तुम्हालाही आहे थायरॉईडचा त्रास, जाणून घ्या थायरॉईडविषयी सगळे काही (Thyroid Symptoms In Marathi)

तुम्हालाही आहे थायरॉईडचा त्रास, जाणून घ्या थायरॉईडविषयी सगळे काही (Thyroid Symptoms In Marathi)

थायरॉईड हा आजार 10 पैकी 5 जणांना हमखास होतो. बदलत्या लाईफस्टाईलमुळेही हा आजार अनेकांना बळावताना दिसत आहे. विशेष म्हणजे महिलांमध्ये या आजाराचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक आहे. पुरुषांच्या तुलनेत महिला या अधिक धावपळ करतात. त्यांच्याकडे कामाच्याही जबाबदाऱ्या अधिक असतात. मासिक पाळी, गर्भावस्था या सगळ्यामुळे त्यांच्यात हार्मोन्स बदल होतात. त्यामुळेच महिलांमध्ये याचे प्रमाण अधिक असते. तुम्हालाही तुमच्यात काही बदल जाणवत आहेत का? ते थायरॉईड तर नाही ना? म्हणूनच तुमच्यासाठी थायरॉईडची A To Z  माहिती.


थायरॉईड म्हणजे काय


थायरॉईडचे प्रकार कोणते


थायरॉईड होण्याची कारणे


थायरॉईड लक्षणे


थायरॉईड वर घरगुती उपाय


थायरॉईड असणाऱ्यांनी हे खाऊ नका


सतत विचारले जाणारे प्रश्न


थायरॉईड म्हणजे काय? (What is Thyroid Meaning In Marathi) 


थायरॉईड ही एक लहान ग्रंथी मानेच्या खालच्या बाजूला असते. तिचे काम शरीराची चयापचय क्रिया नियंत्रणात ठेवणे असते. ही चयापचय क्रिया नियंत्रणात ठेवण्यासाठी थायरॉईड संप्रेरकांचे उत्सर्जन करत असते. जे शरीरातील पेशींना उर्जेचा वापर कसा करायचा ते सांगते. संप्रेरकांचे उत्सर्जन झाल्यानंतर त्याचा वापर शरीर करते. ही प्रक्रिया सतत सुरु राहते. जर ही प्रक्रिया बिघडली तर थायरॉईडचा त्रास बळावतो. म्हणजेच शरीराला आवश्यकतेपेक्षा जास्त संप्रेरके तयार करते आणि उर्जेत रुपांतर झालेल्या संप्रेरकांचा अधिक वापर केला जातो त्यावेळी तुम्हाला थायरॉईड हा आजार बळावतो.


थायरॉईडचे प्रकार कोणते (Types Of Thyroid In Marathi)


साधारणपणे थायरॉईडचे दोन प्रकार आहेत. ते पुढील प्रमाणे


%E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%88%E0%A4%A1%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%95%E0%A4%BE%E0%A4%B0 - Thyroid Symptoms In Marathi


वाचा - दररोज कॅल्शियमच्या आवश्यकतेबद्दल


हायपरथायरोडिझम (Hyperthyroidism)


तुमच्या ग्रंथी क्षमतेपेक्षा अधिक काम करतात. त्याला हायपरथायरोडिझम म्हणतात. लोकांमध्ये हायपरथायरोडिझमचे प्रमाण अधिक असते. रक्ताची चाचणी केल्यानंतर तुम्हाला याबद्दल कळू शकते.


ऑटोइम्यून हायपरथायरोडिझम (Autoimmune Hyperthyroidism)


जर हे प्रमाण अधिक वाढले तर हा प्रकार ऑटोइम्यून हायपरथायरोडिझममझ्ये मोडतो. हा प्रकारही पटकन ओळखता येत नाही. यासाठीही तुम्हाला रक्ताची चाचणी करण्याची गरज आहे.


थायरॉईड होण्याची कारणे (Thyroid Causes In Marathi)


थायरॉईड होण्याची कारणे आहेत ती देखील तुम्हाला माहीत हवीत. त्यामुळे सगळ्यात आधी थायरॉईड होण्याची कारणे. त्यामुळे तुम्हाला हा त्रास झाला आहे की नाही हे लक्षात येईल.


आयोडिनची कमतरता (Iodine Deficiency)


तुमच्या आहारात आयोडिनचे योग्य प्रमाण असणे आवश्यक असते. जर तुमच्या आहारातील आयोडिनचे प्रमाण कमी झाले असेल तर तुम्हाला हा त्रास होण्याची शक्यता असते.


औषधांचे दुष्परिणाम (Side Effects Of Medicine)


काही औषधे तुमच्यातील हार्मोन्सचे प्रमाण वाढवत असतात. जर तुम्ही कोणत्या आजाराने ग्रस्त असाल आणि तुमची औषधं सुरु असतील तर त्यांचा परिणामदेखील तुमच्याव होऊ शकतो.


बाळंतपणा (Post Pregnancy)


काही वेळा बाळंतपणानंतरही अनेक महिलांना थायरॉईडचा त्रास होतो. पण हा तात्पुरत्या स्वरुपाचा असू शकतो. या दिवसात स्त्रियांच्या शरीरामध्ये बरेच हार्मोन्सचे बदल होतात. शिवाय जर तुम्हाला हा त्रास असेल तर तुमच्या फर्टिलिटीवर याचा परिणाम होऊ शकतो. जेव्हा महिलांच्या शरीरामध्ये थायरॉईड ग्रंथी पुरेशा प्रमाणात थायरॉईड या हार्मोन्सची निर्मिती करत नागी. त्यावेळी थायरॉईडचा त्रास वाढतो. पुनरुत्पादनक्षमतेवरही याचा परिणाम होतो.  


ताणतणाव (Stress)


%E0%A4%A4%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A4%A4%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B5 - Thyroid Symptoms In Marathi


हल्ली आपले लाईफस्टाईल इतके बदलले आहे.धावपळीच्या युगात कधीही आणि कसेही खाल्ले जाते. तुमची कधीही आणि काहीही खाण्याची हीच सवय तुमच्या आरोग्यासाठी हानीकारक ठरु शकते. तुमच्या थायरॉईड ग्रंथीच्या कार्यात बिघाड होऊन तुम्हाला थायरॉईडचा त्रास होऊ शकतो.


अनुवंशिकता (Some Genetic Disorder)


अनेकदा थायरॉईडचा आजार होण्याचे कारण अनुवंशिकता असते. जर तुमच्या कुटुंबात कोणाला थायरॉईडचा त्रास असेल तर तुम्हाला देखील तो होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्ही  आहाराच्या बाबतीत काळजी घेणे आवश्यक आहे.


थायरॉईड लक्षणे (Thyroid Symptoms In Marathi)


थायरॉईडची कारणे जाणून घेतल्यानंतर आता थायरॉईडची लक्षणेसुद्धा जाणून घेणे महत्वाचे आहे. म्हणूनच आता आपण थायरॉईडची लक्षणे काय आहेत ते जाणून घेऊया.


वजन वाढणे (Weight Gain)


जर तुमचे वजन अचानक वाढत असेल तर तुम्हाला थायरॉईड असण्याची शक्यता आहे. थायरॉईडमध्ये तुमचे वजन वाढण्याचे कारण असे की, त्यावेळी तुमची पचनशक्ती मंदावते. तुम्ही जे खाता त्याचे फॅटमध्ये रुपांतर होते. तुमच्या शरीराला आवश्यक असणारी उर्जा तुम्हाला मिळत नाही. त्यामुळे तुम्ही कायम थकलेलेल दिसता. कोणत्याही अॅक्टिव्हिटीमध्ये सहभाग घेण्याची तुम्हाला मनापासून इच्छा होत नाही. हे देखील थायरॉईचे एक लक्षण आहे.


केसगळती (Hair Loss)


%E0%A4%95%E0%A5%87%E0%A4%B8%E0%A4%97%E0%A4%B3%E0%A4%A4%E0%A5%80 - Thyroid Symptoms In Marathi


आता तुम्ही खात असलेल्या पदार्थांपासून तुम्हाला काहीच प्रोटीन किंवा एनर्जी मिळत नसेल तर त्याचा तुमच्या शरीरावर चांगला परिणाम होण्याची शक्यता कमीच असते. तुमच्या केसांना आवश्यक असलेले घटक तुमच्या शरीराला न मिळाल्यामुळे तुमचे केस गळू लागतात.


नख पातळ होणे (Weak Nails)


थायरॉईड झाल्याचे हे पहिले लक्षण आहे. तुमच्या नखांमध्ये तुम्हाला बदल दिसू लागतात. तुमची नखं पातळ पडू लागतात. नखांना चिरा जायला सुरुवात होते. नख अगदी सहज तुटू लागतात.


*जर तुम्हाला तुमची नखं पातळ वाटत असतील तर तुम्ही लगेचच डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा.


सारखे आजारी पडणे (Affects Immune System)


तुम्हाला वरचेवर आजारपण येत असेल तर ते देखील थायरॉईडचे लक्षण आहे असे समजावे. तुमची प्रतिकारशक्ती थायरॉईडमुळे कमी होते. त्यामुळेच तुम्ही आजारी पडता. सतत आजारी पडल्यामुळे तुम्ही


मासिकपाळी अनियमित येणे (Irregular Periods)


%E0%A4%AE%E0%A4%BE%E0%A4%B8%E0%A4%BF%E0%A4%95%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B3%E0%A5%80 %E0%A4%85%E0%A4%A8%E0%A4%BF%E0%A4%AF%E0%A4%AE%E0%A4%BF%E0%A4%A4 %E0%A4%AF%E0%A5%87%E0%A4%A3%E0%A5%87 - Thyroid Symptoms In Marathi


थायरॉईडचा त्रास असेल तर अशा महिलांना अनियमित पाळीचा त्रास होऊ लागतो. जर एखाद्या महिलेच्या मासिक पाळीचा कालावधी 28 दिवसांचा असेल तर तो 40 दिवसांचा होतो. कधी कधी दोन महिले सलग पिरेड्स येतात. पुन्हा त्यामध्ये खंड पडतो. असे होत असल्यास तुमच्या शरीरातील हार्मोन्स बदलत आहेत. थायरॉईडचे ते लक्षण आहे.


शारिरीक बदल होणे (Changes In Body)


थायरॉईड झाल्यानंतर शरीरात अनेक बदल व्हायला सुरुवात होते. अंडरअॅक्टिव्ह थायरॉईड ग्लँडमुळे महिलांच्या आवाजात बदल व्हायला सुरुवात होते. त्यांचा आवाज पुरुषांसारखा वाटू लागतो. त्यांचा आवाज अधिक खरखरीत आणि रुक्ष ऐकायला येतो.


दुसरा बदल महिलांना जाणवतो तो म्हणजे महिलांमधील सेक्सची इच्छा कमी होत जाते. सेक्सची इच्छा कमी होण्यापर्यंतच हा बदल राहात नाही. जर याकडे दुर्लक्ष केले तर अनेकदा महिलांना सेक्सबद्दल घृणा निर्माण होते.ही काही थायरॉईडची लक्षणे आहेत.


कढीपत्त्याचे असतात भरपूर फायदे, तुम्हाला माहीत आहेत का ?


थायरॉईडच्या उपचारपद्धती (Medical Treatment For Thyroid In Marathi) 


आता तुम्हाला थायरॉईडचा त्रास असेल तर घाबरण्याचे काहीच कारण नाही. कारण थायरॉईडच्या उपचारपद्धती आहेत. तुम्ही योग्य सल्ल्यानंतर उपचार करुन घेऊ शकता. जाणून घेऊया थायरॉईडच्या उपचारपद्धती


आयोडिन ट्रिटमेंट (Iodine Treatment)


तुमच्या रक्ततपासणीनंतर तुम्हाला काही उपचारपद्धती सांगितल्या जातात. त्यापैकी  एक आहे ती म्हणजे आयोडिन ट्रिटमेंट. तुमच्या शरीरातील आयोडिनची कमतरचा या ट्रिटंमेंटने भरुन काढली जाते.


सर्जरी (Surgery)


जर तुमच्यातील थायरॉईडचा त्रास जेव्हा नियंत्रणाबाहेर जातो त्यावेळी तुम्हाला सर्जरीचा सल्ला दिला जातो. या सर्जरीमध्ये थायरॉईड ग्लँडचा काही भाग काढून टाकला जातो. पण अद्याप या सर्जरीबाबत लोकांमध्ये फार जागरुकता नाही.


औषधोपचार (Medicines)


थायरॉईडची लक्षणे तुम्हाला जाणवत असतील तर तुम्ही सगळ्यात आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. तुमच्या शरीरातील थायरॉईडचे प्रमाण तपासण्यासाठी तुम्हाला रक्ततपासणी करण्याचा सल्ला दिला जातो आणि त्यानंतर तुम्हाला काही औषधे दिली जातात. औषधोपचार हा अगदी सर्वसामान्य पर्याय तुम्हाला उपलब्ध करुन दिला जातो.


थायरॉईड वर घरगुती उपाय (Home Remedies For Thyroid In Marathi) 


मेडिकल सायन्स व्यतिरिक्त तुम्हाला घरगुती पद्धतीनेही थायरॉईडची काळजी घेता येऊ शकते. थायरॉईड वर घरगुती उपाय आहेत हे तुम्हाला माहीत नसतील तर जाणून घेऊया थायरॉईड वर उपाय. 


व्हिटॅमिन A आणि B असलेल्या पदार्थांचे सेवन (Food Contain Vitamin B)


आता तुम्ही काय खाऊ नये हे तुम्हाला कळले असेलच पण तुम्ही कोणत्या पदार्थांचे सेवन करायला हवे हे देखील तुम्हाला माहीत असे. थायरॉईड लवकर बरा करण्यासाठी तुम्ही व्हिटॅमिन A आणि B असलेल्या पदार्थांचे सेवन करावे.


अंडी (Eggs)


अंडी तुमच्या शरीराला आवश्यक असलेले प्रोटीन पुरवतात. त्यामुळे तुमच्या शरीराची क्रिया सुरळीत करण्यासाठी तुम्ही अंडी खाणे आवश्यक आहे.


%E0%A4%85%E0%A4%82%E0%A4%A1%E0%A5%80 - %E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%88%E0%A4%A1 %E0%A4%B5%E0%A4%B0 %E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF


चीझ (Cheese)


तुमच्या शरीराला प्रोटीनसोबतच फॅटची देखील गरज असते. चीझ क्युब मधून तुम्हाला फॅट मिळू शकते. त्यामुळे तुम्हाला एनर्जी देखील मिळते.


मासे (Fish)


माशांमधील फिश ऑईल तुमच्या शरीरासाठी चांगले असते. माशामध्ये असलेले आयोडिनचे प्रमाण तुमच्यामधील आयोडिनची कमतरचा भरुन काढते.


मटारचे दाणे (Peas)


%E0%A4%AE%E0%A4%9F%E0%A4%BE%E0%A4%B0%E0%A4%9A%E0%A5%87 %E0%A4%A6%E0%A4%BE%E0%A4%A3%E0%A5%87 - %E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%88%E0%A4%A1 %E0%A4%B5%E0%A4%B0 %E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF


मटारचे दाणे देखील तुम्ही खायला हवेत. तुमच्या आहारात तुम्ही याचा समावेश करायला हवा.


तीळ (Sesame Seeds)


तिळाचे सेवनही तुमच्यासाठी चांगले असू शकते.  तिळामध्ये असलेले मिनरल्स थायरॉईड नियंत्रणात आणण्यास मदत करते.


गाजर (Carrots)


गाजरमध्ये असलेले व्हिटॅमिन A तुमच्या थायरॉईडचा त्रास कमी करु शकते. त्यामुळे तुम्ही तुमच्या आहारात गाजराचा समावेश करा.


पालक (Spinach)


%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A4%95 - %E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%88%E0%A4%A1 %E0%A4%B5%E0%A4%B0 %E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF


पालकामध्ये लोहाचे प्रमाण चांगले असते. यात असलेल व्हिटॅमिन्स तुमच्या शरीरातील हार्मोन्स नियंत्रणात आणू शकते. शक्य तितक्या जास्त हिरव्या पालेभाज्या तुम्ही खाण्यास काहीच हरकत नाही.


साखर नसलेले पदार्थ (Sugar Free Diet)


या शिवाय तुमच्यासाठी साखर नसलेले पदार्थ हे उत्तम आहेत. साखरेमुळे थायरॉईडचा त्रास अधिक वाढू शकतो. त्यामुळे शक्यतो साखर असलेले पदार्थ खाऊ नका.


प्रोटीन असलेले पदार्थ (Protein Food)


तुमच्या शरीराला या काळात प्रोटीनची अधिक आवश्यकता असते. त्यामुळे या दिवसात तुमच्या आहारात चिकन, अंडी, मासे यांचे योग्य प्रमाण असू द्या. 


 बिनधास्त खा भात कारण भात खाण्याचे आहेत भरपूर फायदे


थायरॉईड असणाऱ्यांनी हे खाऊ नका (Foods To Avoid With Thyroid)


जर तुम्हाला थायरॉईड झाला आहे असेल आणि तुमचे उपचार सुरु असतील तर तुम्हाला काही गोष्टींचे पालन करणे गरजेचे आहे. विशेषत: तुमच्या आहाराच्या बाबतीत तुम्हाला फार जागरुक असणे गरजेचे असते.त्यामुळे तुम्ही या कालावधीत काय खायला हवे आणि काय टाळायला हवे याची एक यादीच आम्ही केली आहे.


तळलेले पदार्थ (Fried Food)


थायरॉईड झाल्यानंतर तुम्हाला तुमच्यातील हार्मोन्स नियंत्रणात ठेवण्यासाठी काही गोळ्या जातात. त्या गोळ्यांचे सेवन करत असताना जर तुम्ही तेलकट पदार्थांचे सेवन केले तर त्या गोळ्यांचा परिणाम तुमच्यावर होत नाही. त्यामुळे थायरॉईड असलेल्या व्यक्तींना तेलकट पदार्थ टाळण्याचा सल्ला दिला जातो.


कॉफी (Coffee)


%E0%A4%95%E0%A5%89%E0%A4%AB%E0%A5%80 - %E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%88%E0%A4%A1 %E0%A4%B5%E0%A4%B0 %E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF


काही जणांना सतत कॉफी पिण्याची सवय असते. पण तुम्हाला थायरॉईड असेल तर तुम्हाला ही सवय सोडणे फारच गरजेचे आहे. थायरॉईडमध्ये असलेले एपिनेफ्रिन आणि नोरेपिनेफ्रिन हे घटक थायरॉईड कमी न करता वाढवतात.


साखर (Sugar)


थायरॉईड असलेल्यांसाठी साखर खाणेही चांगले नाही. त्यामुळे अशांनी त्यांच्या आहारातून साखर वगळणे फारच गरजेचे आहे.


ग्लुटेन (Gluten)


ग्लुटेन असलेल्या पदार्थांमध्ये असे प्रोटीन असते जे तुमची प्रतिकारशक्ती कमी करते. थायरॉईड झाल्यानंतर तुमची प्रतिकारशक्ती आधीच कमी झालेली असते. त्यामुळे तुम्ही ग्लुटेन असलेले पदार्थ अजिबात खाऊ नये. उदा. गहू, रवा,नाचणी,बेसन इत्यादी


सोयाबीन (Soyabean)


%E0%A4%B8%E0%A5%8B%E0%A4%AF%E0%A4%BE%E0%A4%AC%E0%A5%80%E0%A4%A8 - %E0%A4%A5%E0%A4%BE%E0%A4%AF%E0%A4%B0%E0%A5%89%E0%A4%88%E0%A4%A1 %E0%A4%B5%E0%A4%B0 %E0%A4%89%E0%A4%AA%E0%A4%BE%E0%A4%AF


असं म्हणतात की, थायरॉईड असलेल्यांनी सोयाबीन अजिबात खाऊ नये कारण त्यामुळे तुम्हाला थायरॉईडचा त्रास अधिक होऊ शकतो. पण असे कुठेही सिद्ध झालेले नाही. पण जर तुम्हाला तुमच्या डॉक्टरांनी हे टाळण्याचा सल्ला दिला तर तुम्ही सोयाबीनचे सेवन करु नका. कारण जर तुमच्या शरीरात आयोडिनचे प्रमाण योग्य असेल तर तुम्ही सोयाबीन आरामात खाऊ शकता.


सतत विचारले जाणारे प्रश्न (FAQ's)


थायरॉईड तुमच्या शरीरावर काय परिणाम करते?


थायरॉईड असलेल्या व्यक्तींच्या मानेखानी जाड जाड दिसायला लागते. डबलचीनपेक्षाही हा भाग जास्त मोठा दिसू लागतो. याशिवाय महिलांमध्ये सेक्सची इच्छा कमी होते. जर याचा त्रास अधिक असेल तर सेक्सबद्दल घृणा वाटायला लागते.


थायरॉईडची सुरुवातीची लक्षणे काय आहेत?


वजन वाढणे, केस गळणे, नख तुटणे आणि वरचेवर आजारी पडणे ही थायरॉईडची लक्षणे आहेत. जर तुम्हाला याचा त्रास होत असेल तर तुम्ही तातडीने डॉक्टरांची भेट घ्या


गरोदरपणात थायरॉईडचा त्रास होऊ शकतो का?


बाळंतपणानंतर तुम्हाला थायरॉईडचा त्रास काही कालावधीसाठी बळावण्याची शक्यता असते. हा त्रास तुम्हाला नियंत्रणात आणता येतो. पण जर तुम्हाला थायरॉईडचा त्रास आधी झाला तर तुम्हाला गर्भधारणा करण्यास अडचणी येऊ शकतात.


थायरॉईड कसे दिसतात?


थायरॉईडची ग्रंथी तुमच्या मानेखाली असते. ती सूजल्यासारखी दिसते. काहींना ही सूज येत नाही. काहींचे वजन वाढते. काहींना थायरॉईडचा त्रास झाल्यानंतर वेगवेगळे त्रास व्हायला सुरुवात होते.


थायरॉईड बरा होऊ शकतो का?


तुम्हाला थायरॉईड नियंत्रणात नक्कीच आणता येऊ शकतो. थायरॉईड ग्रंथीच्या बिघाडामुळे झालेला हा त्रास तुम्हाला नियंत्रणात आणण्यासाठी योग्य आहार घेणे आवश्यक असते. या शिवाय तुम्हाला योग्य औषधोपचार घेणेही आवश्यक आहे.


फोटो सौजन्य  - Shutterstock


You Might Like This:


मधुमेहासंदर्भात तुम्हाला आहे का सगळी माहिती, नसेल तर वाचा