहज उपलब्ध असतात. त्यांचा वापर करुन तुम्हाला फ्रेश तर वाटेलच शिवाय तुम्हाला तुमची त्वचा चमकदार, कोमल आणि स्वच्छ वाटेल.

लिंबू (Lemon)

shutterstock

व्हिटॅमिन c ने युक्त असलेल्या लिंबाचे भरपूर फायदे आहे. अगदी पचनापर्यंतच्या ते चेहऱ्यापासून अनेक समस्यांसाठी लिंबाचे सेवन केले जाते. तुमच्या त्वचेसाठीही लिंबू चांगला आहे. लिंबामध्ये असलेले ब्लिचींग एजंट तुमच्या त्वचेवरील घाण, अतिरिक्त मळ काढून टाकते. शिवाय तुमचे टॅनिंगही कमी करते. जर तुम्ही रोजच कोमट पाण्याने आंघोळ करत असाल तर तुम्ही तुमच्या पाण्यामध्ये अर्ध लिंबू पिळायला काहीच हरकत नाही. लिंबाच्या रसामुळे तुमच्या शरीरावरील मळ, चिकटपणा निघून जातो. तुम्हाला फ्रेशसुद्धा वाटते. या शिवाय त्वचेसंदर्भातील अन्य त्रासही दूर होतात

*जर तुम्हाला सकाळी वेळ नसेल तर घरी आल्यानंतर झोपण्याआधी आंघोळ करताना त्यात लिंबू पिळा. सकाळीही अगदी काहीच सेंकदात तुम्ही लिंबू पिळून त्या पाण्याने आंघोळ करु शकता.

चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो हवा असेल तर नक्की ट्राय करा चॉकलेट फेसपॅक

खडे मीठ(Epsom Salt)

shutterstock

जर तुम्हाला दिवसभरात आलेला थकवा घालवायचा असेल. तर खडे मीठ तुमच्यासाठी अगदी परफेक्ट आहे. खडे मीठ घातलेल्या पाण्यात आंघोळ केल्यामुळे तुम्हाला रिलॅक्स वाटते. ताणतणाव दूर होते. अंगदुखी बंद होते. या शिवाय मीठामुळे त्वचा मुलायम होते. त्यामुळे तुम्हाला ऑफिसमधून घरी आल्यानंतर अशाप्रकारे आंघोळ करायला काहीच हरकत नाही. 

*गरम पाण्यात साधारण अर्धा ते 1 चमचा मीठ घालून मीठ विरघळू द्या. या पाण्याने आंघोळ करा. शक्य असेल तर या पाण्यात काही वेळ बसलात तरी काहीच हरकत नाही. आठवड्यातून किमान दोन वेळा तरी हा प्रयोग करुन पाहा.

आलं (Ginger)

Shutterstock

 जर तुम्हाला सर्दी, ताप असा काही त्रास असेल तर तुम्ही आवर्जून आल्याच्या पाण्यात आंघोळ करायला हवी.  आलं थोडसं ठेचून तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यात घालायचे आहेत. तुम्हाला लगेचच आराम पडेल.

*जर तुमची त्वचा नाजूक असेल तर तुम्ही आलं वापरणं टाळा. कारण आल्यामुळे तुमची त्वचा जळू शकते. अगदी लहानला तुकडा ठेचून तुम्ही पाण्यात घालणे अपेक्षित असते.

लग्नाचा सीझन आला नैसर्गिक पद्धतीने चेहऱ्यावर आणा ग्लो

ग्रीन टी (Green Tea)

Shutterstock

ग्रीन टी चे भरपूर फायदे आहेत हे आपण जाणतोच. पण आंघोळीच्या पाण्यात तुम्ही ग्रीन टीचे पाऊच उघडून घातले तर तुमच्या त्वचेला त्याचा अधिक फायदा होईल. त्वचा टोन्ड करण्यासाठी ग्रीन टी ही उत्तम आहे. 

तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यात ग्रीन टी घालायची आहे. तुम्ही ग्रीन टी चे मिळणारे सॅशे उघडून टाकले तर तुमच्या पाण्यात तुम्हाला पान दिसतील. त्यापेक्षा तुम्ही ग्रीन टीचे मिळणारे डीप डीप पाऊच पाण्यात घालून आंघोळ करा. साधारण आठवडाभऱानंतर तुम्हाला फरक जाणवेल.

असे कराल तर एका रात्रीत उजळून निघेल तुमचा चेहरा

अँटिसेप्टीक लिक्वीड

shutterstock

खूप लोकांना पाण्यात अँटिसेप्टिक लिक्विड घालून आंघोळ करायची सवय असते. तुम्हालाही बाहेरील धूळ मातीचा त्रास असेल किंवा तुम्हाला झटपट स्वच्छता हवी असेल तर तुम्ही तुमच्या पाण्यात अँटीसेप्टीक लिक्वीड घालू शकता. यामुळे तुमच्या शरीरावर कोणत्याही जखमा असतील तर त्यांच्यावरही हे अँटीसेप्टीक लिक्वीड चांगले काम करते. 

पूर्वी अनेक अँटीसेप्टीक लिक्वीड लहान मुलांच्या आंघोळीच्या पाण्यात टाकण्याचा सल्ला दिला जायचा. पण आता डॉक्टर अगदी तान्ह्या बाळांना हा सल्ला देत नाही.  

आता तुम्ही कावळ्याची आंघोळ करत असाल तरी शरीर अस्वच्छ राहण्याचे टेन्शन नाही. तुम्ही या वस्तूंचा वापर करुन स्वच्छ शरीरच नाही तर अन्य विकारांपासून मुक्ती मिळवू शकता.