जागतिक मैत्री दिनासाठी शुभेच्छा संदेश आणि स्टेटस (Friendship Quotes In Marathi)

जागतिक मैत्री दिनासाठी शुभेच्छा संदेश आणि स्टेटस (Friendship Quotes In Marathi)

मैत्री एक हवंहवंसं वाटणारं आपुलकीचं नातं. मैत्रीच्या नात्यात कोणतीही बंधन नसतात. जगातील सर्व नात्यांच्या पलीकडे असलेलं मैत्रीचं नातं आयुष्यभर साथ देतं. मैत्रीचे हे बंध एकमेकांशी कधी जुळतात हे कोणालाच कळत नाहीत. मात्र एकदा का असे हे रेशीमबंध जुळले की ते कधीच कोणत्याही कारणासाठी तुटत नाहीत. जन्माला आल्याबरोबर जीवनात अनेक नाती आपल्यासोबत आपोआप जोडली जातात. आईवडीलांमुळे निर्माण झालेली नाती आपल्याला कुटुंबाकडून मिळतात. प्रेम आणि आपुलकी असलेली रक्ताची ही नाती आपल्याला आयुष्यभर सोबत करतात. पण मैत्रीची नाती काही वेगळीच असतात. शाळा, कॉलेज आणि नोकरी-व्यवसायामुळे माणसाला जगातील अफाट विश्व खुलं होतं. या प्रवासात मैत्रीचे नाते हळूहळू गुंफले जाते. मैत्री ही ठरवून करता येत नसली तरी ज्यांच्याशी आपले विचार आणि मत जुळतं अशांचीच आपली मैत्री दृढ होत जाते.


ऑगस्टचा पहिला रविवार हा जागतिक मैत्री दिन अथवा फ्रेंडशिप डे म्हणून साजरा केला जातो. जुन्या मैत्रीचे बंध जपत नव्या मैत्रीशी जोडले जाण्यासाठी सर्वांना जागतिक मैत्री दिनाच्या शुभेच्छा आणि मैत्री वर कोट्स... Friendship Quotes In Marathi !!


मैत्री दिनासाठी सुविचार आणि मैत्रीबाबत प्रसिद्ध व्यक्तींचे विचार (Friendship Quotes In Marathi)


मैत्री दिनाच्या हार्दिक शुभेच्छा देण्यासाठी है मैत्री संदेश, सुविचार तुम्हाला नक्कीच उपयोगी पडतील.


1. मित्र नेहमी अंलकाराप्रमाणे केवळ सौंदर्य वाढविणारे नसावेत,
    स्तुती करणारे मित्र आपल्याला अनेक मिळतील,
    पण आरश्याप्रमाणे आपले गुणदोष दाखविणारे मित्र,
    दैवानेच लाभतात… - व.पू. काळे


Friendship-Quotes-in-Marathi


2. मैत्री एक सोपी व्याख्या आहे…
रोज आठवण यावी असं काही नाही,
रोज भेट व्हावी असं काही नाही,
एवढंच कशाला रोज भेट व्हावी
असंही काहीच नाही,
पण मी तुला विसरणार नाही,
ही झाली खात्री आणि
तुला याची जाणिव असणं ही झाली मैत्री - पु. ल. देशपांडे


3. मैत्रीची परिक्षा संकटात केलेल्या मदतीने होते आणि ती मैत्री बिना शर्तींची असणं गरजेचं आहे - महात्मा गांधींचे विचार


4. जो टीका करतो मात्र मैत्री तुटेल याच्या भितीने सावध राहतो तो तुमचा मित्र नाही - गौतम बुद्ध


5. मैत्री हा जर तुमचा विकपॉईंट असेल तर तुम्ही जगातील शक्तीमान व्यक्ती आहात - अब्राहम लिंकन


मैत्रीची कविता (Friendship Day Poem In Marathi)


मैत्रीवर आधारित अनेक कविता आहेत. मित्रासाठी कविता करण्यासाठी हे शब्द तुम्हाला प्रेरणा देतील


1. मित्र


मित्र म्हणायचा - त्या पेनानेच लिही फक्त
जे झिडकारून, भीक म्हणून अंगावर टाकेल कोणी!
त्या पेनाच्या जिभेतच सापडतील तुला
फक्त पूर्णविराम बाकी अशी संपूर्ण गाणी ....”


मित्र म्हणायचा - “अन लिही हवे तसे
जसे की लिहायचेच नव्हते तुला कधी काही
सहीपाशी भेटले दुःख, तर म्हण हे माझेच लिहिणे
भेटले लोचट सुख तर म्हण - छे मी लिहीलेच नाही !!”


मित्र म्हणायचा - प्रेमात पड पौर्णिमेला
अमावसेशी टिकले तर चमत्कार म्हण!
मदाऱ्याच्या माकडासारखा सोपस्कार म्हणून
आतून राहत सुटा सुटा ‘नमस्कार’ म्हण!”


कवी - संदीप खरे


2. मैत्र


आयुष्याच्या वाटेवरती 
किती मिळती सखे - सोबती
जीवन आपुले सुखी करूया
हात तयांचे घेऊन हाती


बालपणीची सकाळ हासरी
निष्पाप मने तेव्हा असती
सर्व सोबती आनंदाने 
सभोवताली भिरभिरती


शैशव संपून तारूण्याच्या
उंबरठ्यावर पाऊल पडे
सख्या- सोबत्यांचा तेव्हा
आधार किती मोठा हा गडे 


हळुवार पावलांनी मग
वार्ध्यक्य साद देते
एकाकीपण साहताना
मृत्युती चाहूल येते


हळूवार रेशमी अतूटं बंध
वेगवेगळे कसे प्रंसग
सख्या -सोबत्यांशी आपुला
तयार होतो सुंदर संग


प्रत्येक क्षणी आयुष्याच्या
सखे - सोबती साथ देती
जीवन आपुले सुखी करूया 
हात तयांचे घेऊन हाती.


- कवयित्री स्पृहा जोशी 


marathi-poem-on-friendship-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80%E0%A4%9A%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE


3. मैत्री 


थकलेले जीव सारे
सावलीला निजले होते...
बाभळीचे झाड घराशी
फुलांनी सजले होते...
पाखरांनी आपले घरटे
छपराला टांगले होते...
भातुकलीचे डाव दारी
खेळ सारे मांडले होते...
तेव्हा उमगले ते घर
माझ्या मित्राने बांधले होते...


- अज्ञात


रक्षाबंधनासाठी शुभेच्छा संदेश (Rasha Bandhan Wishes In Marathi)


मैत्री स्टेटस (Friendship Day Status In Marathi)


जागतिक मैत्री दिन साजरा करा या मैत्री स्टेटसने 


1. त्रास फक्त प्रेमामध्ये होतो असं नाही एकदा जीवापाड मैत्री करून बघा प्रेमापेक्षा जास्त त्रास मैत्रीत होतो 


2. समोरच्या मनाची काळजी तुम्ही तुमच्या मनापेक्षा जास्त घेता याची जाणिव म्हणजे मैत्री


3. फुलांबरोबर काय मैत्री करायची ती तर एकदा फुलतात आणि कोमेजून जातात. मैत्री करायची असेल तर ती काट्यांसोबत करावी एकदा टोचलं की कायम लक्षात राहतात


%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B8-friendship-day-status-in-marathi


4. देव ज्यांना रक्ताच्या नात्यात जोडायला विसरतो त्यांनाच मित्र म्हणून पाठवतो


5. तुझी माझी मैत्री अशी असावी की काटा तुला लागला तर कळ मला यावी


6. लिहीताना थरथरले हात माझे आणि शाईतून तुझं नावच सांडलं अक्षरात का होईना मी मैत्रीला सर्वांपुढे मांडलं


7. नाती, प्रेम आणि मैत्री तर सगळीकडेच असतात. पण परिपूर्ण तिथेच होतात जिथे त्यांना आदर मिळतो.


8. आयुष्यात खूप फ्रेंड्स मिळाले पण स्पेशल तूच आहेस


9. मैत्री असो वा कोणतंही नातं सर्व विश्वासावर टिकून असतात.


10. मैत्री ही प्रेमापेक्षाही सुंदर आहे.


मैत्री दिन विनोदी स्टेटस (Funny Friendship Status In Marathi)


यंदाच्या मैत्री दिनाला काय स्टेटस ठेवावा असा प्रश्न पडला असेल तर हे विनोदी स्टेटस तुम्हाला नक्कीच आवडतील.


1. प्रत्येकाच्या आयुष्यात ती एक मैत्रीण असतेच जिला  थोडं काही बोललं तर लगेच फुगून बसते.- मैत्री दिनाच्या शुभेच्छा


2. एक गोड मैत्रीण आहे माझी, चष्मा लावून फिरणारी, मी बॅटरी ढापणी बोलताच चीड चीड करून रागावणारी


3. मातीचे मडके आणि मित्रांची किंमत फक्त बनवण्याऱ्यांनाच माहीत असते, तोडणाऱ्यांना नाही


4. प्रेमाच्या चौकात कितीपण फिरा मित्रांच्या कट्यांवर येणारी मज्जा काही औरच असते


5. काय पण लहानपण असायचं जेव्हा फक्त दोन बोटं जोडली की मैत्री व्हायची. मैत्री दिनाच्या शुभेच्छा


%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%A6%E0%A4%BF%E0%A4%A8-%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A5%8D%E0%A4%9F%E0%A5%87%E0%A4%9F%E0%A4%B8-funny-friendship-day-status-in-marathi


6. सगळ्याच बाबतीत हुशार आहेस थोडं नाकावरचा राग फक्त जरा कमी कर तिथेच थोडी भिती वाटते


7. शाळेत आमची मैत्री इतकी फेमस होती की काही झालं तर आमचंच नाव समोर यायचं


8. गुण जुळले की लग्न होतात आणि दोष जुळले की मैत्री


9. जेव्हा आपल्याला पैसे, सल्ले, कंपनी आणि ज्ञानाची गरज असते तेव्हा मित्र नेहमीच तुमच्यासाठी असतात.


10. बेस्ट फ्रेंड हा असा एक व्यक्ती असतो जो तुम्हाला  हसायला मजबूर करतो  जेव्हा तुमचा मूड खराब असतो. 


                                           व्हॉट्सअपसाठी कडक आणि रूबाबदार स्टेटस मराठीत


मैत्री संदेश (Friendship Day Messages In Marathi)


मैत्री दिनाच्या शुभेच्छा देण्यासाठी तुमच्या मित्रमैत्रिणींना पाठवा हे मैत्री संदेश


1. मैत्री म्हणजे आपल्या विचारात सतत कुणीतरी येणं मैत्री म्हणजे न मागता समोरच्याला भरभरून देणं


2. मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे जुन्या आठवणींना उजाळा देत गालातल्या गालात हसणारे


3. मैत्री असावी निखळ वाहणाऱ्या पाण्यासारखी


4. मैत्री असावी मुक्त गाणाऱ्या पाखरांसारखी मैत्रीचं नातं असतं नाजूक फुलासारखं फुलणारं एकदा फुलल्यावर आयुष्यभर गंध देणारं


marathi-friendship-sms-%E0%A4%AE%E0%A5%88%E0%A4%A4%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A5%80-%E0%A4%B8%E0%A4%82%E0%A4%A6%E0%A5%87%E0%A4%B6


5. निळ्याशार सागराला आपल्या मैत्रीची ओढ वाटावी उसळणाऱ्या लाटांना आपल्या भेटीची आस असावी


6. मैत्री म्हणजे श्रावणातील हिरवळ मैत्री म्हणजे फुलांचा दरवळ


7. मैत्री म्हणजे निरभ्र आकाश मैत्री म्हणजे एकमेकांमधला विश्वास


8. तुझं माझं नातं मैत्रीच्या पलीकडचं आणि प्रेमाच्या अलीकडचं


9. काय फरक पडतो मैत्री जुनी असते की नवी असते आयुष्याच्या प्रत्येक वळणावर मैत्री मात्र हवी असते.


10. मैत्री म्हणजे दुःखात साथ देणारं आणि संकटावर मात करणारं एक प्रेमळ नातं


11. आपले मनातले वजन कमी करण्याचे ठिकाण म्हणजे मैत्री 


12. जे रक्ताचं नसूनही रक्तारक्तात भिनतं ते नातं म्हणजे मैत्री


मैत्री दिन शुभेच्छा (Friendship Day Wishes In Marathi)


तुमच्या मित्रमैत्रीणींना जागतिक मैत्री  दिनाच्या शुभेच्छा द्या या संदेशांनी


1. हजार शब्दात जे सांगता येत नाही ते एका शब्दात कळणं म्हणजे मेैत्री - मैत्री दिनाच्या शुभेच्छा


2. मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी
    एकाने गरीबीतही स्वतःचा  कधीच स्वाभिमान सोडला नाही
    आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही.


3. जिथे बोलण्यासाठी शब्दाची गरज नसते,
    दुःख व्यक्त करण्यासाठी आसवांची  गरज नसते त्यालाच मैत्री म्हणतात
    - मैत्री दिनाच्या शुभेच्छा


4. खऱ्या मैत्रीशिवाय आयुष्याला अर्थ नाही.


5. जन्म हा थेंबासारखा असतो
    आयुष्य ओळीसारखं असतं
    प्रेम त्रिकोणासारखं असतं
    मैत्री मात्र वर्तुळासारखी असते
    कारण, मैत्रीला शेवट नसतो.


6. ज्याचे मन आहे पवित्र तोच तुमचा खरा मित्र


7. जिथे शब्दावाचून मन वाचता  येते ती खरी मैत्री


8. निखळ मैत्रीचे धन असेल तर तुम्ही जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहात - मैत्री दिनाच्या शुभेच्छा


9. चांगल्या व्यक्तीसोबत मैत्री ही ऊसासारखा असते. तुम्ही त्याला कितीही तोडा, घासा, पिरघळा त्यातून गोडवाच बाहेरयेतो.


10. मैत्री म्हणजे निसर्गाने माणसाला दिलेली अनमोल देणगी - मैत्री दिनाच्या शुभेच्छा


11. प्रेम असो वा मैत्री ह्रदयापासून केली तर आपण त्यांच्याशिवाय एक मिनीटही राहू शकणार नाही.


12. मित्र परिसासारखे असतात त्यांच्या सहवासानेच आयुष्याचं सोनं होतं - मैत्री दिनाच्या शुभेच्छा


देखील वाचा:


अधिक वाचा लग्न वर्धापनदिनाचे शुभेच्छा संदेश


Happy Birthday Messages For Friends In Marathi


Best Anniversay Messages & Wishes For Couples In Marathi


Best Wishes For Janmashtmi In Marathi


भाऊ वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा - Birthday Messages For Brother In Marathi