व्यस्त आयुष्यात हवा असेल Instant Glow तर ट्राय करा 11 घरगुती उपाय

व्यस्त आयुष्यात हवा असेल Instant Glow तर ट्राय करा 11 घरगुती उपाय

आपल्यासाठी आपला चेहरा हा खूपच महत्त्वपूर्ण भाग असतो. चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी रोज साधारण 8-10 ग्लास पाणी, चांगली झोप, व्यवस्थित डाएट, No smoke, No drink आणि झोपायच्या आधी मेकअप काढून झोपणं हे करणं गरजेचं असतं. हे उपाय आपल्या सगळ्यांनाच माहीत आहेत. पण तुम्हाला कमी वेळात चेहऱ्यावर चांगली चमक आणायची असेल तर काही घरगुती उपाय आहेत, ज्यामुळे तुमचा चेहरा तजेलदार आणि सुंदर दिसतो. घरबसल्या तुम्हाला हे घरगुती उपाय करून व्यस्त आयुष्यात तुम्ही Instant Glow मिळवू शकता. त्यासाठी काय करायला हवं ते जाणून घेऊया - 

1. टॉमेटो

Shutterstock

तुम्ही टॉमेटोचा पल्प तुमच्या चेहऱ्यावर लावावा. त्यानंतर 15 मिनिट्स हा पल्प लाऊन तसाच ठेवावा. टॉमेटोमध्ये नैसर्गिक ब्लीचींग घटक (bleaching properties) असतात. यामुळे तुमच्या त्वचेवरील रंग लाईट होण्यास मदत होते. चेहरा धुताना थंड पाण्याचा वापर करा. गरम पाण्याने चेहरा धुऊ नये. 

Also Read : सर्वोत्कृष्ट टॅनिंग तेल

2. आईस क्यूब

Shutterstock

आईस क्यूब्स (Ice Cubes) संपूर्ण चेहऱ्यावर योग्य तऱ्हेने घासून घ्या. यामुळे तुमच्या शरीरातील ब्लड सर्क्युलेशन सुधारण्यास मदत होते. तुम्ही एखाद्या पार्टीत अथवा काही विशेष कार्यक्रमाला जाण्यापूर्वी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला आईस क्यूब लावा. यामुळे मेकअप जास्त वेळेपर्यंत राहण्यास याची मदत होईल. याशिवाय आपल्या मॉईस्चराईजरचे काही थेंब आईस क्यूबवर लावा आणि त्याने चेहऱ्यावर मसाज करा. यामुळे चेहरा एकदम ताजातवाना होईल आणि तुम्हाला मिळेल instant glow!

3. साखर

Shutterstock

थोडीशी साखर घ्या. यामध्ये थोडासा लिंबू रस आणि काही थेंब ऑलिव्ह ऑईल त्यामध्ये मिसळा. याचा वापर तुम्ही स्क्रबप्रमाणे करा. ऑलिव्ह ऑईलने तुमची त्वचा योग्यरित्या मॉईस्चराईज करते. साखर डेड सेल्स काढण्यास मदत करते आणि लिंबू नैसर्गिक ब्लीचचं काम करतं. 

4. बटाटा

Shutterstock

न सोललेले बटाटे तुम्ही कापून घ्या आणि 5 मिनिटं पाण्यामध्ये भिजवून ठेवा. आता या फोडी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर घासा. बटाटादेखील नैसर्गिक ब्लीचचं काम तुमच्या चेहऱ्यासाठी करतो. त्यामुळे काही मिनिट्समध्येच तुमचा चेहरा तजेलदार आणि चांगला दिसतो. 

5. केळं

Shutterstock

अर्ध केळं घेऊन मॅश करा. यामध्ये एक चमचा दही आणि अंड्याचा पांढरा भाग घाला. आता या तिन्ही गोष्टींचं नीट मिश्रण करून घ्या आणि चेहऱ्यावर लावा. केळ्यामुळे तुम्हाला फेशियलसारखा ग्लो चेहऱ्यावर मिळतो आणि  तोदेखील काही सेकंदांमध्ये. त्यामुळे घरच्याघरी तुम्ही हा सोपा उपाय करून चेहऱ्यावर त्वरीत ग्लो आणू शकता. 

6. काकडी

Shutterstock

एक चमचा काकडीच्या रसामध्ये काही थेंब लिंबाचा रस मिसळा आणि मग चिमूटभर हळद यामध्ये मिसळा. हा पॅक तुम्ही चेहऱ्यावर लाऊन चेहऱ्यावर इन्स्टंट ग्लो आणू शकता. केवळ 15 मिनिट्स हे पॅक तसंच चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुऊन घ्या. चेहरा सुकवून त्यावर नंतर मॉईस्चराईजर लावा. 

7. दूध

Shutterstock

दूध हे चेहऱ्यासाठी नेहमीच चांगलं ठरतं. तुम्ही चेहऱ्यावर ग्लो आणण्यासाठी एक चमचा दुधात काही थेंब लिंबाचा रस मिसळा. हे तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा आणि साधारण 20 मिनिट्पर्यंत ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या अतिशय मऊ आणि मुलायम होईल आणि तुकतुकीत दिसायला लागेल. 

8.नारळाचं तेल

Shutterstock

नारळाचं तेल चेहऱ्यावर लावा. तुमच्या चेहऱ्यावरील Tanning कमी करण्यासाठी याचा उपयोग होतो. तसंच तुमचा चेहरा मॉईस्चराईज करण्यासाठी याचा वापर करता येतो. तुम्ही याचा वापर रोज तुमच्या चेहऱ्यासाठी करू शकता. नारळाच्या तेलाने कधीही तुमच्या त्वचेला हानी पोहचत नाही.

9. चंदन पावडर

Shutterstock

चंदन हे अतिशय थंड असते. तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर चंदन लावल्यावर शरीरातील गरमी कमी करण्यासाठी मदत होते. दोन चमचे चंदन पावडर घेऊन गुलाबपाणी मिसळा. हे तुम्ही चेहऱ्यावर 10-15 मिनिट्स लावा आणि मग थंड पाण्याने धुवा. यानंतर चेहऱ्यावर मॉईस्चराईजर लावा.

10.ऑलिव्ह ऑईल

Shutterstock

ऑलिव्ह ऑईलचे काही थेंब तुमच्या गालाच्या हाडांवर लावा. त्यावर ब्लशर लावा आणि त्यानंतर तुमच्या चेहऱ्यावर आलेला इन्स्टंट ग्लो तुम्हालादेखील आश्चर्यकारक वाटेल.

11 .तांदूळ पीठ

थोडेसे तांदूळ घेऊन बारीक वाटा. त्यामध्ये दूध मिक्स करून पेस्ट तयार करून घ्या. ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि 15-20 मिनिट्स स्क्रब करा. स्क्रब केल्यामुळे ही पेस्ट व्यवस्थित तुमच्या चेहऱ्याला लागेल. आता तुम्ही थंड पाण्याने चेहरा धुवा. यामुळे तुमची त्वचा सुंदर होईलच तसंच चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्सदेखील निघून जातील.