ADVERTISEMENT
home / Mental Health
#internationalyogaday : ‘मेडिटेशन’ ताणतणाव दूर करण्याचा प्राचीन फंडा

#internationalyogaday : ‘मेडिटेशन’ ताणतणाव दूर करण्याचा प्राचीन फंडा

 

कामाची दगदग आणि दैनंदिन ताणतणाव दूर करण्यासाठी मेडिटेशन म्हणजेच ध्यानधारणेचा नक्कीच चांगला फायदा होतो. काही संशोधनानुसार मेडिटेशन केल्यामुळे नैराश्य आणि मानसिक विकारदेखील दूर होऊ शकतात. यासाठी नियमित वीस ते तीस मिनीटे मेडिटेशनचा सराव करणं गरजेचं आहे. बदलेल्या जीवनशैलीमुळे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यत माणसं सतत भविष्याची काळजी आणि भूतकाळातील चिंताच विचार करत असतात. मन शांत आणि निवांत होण्यासाठी ते वर्तमान काळात काही काळ स्थिर राहणं गरजेचं असतं. मेडीटेशनमुळे तुमचे मन वर्तमानकाळात स्थिर होण्यास नक्कीच मदत होते. मेडिटेशनबाबत असलेल्या काही गैरसमजांमुळे मेडिटेशन अथवा ध्यान हे सर्वसामान्यांसाठी नाही अशी भावना निर्माण झाली आहे. वास्तविक मेडिटेशन करून तुम्ही तुमचे जीवन आनंदी, फिटनेसने निरोगी आणि यशस्वी करू शकता. यासाठीच मेडिटेशन विषयी या काही गोष्टी तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे.

shutterstock

मेडिटेशन म्हणजे नेमकं काय

 

मन शांत करण्यासाठी अथवा मनाची एकाग्रता वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या ध्यान साधनेला मेडिटेशन असे म्हणतात. मेडिटेशन मुळे शरीर, मन आणि चैतन्यशक्ती एकत्र जोडली जाते. ध्यानाची ही एक उच्च अवस्था आहे. या अवस्थेत स्थिर होण्यासाठी आधी नियमित ध्यानाचा सराव करणे गरजेचे आहे. शरीर आणि मनाचा जवळचा संबध असतो. मानसिक अवस्थेचा शरीरावर आणि शारीरिक समस्यांचा तुमच्या मनावर नकळत परिणाम होत असतो. शारीरिक व्याधी असतील तर मन निराश होते आणि मानसिक शांतता नसेल तर शारीरिक दुखणी आपोआप पाठी लागतात. आजकालच्या बदलत्या जीवनशैलीत कामाचा ताण आणि शारीरिक दुखणी ही पाठीच लागलेली असतात. मात्र या समस्यांवर मेडिटेशनने मात करता येऊ शकते. मेडिटेशनच्या मदतीने तुम्ही तुमच्या शरीर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकता. जेव्हा शरीर आणि मन एकाग्र होते तेव्हा निसर्गनियमानूसार नैसर्गिक चैतन्यशक्ती अथवा निसर्गशक्तीचा चांगला प्रसिसाद मिळू लागतो. निसर्गशक्ती ही अचाट आणि अद्भूत असल्यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा आणि उत्साह मिळू लागतो. मानसिक शांतता मिळाल्यामुळे मनात येणाऱ्या चिंता, काळजी हळूहळू दूर होतात.

shutterstock

ADVERTISEMENT

मेडिटेशन करताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी

 

  • एखाद्या विशिष्ठ ठिकाणी नियमित काही मिनीटे बसून मन एकाग्र करण्याचा प्रयत्न करावा
  • ध्यानासाठी तुम्ही निवडलेली जागा शांत आणि आरामदायक असावी
  • मेडिटेशन करताना एखाद्या नेहमीच्याच आसनावर बसावे ज्यामुळे तुमच्या शरीरात निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जेचा तुम्हाला अनुभव मिळू लागेल.
  • सुखासन अथवा पद्मासनात बसून तुम्ही मेडिटेशन करू शकता.
  • ध्यान करताना तुमच्या मनात येणाऱ्या चिंता-काळजी दूर ठेवण्याचा प्रयत्न करावा.
  • एखादी प्रार्थना अथवा चांगल्या विचारावर मन केंद्रित करावे.
  • सुरूवातीला तुमच्या मनातील नकारात्मक विचार दूर करणे कठीण जाईल मात्र हळूहळू सरावाने तुमचे मन एखाद्या चांगल्या विचारावर एकाग्र होऊ लागेल.
  • ध्यान करताना श्वासाकडे केवळ लक्ष ठेवावे श्वास नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न करू नये.
  • मेडिटेशन करता करता हळूहळू तुमच्या मनातील चिंता,काळजीचे विचार कमी होऊ लागतात.
  • मेडिटेशन करताना मनात येणारे विचार ओळखण्याचा प्रयत्न  करा ज्यामुळे ते सकारात्मक आहेत की नकारात्मक हे तुम्हाला समजेल.
  • नकारात्मक विचार आणि सकारात्मक विचार ओळखणे ही ध्यानातील एक प्राथमिक अवस्था आहे.
  • जर तुमच्या मनातील विचारांवर लक्ष केद्रित करणे तुम्हाला जमत नसेल तर शरीर अथवा श्वासावर लक्ष द्या.

shutterstock

मेडिटेशनचे शरीर आणि मनावर होणारे परिणाम

 

  • रक्ताभिसरण सुधारते
  • मनात वाटणारी भिती कमी होते
  • रोगप्रतिकार शक्ती वाढते
  • मूडस्वींगची समस्या कमी होते
  • निद्रानाशाची समस्या कमी होते
  • आत्मविश्वास वाढतो
  • आनंद व्यक्त करण्याची वृत्ती वाढते
  • सहनशक्ती वाढते
  • एकाग्रता आणि निर्णयक्षमता वाढते
  • ह्रदयविकाराचा धोका कमी होतो
  • रागावर नियंत्रण मिळवणे सोपे जाते
  • मानसिक त्रासामुळे होणारी डोकेदुखी, पाठदुखी, पोटदुखी कमी होते.
  • फ्रेश आणि उत्साही वाटते

अधिक वाचा

रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी फॉलो करा ‘या’ सोप्या टीप्स

तुमच्या आयुष्यातील तणावा (Stress )ला करा बाय-बाय (How To Reduce Stress In Marathi)

ADVERTISEMENT

मानसिक ताणाला दूर ठेवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय (How to Relieve Mental Pressure in Marathi)

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

20 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT