ADVERTISEMENT
home / Recipes
विविध राज्यातील खास चटकदार चटण्या

विविध राज्यातील खास चटकदार चटण्या

 

पावसाळ्याच्या दिवसात भाज्यांची आवक बाजारात कमी होते. अशावेळी तोंडी लावायला भाजीऐवजी तुम्ही चटकदार चटण्या करू शकता. ज्या तुम्हाला बनवता येतील झटपट आणि लागतील रूचकर. अशाच काही चटण्यांच्या खास रेसिपीज आम्ही आज तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. या चटण्यांचा तुमच्या रोजच्या जेवणात समावेश करा आणि आहाराला परिपूर्ण रूप द्या.

चटणीचं भारतीय आहारातील महत्त्व

 

चटणीला भारतीय ताटात खास स्थान देण्यात आलं आहे. अगदी पूर्वापारपासून आपल्या ताटात डाव्या बाजूला विविध चटण्या आणि कोंशिबीरींना विशेष समावेश करण्यात आला. ज्या तोंडी लावणं म्हणून आजही आपण रोजच्या जेवणात वापरतो. एखाद्या दिवशी घरात नावडती भाजी बनवली असल्यास आपल्याला आधार असतो तो या चटण्यांचा. ज्या भातासोबत किंवा पोळीसोबत सहज खाता येतात. काहीवेळा भाजी करायचा कंटाळा आल्यास ताजी चटणी बनवून तुम्ही ती जेवणासाठी वापरू शकता.

पूड चटणी आणि रेसिपीज

 

मराठवाड्यात आणि महाराष्ट्राच्या कर्नाटक सीमावर्ती भागात पूड किंवा पोडी चटणी केली जाते. या चटणीचा वापर तोंडी लावण्यासाठी तसेच अनेक पदार्थ बनवण्यासाठीही केला जातो. दाक्षिणात्य पदार्थांच्या जोडीलाही चटणी सर्रास असते. पाहूया या लातूरची माहेरवाशिण आणि आता मुंबईकर असलेल्या अंजली भातंब्रेकर यांनी सांगितलेली पूड चटणीची ही  कृती –

साहित्य –

ADVERTISEMENT

दीड वाटी हरभरा डाळ,

अर्धी वाटी उडीद डाळ

अर्धी वाटी तीळ

अर्धी वाटी किसलेलं सुकं खोबरं

ADVERTISEMENT

अर्धी वाटी धने,

2 चमचा जीरं,

15-20 सुक्या बेडगी लाल मिरच्या

1 वाटी कडीपत्ता

ADVERTISEMENT

लिंबाएवढी चिंच

चिंचेएवढाच गूळ

अर्धा टीस्पून हिंग

मीठ चवीनुसार

ADVERTISEMENT

कृती

आधी दोन्ही डाळी मंद आचेवर भाजून धणा जिरं भाजून घ्या. नंतर जाडसर वाटून घ्या. तीळं आणि सुकं खोबर भाजून घ्या.  फोडणी करून त्यात हिंग, मोहरी, कडीपत्ता मिरची आणि तीळ, सुकं खोबरं परतून घ्या. जाडसर भरडलेली डाळींची भरड त्यात घाला. नंतर चिंच-गूळ मिक्स करा. सर्व मिश्रण नीट परतून नंतर वाटून घ्या. पूड चटणी तयार आहे.

पूड चटणी घालून करायच्या काही रेसिपीज –

  • पूड चटणी तुम्ही खोबऱ्याच्या चटणीऐवजी डोसा किंवा इडलीसोबत खाऊ शकता किंवा डोस्यावरही लावून म्हैसूर डोसासारखं खाऊ शकता.
  • लावलेले पोहे हीसुद्धा पूडचटणीपासून बनवण्यात येणारी प्रसिद्ध रेसिपी आहे. यासाठी आधी पातळ पोहे किंवा चिवड्याचे पोहे भाजून घ्या. मग या पोह्यांना मेतकूट, मीठ आणि पूड चटणी घालून मिक्स करा. तेल गरम करून त्यात भरपूर कोथिंबीर घालून तडतडू द्या आणि ही फोडणी पोह्यांवर घाला. लावलेले पोहे तयार आहेत.

 वाचा – खमंग चिवडा रेसिपी, बनवा घरच्या घरी

ADVERTISEMENT

instagram

कांद्याची चटणी

 

आपल्याकडे कांद्याची चिंच-गूळ घालून चटणी केली जाते. पण ही चटणी त्यापेक्षा वेगळी आहे. या चटणीसाठी कांदा फ्राय करून घेतला जातो. मग त्यात भाजलेला लसूण आणि टोमॅटो घातला जातो. हे सर्व थंड करून ते वाटून त्याची चटणी केली जाते. पण ही चटणी खाताना तुम्हाला कांदा खाण्याचे फायदे माहीत असायला हवे.

साहित्य –

2 कांदे

ADVERTISEMENT

4 टोमॅटो

अर्धा चमचा लाल तिखट

दोन चिमूट हळद पावडर

अर्धा चमचा धने पावडर

ADVERTISEMENT

लसूण तीन ते चार पाकळ्या

थोडंसं आलं

एक चिमूट हळद

जीरं अर्धा चमचा

ADVERTISEMENT

बारीक चिरलेली कोथिंबीर

मीठ चवीनुसार

एक चमचा तेल

कृती

ADVERTISEMENT

ही चटणी बनवण्यासाठी आधी कांदा बारीक चिरून घ्या आणि कढईत तेलावर भाजून घ्या. नंतर त्यात टोमॅटो आणि लसूण घालून परतून घ्या.  थंड झाल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्या. नंतर पॅनमध्ये पुन्हा तेल घेऊन जीऱ्याची फोडणी द्या. नंतर त्यात हिंग, लाल तिखट, धने पावडर, हळद घाला. मग वाटलेली पेस्ट घालून त्यात शेवटी मीठ घाला.

वाचा – Samosa Recipe In Marathi

राजस्थानची प्रसिद्ध लसूण चटणी

 

राजस्थानची खासियत असलेली ही लसूण चटणी चवीला तिखट आणि चटपटीत असते. जर तुम्हाला भाजी खायचा कंटाळा आल्यास किंवा काहीतरी चटपटीत खायची इच्छा झाल्यास तुम्ही लसूणची ही झणका असलेली चटणी नक्की करून पाहा.

साहित्य –

ADVERTISEMENT

सुकलेल्या लाल मिरच्या – 15-20 मिनिटं किंवा एक तास कोमट पाण्यात भिजवून ठेवा.

लसूण पाकळ्या – 15 ते 20

एक चमचा तेल

आल्याचा छोटा तुकडा

ADVERTISEMENT

मीठ चवीनुसार

मोहरी – अर्धा चमचा

जीरं – अर्धा चमचा

हिंग – एक चिमूट

ADVERTISEMENT

कृती-

भिजवलेल्या मिरच्यांमधील बिया काढून टाका. जर तुम्हाला तिखट चटणी चालणार असेल तर बिया राहू द्या. मिक्सरमध्ये चटणी वाटण्यासाठी आलं, लसूण आणि मिरच्यांमध्ये थोड पाणी घालून पेस्ट बनवून घ्या. आता एका पॅनमध्ये तेल घेऊन ते गरम झाल्यावर हिंग, जीरं आणि मोहरी घालून थोडं परतून घ्या. जीरं तडतडल्यावर त्यात वाटलेली पेस्ट घाला. ही पेस्ट चांगली परतून घ्या. चांगला घमघमाट आणि तेल सुटल्यावर गॅस बंद करा. ही चटणी तुम्ही पोळी, पराठा किंवा पुरीसोबत खाऊ शकता. ही चटणी हवाबंद डब्यात फ्रिजमध्ये ठेवल्यास तीन महिन्यांपर्यंत टीकते. ही चटणी तुम्ही भाज्यांमध्येही वापरू शकता.

लखनवी हिरवी चटणी

 

लखनऊची खासियत असलेली ही चटणी अगदी साधी सोपी अशी याची रेसिपी आहे. ज्यामध्ये कोथिंबीर, पुदीना, हिरवी मिरची आणि दही घालून बनवली जाते. लखनऊमध्ये चटणी खास कबाबसोबत दिली जाते. याची चव फारच शाही असते. तुम्हीही पावसाच्या थंडगार वातावरणात गरमगरम भजीसोबत ही मस्त हिरवी चटणी खाऊ शकता.

खास खिचडीसाठी लज्जतदार चटणी

 

ही चटणी खास खिचडीसोबत खाल्ली जाते. जी तुमच्या खिचडीच्या साध्या बेताला करेल चटकदार. या चटणीसाठी लागणारं साहित्यही घरात सहज उपलब्ध असतं.

ADVERTISEMENT

साहित्य –

15 हिरव्या मिरच्या

लसूण – 10 ते 15 पाकळ्या

भाजलेले शेंगदाणे तीन चमचे

ADVERTISEMENT

मीठ चवीनुसार

तेल दोन चमचे

कृती

हे सर्व मिश्रण एकत्र करून चांगलं वाटून घ्या आणि नंतर पॅनमध्ये तेल घालून चांगल परतून घ्या. असं केल्याने या चटणीची चवही चांगली लागते आणि ती जास्त दिवस टिकतेही.

ADVERTISEMENT

मग घरी नक्की करून पाहा या चटकदार चटण्या. 

फोटो सौजन्य – Instagram

24 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT