ज्या मुलींची उंची जास्त असेल त्यांना नक्कीच माहीत असेल की, शॉपिंग करताना आपल्याला काय काय प्रोब्लेम्स येतात ते. जेव्हा उंच मुली स्वतःसाठी फॅशनेबल आणि स्टाईलिश कपडे खरेदी करण्यासाठी जातात तेव्हा त्यांना मनासारखे कपडे घेणं जरा कठीणच जातं. कारण बरेचदा उंची जास्त असल्यामुळे मनासारखे टॉप्स किंवा उंचीला पुरणाऱ्या जीन्स मिळतच नाहीत. पण उंची मुलींनी पुढील काही खास फॅशन टीप्स फॉलो केल्या तर त्यांना शॉपिंग करताना होणारे प्रोब्लेम्स नक्कीच कमी होतील.
उंच असणाऱ्या मुलींसाठी फॅशन टीप्स
उंच मुलींच्या फॅशनबाबतीतले काही प्रश्न - FAQ' s
जर तुमची उंची जास्त असेल तर अनेक वेळा शॉपिंगला गेल्यावर तुमची मनपसंत शॉपिग क्वचितच होत असेल. कारण आपल्याला नेहमी जे कपडे आवडतात ते आपल्या फिटींगप्रमाणे मिळतीलच याची काही गॅरंटी नसते. काहीवेळा आपल्या सूट होतील टॉप्स मिळत नाहीत तर काहीवेळा एखादा प्लाझो आवडल्यास त्याची हाईट आपल्याला पुरत नाही. एखाद्या स्लीम फिट पँटचा रंग आवडतो पण घातल्यावर ती पँट नेमकी आखूड झाल्यासारखी वाटते. यामुळे अनेकदा आपल्या उंचीचा रागही येतो. पण आता आम्ही ज्या फॅशन टीप्स जर तुम्ही फॉलो केल्यातर तुमचा वॉर्डरोब नक्कीच भरलेला राहील.
इंडियन वेअरमध्ये स्लीम दिसण्यासाठी फॉलो करा या टीप्स
असं होऊ शकतं की, तुम्हाला एखादा मनासारखा ड्रेस मिळेल पण घातल्यावर तोच ड्रेस तुम्हाला सूट होणार नाही. ज्यात तुमची उंची जास्त वाटेल किंवा तुम्ही जास्त बारीक दिसाल. खरंतर उंच मुलींना कपड्यांची स्टँडर्ड उंचीही कमी पडते. त्यामुळे उंच मुलींनी शक्यतो प्रत्येक ड्रेस ट्राय करून खरेदी करावा आणि शक्यतो ऑनलाईन कपड्यांची खरेदी करू नये. खासकरून अश्या वेबसाईट्सवरून ज्यांच्याकडे रिटर्न पॉलिसीच नसेल.
तुम्हाला लो वेस्ट जीन्स नक्कीच आवडत असतील पण खरंतर हाय वेस्ट कपडे उंच मुलींना जास्त छान दिसतात. याला तुम्ही उंच मुलींनी फॉलो करावी अशी क्लोथिंग हॅकही म्हणू शकता. यामुळे उंच मुलींनी पेन्सिल स्कर्ट, फ्लेयर्ड पँट, हाय वेस्ट जीन्स खरेदी करावी. या तुमच्या बॉडी टाईपला नक्कीच सूट होतील.
मॅक्सी ड्रेसेस सध्या फारच फॅशनमध्ये आहेत. मॅक्सी ड्रेसेस हे कमी उंचीच्या मुलीही घालतात पण खरं पाहता मॅक्सी ड्रेसेस हे उंच असणाऱ्या मुलींसाठी परफेक्ट आहेत. हे फक्त घालण्यासाठीच कंफर्टेबल नाहीत तर फिगरलाही खास लुक देतात. त्यामुळे तुमच्या वॉर्डरोबमध्ये मॅक्सी ड्रेसेस नक्कीच असले पाहिजेत. बाजारात अनेक पॅटर्न आणि नेकलाईनचे मॅक्सी ड्रेसेस उपलब्ध आहेत. तसंच या मॅक्सी ड्रेसेसवर स्टेटमेंट अक्सेसरी कॅरी करायला विसरू नका.
बॅगी कपडे म्हणजेच सैलसर कपडे घालणं टाळा. जर तुम्ही सैल कपडे घातले तर त्यामुळे तुम्ही हेल्दी असल्यासारखा लुक येतो. जो अगदी विरोधाभासी आहे. त्यामुळे तुम्ही असेच कपडे घाला जे तुम्हाला फिटींगला परफेक्ट असतील आणि तुमची बॉडी फ्लॅटरही दिसणार नाही.
स्किनी जीन्स प्रत्येक उंच मुलीच्या वॉर्डरोबमध्ये असायलाच हवी. या प्रकारची जीन्स घातल्यावर तुम्ही गर्दीतही उठून दिसाल. या जीन्सच्या लांबीबाबतही चिंता करण्याची गरज नाही. ही जीन्स उंचीला कमी असली तरी चालेल. तुम्ही हवं असल्यास स्किनी जीन्सला एक दोन फोल्ड करूनही घालू शकता. यामुळे तुमचं फुटवेअरही उठून दिसेल. या प्रकारच्या जीन्सवर तुम्ही शर्ट, टॉप किंवा क्रॉप टॉपही घालू शकता.
तुमची उंची कमी आहे का मग फॉलो करा या फॅशन टीप्स
प्रिंटेड टॉप नेहमीच छान दिसतात. उंच मुलींनी प्रिंटेड टॉप घातल्यावर चारचौघात त्यांच्याकडे लक्ष वेधलं जातचं. अशाप्रकारच्या टॉपमुळे लोकांचं लक्ष तुमच्या उंचीकडे जात नाही. त्यामुळे लोक तुमच्या उंचीमुळे आश्चर्यचकित होणार नाहीत. उंच मुली लाऊड प्रिंट्सचे टॉपही घालू शकतात. कारण हे टॉप त्यांच्यावर फारच छान दिसतात. पण लक्षात ठेवा की, तुमच्या बॉटमचा कलर आणि टॉपचा कलर हा वेगवेगळा असला पाहिजे. ज्यामुळेच तुमची उंची कमी दिसेल.
जर तुम्हाला तुमचा लुक हा बॅलन्स ठेवायचा असेल तर तुम्ही कमरेपर्यंत येणार लांब जॅकेट किंवा ब्लेजरसुद्धा कॅरी करू शकता. यामुळे तुमच्या पर्सनॅलिटीला मिळेल चिक लुक. अशाप्रकारचं जॅकेट तुमच्या आऊटफिटला देतं ब्रेक ज्यामुळे तुमची उंची दिसते बॅलन्स.
तुम्ही जर गुडघ्यापर्यंत असलेला स्कर्ट घातला तर तुम्ही क्लासीही दिसता आणि मॉर्डन लुकही मिळतो. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे या प्रकारचे स्कर्ट उंच मुलींसाठी परफेक्ट आऊटफिट्स ठरतात. ऑफिस वेअर म्हणूनही तुमच्यावर हे स्कर्ट्स उठून दिसतील. ज्यामुळे तुम्हाला मिळेल क्लीन आणि सुपर सेक्सी लुक.
शॉर्ट हाइट गर्ल्ससाठी फॅशन टिप्सही वाचा
साधारणतः आपण पाहतो की, बऱ्याच जणी मोठ्या किंवा स्टेटमेंट अक्सेसरीज घालणं टाळतात. कारण या अशा प्रकारच्या अक्सेसरीज लुकला ओव्हरपावर करतात. त्यामुळे कमी उंचीच्या मुली अशा अक्सेसरीज घालणं टाळतात. पण उंच मुलींनी अशा अक्सेसरीज घालण्यास काहीच हरकत नाही. उदा. ओवरसाईज्ड बॅग, मोठ्या ईयररिंग्ज्स आणि इतरही मोठ्या अक्सेसरीजचा वापर तुम्ही करू शकता. विश्वास ठेवा, जर तुम्ही उंच असाल तर अशा अक्सेसरीज तुमच्यावर नक्कीच छान दिसतील.
जर तुम्ही मिनी स्कर्ट घालणार असाल तर त्यासोबत इतर कोणतंही फुटवेअर घालण्याऐवजी तुम्ही ओव्हर द नी बूट्स घालू शकता. अशा प्रकारचे बूट्स तुमच्या गुडघ्यापर्यंत दिसतात. त्यालाच मॅचिंग बॅग कॅरी करून तुम्ही कॅज्युअल आऊटफिट लुक मिळवू शकता.
व्हर्टिकल लाईन्स कमी उंची असणाऱ्या मुली उंच असल्याचा आभास देतात. पण हॉरिझॉन्टल लाईन्समुळे तुम्ही जर उंच असाल तर लोकांचं लक्ष तुमच्या उंचीकडे जात नाही. यामुळे तुमची उंची योग्य वाटेल. त्यामुळे अशा प्रिंट्सचे ड्रेसेस, कुर्ती, स्कर्ट, टॉप तुम्ही तुमच्या वॉर्डरोबमध्ये अॅड केले पाहिजेत.
अवरग्लास फिगरचा लुक मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या लुकमध्ये बेल्टला नक्कीच जागा दिली पाहिजे. उंच मुलींनी शक्य असल्यास बेल्टचा वापर रोज करावा. तुम्ही तुमच्या आवडीनुसार बारीक किंवा जाड बेल्ट वापरू शकता. असा बेल्ट तुम्ही शर्ट, कुर्ती, साडी किंवा जॅकेटसोबत पेअर करू शकता. फक्त गरज आहे ती एक्सपेरिमेंट करण्याची. जर तुम्हाला हे एक्सपेरिमेंट आवडल्यास नक्की कॅरी करा.
ही गोष्ट शंभर टक्के खरी आहे की, उंच मुलींना फुटवेअरबाबत फारच लक्ष द्यावं लागतं. त्यांचे कपडे आणि इतर गोष्टींकडे लोकांचं लक्ष नंतर जातं. पण पहिल्यांदा लक्ष जातं ते त्यांच्या फुटवेअरकडे. त्यामुळे हे खूप आवश्यक आहे की, तुम्ही सुंदर आणि योग्य फिटींगचे फुटवेअर कॅरी करा. उंची जास्त असल्यामुळे तुम्हाला हील्स तर घालता येत नाहीत पण तुम्ही पॉईंटेज फ्लॅट्स नक्कीच घालू शकता.
हाय बन किंवा अंबाडा घालण्याबाबत तर तुम्ही विचारच करू नका. तुमच्या लुकसाठी सर्वोत्तम हेअरस्टाईल म्हणजे केस मोकळे सोडणे. मानेपर्यंत येणाऱ्या केसांमुळे तुमच्या उंचीला बॅलन्स्ड लुक मिळतो. तर हाय बन घातल्यामुळे तुमची उंची जास्त दिसते.
उंच मुलींनी काही गोष्टी लक्षात ठेवण्याची गरज आहे. तुमची उंची हीच तुमची सर्वोत्तम अक्सेसरी आहे. त्यामुळे तुमचा लुक सिंपल असल्यास तो जास्त छान दिसेल. ड्रेससुद्धा जितका सिंपल असेल तितका जास्त छान वाटेल. ड्रेसवर भरपूर अक्सेसरीज घालण्याऐवजी ईयररिंग्ज, नेकलेस किंवा ब्रेसलेटपैकी एखादीच अक्सेसरी कॅरी करा.
उंच मुली या नेहमीच आपल्या फॅशन, हेअर आणि मेकअपबाबत फारच जास्त कॉन्शियंस असतात. पण असं असण्याची खरंतर काहीच गरज नाही. तुम्ही तुमच्या मेकअपबाबत नक्कीच एक्सपेरिमेंट करू शकता. सुंदर असा लिप कलर आणि वेगळी हेअरस्टाईल तुमच्या लुकला करते एनहॅन्स.
नागपूरात लग्नाची शॉपिंग करताय मग 'या' ठिकाणांना जरूर भेट द्या
उंच मुलींनी शॉपिंग करताना शक्यतो या फॅशनेबल कपड्यांपासून जरा लांबच राहिलं पाहिजे. जर तुम्हाला वाटतं असेल की, तुमची उंची ऑड वाटू नये म्हणून तुम्ही शॉर्ट्स, मिनी स्कर्ट, हाय हील्स, व्हर्टिकल स्ट्राईप्स, शोल्डर पॅड्स, रफल्स आणि कॅप्री हे प्रकार टाळले पाहिजेत.
1. साधारणतः किंती उंची असलेल्या मुलींना उंच म्हटलं जातं?
मुलींसाठी आईडियल उंची म्हणजे 5 फूट 6 इंच असते. यापेक्षा जास्त उंची असणाऱ्या मुलींना हाईटेड किंवा उंच असं म्हटलं जातं.
2. जर उंच मुलींना हील्स घालावेसे वाटले तर?
जर तुमची उंची जास्त असूनही तुम्हाला हील्स घालायची ईच्छा झाल्यास तुम्ही साधारण अर्धा किंवा दोन इंचापर्यंत हील्स घालू शकता.
3. पाय लांब असल्यास कोणत्या प्रकारचे ड्रेसेस घालावे?
क्रॉप पँट्स उंच पायांना बॅलन्स्ड लुक देतात. सुपर टाईट पँट्स घालणं मात्र टाळा.
4. उंच मुलींना कोणत्या प्रकारची नेकलाईन परफेक्ट वाटते?
उंच मुलींवर क्रू नेक खूपच छान दिसतो. मात्र त्यांनी व्ही नेकचे ड्रेसेस किंवा टॉप घालणं मात्र टाळावं.
5. उंच मुलींनी कोणत्या प्रकारच्या कपड्याचं पेअरिंग टाळलं पाहिजे?
उंच मुलींनी सुपर लॉन्ग जीन्स आणि क्रॉप टॉपचं पेअरिंग टाळावं.
You Might Like These:
यंदा हिवाळ्यात नक्की ट्राय करा हे विंटर जॅकेट्स