या विचित्र फोटोंमुळे हे सेलिब्रिटी झाले होते चर्चेचा विषय

या विचित्र फोटोंमुळे हे सेलिब्रिटी झाले होते चर्चेचा विषय

कोणी काय घालावे काय घालू नये हा प्रत्येकाचा खासगी विषय असला तरी सेलिब्रिटींच्या बाबतीत मात्र ते लागू पडत नाही. ते काय घालतात. याकडे कायमच सगळ्यांचच लक्ष असतं. जर घातलेले कपडे अगदीच चांगले असतील तर त्या कपड्यांचा ट्रेंड सगळीकडे दिसू लागतो. पण जर तेच कपडे विचित्र असतील तर त्यांना ट्रोल देखील केले जाते. 90 च्या दशकात सेलिब्रिटींचे असेच काही फॅशन फोटो झाले होते ट्रोल… ज्यावर आजही अनेकांचे हसू आवरत नाही. हे सेलिब्रिटी कोण ते पाहुयात

शक्ती कपूर

आऊ… म्हटलं की, तुम्हाला पटकन डोळ्यासमोर आठवतो तो शक्ती कपूर.90च्या दशकात शक्ती कपूर म्हणजे फक्त आणि फक्त निगेटीव्ह रोल करणारा अभिनेता अशीच ओळख झाली होती. त्याच्या कामाव्यतिरिक्त जर काही लक्षात राहिलं असेल तर ते त्याचे फोटोशूट. तुम्ही कधी शक्ती कपूरचे विचित्र फोटो पाहिले आहेत का? नसतील पाहिले तर शक्ती कपूरचे हेच काही विचित्र फोटो त्या काळी इतके गाजले होते की, आताच्या भाषेत सांगायचे झाले तर चांगलाच ट्रोल झाला होता. काहीच दिवसांपूर्वी श्रद्धा कपूर हिने या  कपड्यांसाठी माझ्या वडिलांना पुरस्कार मिळायला हवा अशी प्रतिक्रिया दिली होती.

पाहा फोटो

social media

गोविंदा आणि जुही

twitter

गोविंदा आणि जुही यांचा हा फोटोही असाच काहीसा आहे. हा फोटो पाहून त्यावेळी नक्कीच त्यांच्यावर सगळे हसले असतील यात काहीच शंका नाही. त्यांनी अंगाला गुंडाळलेले अॅल्यनुमिअम फॉईल आणि तो चमकदार कागद. त्यांनी काढलेला हा फोटो फारच गाजला होता. या फोटोमागे नक्कीच काहीतरी थीम असेल. पण ती इतकी भयानक दिसू शकेल हे त्यांनाही कधी बाटले नसेल. पण हा फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला अंदाज आला असेलच.

रेखा

Instagram

रेखा या त्या काळात फॅशनक्वीन म्हणूनच प्रसिद्ध होत्या. पण प्रत्येकवेळी केलेली फॅशन चांगलीच असेल असे आपण ठामपणे सांगू शकत नाही. रेखाच्या बाबतीतही असेच  काहीसे झाले असे म्हणायला हवे. कारण त्यांचे असे अनेक फोटो अनेकांसाठी हसण्याचे कारण बनले. कपडे, हेअर स्टाईल.कधी मेकअप इतका विचित्र असायचा की,त्यांच्या या फॅशनवर कायमच बोलले जायचे. आता हा फोटो पाहून तुम्हाला अंदाज आलाच असेल.

आदित्य पांचोली

आदित्य पंचोलीने काढलेला हा न्यूड फोटो आजच्या काळासाठी काही नवा नाही. पण त्या काळात आदित्य पंचोलीने हा फोटो काढल्यानंतर फारच कॉन्ट्राव्हर्सीज झाल्या होत्या. आता तर असे न्यूड फोटो अनेक अभिनेते काढतात. पण आदित्य पंचोलीचा हा फोटो चांगलाच गाजला होता.

social media

अनिल कपूर

filmfare

अनिल कपूर आता जितका हँडसम दिसतो. तितकेच त्याच्या हेअरी बॉडीवर विनोद करण्यात आले आहेत. आता अनिल कपूरचा हा फोटो पाहिल्यानंतर अनिल कपूर केसांनी इतका भरलेला आहे की, त्याला शर्टाचीही गरज नाही असे काही विनोद आजही सोशल मीडियावर हिट आहेत. अनिल कपूरच्या केसांसारखाच टिशर्ट देखील तयार करण्यात आला होता. त्यामुळे त्याचे उघडे फोटो हे त्याकाळातील सगळ्यात फनी फोटोंपैकी एक होते. आताच्या अनिल कपूरकडे पाहिल्यानंतर त्याच्यात  किती बदल झाला हे लक्षात येईल. पण हा फोटो फारच विनोदी होता हे मात्र नक्की!

आता या शिवाय मिथुन चक्रवर्ती,रणजीत, मिलिंद सोमण यांचेही काही फोटो चांगलेच गाजले आहेत. तुम्हालाही असे कोणते सेलिब्रिटी माहीत आहेत का ज्यांनी फोटोशूटसाठी असेच काहीसे घातले होते आणि त्यांचे हे फोटो चांगलेच व्हायरल झाले होते. आम्हालाही नक्की कळवा