आपण नेहमीच ऐकत असतो की, आहारात जास्तीत जास्त फळांचा समावेश केला पाहिजे. पण फळ खाल्ल्यावर आपण फळांची सालं फेकून देतो. खरंय ना...तुम्ही कधी या फळांच्या सालातील गुणांबाबत विचार केला आहे का? शक्यता फार कमी आहे. खरंतर जसं फळं खाणं हे आपल्या आरोग्यासाठी लाभदायक आहे तसंच फळांच्या सालांमध्येही औषधी आणि आपलं सौंदर्य वाढवणारे अनेक गुण आहेत. ही फळांची साल तुमच्या त्वचेला सुदंर बनवण्याची क्षमता ठेवतात. जी महागड्या आणि ब्रँडेड क्रिम किंवा फेशियलमध्येही नाही. फळांच्या सालांचा वापर तुम्ही चेहरा आणि केसांच्या सौंदर्यवर्धनासाठी करू शकता. त्यामुळे पुढच्या वेळी फळांची साल कचऱ्यात टाकण्याआधी एकदा नक्की विचार करा. आम्ही तुम्हाला सांगणार आहोत घरच्याघरी तुम्ही फळांच्या सालांपासून फ्रूट पील पॅक बनवून आरोग्यदायी आणि चमकदार त्वचा कशी मिळवू शकता.
अनेकदा महागड्या कॉस्मेटीक्स आणि ब्युटी ट्रीटमेंट्सपेक्षा घरगुती गोष्टींनी तुमच्या सौंदर्याला जास्त फायदा होतो. असंच काहीसं आहे फ्रूट पील्सबाबत. चला जाणून घेऊया.
या फळाची सालं खाणं केवळ अशक्या आहे पण यापासून मिळणाऱ्या तेलापासून उत्तम स्कीन सेरम निर्माण केलं जातं. कारण हे सिरम थेट चेहऱ्याच्या आतील थरांपर्यंत जातं आणि चेहऱ्याला मुलायम बनवून त्याची आर्द्रता कायम ठेवतं. त्वचा आणि केसांसाठी अवकॅडोचा वापर करणं हे उत्तम आहे. यामध्ये व्हिटॅमीन ए, ई आणि सी असतं. जे तुमच्या त्वचेला आणि केसांना पोषण देतं. तसंच मजबूतही बनवतं. याची साल चेहऱ्यावर किंवा केसांना घासून लावा आणि 20 मिनिटं ठेवा.
क्विनोआ म्हणजे काय याबद्दल वाचा
अवकॅडोची सालं वाटून त्यात दोन चमचे गव्हाचं पीठ घाला. आता थोडं थोडं दूध घालून त्याची पेस्ट बनवून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर कोमट पाण्याने धूवून टाका. चेहऱ्यावर अगदी नैसर्गिक ग्लो येईल.
तुमच्या त्वचेला प्राकृतिकरित्या आर्द्रता मिळण्यासाठी अवकॅडोची सालांसोबत अंड्याचं बलक आणि लिंबाच्या रसाचे दो-चार थेंब घालून पेस्ट बनवून घ्या. हे स्कीनवर लावून तब्बल अर्धा तास तसंच ठेवा. हे तुमच्या त्वचेला चांगल्या रीतीने मॉईश्चराईज करेल.
केळ्यामध्ये प्राकृतिक चरबी आणि प्रोटीनयुक्त गुळगुळीतपणा असतो. जो तुमच्या त्वचेला मऊ आणि मुलायम ठेवण्यासाठी आवश्यक आहे. हे असं फळ आहे, ज्यामध्ये व्हिटॅमीन ए, बी, सी आणि ई सारखी पोषक तत्त्वांसोबत पोटॅशिअम, झिंक, आर्यन आणि मँगनीजसारखी खनिज असतात. असं म्हणतात रोज एक केळ खाल्ल्यास तुम्ही निरोगी राहता, त्याचप्रमाणे केळ्याच्या सालापासून तुमच्या केसांना आणि शरीरालाही तुम्ही निरोगी ठेवू शकता. केळ्याच्या सालात अँटी-ऑक्सीडंट्स भरपूर प्रमाणात आढळतात. जे तुमच्या त्वचेवसाठी वापरल्यास सूर्याच्या हानीकारक अल्ट्रा-व्हॉयलेट किरणांपासून तुमचा बचाव होतो.
आंघोळ करण्याआधी तुमच्या शरीरावर केळ्याचं साल चोळा आणि ते 5- 15 मिनिटं तसंच राहू द्या. यानंतर आंघोळ करा. तुमची त्वचा मऊ आणि मुलायम होईल. केळ तुमच्या त्वचेला पोषण तर देतंच त्यासोबतच आर्द्रताही कायम ठेवतं. याच्या नियमित वापराने तुमच्या शरीरावरील डाग आणि व्रण गायब होतील. केळ्याच्या सालाने तुमची डार्क सर्कल्स आणि पिगमेंटेशनची समस्याही दूर होऊ शकते.
जास्तकरून लोक संत्र्याचं साल फेकूनच देतात. पण तुम्हाला माहीत आहे का याच सालाचा तुम्हाला किती उपयोग होऊ शकतो ते. अनेक कॉस्मेटीक्स आणि सौंदर्य उत्पादनांमध्ये संत्र्याच्या सालाचं तत्त्व असतं. कारण यामध्ये आहेत अनेक प्रकारची पोषक तत्त्व, फायटोन्यूट्रिएंट्स, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी- माइक्रोबायल गुण. जे तुमच्या त्वचेसंबंधीच्या अनेक समस्या दूर करू शकतात. हे त्वचेसाठी स्कीन लाईटनिंग एजंटचे काम करते आणि चेहऱ्यावरील पिगमेंटेशन दूर करण्यातही उपयोगी आहे. आँरेज पीलपासून बनवण्यात येणाऱ्या फेस मास्क हे फेस क्लिंजरसारखं काम करतं आणि त्वचेला ताजंतवान ठेवतं.
तुमच्या चेहऱ्यावर किंवा शरीरावर तुम्ही संत्र्याचं साल चोळू शकता. संत्र्याच्या सालाचा रसही तुम्ही चेहऱ्यावर लावू शकता. पण हा रस चेहऱ्यावर लावल्यावर चेहरा लगेच धुवू नका. किमान अर्धा तास तसंच ठेवून मग थंड पाण्याने चेहरा धुवा. हे लावल्यानंतर कोणत्याही क्लिंजर किंवा साबणाचा वापर करू नका. तुमची त्वचा तुकतुकीत आणि सुंदर दिसू लागेल. याचा वापर केल्याने तुमच्या चेहऱ्यावरील डाग आणि खुणा हळूहळू कमी होऊ लागतील. पण लक्षात ठेवा संत्र्याचा सालाचा वापर रात्रीच्या वेळी चेहऱ्यावर करू नका. कारण यातील सायट्रीक एसिड त्वचेला कोरडं बनवतं.
हे साल वापरण्याची दुसरी पद्धत म्हणजे संत्र्याचं साल सुकवून त्याची पावडर बनवून मग त्याचा वापर करा. ही पावडर तुम्ही एअर टाईट डब्ब्यात किमान सहा महिने ठेऊ शकता. एक चमचा संत्र्याच्या सालाच्या पावडरमध्ये दोन चमचे दही मिक्स करा आणि ते चेहऱ्यावर लावा. 20 मिनिटांनी धुवून टाका. तुमच्या स्कीनचं टाईटनिंगही होईल आणि ती क्लिअर व फ्रेश दिसेल. कोणत्याही पार्टीला जाण्याआधी तुम्ही हा फेसमास्क जरूर लावा.
जर तुमची त्वचा काळवंडली असेल तर एक चमचा ऑरेंज पील पावडरमध्ये एक चमचा हळद आणि एक चमचा मध मिक्स करून प्रभावित जागी लावा आणि दहा मिनिटानंतर गुलाबपाण्याने धुवून टाका. अॅक्ने असलेल्या स्कीनवर हा फेसपॅक लावणं टाळा.
एक चमचा ऑरेंज पील पावडरमध्ये एक चमचा चंदन पावडर आणि एक चमचा अक्रोड पावडर मिक्स करा. आता यामध्ये लिंबाच्या रसाचे काही थेंब आणि दोन चमचे गुलाबपाणी मिक्स करा. ही पेस्ट चेहऱ्यावर पाच मिनिटं लावून ठेवा आणि मग धुवून टाका. तुमचा चेहरा चमकदार दिसेल.
ज्यांची स्कीन ऑईली असेल त्यांनी एक चमचा ऑरेंज पील पावडरमध्ये एक चमचा मुलतानी माती आणि गुलाबजल मिक्स करून पेस्ट बनवून घ्या. हे थोडंसं ओलसर असतानाच चेहरा धुवून टाका. हा फेसपॅक तुमच्या चेहऱ्याला खोलवर जाऊन स्वच्छ करेल आणि ब्लॅकहेड्ससोबतच व्हाईट हेड्सही काढून टाकेल.
व्हिटॅमीन सी युक्त आंबट फळाचं सेवन केल्याने तुमची स्वच्छ आणि चमकदारा होते. स्वच्छ त्वचेसाठी संत्र किंवा लिंबासारख्या आंबट फळांचा तुमच्या रोजच्या जेवणात समावेश असला पाहिजे. तसंच चेहऱ्यावर लावण्यानेही उपयोग होतो. लिंबाच्या सालात अँटी-एन्फ्लेमेट्री आणि अँंटी बॅक्टेरियल गुण असतात. जे तुमच्या स्कीनसंबंधी प्रत्येक समस्येला दूर करतात. यामधील सायट्रीक अॅसिड तुमच्या त्वचेचा रंगाला सूट होतं. तसंच तुमची त्वचा निरोगी आणि रेडीएंट राहते.
लिंबाचं साल चांगल क्लिंजर म्हणून काम करतं. लिंबाचं साल हे उन्हात सुकवून त्याची पावडर बनवून घ्या. आता ही पावडर कोणत्याही फेसपॅकमध्ये मिक्स करून लावा. ही तुमची त्वचा स्वच्छ करण्यास मदत करेल. पण चेहऱ्यावर लावण्याआधी लिंबू हातावर लावून पॅच टेस्ट करा कारण कधी कधी लिंबू जास्त अॅसिडीकही असतो.
एका बाऊलमध्ये दोन चमचे लिंबाच्या सालाची पावडर, एक चमचा ब्राऊन शुगर पावडर, एक चमचा मध आणि एक चमचा बदाम तेल घाला. सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता हातावर घेऊन चेहरा आणि मानेवर दोन मिनिटं हलक्या हाताने चोळा. दहा मिनिटं तसंच ठेवा मग थंड पाण्याने चेहरा धुवून टाका. यामुळे तुमची त्वचा एक्सफॉलिएट होईल आणि डेड स्कीन दूर होऊन त्वचाही उजळेल.
पपई हे फळ सगळ्या फळांमध्ये खास आहे ते याच्या स्वाद, टेक्श्चर आणि आरोग्यदायी गुणांमळे. पपई हे फळ तुम्हाला पूर्ण वर्षभर मिळतं. हे चवीला गोड असून याचा गर एकदम मऊ असतो. पपई हे प्राकृतिकरित्या एक्सफॉलिएशनच्या रूपात काम करते. हे तुमच्या त्वचेला डागविरहीत बनवतं आणि यामध्ये व्हिटॅमीन ए चं प्रमाणही भरपूर असतं. हे साल फक्त चेहऱ्यावर लावण्यासाठीच नाहीतर पायांचा रंग उजळवण्यासाठीही तुम्ही वापरू शकता. चेहऱ्यावर पपईच्या सालाचा रोज वापर केल्यास तुमचं वाढतं वय दिसून येणार नाही. तसंच अॅक्ने आणि डागांच्या खुणाही कमी होण्यास मदत होईल.
पपईच साल तुम्ही थेट त्वचेवर चोळू शकता. सुकल्यावर पाण्याने धुवून टाका.
पपई फेसपॅक बनवण्यासाठी एक पपईच साल स्वच्छ करून घ्या. मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घ्या. यात एक ते दोन चमचे लिंबाचा रस आणि मध घाला. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुकल्यावर पाण्याने धुवून टाका. आठवड्यातून एकदा ही पेस्ट चेहऱ्यावर लावल्यास तुमची डेड स्कीन निघून जाईल आणि त्वचेवरील डागही गायब होतील.
या फळात व्हिटॅमीन सी आढळते. जे तुमच्या त्वचेला मुलायम तर ठेवतेच त्यासोबतच त्वचेला टोनही करते. सफरचंदात पॅक्टीन नावाचा घटक असतो जो चेहऱ्यावर अॅक्ने होऊ देत नाही. त्यामुळे सफरचंदाच सालंही तुमच्या चेहऱ्यासाठी उपयुक्त आहे.
दोन चमचे सफरचंदाच्या सालाच्या पावडरमध्ये तीन चमचे बटरमिल्क घालून पेस्ट करा. अर्धा तास ही पेस्ट चेहरा आणि मानेला लावा. मग थंड पाण्याने धुवून टाका. हा पॅक लावल्यास तुमच्या त्वचेचा रंग उजळतो आणि त्वचा मुलायमही राहते.
त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमची त्वचा ही राहील छान
डाळिंबामध्ये भरपूर अँटी- ऑक्सिडंट्स असतात. डाळिंब्याच्या सालात असे गुण आहेत जे तुमच्या चेहऱ्यावरील एजिंगच्या खुणा रोखण्याची क्षमता ठेवतात. तसंच चेहरा उजळवतात. डाळिंबाचं साल सुकवून पावडर बनवून घ्या आणि त्याचा अॅक्ने असलेल्या स्कीनवर करा.
दोन चमचे डाळिंबाच्या सालाच्या पावडरमध्ये एक चमचा लिंबाचा रस आणि एक चमचा मध घाला. चांगली पेस्ट बनवून घ्या. आता ही पेस्ट चेहरा आणि मानेव 15 मिनिट लावून ठेवा आणि कोमट पाण्याने धुवून टाका. हा फेसपॅक चेहऱ्यावरील डाग दूर करतो आणि अॅक्नेही कमी करतो. तसंच यामुळे चेहरा दिसतो चमकदार आणि हायड्रेटही राहतो.
तुम्ही कधी विचार केला आहे का, आंब्याला फळांचा राजा असं का म्हटलं जातं. कारण याचे अनेक फायदे आहेत. हे फक्त चवीलाच गोडं असतं असं नाही. पण तुमच्या त्वचेलाही आंबा प्रिय आहे. हा तुमच्या त्वचेवर जादूप्रमाणे काम करतो. आंब्यात आहेत अँटी-ऑक्सीडंट्स आणि अँटी- इंफ्लेमेट्री गुण. जे वाढत्या वयाच्या खुणा कमी करतं. तसंच चेहऱ्यावर होणाऱ्या बॅक्टेरियल, फंगल आणि मायक्रोबियल हल्ल्यांना थांबवण्याचंही काम करतं.
चेहरा चमकदार बनवण्यासाठी आंब्याच्या सालामध्ये एक चमचा गव्हाचं पीठ आणि एक चमचा मध घालून पेस्ट बनवून घ्या. जर पेस्ट खूप घट्ट वाटली तर यामध्ये मधाचं प्रमाण वाढवा. आपल्या बोटांच्या मदतीने ही चेहऱ्यावर लावताना मसाज करा. चेहऱ्यासोबतच ही पेस्ट मानेवरही लावा. सुकल्यावर थंड पाण्याने थुवून टाका. चेहरा चमकदार दिसेल.
अशाच प्रकारे चेहऱ्यांवरील डाग दूर करण्यासाठी आंब्याच्या सालासोबत गरम दूध थंड करून वाटून घ्या. ही पेस्ट अर्धा तास फेसपॅक म्हणून चेहऱ्याला लावा आणि नंतर धुवून टाका.
त्वचा आणि सौंदर्यजतनासाठी बाबा रामदेव यांचे पतंजलि प्रोडक्ट्
चेहऱ्यावरील वाढतं वय न दिसण्यासाठी दोन चमचे आंब्याच्या सालाच्या पेस्टमध्ये एका अंड्याचा पांढरा भाग मिक्स करा. जेव्हा स्मूद पेस्ट तयार होईल तेव्हा चेहऱ्यावर लावा. पण लावताना डोळ्यांजवळ लागणार नाही याची काळजी घ्या. मग थंड पाण्याने धुवून टाका. अंड्याचा पांढरा भाग हा स्कीन टोनिंगसाठी उत्तम आहे. तर आंब्याचं साल हे चेहरा कोरडा होऊ देत नाही.
उन्हाळ्याच्या दिवसात हे गोडं आणि रसदार फळ सगळ्यांनाच हवहवंस वाटतं. यामध्ये आहे अँटी- ऑक्सीडंट्स आणि फ्री रॅडीकल फाईटिंग लाइकोपीन जे तुमच्या त्वचेला बनवतं सुंदर. कोरियामध्ये तर या फळाचा वापर खासकरून त्वचेसाठीच केला जातो. कोरियामध्ये कलिंगडाच्या सालाचा वापर हा कूलिंग मास्क, एक्सफॉलिएटर आणि रेडियंस बूस्टिंग हायड्रेटर म्हणून केला जातो.
चेहरा चमकदार आणि सुंदर बनवण्यासाठी कलिंगडाच्या सालाचा फेसमास्क तुम्ही वापरू शकता. हा फेसमास्क तयार करण्यासाठी कलिंगडाचा गर काढून घ्या. आता ही सालं काही वेळ फ्रिजमध्ये ठेवा म्हणजे ती थंडगार होतील. आता कागदाएवढे पातळ तुकडे कापून ते थेट स्कीनवर लावा. हे स्कीनला थंडावा देतात आणि चमकदारही बनवतात.
ही आहेत फळांची काही जादुई सालांचे फ्रूट पील्स. जे तुमच्या त्वचेला बनवतात चमकदार आणि मुलायम. मग आतापासूनच या फळांची सालं टाकणं थांबवा आणि त्याच्या योग्य वापर करा.
मेकअप न करता सुंदर दिसण्यासाठी सोप्या टिप्स
स्कीन सेल्सला रीस्टोर करण्यासाठी आवश्यक 80 टक्के व्हिटॅमीन्स असतात. तसंच अवकॅडोमध्ये ईन्सेशियल ऑईल आणि बी कॉम्प्लेक्स व्हिटॅमीन्स असतात. जे त्वचेला पोषण देतात.
पपई आणि अननस मसाज क्रीमने केलेलं फेशियल हे त्वचेला स्मूद रेडियंस आणि कोलेजन इलॅस्टिसिटी देतं.
तसं तर प्रत्येक फळ तुम्ही थेट त्वचेवर लावू शकता. पण लिंबू आणि संत्र्यांत पॉवरफुल स्कीन लाईटनिंग गुण असतात जे तुमच्या चेहऱ्यांवरील छिद्र खोलवर जाऊन स्वच्छ करतात.
पपई हे फळ स्कीनकेअरसाठी सर्वोत्तम मानलं जातं. यामध्ये त्वचेला एक्सफोलिएट करणं आणि ब्लेमिशेस दूर करण्याची क्षमता असते.
लिंबाचा रस कधीही चेहऱ्यावर लावू शकतो. पण जर तुमची त्वचा सेन्सेटीव्ह असेल तर लावण्याआधी पॅच टेस्ट नक्की घ्या.