प्लास्टिक सर्जरीनंतर असे दिसू लागले हे सेलिब्रिटी, पाहा फोटो

प्लास्टिक सर्जरीनंतर असे दिसू लागले हे सेलिब्रिटी, पाहा फोटो

सुंदर दिसायला कोणाला आवडत नाही. सतत पडद्यावर दिसणाऱ्या सेलिब्रिटींना तर कायमच त्यांच्या सौंदर्याकडे लक्ष द्यावे लागते.इतके सुंदर असूनही जर त्यांना त्यांच्या सौंदर्यात जर काही कमी वाटली तर आता प्लास्टिक सर्जरीचा पर्याय अगदी सहज उपलब्ध आहे. अशाच काही सेलिब्रिटींनी इंडस्ट्रीत आल्यानंतर प्लास्टिक सर्जरीचा पर्याय अवलंबून त्यांनी त्यांचे सौंदर्य अधिक खुलवले. पण काहींनी केलेल्या प्लास्टिक सर्जरीमुळे त्यांच्या सौंदर्यात वाढ झाली असे त्यांच्या चाहत्यांना वाटले नाही. पाहा अशाच काही सेलिब्रिटींचे प्लास्टिक सर्जरी पूर्वीचे आणि प्लास्टिक सर्जरीनंतरचे फोटो..

दीपिकाला लागले गरोदरपणाचे वेध,वाचा

मौनी रॉय

Instagram

‘देवो के देव महादेव’ आणि ‘नागिन’ या मालिकेतून मौनी रॉय हिने स्मॉल स्क्रिन इंडस्ट्रीमध्येय पदार्पण केले. इंडस्ट्रीत एक नवा चेहरा आल्यानंतर मौनी रॉयला खूपच पसंती मिळाली. त्यानंतर अचानक मौनी रॉय बदललेली दिसली. तिच्या चेहऱ्यात फरक जाणवू लागला होता. हा फरक मेकअपचा नव्हता.तर तिने केलेल्या सर्जरीमुळे हा फरक झाला होता. तिने लीप्स जॉब केला असून तिने तिचे पातळ ओठ मोठे करुन घेतले आहे.प्लास्टिक सर्जरी करुन आल्यानंतर तिला अनेकांनी तिला तिच्या या नव्या ओठांवरुन ट्रोल केले होते पण एक नक्की की, ही प्लास्टिक सर्जरी केल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर्सही मिळाल्या. गोल्ड. K.G.F या चित्रपटा तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या. आणि आता आणखी एक चित्रपट तिच्याकडे आहे तो म्हणजे धर्मा प्रोडक्शनचा 'ब्रम्हास्त्र'

राखी सावंत

Instagram

बॉलीवूडची डान्सिंग दिवा आणि आयटम गर्ल राखी सावंत तिच्या सुरुवातीच्य काळात दिसायला चांगली होती असे म्हटले जात होते. पण आता तिने केलेल्या प्लास्टिक सर्जरीनंतर मात्र तिच्या चेहऱ्यात अनेक बदल झाले. ते बदल आता चांगले नाही, त्याचे तिच्या चेहऱ्यावर वाईट परिणाम झाले. जर तुम्हाला राखी सावंत ‘परदेसिया’ या गाण्याच्या रिमिक्समधून लोकांच्या समोर आली. त्या गाण्यात ती खूप चांगली दिसत होती. पण आता तिच्या चेहऱ्यातील या बदलामुळे लोक तिला प्लास्टिक असं म्हणतात. तिने तिच्या चेहऱ्यावरच नाही. तर बुब्सवरदेखील प्रयोग केले आहेत. तिने सिलिकॉनचे बुब्स लावले असून तिचे सध्या सगळ्यात जास्त सर्जरी केल्या आहेत असे कळत आहे.

गायिका सावनी रविंद्रची ही नवी म्युझिकल सीरिज ऐकलीत का?

शमा सिकंदर

Instagram

शमा सिंकदरचे यासाठी आवर्जून नाव घ्यावे लागेल कारण एकेकाळी मालिकेत अगदी साधी दिसणारी ही अभिनेत्री आता ग्लॅमरस झाली आहे. काळानुरुप हा बदल झाला नाही. तर हा बदल तिने प्लास्टिक सर्जरीतून करुन घेतला आहे. सध्या दुबईत राहणाऱ्या शमाने नाक, हनुवटी, ओठ यांवर प्लास्टिक सर्जरी केली आहे. तिने केलेल्या या प्लास्टिक सर्जरीमुळे तिचा चेहरा अधिक खुलला आहे. पण शमा सिंकदरच्या काही चाहत्यांना हा बदल अगदीच फेक वाटतो. तिच्या गालावर असणारी खळी आता या सर्जरीनंतर दिसेनाशी झाली आहे.

कोयना मित्रा

Instgram

कोयना मित्रा हे नाव तसं आता कोणाच्या फार लक्षातही राहिले नसेल. पण मायकल जॅक्सननंतर विचित्र दिसणारी जर कोणी सेलिब्रिटी असेल तर ती कोयना मित्रा.. बाँग ब्युटी असलेल्या कोयनाने चेहऱ्यावर अशा काही सर्जरी केल्या की, त्यानंतर ती पुरुषासारखीच दिसू लागली. अपना सपना मनी मनी, रोड, इन्सान आणि साऊथच्या काही चित्रपटांमध्ये ती दिसली होती. आजही तिचे फॅनक्लब पेज सोशल मीडियावर आहे. पण तिचे फोटो पाहिल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल हे नक्की

आता कंगनाला दिला ह्रतिकच्याच बहिणीने पाठिंबा

आएशा टाकिया

Instagram

अत्यंत गोड चेहरा असलेली ही अभिनेत्री आता मात्र फारच वेगळी दिसू लागली आहे. काहीच वर्षांपूर्वी तिने लीप जॉब करुन घेतला आणि तिचे सौंदर्य बिघडले असे अनेक जणांचे म्हणणे आहे. आएशाने अनेक चित्रपटात काम केले आहे. बाल कलाकार म्हणून ती या इंडस्ट्रीमध्ये आली.तिच्या अनेक जाहिराती प्रसिद्ध होत्या.तिने टारझन, वॉन्टेड,डोर,सोचा ना था अशा चित्रपटांमधून तिने काम केली आहेत.  तिने आबू आझमीचा मुलगा फरहान आझमी याच्याशी 2009 साली लग्न केलं आणि तिने या इंडस्ट्रीला रामराम केला.

तर हे असे काही सेलिब्रिटी आहेत. त्यांच्या चेहऱ्यात प्लास्टिक सर्जरीनंतर खूप बदल झाला आहे. हा बदल काहींना चांगला वाटला तर काहींना तो फारच विचित्र वाटला.