महिलांना त्यांची हँडबॅग त्यांना किती प्रिय असते ते सांगायलाच नको. जगातल्या सगळ्या गोष्टी एकीकडे आणि त्यांची बॅग एकीकडे. पण तुम्ही अगदी कोणतीही बॅग कॅरी करा तुमच्या बॅगमध्ये काही खाण्याच्या वस्तू नक्कीच असायला हव्यात. प्रत्येकवेळी तुम्हाला काही खायला मिळेलच असे नाही अशावेळी चघळायला अशा काही वस्तू तुम्ही नक्कीच ठेवायला हव्यात. या वस्तू कॅरी करताना तुमच्या बॅगमधील फार काही जागा अडणार नाही. आणि त्याच वजनही तुम्हाला लागणार नाही.
जर तुम्हाला रक्तदाबाचा त्रास असेल तर चॉकलेट तुमच्यासाठी उत्तम आहे. त्यामुळे तुमचा रक्तदाब नियंत्रणात राहतो. या शिवायही चॉकलेट खाण्याचे अनेक फायदे आहेत. प्रवासात जर तुम्हाला थोडे थकल्यासारखे वाटत असेल तर तुम्हाला चॉकलेट खाल्यामुळे बरे वाटते. आणि जर तुम्हाला मासिक पाळी असेल त्यावेळी तुमचे मूड स्विंग होतात.अशावेळी तुम्ही चॉकलेट खाल्ले तर तुमचा मूडही चांगला होऊन शकतो.तुम्ही बॅगमध्ये डार्क चॉकलेट, मिल्क चॉकलेट ठेवा. पण तुम्ही एकावेळी एकच लहान तुकडा खा. एकदम सगळं चॉकलेट संपवायला जाऊ नका. कारण अति खाणे ही तुम्हाला महागात पडू शकते.
कधी तरी बाहेर खाल्यानंतर अचानक पोट घट्ट झाल्यासारखे वाटते. अशावेळी तुम्हाला अस्वस्थ व्हायला होते. यावेळी गूळ कामी येतो. गूळ चघळल्यामुळे पाचक रस तयार होतो. आणि अशा अरबट चरबट खाण्यामुळे बद्धकोष्ठतेचा होणारा त्रास होत नाही. त्यामुळे तुम्ही तुमच्या बॅगमध्ये एका एअरटाईट डब्यात गूळाचा एखादा खडा ठेवायला काहीच हरकत नाही. या शिवाय जेवणानंतर गूळ खाणे नेहमीच चांगले. त्यामुळे तुमचे पचन चांगले होते. तुमची प्रतिकारशक्ती वाढते. या शिवाय गूळाच्या नित्यसेवनामुळे तुमचे शरीर डिटॉक्स होते.
अॅसिडीचा त्रास अनेकांना असतो. खाण्याच्या वेळा चुकल्यानंतर हा त्रास होण्याची शक्यता असते. अशावेळी जर तुम्ही तुमच्यासोबत पाचक गोळी ठेवलीत तर तुम्हाला तात्पुरता दिलासा मिळू शकेल. जर तुमचा जास्तीत जास्त वेळ ऑफिसमध्ये जात असेल, दुपारच्या जेवणानंतर बाहेर फिरण्याची काहीच सोय नसेल अशावेळी काहींना बसून बसून अपचनाचा त्रास होऊ शकतो अशावेळी तुम्हाला पचनक्रिया सुधारण्यासाठी या पाचक गोळी मदत करतात. बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पाचक गोळ्या मिळतात. अशा पाचक गोळ्या बॅगमध्ये फार जागासुद्धा घेत नाही
कधी कधी काहीच खाण्याची इच्छा होत नाही. म्हणजे तिखट-गोड असे काहीच खावेसे वाटत नाही. अशावेळी तुम्ही एखादे बिस्कीट चघळायला काहीच हरकत नाही. ग्लुकोझ, कमी शुगर असलेले बिस्कीट खाणे चांगले. कधी तरी आपल्याला खूप भूक लागल्यासारखे वाटते अशावेळी तुम्हाला जवळपास काही मिळाले नाही तरी तुम्ही बिस्कीट खाऊन तुमची भूक काही काळासाठी भागवू शकता. हल्ली सगळ्याच बिस्कीटांचे अगदी छोटे-छोटे पुडे मिळतात. ते फार जागाही अडवत नाहीत. त्यामुळे तुम्ही बिस्कीट बॅगमध्ये ठेवायला काहीच हरकत नाही. शिवाय कधी कधी काही जणांना साखरेचा त्रास असेल तर त्यांना काही गोड बिस्कीट खाल्ल्याने बरे वाटू शकते.
बदलत्या वातावरणामुळे आणि काहींना थकव्यामुळे अंगातून त्रास गेल्यासारखे वाटते. अशावेळी तुम्ही जर प्रवासात असाल तर तुम्हाला तुमचा थकवा घालवण्यासाठी ग्लुकोझ पावडर ठेवायला हवी. अगदी पटकन पाण्यात विरघळणारी ग्लुकोझ पावडर तुम्ही पाण्यात घालून ते पाणी पिऊ शकता. त्यामुळे तुम्हाला आलेला थकवा निघून जाईल किंवा जर तुम्हाला चक्कर आली असेल तर बरे वाटेल.हल्ली एनर्जी पावडरचे अनेक फ्लेवर्स मिळतात. तुम्ही त्याचे छोटे छोटे सॅशेटदेखील तुमच्या बॅगमध्ये कॅरी करु शकता.
तर या काही गोष्टी आहेत ज्या तुम्ही कॅरी करु शकता.जर तुम्हाला या व्यतिरिक्त काही कॅरी करायचं असेल तर तुम्ही यापैकी काही गोष्टी रिप्लेसही करु शकता.