कितीही भीती वाटली तरी हॉरर चित्रपट पाहायला आणि पुस्तके वाचायला अनेकांना आवडतात. आता भूत आहेत किंवा नाही या वादात आम्हाला पडायचे नाही. पण अनेकांकडून भूताच्या काही गोष्टी ऐकल्यानंतर काही भूतांची नावे तुमच्याही कानावरही पडली असतील किंवा तुम्ही देखील भूतांच्या काही गोष्टी ऐकल्या असतील. अशाच काही प्रचलित भूतांची यादी आम्ही केली आहे. तुम्हालाही ही भूतं किंवा त्यांच्या गोष्टी माहीत आहेत का ?
मानकाप्या :
मानकाप्या भूताबद्दल ही तुम्ही नक्कीच कोणाकडून ऐकले असेल. या भूताला नुसते धड असते. वर मुंडके नसते. म्हणूनच त्याला मानकाप्या भूत म्हणतात. हा भूत म्हणे कधी घोड्यावर तर कधी तर कधी चालत फिरत असते. मुंबईतील अनेक ठिकाणी आजही मानकाप्या भूताचा वावर आहे, असे म्हटले जाते. हा भूत नेमकं काय करतो या बाबत एकमत असे नाही. पण या भूताच्या मार्गावर आले तर तो तुम्हाला मारतो असे म्हणतात.
देवचार:
कोकणातील असाल तर तुम्हाला हमखास देवचार हे नाव माहीत असेल. आता देवचार म्हणजे काय ? हे तुम्हाला माहीत नसेल तर वाचा.
तर देवचार म्हणजे एखाद्या गावाचा राखणदार. जो एका ठराविक मार्गाने मार्गक्रमण करतो. त्याच्या तो जात असताना त्याच्या मार्गात आल्यानंतर तो पहिल्या दोव वेळा सोडून देतो असे म्हणतात आणि जर तुमच्याकडून ही चुकी पुन्हा झाली तर मात्र तो तुम्हाला त्रास देतो असे सांगितले जाते. त्याचे काम गावाची रक्षा करणे आहे.
अनेकांना याचा अनुभव आला आहे आणि त्यांनी तो अनुभव सांगितला देखील आहे. काही जणांचे असे म्हणणे आहे की, देवचार हा वेगवेगळ्या रुपात दिसतो. जर तुम्ही चुकीच्या वेळी कुठे असाल तर तो तुम्हाला घाबरवू शकतो. काहींना हा देवचार काठी आणि खांद्यावर घोंगडी अशा रुपात दिसला आहे. आधी सर्वसामान्य माणसाच्या उंचीचा वाटणारा देवचार अचानक उंच होतो. देवचारमुळे कोणाचा मृत्यू झाला असे कधीही ऐकलेले नाही.
चकवा:
चकवा हा काय भूताचा प्रकार नाही. पण असं म्हणतात की, चकवा एक भूतांची भूल द्यायची पद्धत आहे. अनेकांना हा अनुभव आला आहे. अगदी काहीच अंतरावर तुम्हाला जायचे असते. पण हा चकवा लागल्यानंतर तुम्हाला तुमची वाट शोधणे अगदीच कठीण होऊन जाते. चकवा हा रात्रीच्या वेळीच लागतो असे नाही तर तो दिवसाही लागू शकतो. असं म्हणतात की, चकवा कधी कधी प्राण्यांच्या रुपातही लागतो.
अनेकांनी चकवा लागण्याच्या गोष्टी शेअर केल्या आहेत.प्रत्येकाचे अनुभव हे वेगळे आणि तितकेच भयानक आहे.
मुंजा:
जो ब्राम्हण मुलगा मुंज झाल्यानंतर सोड मुंज होण्याआधीच मरतो त्याला मुंजा असे म्हणतात. मुंजा याचे मुख्य स्थान पिंपळाचे झाड आहे. तो पिंपळाच्या झाडावर राहतो असे म्हणतात. मुंजाने कोणाला मारले आहे, असे कधीच ऐकण्यात आले नाही. पण हा भूत तुम्हाला घाबरवण्याचे काम करतो असे सांगितले जाते. या भूताचा प्रकार एकदम वेगळा आहे. असे म्हणायला हवे.
खवीस:
खवीस हा प्रकार मुस्लिमांमध्ये येतो असे म्हणतात. हे भूत फारच त्रासदायक असते असे अनुभव अनेकांनी सांगितले आहे. ज्याचा मृत्यू अत्यंत क्रूररित्या होतो. त्याचे रुपांतर खवीसमध्ये होते असे म्हणतात. त्यामुळे या भूताच्या वाट्याला आल्यानंतर तो तुम्हाला सोडत नाहीत असे म्हणतात.अनेक ठिकाणी हे भूत आहे असे मानले जाते.
* भूताचे हे असे प्रकार असल्याचे म्हटले जाते. या संदर्भात आलेले अनुभव अनेकांना सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या पोस्टच्या माध्यमातून अंधश्रद्धा पसरवण्याचा आमचा कोणताही हेतू नाही.