शुभ रात्री संदेश मराठीतून, प्रियजनांना द्या शुभेच्छा (Good Night SMS In Marathi)

शुभ रात्री संदेश मराठीतून, प्रियजनांना द्या शुभेच्छा (Good Night SMS In Marathi)

दिवसभर थकल्यावर रात्री झोपताना नेहमी शुभ विचार करावेत. कारण तुम्ही जेव्हा रात्री झोपता तेव्हा जे विचार करत झोपता तेच तुम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी आठवतात. याचाच अर्थ जर तुम्ही रात्री शुभ विचार करत झोपला तर तुमची सकाळ उत्साही आणि फ्रेश होते. सकाळी चांगले विचार मनात असतील तर दिवस चांगला जातो. यासाठीच रात्री आपल्या प्रिजजनांना गुडनाईट मेसेज अथवा शुभरात्रीचे शुभेच्छा संदेश पाठवण्याची पद्धत आहे. तुम्हाला देखील तुमच्या जवळच्या लोकांना गुडनाईट मेसेज पाठवायचे असतील तर हे संदेश जरूर वाचा. प्रिय व्यक्ती, घरची मंडळी, ऑफिसमधील सहकारी, मित्रमंडळी आणि भावंडांना रात्री झोपण्यापूर्वी हे मेसेज जरूर पाठवा. आम्ही तुमच्यासोबत काही खोडकर आणि मजेशीर मेसेजदेखील शेअर करत आहोत. 

Table of Contents

  प्रिय व्यक्तीसाठी गुडनाईट मेसेज (Good Night Love SMS In Marathi)

  तुमच्या आयुष्यातील जिवलग व्यक्तीसाठी हे आहेत प्रेमळ मराठी शुभ रात्री मेसेज 

  • जीवन सुखी आहे कारण तु माझ्यासोबत आहेस. शुभ रात्री
  • रात्रीचं चांदणं अंगणभर पसरतं, तसं माझं प्रेम तुझ्या मनात बरसतं. शुभ रात्री
  • देवा, मला माझ्यासाठी काहीच नको मात्र हा मेसेज वाचणाऱ्या माझ्या प्रिय व्यक्तीच्या मनात थोडी जागा दे. शुभ रात्री
  • भेटीचे हे क्षण हातातून अलगद निसटून जातात, रात्री झोपताना एकांतात आठवणींचे वारे वाहतात. शुभ रात्री
  • रात्रीच्या गुढ शांततेतही अनेक शब्द दडलेले असतात, म्हणूनच हे शब्द खास तुझ्यासाठी. शुभ रात्री
  • चांदण्याचा मंद प्रकाश, थंडगार हवा मला तुझी आठवण करून देतात. तो दिवस माझ्यासाठी खास असेल जेव्हा ही रात्र तुझ्यासोबत असेल. गुडनाईट
  • रात्र येते चांदण घेऊन, झोप येते सुंदर स्वप्न घेऊन, माझी इच्छा आहे उद्याचा दिवस यावा तुझ्यासाठी सर्व सुख घेऊन. शुभ रात्री
  • रात्रीचं चांदणं आणि तुझी साथ यापेक्षा आणि काय हवं जगण्याला. शुभ रात्री
  • पौर्णिमेचा चंद्र, चांदणं आणि तू, माझ्या आयुष्यातील आवडत्या गोष्टी. गुड नाईट
  • चंद्र म्हणाला चांदणीला चल जाऊ दूर कुठेतरी, चांदणी लाजून म्हणाली नको पाहील कुणीतरी. शुभ रात्री

  कुटुंबासाठी गुड नाईट मेसेज (Good Night SMS For Family In Marathi)

  कुटुंबातील प्रिय व्यक्तींना मेसेज देण्यासाठी प्रेमळ मराठी शुभ रात्री मेसेज अवश्य वापरा

  • पाणी झाडाला मोठं करतं म्हणून कदाचित पाणी लाकडाला कधीच बुडू देत नाही. अगदी आपल्या आईवडीलांसारखीच. गुड नाईट
  • आकाशातील तारे कधीच मोजता येत नाहीत. तसंच माणसाचा गरजादेखील कधीच संपत नाहीत यासाठी जीवनात समाधानी रहा. शुभ रात्री
  • चांगले विचार सुंगधासारखे असतात, ते पसरावे लागत नाहीत आपोआप पसरतात. शुभ रात्री
  • ध्येय साध्य करणं कितीही कठीण असलं तरी आत्मविश्वास असेल तर काहीच अशक्य नाही. शुभरात्र
  • रोज झोपताना चांगले विचार करत झोपा. उद्याचा दिवस तुमचाच असेल. शुभ रात्री
  • दिवस संपला, रात्र झाली, पाखरांची किलबिल कुशीत विसावली. शुभरात्र
  • लोकांच्या निंदेला नम्रपणे सामोरं जा, कारण यश मिळाल्यावर तुम्हाला हेच लोक सर्वात आधी अभिनंदन करतील. शुभ रात्री
  • जीवनात दोन गोष्टी कधीच वाया जाऊ देऊ नका. एक म्हणजे अन्नाचा कण आणि दुसरं म्हणजे आनंदाचा क्षण. शुभ रात्री
  • विश्वास ठेवा उद्याचा दिवस तुमचाच आहे. शुभ रात्री
  • छान झोपा, सुंदर स्वप्न पहा आणि उद्या ती सत्यात उतरवण्यासाठी प्रयत्न करा.गुड नाईट

  मित्रमंडळीसाठी गुड नाईट मेसेज (Good Night Messages For Friend In Marathi)

  मित्र मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा देण्यासाठी हे संदेश आहेत परफेक्ट

  • मैत्रीचं नाव काय ठेवू, स्वप्न ठेवलं तर ते अपूर्ण राहील, मन ठेवलं तर ते कुणीतरी मोडेल, म्हणून मग मी मैत्रीला श्वासाचं नाव ठेवलं. ज्यामुळे ती आयुष्यभर सोबत राहील.
  • मैत्रीचं नातं हे जगावेगळं असतं, म्हणूनच मैत्रीत सारं काही मनासारखं असतं. शुभ रात्री
  • हजार शब्दात जे सांगता येत नाही ते एका शब्दात कळणं म्हणजे मेैत्री. गुडनाईट
  • मैत्री ही कृष्ण आणि सुदाम्यासारखी असावी एकाने गरीबीतही स्वतःचा कधीच स्वाभिमान सोडला नाही आणि दुसऱ्याने श्रीमंतीचा कधीच अभिमान केला नाही. शुभ रात्री
  • जिथे बोलण्यासाठी शब्दाची गरज नसते, दुःख व्यक्त करण्यासाठी आसवांची गरज नसते त्यालाच मैत्री म्हणतात. माझ्या प्रिय मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा
  • खऱ्या मैत्रीशिवाय आयुष्याला अर्थ नाही. शुभ रात्री
  • जन्म हा थेंबासारखा असतो,आयुष्य ओळीसारखं असतं, प्रेम त्रिकोणासारखं असतं, मैत्री मात्र वर्तुळासारखी असते कारण, मैत्रीला शेवट नसतो. शुभ रात्री
  • मैत्री म्हणजे तू आणि मी, तुला माझं मन कळतं आणि मला तुझ्याशिवाय काहीच कळत नाही. माझ्या जीवलग मैत्रिणीला शुभ रात्रीच्या शुभेच्छा

  गोड मजेशीर गुडनाईट मेसेज (Cute Good Night SMS In Marathi)

  रात्री झोपण्यापूर्वी एखाद्या व्यक्तीचा मूड मस्त करण्यासाठी परफेक्ट आहेत हे मजेशीर आणि गोड मराठी शुभ रात्री मेसेज 

  • लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई, आज माझ्या पाडसाला झोप का गं येत नाही. शुभ रात्री
  • दुसऱ्यांना गुड नाईट करणारी व्यक्ती रात्रभर जागून इतरांना गुड नाईट करते सो स्वीट.
  • हरवलो आहोत आपण स्वतः मात्र देवाला शोधत बसलोय. शुभ रात्री
  • जीवनात चांगली माणसं शोधू नका कारण चांगले विचार केले तर लोक तुम्हाला शोधत येतील.
  • बोलून विचार करण्यापेक्षा विचार करून बोला. शुभ रात्री
  • मम्माच्या कुशीत झोपलंय कोण इटुकली पिटुकली पिल्लं दोन. गुड नाईट
  • चंद्र झोपी गेला आणि रात्र झाली गडद, झोपा सर्वांनी आता पटकन...हा..हा..हा. गुड नाईट
  • स्वप्न पाहण्याची वेळ झाली… गुड नाईट
  • नाती मोठी नसतात ती सांभाळणारी माणसं मोठी असतात. शुभ रात्री
  • आवाजापेक्षा प्रेमळ डोळे आणि डोळ्यांपेक्षा प्रेमळ श्वास, श्वासापेक्षा प्रेमळ हा मेसेज वाचणारी व्यक्ती. गुड नाईट

  सहकाऱ्यासाठी गुड नाईट मेसेज (Good Night Messages For Colleagues)

  एकत्र काम करताना ऑफिस सहकाऱ्यांसोबत आपलं एक छान नातं तयार होत असतं यासाठी त्यांना रात्री झोपण्यापूर्वी अशा द्या शुभेच्छा

  • जितका कठीण संघर्ष असतो त्याहून शानदार तुमचं यश असतं. उद्याचा दिवस यशस्वी जाण्यासाठी गुड नाईट.
  • समजावण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते, कारण समजण्याासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. शुभ रात्री
  • आयुष्य कधीच लहान नसतं आपण जगायला थोडा उशीर करतो. शुभ रात्री
  • फांदीवर बसलेल्या पक्ष्याला फांदी तुटण्याची कधीच भिती वाटत नाही. कारण त्याला फांदीवर नाही तर आपल्या पंखावर विश्वास असतो. गुड नाईट
  • जर वेळ आपल्यासाठी कधीच थांबत नाही तर आपण योग्य येण्याची वाट पाहत का थांबायचं. प्रत्येक क्षण हा योग्यच असतो. शुभ रात्री
  • जी व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते तिचा कधीच तिरस्कार करू नका. कारण ती व्यक्ती तुम्हाला स्वतःपेक्षा जास्त श्रेष्ठ समजत असते. शुभ रात्री
  • एखादे संकट समोर आलं तर समजा हे संकट नसून संधी तुमच्यासमोर आली आहे. शुभ रात्री
  • नशीबवादी होण्यापेश्रा प्रयत्नवादी व्हा. कारण प्रयत्न केले तरच तुमचे नशीब तुम्हाला साथ देईल. गुड नाईट
  • स्वप्न ती नसतात जी तुम्हाला झोपल्यावर पडतात तर स्वप्न ती असतात जी तुम्हाला झोपूच देत नाहीत. शुभ रात्री
  • नम्रतेमध्ये प्रंचड सामर्थ्य आहे म्हणूनच तर खडक झिजतात आणि प्रवाह रुंदावतात. शुभ रात्री
  • कष्ट करणारा माणूसच आयुष्यात श्रेष्ठ होतो. गुड नाईट

  मजेशीर गुडनाईट मेसेज (Funny Good Night SMS In Marathi)

  मजेशीर गुडनाईट मेसेज हवे असतील तर हे मेसेज अवश्य वाचा.

  • हिवाळ्यात रात्री फक्त एकच विचार येतो, अरे चादरीत एवढी हवा येते तरी कुठून
  • झोप डोळे बंद करून नाही तर नेट बंद केल्यामुळे येईल. गुड नाईट
  • उषःकाल होता होता काळ रात्र आली, चला झोपूया फार रात्र झाली. शुभ रात्री
  • झोप लागावी म्हणून Good Night, चांगली स्वप्न पडावी म्हणून Sweet Dreams, आणि झोपेत बेडवरून पडू नये यासाठी Take Care.
  • रात्री झोपल्यावर माझा विचार करू नकोस कारण मी भ्यॉ केल्यावर बेडवरून पडशील. गुडनाईट
  • रात्र आणि तू दोघंही माझ्यासाठी सारखेच आहात. निशब्द, अबोल आणि... शुभ रात्री
  • रात्र झाली की मला नेहमी तुझी आठवण येते कारण माझे पाय खूप दुखतात आणि तू माझे पाय चेपल्याशिवाय मला झोप येत नाही. गुडनाईट
  • आई म्हणते रात्री तू गालातल्या गालात का हसतोस, तिला कसं सांगणार रात्री झोपेत मी तुझ्या सुनेला पाहत असतो. शुभ रात्री
  • रात्री तू मला खूप आवडतेस, कारण तेव्हाच तू जरा शांत बसतेस. गुडनाईट
  • सुर्याला राग आहे चंद्राला डाग आहे, तुला हे सांगणं आता मला भाग आहे. गुड नाईट

  आपल्याकडे प्रत्येक गोष्टीसाठी संदेश पाठविण्याची पद्धत आहे. असेच साखरपुडा, लग्न, मित्रमैत्रिणीचा वाढदिवस, अभिनंदन शुभेच्छा संदेश आपल्याला आमच्या संकेतस्थळावर हमखास मिळतील. 

  अधिक वाचा

  लग्न वर्धापनदिनाचे शुभेच्छा संदेश

  #Friendshipday साठी शुभेच्छा संदेश आणि स्टेटस (Friendship Day Quotes In Marathi)

  वाढदिवसाच्या मराठमोळ्या शुभेच्छा

  फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम