या ‘8’ ‘टिप्स Sex लाईफ करतील अधिक interesting

या ‘8’ ‘टिप्स Sex लाईफ करतील अधिक interesting

प्रत्येक माणसाला आपलं Sex Life चांगलं आहे असंच वाटत असतं. पण सेक्स लाईफमध्ये अशा काही गोष्टी असतात ज्या कायम राहून जातात. तोचतोचपणा काही वर्षानंतर सेक्स लाईफमध्ये यायला लागतो. त्यामुळे आपल्या जोडीदाराबरोबर तुम्हाला तुमची सेक्स लाईफ अजून interesting बनवायची असेल तर तुम्हाला आम्ही काही Secret गोष्टी सांगणार आहोत. कोणतीही लाज न बाळगता तुम्ही या गोष्टी जर आपल्या जोडीदाराबरोबर केल्यात तर नक्कीच तुमच्या आयुष्यात अजून Spice येईल. पण मग नक्की असं काय करायला हवं असा प्रश्न आता तुम्हाला पडला असेल. तर सर्वात आधी हे लक्षात ठेवा की, सेक्स करताना तुम्हाला तुमच्या जोडीदाराबरोबर कोणतीही लाज बाळगता कामा नये. तरच तुम्ही काहीतरी interesting करू शकाल. आता म्हणजे नक्की काय ते आम्ही तुम्हाला सांगतो -

1. तुमची Fantasy नक्की करून पाहा

GIPHY

तुम्ही ज्या गोष्टीबरोबर कम्फर्टेबल असाल ती गोष्ट तुम्ही सेक्स करताना करू शकता. सर्वात महत्त्वाचं म्हणजे यामध्ये अजून काय वेगळेपणा आणता येईल याचा विचार करा. काहीतरी नवीन ट्राय करण्याची गरज असते. त्यामुळे तुमच्या जोडीदाराबरोबर त्यांची फँटसी नक्की काय आहे याबद्दल चर्चा करा आणि सेक्स करताना ती फँटसी नक्की ट्राय करा. तुम्ही लाजत राहिलात तर तुमच्या सेक्स लाईफवर त्याचा परिणाम होतो आणि मग तुम्ही दोघेही सेक्सचा आनंद घेऊ शकत नाही.

उदा. तुम्हाला सेक्सची एखादी पोझिशन करून पाहायची असेल तर तुम्ही तुमच्या जोडीदाराशी याबाबत स्पष्ट बोला आणि त्याला अथवा तिलासुद्धा हे करण्यात इंटरेस्ट आहे का हे पाहून सेक्स करताना ही पोझिशन ट्राय करा.

2. जेव्हा तुम्ही त्याच्यावर असता

सेक्स करताना जेव्हा तुम्ही लीड करत असता अर्थात जेव्हा तुम्ही त्याच्यावर असता हे तुमच्यासाठी आणि त्याच्यासाठी दोघांसाठीही इंटरेस्टिंग असतं. कारण तुम्हाला या पोझिशनमध्ये लवकर आनंद मिळतो आणि तुमच्या जोडीदाराला तुम्हाला आणि तुमच्या चेहऱ्यावरील सेक्सचा आनंद बघण्यात अजून मजा येत असते. शिवाय यामुळे तुमच्या जोडीदाराला additional visual stimulation देण्याचा प्रयत्न या पोझिशनमध्ये असतो.

3. पाण्यात राहून Sex

काही जणांना पाण्यात राहून सेक्स करता येतो. मुळात पाण्यात आपला जोडीदार अत्यंत मादक दिसतो असं म्हटलं जातं आणि ही मादकता मुलांना अथवा मुलींना सेक्सच्यावेळी हवी असते. त्यामुळे आंघोळ करताना अथवा एखाद्या बाथटबमध्ये अथवा तुम्ही एखाद्या हॉटेलमध्ये हनीमूनसाठी गेला असाल आणि तिथे पूलमध्ये तुम्हाला एकांत मिळत असेल तर सूर्यास्त पाहता पाहता Kiss करणं आणि त्यानंतर सेक्सचा आनंद घेणं हेदेखील अतिशय इंटरेस्टिंग आहे. तुम्हाला यातून जोडीदाराच्या अधिक जवळ तर जाता येतंच. पण ल्युब्रिकंटसाठी इतर कोणत्याही गोष्टीची आवश्यकताही भासत नाही. तसंच पाण्यामध्ये सेक्स चढायला जास्त वेळ लागत नाही. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही अधिक प्रमाणात foreplay देखील करू शकता.

उदा. तुमचा नवरा आणि अथवा बायको आंघोळ करत असताना अचानक बाथरूममध्ये जाऊन रोमँटिक होणं आणि त्यानंतर अधिक जवळ जाऊन किस घेत सेक्सचा आनंद घेणं.

4. Talking dirty…

बऱ्याचदा मुलींना ही गोष्ट करण्यासाठी लाज वाटते आणि बऱ्याचदा आपल्या जोडीदाराशी सेक्सच्या बाबतीत बोलताना मुली लाजतात. कारण त्या जो विचार करत आहेत तो आपल्या जोडीदाराला कसा वाटेल असाही विचार त्यांच्या मनात असतो. पण खरं सांगायचं तर मुलांना अशा गोष्टी ऐकायला जास्त आवडतात. सेक्स करण्याआधी अशा प्रकारे dirty talks केल्यास, बऱ्याच पुरूष आणि महिलांना turn-on करण्यासाठी उपयुक्त असतो. कोणत्याही मुलाला अथवा मुलीला Turn - on करण्याचा हा योग्य पर्याय आहे. तुम्हीदेखील ही इंटरेस्टिंग गोष्ट एकदा नक्की करून पाहा. कदाचित पुढच्या वेळेपासून तुम्हाला हे करायला जास्त आवडेल आणि तुमच्या सेक्स लाईफमध्ये यामुळे अधिक spice निर्माण होईल.

उदा. तुम्हाला त्याच्याशी कशा प्रकारे सेक्स करावं वाटत आहे हे त्याला वेळोवेळी मेसेज करून सांगणं अथवा जवळ असल्यास, सेक्सआधी त्याच्या कानात याबद्दल बोलणं.

5. Delayed pleasure…

GIPHY

याचा नक्की अर्थ काही जणांना कळत नाही. पण खरं तर तुम्हाला सेक्स करताना जेव्हा परमोच्च आनंद मिळण्याचा अर्थात Orgasm ची वेळ असते तेव्हा तुम्ही थोडं थांबा आणि एकमेकांना अजून थोडं Climax पर्यंत आणून स्वतःवर थोडं नियंत्रण ठेवा आणि पुन्हा एकदा फोरप्ले करत सेक्स केल्यास, तुम्हाला Orgasm एक वेगळा आनंद मिळू शकतो. तुम्ही हे एकदा नक्की ट्राय करा आणि त्यामध्ये तुम्हाला अप्रतिम अनुभव मिळेल.

6. एखाद्या नव्या जागेवर

नेहमी त्याच त्याच ठिकाणी सेक्स करून कंटाळा आला असेल तर तुम्ही अचानक आपल्या जोडीदाराला घेऊन दुसऱ्या ठिकाणी नेऊन सरप्राईज द्या.  एखाद्या वेगळ्या ठिकाणी सेक्स करणं तुमच्या लाईफमध्ये spice add करू शकतं. जर तुम्हाला बाहेर कुठे जाणं शक्य नसेल तर तुम्ही एखाद्या कार अथवा वेगळ्या ठिकाणी सेक्स करण्याची मजा घ्या. तुम्हाला पूर्ण privacy मिळणार असेल अशा ठिकाणी तुम्ही आपल्या जोडीदाराबरोबर सेक्स करा. अशा प्रकारे सेक्स करणं तुमच्या आयुष्यातील सेक्स लाईफधील pleasure नक्कीच वाढेल.

उदा. घरी असलात तरी घरात कोणी नाही हे बघून बेडवर सेक्स न करता डायनिंग टेबल अथवा घराच्या जिन्यावर अथवा किचनमध्ये सेक्स करणं

7. भांडण झाल्यास असा घ्या बदला

GIPHY

आपल्या जोडीदाराबरोबर जर तुमचं भांडण झालं असेल तर तुम्ही सेक्स लाईफमधून एक वेगळ्या आणि चांगल्या प्रकारचा बदला नक्कीच घेऊ शकता. अशी भांडणं सोडवण्यासाठी सेक्स हा उत्तम उपाय आहे. बेडवर जाऊन एकमेकांना खेचून अथवा थोडंसं wild सेक्स करत तुम्ही तुमचं सेक्स लाईफ अजून इंटरेस्टिंग करू शकता. असं केल्यामुळे तुम्हाला एका वेगळ्या Crazy आणि passionate sex चा अनुभव मिळतो.

उदा. दिवसभर तुम्ही एकमेकांशी भांडत असल्यास, सेक्स करताना त्याच्या किंवा तिच्या मानेचा दुखणार नाही अशा प्रकारे चावा घेणं अथवा त्याच्यावर बसून सेक्स करणं

8. तुमच्यासाठी नक्की काय गरजेचं आहे

तुमच्यासाठी नक्की काय गरेजचं आहे हे तुम्ही तुमच्या जोडीदाराबरोबर नक्की शेअर करा. तुम्हाला जर थकवा वाटत असेल तर तुम्ही आपल्या जोडीदाराला तसं सांगा. कारण अशावेळी तुम्ही ना स्वतः आनंद मिळवू शकत ना आपल्या जोडीदाराला देऊ शकत. त्यामुळे जोडीदाराशी याबाबत बोलणं आणि त्यानेही समजून घेणं गरजेचं आहे. अशावेळी तुम्ही एकमेकांच्या जवळ राहून शारीरिक जवळीक मात्र नक्कीच निर्माण करू शकता. त्यावेळी तुम्हाला सेक्स करावं वाटलं तर एकमेकांच्या संमतीने सेक्स करा आणि त्यामुळे तुम्ही तुमचं सेक्स लाईफ निरोगी ठेऊ शकता.