होत असेल White Discharge, तर माहीत असायलाच हव्यात ‘या’ गोष्टी

होत असेल White Discharge, तर माहीत असायलाच हव्यात ‘या’ गोष्टी

प्रत्येक महिलेला आपल्या आयुष्यात व्हाईट डिस्चार्ज (White Discharge) अर्थात व्हजायनल डिस्चार्जचा अनुभव आलाच असेल. व्हजायनामधून सफेद पाणी हे प्रत्येक महिलेसाठी अतिशय कॉमन आहे. पण बऱ्याचदा काही महिला या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. व्यवस्थित माहिती नसल्यामुळे असं दुर्लक्ष होतं. तुम्हाला ही अडचण जेव्हा नेहमीच येणार आहे हे माहीत असतं तेव्हा तुम्हाला त्या गोष्टीबद्दल सगळी माहिती ही असायलाच हवी. त्यामुळे याचे नक्की फॅक्ट्स काय आहेत आणि तुम्हाला जर काही गोष्टी नीट माहीत नसतील तर ती माहिती आम्ही या लेखाद्वारे तुम्हाला देणार आहोत. कारण तुम्हालादेखील या अडचणीला सामोरं जायला लागतं आणि त्यासाठी तुम्हाला योग्य काळजी घेणं गरजेचं आहे. त्याची तुम्हाला सर्व माहिती असणंदेखील गरजेचं आहे. 

जाणून घेऊया याचे काही फॅक्ट्स -

1. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा कोणताही आजार नाही. ही अगदी नॉर्मल प्रक्रिया आहे. व्हजायन आणि सर्व्हिक्समध्ये असणाऱ्या ग्रंथी एक फ्लुईड निर्माण करतं, जे डिस्चार्ज स्वरूपात व्हजायनामधून बाहेर येतं. हे डिस्चार्ज डेड सेल्स आणि बॅक्टेरिया आपल्या शरीरातून बाहेर काढून टाकण्याचं काम करत असतं. यामुळे आपले युटेरस आणि पेल्विस सुरक्षित राहातात आणि त्यासाठी हे सफेद पाणी येणं अर्थात असा व्हाईट डिस्चार्ज येणं अतिशय नॉर्मल बाब आहे. तसंच महिलांच्या रिप्रॉडक्टिव्ह सिस्टिमला साफ आणि निरोगी ठेवण्यासाठी याची मदत होते.

Shutterstock

2. सामान्यतः येणारं सफेद पाणी जे येतं त्याचा रंग हा क्लिअरही असतो किंवा मिल्की व्हाईट असाही असतो आणि त्याला कोणत्याही प्रकाराचा गंध नसतो (Odourless). हे जरी खरं असलं तरी ते प्रत्येक महिलेच्या आरोग्य आणि मासिक पाळी आणि त्याचा होणारा फ्लो यावर अवलंबून असतं.

3. प्रत्येक महिलेने हे लक्षात ठेवावं की, कोणत्याही मुलीच्या व्हाईट डिस्चार्जचा रंग हा ब्राऊन, हिरवा अथवा गुलाबी अथवा त्याचं टेक्स्चर क्लम्पी, फोमी अथवा चीजी असं जाणवंल अथवा कोणत्याही प्रकारचा त्यातून गंध येत असल्याचं जाणवलं तर तु्म्हाला लगेच डॉक्टरांकडे जायला हवं. कारण कोणतं तरी इन्फेक्शन झाल्याशिवाय असं होत नाही. अर्थात बॅक्टेरिया, यीस्ट, एस.टी.डी. यासारखं इन्फेक्शन झाल्यास, तुम्हाला अशी लक्षणं दिसून येतील.

4. गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळामध्ये जास्त सफेद पाणी येऊ शकतं आणि त्यावेळी तुम्ही दुर्लक्ष करू नका कारण त्यावेळी त्यातून गंध येत असतो. असं होण्याचं कारण व्हजायना जास्त म्युकस बनवून सर्व्हिक्स साफ करत असते आणि यावेळी व्हजायना अतिशय साफ, निरोगी, ओली आणि सील्ड ठेवण्याचंही काम करत असते. व्यक्तीगत साफसफाई न ठेवल्यास केवळ गंध येऊ शकतो. तुम्ही जर गर्भनिरोधक गोळ्या घेत असाल तर डिस्चार्ज अमाऊंट आणि गंध यामध्ये बराच फरक पडू शकतो. पण जास्त फरक पडला आहे असं जाणवल्यास, तुम्ही लगेच डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

5. साधारणतः एका महिलेच्या व्हजायनामधून सफेद पाण्याचा डिस्चार्ज हा प्रति दिन एक ते दोन चमचे इतकाच होतो. पण हे प्रमाण जास्त तेव्हा होतं जेव्हा तुम्ही गरोदर असता किंवा तुमच्या अंगावर तुमचं बाळ दूध पित असतं. तसंच तुम्ही सेक्शुअली चार्ज्ड अथवा तणावात असल्याही असं तुम्हाला जाणवतं. असं असल्यास व्हाईट डिस्चार्ज जास्त प्रमाणात होतो. पण हे असं होणं अतिशय नॉर्मल गोष्ट आहे.

Shutterstock

6. जेव्हा तुम्ही सेक्शुअली चार्ज्ड असता तेव्हा सफेद पाणी जास्त प्रमाणात येतं. जे व्हजायनामध्ये ओलावा राखतं आणि नैसर्गिकरित्या ल्युब्रिकंटचं काम करतं.

7.डिस्चार्जचा रंग, जाडेपणा, अमाऊंट आणि याची येण्याची फ्रिक्वेन्सी ही प्रत्येक व्यक्तीनुसार बदलते. प्रत्येक महिलेच्या शरीराप्रमाणे हे घडतं.

8. वर दिलेल्यापैकी कोणतंही कारण नसेल आणि तरीही सफेद पाणी जास्त येत असल्यास, घाबरून जायची काहीही गरज नाही. जोपर्यंत डिस्चार्जचा रंग आणि गंध सामान्य आहे तोपर्यंत हा व्हजायना क्लिनिंगचा एक प्रकार आहे हेच समजा. जास्त डिस्चार्ज होत असल्यास तुम्ही पँटी लायनर्सचा वापर करा.

Shutterstock

9. व्हजायनल डिस्चार्ज गरोदर राहण्यासाठीही तुम्हाला फायदेशीर आहे. यामुळे स्पर्मला मदत होऊन एक फर्टिलाईज होण्याची संभावना वाढते.

10. व्हजायनल इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी तुम्ही व्यक्तीगत हायजीनची नीट काळजी घ्या. सुगंधित साबण अथवा बॉडी वॉशने व्हजायनाची सफाई करू नका. यामुळे तुमच्या व्हजायनाच्या आतील पीएच बॅलेन्स बिघडतो.  बाथरूमला गेल्यानंतर नेहमी व्यवस्थित साफ करा आणि नेहमी कॉटनची पँटी वापरा.

हे सगळं वाचल्यानंतर आता तुम्हाला व्हाईट डिस्चार्ज हा आजार नसून नॉर्मल बाब असल्याचं कळलं असेल. त्यामुळे घाबरून जाऊ नका. पण काही वेगळं वाटलं तर डॉक्टरला नक्की भेट द्या.