Flashback : सलमान खान ते आलिया... पाहा तुमच्या सेलेब्सचे Audition videos

Flashback : सलमान खान ते आलिया... पाहा तुमच्या सेलेब्सचे Audition videos

बॉलीवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी रोजच्या रोज मुंबईत अनेकजण येतात. पण इथे येऊन आपली ओळख बनवणं तेवढं सोपं नाही. मग तो सेलिब्रिटी किड असो वा कोणी चारचौघातून पुढे आलेला स्टार असो मेहनतही सगळ्यांनाच करावी लागते. प्रत्येकालाच प्रेक्षकांना आपलंस करण्यासाठी भरपूर पापड लाटावे लागतात. आज कोणी फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुपरस्टार असेल तर त्याला सुपर फ्लॉप व्हायला जराही वेळ लागत नाही.  


तुम्हाला माहीत आहे का, बॉलीवूडमध्ये आज स्टार्स म्हणवल्या जाणाऱ्या सेलेब्सनाही हे स्टारडम सहज मिळालं नव्हतं. शाहरूख खान, सलमान खान, रणवीर सिंह, आलिया भट्टसारख्या स्टार्सना अनेक ऑडिशन्स आणि रिजेक्शन्सना सामोर जावं लागलं आहे. मात्र या सगळ्यांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे ती म्हणजे मेहनत आणि कधीही हार न मानण्याची जिद्द.

बॉलीवूड स्टार्सचे अनसीन ऑडिशन व्हिडीओज

आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, बॉलीवूडच्या स्टार्सचे न बघितलेले ऑडिशन व्हिडीओज. जे पाहून तुम्हालाही त्यांच्या मेहनतीचा अंदाज येईल. तसंच पाहा की ऑडिशन ते आत्तापर्यंत तुमच्या आवडत्या सेलेब्समध्ये किती बदल झाला आहे.

सलमान खान

हा व्हिडीओ सलमान खानच्या सर्वात पहिल्या आणि सुपरहिट ठरलेल्या "मैंने प्यार किया" चित्रपटाच्या ऑडीशनचा आहे. या चित्रपटामुळे सलमान खान रातोरात मोठा स्टार झाला. पाहा या व्हिडीओत सलमान भाई किती क्युट दिसत आहे.

शाहरुख खान आणि गायत्री जोशी

जर तुम्ही विचार करत असाल की, स्टार झाल्यावर चित्रपटासाठी ऑडिशनद्यावं लागत नाही तर ते चुकीचं आहे. किंग खान शाहरूख आणि गायत्री जोशी यांचा हा आशुतोष गोवारीकरच्या स्वदेस या चित्रपटाचा ऑडिशनव्हिडीओ पाहा. तोपर्यंत शाहरूखने बॉलीवूडमध्ये किंग खान पद मिळवलं होतं. पण तरीही दिग्दर्शक आशुतोषने त्याचं या चित्रपटासाठी गायत्री जोशीसोबत ऑडिशनघेतलं होतं.

आलिया भट

आलिया भट ही फिल्मी घराण्यांतून आली आहे. असं असूनही फिल्म इंडस्ट्रीत नाव कमावण्याचा तिचा रस्ता सोपा नव्हता. खूप कमी जणांना माहीत असेल की, तिने स्टुडंट ऑफ द ईयर या तिच्या बॉलीवूड डेब्यू फिल्मआधी तिने रणबीर कपूरच्या वेकअप सिड मधील आयेशाच्या भूमिकेसाठी ऑडिशनदिलं होतं. पण ही भूमिका तिला मिळालं रिजेक्शन. नंतर तोच रोल कोंकणा सेनला मिळाला.

रणवीर सिंह

बाॅलीवूडमधील सर्वात एनर्जेटिक अॅक्टर रणवीर सिंहने इंडस्ट्रीत येण्याआधी अॅक्टींगचे धडे घेतले होते. हा व्हिडीओ त्याच्या अॅक्टींग क्लासमधील आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हाला कळेल की, इतक्या वर्षात रणवीरमध्ये कोणताही बदल झालेला नाही. आजही तो आपल्या विनोदी स्वभावाने सगळ्यांना हसवत असतो आणि तेव्हाही आपल्या पहिल्या अॅक्टींगच्या क्लासेसमध्ये सगळ्यांना हसवायचा.

दिशा पाटनी

टायगर श्राॅफची गर्लफ्रेंड दिशा पाटनीने आपल्या करिअरच्या सुरूवातीला माॅडेलिंग आणि काही जाहिरातींमध्ये काम केलं होतं. हा व्हिडीओ कोल्ड क्रिमच्या ऑडीशनसाठी दिलेला आहे. त्यावेळी दिशा पाटनी फक्त 19 वर्षांची होती. त्यामुळे तिला ओळखणंही कठीण होतं.

क्रिती सनोन

फिल्म “हीरोपंती” मधून आपल्या बॉलीवूड करिअरला सुरुवात केलेली अभिनेत्री क्रिती सनोनचा हा ऑडिशन व्हिडीओ तेव्हाचा आहे, जेव्हा ती फक्त 22 वर्षांची होती. हे म्हणणं चुकीचं ठरणार नाही की, बॉलीवूडची ही ‘बरेली की बर्फी’ आजही तितकीच सुंदर दिसते. जितकी ऑडीशनच्या वेळी दिसत होती.

ओमी वैद्य

चित्रपट “3 इडीयट्स” मधल्या चतुर रामालिंगम या कॅरेक्टरची गणती बाॅलीवूच्या एपिक कॅरेक्टर्समध्ये होते. या रोलसाठी अनेक अभिनेत्यांनी ऑडिशनदिलं होतं. पण दिग्दर्शक राजकुमार हिरानीला अभिनेता ओमी वैद्यचा अंदाज आवडला आणि रिजल्ट तुमच्यासमोर आहे.

जॅकलीन फर्नांडिस

श्रीलंकन ब्युटी जॅकलीन फर्नांडिस आज बाॅलीवूडमध्ये आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाली आहे.  व्हिडीओमध्ये पाहा तिने कसं आपल्या मोडक्या-तोडक्या हिंदीमध्ये कसं ऑडिशन दिलं होतं.

व्हिडीओ सौजन्य : Youtube