जुन्या मालिकांमधील स्टार्स आता दिसतात असे, पाहा फोटो

जुन्या मालिकांमधील स्टार्स आता दिसतात असे, पाहा फोटो

कितीतरी जुन्या मालिका आजही अनेकांच्या लक्षात असतात. ती मालिका, मालिकेचे टायटल साँग आणि त्यातील काही कॅरेक्टर्स आपण काहीही केल्या विसरु शकत नाही.अशाच काही मालिका आहेत ज्यांमधून काही कलाकारांना फारच प्रसिद्धी मिळाली.या मालिकांमुळेच ते घराघरात पोहोचले. पण तुम्हाला आवडणाऱ्या मालिकेतील हेच स्टार्स आता कसे दिसतात तुम्हाला माहीत आहे का? मग पाहुयात अशाच काही कलाकारांचे बदललेले फोटो

उर्वशी ढोलकिया

Instagram

कसौटी जिंदगी की, या मालिकेतून घराघरात पोहोचलेली कमोलिका म्हणजेच उर्वशी ढोलकिया.. बालाजी टेलिफिल्सच्या या मालिकेत कमोलिका नावाचे ग्रे शेड असलेले पात्र निभावून देखील उर्वशी फारच प्रसिद्ध झाली. प्रेरणाला सतत त्रास देणारी ही कमोलिका आणि तिचा मेकअप त्यावेळी फारच प्रसिद्ध होता. तिने लावलेली टिकली, तिची ग्लॉसी लिपस्टिक आणि तिच्या केसांचा तो आकडा… प्रेरणापेक्षाही कमोलिकाचा भाव हा त्यावेळी अधिक होता. या मालिकेनंतर उर्वशी ढोलकिया अनेक बिग बॉग, सच का सामना अशा रिअॅलिटी शोमध्ये ती दिसली.बिग बॉस या रिअॅलिटी शोची ती विजेती आहे. तिने अनेक मालिकांमधून काम केले आहे.आता ती ‘नच बलिये’मध्ये दिसणार आहे.

करण वाही

Instagram

हँडसम म्हणून ओळखला जाणारा करण वाही…आता फारच बदलला आहे. जर तुम्हाला त्याची जुनी मालिका आठवत असेल तर त्याने त्याच्या अभिनयाची सुरुवात Remix या मालिकेपासून केली. त्यानंतर तो अनेक मालिकांमधून दिसला.त्याने साकारलेली प्रत्येक भूमिका त्याला लोकांपर्यंत घेऊन गेली. नुकताच त्याने उर्वशी रौतेलासोबत एक चित्रपटही केला.या चित्रपटात त्याची महत्वपूर्ण भूमिका होती. पण त्याचा जुना फोटो आणि आताचा फोटो पाहाल तर तुम्हाला त्यात झालेला बदल लक्षात येईल.

श्वेता गुलाटी

Instagram

साधारण 2004 च्या दरम्यानची Remix ही मालिका. या मालिकेत करण वाहीसोबत मुख्य भूमिकेत श्वेता गुलाटी होती. तिलासुद्धा या मालिकेतून ओळख मिळाली. या मालिकेत तिने टिया अहुजा नावाची भूमिका साकारली होती. तर त्यानंतर आलेल्या दिल मिल गये या प्रसिद्ध मालिकेत तिने डॉ. निकिता मल्होत्रा नावाचे कॅरेक्टर साकारले होते. सब टीव्हीवर सुरु असलेल्या पार्टनर्स या मालिकेत देखील ती दिसली होती.

करण सिंह ग्रोवर

Instagram

दिल मिल गये या मालिकेतील डॉ. अरमान मलिकची भूमिका साकारणारा करण आजही अनेकांच्या लक्षात असेल नाही का? करण सिंह ग्रोवरच्या बाबतीत सांगायचे तर या मालिकेनंतर त्याचा करिअर ग्राफ नेहमीच चढता राहिला आहे. कबुल है, कितनी मस्त है जिंदगी, सोला श्रीगांर सारख्या मालिका केल्या आहेत. या शिवाय बिपाशा बासूसोबत तो Alone या चित्रपटात दिसला आणि त्यानंतर तो मालिकेची नायिका बिपाशा बासूसोबत विवाहबद्ध झाल. करण जितका त्याच्या लुक आणि अभिनयामुळे गाजला त्यापेक्षा अधिक तो त्याच्या अफेअर्समुळे गाजला. त्याने आतापर्यंत तीन लग्न केली असून त्याने पहिल्यांदा अभिनेत्री श्रद्धा निगमसोबत लग्न केले. तिच्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर त्याने दिल मिल गये को स्टार जेनिफर विंगेटसोबत लग्न केले. तिच्याशी वर्षभरात घटस्फोट घेतल्यानंतर त्याने Alone चित्रपटानंतर बिपाशा बासूसोबत लग्न केले. चित्रपटात काम करणारा करणसिंह ग्रोवर पुन्हा एकदा मालिकांकडे वळला आहे. सध्या सुरु असलेल्या कसौटी जिंदगी की या मालिकेत तो मिस्टर बजाजची भूमिका साकारत आहे.

शमा सिकंदर

Instagram

'ये मेरी लाईफ है' या मालिकेतून आपल्या अभिनयाला सुरुवात करणारी शमा सिंकदर आली तेव्हा अगदीच साधी होती. त्या मालिकेतील तिचा लुक तुम्हाला आठवत असेल तरच ही गोष्ट तुमच्या लक्षात येईल. पण आता हीच अभिनेत्री फारच बदलली आहे. स्टारडमपासून दूर गेल्यानंतर अनेक सेलिब्रिटी स्वत:कडे लक्ष देणे कमी करतात. पण शमा सिंकदर ही ही हिंदी मालिकांपासून दूर असली तरी ती वेबसिरीजमध्ये काम करत आहे. तिने तिच्या लुकमध्ये इतके बदल केले आहेत की, तिला आता Hot या शिवाय कोणतीही उपमा देताच येणार नाही.