ADVERTISEMENT
home / Acne
Adult Acne बद्दल तुम्हाला माहीत असायलाच हवेत ‘हे’ 6 Facts!

Adult Acne बद्दल तुम्हाला माहीत असायलाच हवेत ‘हे’ 6 Facts!

आपल्याला नेहमी असं वाटत राहतं की, अॅक्ने अर्थात पिंपल्सची समस्या ही किशोर वयातच होत असते. पण असं अजिबात नाही. किशोरवय झाल्यानंतर अगदी मोठ्या वयातही ही समस्या तुम्हाला त्रासदायक ठरू शकते. तुम्ही कधी Adult Acne बद्दल ऐकलं आहे का? अगदी पाच मुलींपैकी एकीला तरी वयाच्या 25 वर्षानंतर ही समस्या असते. तुम्ही सकाळी उठल्यानंतर अचानक तुम्हाला तुमच्या कपाळावर वा चेहऱ्यावर मोठी पुळी अर्थात अॅक्ने दिसल्यास, तुमचा दिवस खराब होतो. आम्ही तुम्हाला या समस्येबद्दल सर्व काही सांगणार आहोत. तुम्हाला याबद्दल 6 गोष्टी माहीत असायलाच हव्यात. त्यामुळे तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. जाणून घेऊया काय आहेत नक्की Facts!

Fact#1 मुरूमं येण्याची कारणं जाणून घेणं गरजेचं

adult acne

Adult acne चं कारण तसंही अजूनपर्यंत स्पष्ट झालेलं नाही. पण तणावामुळे हार्मोन्स बदलतात, तसंच काही जणींना हे अनुवंशिकही असू शकतं. जास्त तेल अथवा डेड स्किनच्या कारणामुळे पोअर्स बंद होतात आणि त्यामुळे मुरूमं चेहऱ्यावर येऊ लागतात. तुम्ही मोठं झाल्यानंतरचंही हेच कारण असू शकतं. फक्त फरक इतकाच आहे की, ही मुरूमं वेगवेगळ्या ठिकाणी येतात. कपाळ अथवा गालावरच ही मुरूमं येतील असं नाही. .तर तुमच्या जॉईलाईन (jawline) जवळील हाडावर अथवा अगदी मानेवरही ही मुरूमं येतात. किशोरवयात हार्मोन्सच्या बदलामुळे अर्थात सेक्स हार्मोन androgen मुळे तेल निघतं आणि चेहऱ्यावर मुरूमं येतात. त्याप्रमाणे मोठं झाल्यानंतर ज्या मुलींना PCOS (polycystic Ovary Symdrome) चा त्रास असतो त्यांना हे जास्त प्रमाणात होताना दिसतं. तसंच ज्या मुली जास्त ताणतणावात असतात अथवा ज्या मुलींना स्मोकिंगसारख्या सवयी असतात अशा मुलींना हा त्रास जास्त प्रमाणात होतो.

Fact#2 चॉकलेट आणि जंक फूड खाऊन मुरूमं येत नाहीत

किशोरवयात नक्कीच खाण्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर मुरूमं येतात. पण मोठे झाल्यानंतर असं होत नाही. तळलेलं खाणं आणि चॉकलेट यामुळे नाही तर ब्लॉक्ड पोअर्समुळे तुमच्या चेहऱ्यावर अथवा अन्य भागांवर मुरूमं येतात. तळलेलं खाणं अर्थात अनहेल्दी खाण्यामुळे शरीरातील तेलाची मात्रा वाढते आणि या समस्येला अधिक खतपाणी मिळतं हे खरं आहे. या सगळ्या गोष्टी बंद करण्यापेक्षा तुम्ही डार्क चॉकलेट खाणं केव्हाही चांगलं. कारण मिल्क चॉकलेटच्या तुलनेत डार्क चॉकलेटचे खूप फायदे आहेत. तळलेल्या खाण्याबरोबरच तुम्ही चांगल्या हिरव्या भाज्या आणि फळंदेखील खा ज्यामुळे तुमचं डाएट संतुलित (balanced) राहील.

ADVERTISEMENT

Fact#3 खूप जास्त exfoliation चांगलं नाही

scrub

आपल्या त्वचेतील पोअर्स साफ करण्यासाठी आणि अशा प्रत्येक समस्यांमधून सुटका हवी असल्यास, काही महिला बऱ्याचदा स्क्रब अथवा exfoliate करतात. हे अतिशय कॉमन आहे. पण त्यामुळे त्वचेला जास्त हानी पोहचते हे बऱ्याच जणांना माहीत नसतं. तुम्ही जर तुमची त्वचा सतत रगडत साफ केली अथवा सतत exfoliate करत राहिलात तर, तुमच्या चेहऱ्यावरील मुरूमं आणि लालीची समस्या अधिक वाढेल ती कमी होणार नाही. त्यामुळे तुम्ही Exfoliator ला कोणतं तरी क्रिम अथवा जेल स्वरुपात आठवड्यातून दोनदा वापर करणं गरजेचं आहे. तसंच या गोष्टीची काळजी घ्या की, त्यामध्ये सॅलिसायलिक अॅसिडसारखे पदार्थ असू द्या. उदा. Clean Deep Exfoliating Scrub, Rs. 290 याचा तुम्ही चांगला वापर करू शकता.

Fact#4 हे किशोरवयात येणाऱ्या मुरूमांप्रमाणे नसतातacne problem

तुम्ही तुमच्या किशोरवयातील महत्त्वाच्या टप्प्यातून पुढे निघून आलात तर अर्थात नैसर्गिक गोष्ट आहे की, त्यावेळी तुमची त्वचा आणि आताची तुमची त्वचा यांच्या समस्या नक्कीच सारख्या नसणार. पण चेहऱ्यावरील मुरूमं पाहून याचा अंदाज लावला जाऊ शकतो. जसजसं तुमचं वय वाढतं तसतशी तुमची त्वचा ही पातळ होते. जेव्हा तुम्ही साधारण 13 वर्षाचे असता तेव्हा तुमची त्वचा तुलनेत जाड असते. त्यामुळे तुमच्या त्वचेवर अतिशय माईल्ड आणि योग्य परिणाम करतील अशीच उत्पादन तुम्ही वापरायला हवीत.

Fact#5 Benzoyl Peroxide, Salicylic Acid आणि टी ट्री Oil असणारी उत्पादनं तुमच्यासाठी उत्कृष्ट आहेत

तुम्हाला अशी समस्या नेहमी उद्भवत असेल तर तुम्हाला त्वचारोगतज्ज्ञांकडे (dermatologist) उपचार करण्यासाठी वेळवेर जायला हवं. त्यामुळे तुमचे हार्मोन्स  व्यवस्थित नियंत्रणात राहतील. पण त्यासाठी तुम्हाला घरच्या घरी उपचार करायचा असेल तर ज्या उत्पादनांमध्ये benzoyl peroxide आहे अशा उत्पादनांचा वापर करा कारण यामुळे बॅक्टेरियाचा नायनाट होतो आणि सॅलिसिलिक अॅसिड हे तुमच्या पोअर्सना ओपन करतात. तुमच्या त्वचेचे डॉक्टर तुम्हाला जे औषध देणार त्यामध्ये या दोन गोष्टी नक्कीच असणार. तसंच टी ट्री ऑईल रेडनेस आणि इन्फ्लेमेशनपासून दूर राहण्यासाठी नैसर्गिक उपचारही आहे. अशा तऱ्हेचे मुरूमं काढून टाकण्यासाठी तुम्हाला Clean and Clear Persa-Gel 10 में 10% benzoyl peroxide, Rs. 3146 वापरही करता येऊ शकतो.

ADVERTISEMENT

Fact#6 नियमित साफसफाई केल्यास दूर होतात मुरूमं

आतापर्यंत तुम्हाला कळून चुकलं असेलच की, ताज्या आणि निरोगी त्वचेसाठी दिवसातून किमान दोन वेळा तरी नियमित क्लिन्झिंग, टोनिंग आणि मॉईस्चराईजिंग करणं अतिशय आवश्यक आहे. हे सांगण्यासाठी तुम्हाला कोणत्याही डॉक्टरांची नक्कीच गरज नाही. नियमित साफसफाई ठेवल्यास, तुम्ही नक्कीच मुरूमांपासून दूर राहू शकता. त्वचेवरील पोअर्स ओपन करण्यासाठी आणि चांगली त्वचा मिळवण्यासाठी हे गरजेचं आहे. जास्त चांगल्या परिणामांसाठी तुम्ही या प्रक्रियेत benzoyl peroxide आणि salicylic acid चादेखील वापर करू शकता. फक्त लक्षात ठेवा की, तुमच्या संवदेनशील त्वचेसाठी केवळ लाईट उत्पादनांचाच वापर करा.

फोटो सौजन्य – Shutterstock

हेदेखील वाचा

चेहरा क्लीन आणि चमकदार बनवण्यासाठी 10 घरगुती उपाय

ADVERTISEMENT

एका रात्रीत चेहरा उजळवण्यासाठी फॉलो करा Overnight टिप्स

चुकूनही तुमच्या चेहऱ्यावर लावू नका ‘या’ ७ गोष्टी, पडू शकतं महागात

How To Get Rid Of Pimples In Marathi

01 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT