आहारात विविध प्रकारच्या पोषकतत्त्वांचा समावेश असणं फार गरजेचं आहे. यासाठी तृणधान्य, कडधान्य, विविध प्रकारच्या डाळी, हिरव्या पालेभाज्या आणि ताजी फळं आहारात नेहमी असावीत. निसर्गात विविध प्रकारची फळं उपलब्ध असतात. फळांंमध्ये केशरी रंगाचं आणि चवीला गोडसर असलेलं पपई हे फळ आरोग्यासाठी फार उत्तम आहे. मात्र पपई उष्ण गुणधर्माचं असल्यामुळे त्याबाबत अनेक समज आणि गैरसमज आहेत.वास्तविक पपई नियमित खाण्याने आरोग्यावर चांगले परिणाम होऊ शकतात.
पपईमध्ये व्हिटॅमिन्स ए भरपूर प्रमाणात असतं. डोळ्यांचे आरोग्य निरोगी राखण्यासाठी शरीराला व्हिटॅमिन ए ची गरज असते. यासाठी रातआंधळेपणा अथवा डोळ्यांचे इतर विकार टाळण्यासाठी पपईचा आहारात समावेश जरूर करा.
पपईमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घटक आणि फायबर असतात. ज्यामुळे तुमचे पोट बराच वेळ भरलेले राहते. पपईमुळे लवकर भुक लागत नाही आणि शरीराचे पोषण उत्तम होते. म्हणूनच जर तुम्ही वजन कमी करण्याचा विचार करत असतात तर नियमित पपई खा.
आजारपणापासून दूर राहण्यासाठी रोगप्रतिकार शक्ती शरीरात असणं गरजेचं आहे. पपईमध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. त्यामुळे तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढते आणि तुम्ही आजारपणापासून दूर राहता.
पपई खाण्यामुळे रक्तामधील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण नियंत्रित राहते. सहाजिकच यामुळे ह्रदयरोग कमी होतात. ह्रदयावर कमी दाब आल्यामुळे ह्रदयविकाराचा झटका येण्याचा धोका कमी होतो.
मधुमेंहींनी कोणती फळे खावीत याबाबत नेहमीच संभ्रम असतो. त्यामुळे मधुमेही रूग्ण फळेच खात नाहीत. पपई हे जरी गोड फळ असलं तरी त्यामध्ये व्हिटॅमिन सी प्रमाणात असल्यामुळे रक्तातील साखर अधिक प्रमाणात वाढत नाही. यासाठीच मधुमेहींनी पपई खाण्यास काहीच हरकत नाही.
अयोग्य आहार आणि खाण्याच्या चुकीच्या वेळा यामुळे तुम्हाला पचनाच्या समस्या होतात. कारण अपथ्यकारक पदार्थांमुळे पचनसंस्थेवर ताण येतो. यासाठी सकाळी नास्ता करताना अथवा संध्याकाळी एक वाटीभर पपईचे तुकडे खा. ज्यामुळे तुमच्या पोटात पुरेसे फायबर जातील आणि तुमची पचनसंस्था सुधारेल.
पपईमध्ये व्हिटॅमिन सी असल्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. शिवाय पपईमुळे शरीरातील वेदनादेखील कमी होण्यास मदत होते. सांधेदुखी झाल्यास उठता-बसता सतत शरीरातून वेदना निर्माण होत असतात. मात्र पपईमुळे सांध्यांमधील सूज आणि दाह कमी होतो. तीव्र सांधेदुखीवरील वेदनाशामक गोळ्या कमी करण्यासाठी आहारात पपईचा वापर सुरू करा.
पपईमुळे शरीरातील रक्त शुद्ध होते ज्याचा परिणाम तुमच्या त्वचेवर दिसू लागतो. सौदर्य वाढविण्यासाठी पपईचा गर स्मॅश करून चेहऱ्यावर लावा. ज्यामुळे चेहऱ्यावर एक प्रकारची नैसर्गिक चमक येईल. जर तुम्हाला एखाद्या पार्टीसाठी इस्टंट ग्लो हवा असेल तर चेहऱ्यावर पपईचा गर जरूर लावा.
पपईच्या पानांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवणारे घटक असतात. ज्यामुळे शरीराची झीज लगेच भरून निघते. डेंग्यू आणि मलेरियासारख्या तापामुळे शरीरातील प्लेटलेट कमी होतात. यासाठी पपईच्या कोवळ्या पानांचा रस घेण्याचा सल्ला दिला जातो. पपईच्या पानांच्या रसामुळे तुमच्या शरीरातील रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते.
केळ्याने वाढतं तुमच्या केसांचं आणि त्वचेचं सौंदर्य
जाणून घ्या नव्या Eco-Keto Diet बद्दल
Kitchen Tips: फ्रिजची अशाप्रकारे करा साफसफाई
फोटोसौजन्य - इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक