ADVERTISEMENT
home / xSEO
Pregnancy Care Tips In Marathi

प्रेगन्सीमध्ये कशी घ्याल काळजी | Pregnancy Care Tips In Marathi

आई होणं ही प्रत्येक स्त्रीसाठी भावनिक गोष्ट असते. ज्या क्षणी तुम्हाला बाळाची चाहूल लागते तो क्षण तुमच्यासाठी काळजाचा ठोका चुकवणारा असतो. सहाजिकच गरोदर स्त्रीसाठी गर्भारपणाचा काळ हा खासच असतो. एक नवा जीव आपल्यातून निर्माण होणार आहे ही भावना नाजूक असते. त्यात  पहिल्यांदाच हा अनुभव घेणाऱ्या महिलांसाठी तर नऊ महिने काय करावे आणि काय करू नये असं होऊ शकतं. प्रत्येक स्त्रीचं वय, अनुभव, परिस्थिती, शारीरिक क्षमता, आरोग्य एकसारखं असेल असं नाही. त्यामुळे प्रेगन्सीमधील अनुभव आणि या काळात घ्यायची काळजी निरनिराळी असू शकते. यासाठीच आम्ही तुम्हाला गर्भधारणा झाल्यापासून बाळाच्या जन्मापर्यंत काय काळजी घ्यायची हे सांगण्याचा प्रयत्न करत आहोत. या प्रेगनन्सी टिप्स (Pregnancy Tips In Marathi) चा तुम्हाला तुमच्या आई होण्याच्या या सुखद प्रवासात नक्कीच फायदा होऊ शकतो.

गरोदरपणासाठी टिप्स – Prenatal Care Tips In Marathi

Pregnancy Care Tips In Marathi

गरोदरपणाचा काळ हा सुखावह करण्यासाठी या काळात काही गोष्टींची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. यासाठीच फॉलो करा या टिप्स आणि राहा आनंदी

स्वतःला प्रशिक्षित करा (Educate Yourself)

बाळ होण्याचा निर्णय हा नवरा बायको दोघांचा असायला हवा. त्यामुळे जर तुम्ही पहिल्यांदा आई बाबा होणार असाल तर तुम्हाला काही गोष्टी आधीच शिकून घेणं गरजेचं आहे. यासाठी आजकाल काही चाईल्ड बर्थ क्लासेस असतात ज्यामुळे तुम्हाला योग्य प्रशिक्षण मिळू शकते. प्रसूती दरम्यान होणाऱ्या समस्या, बाळाच्या जन्मानंतर त्याला कसं हाताळावं याबाबत या क्लासेमध्ये योग्य मार्गदर्शन केलं जातं. त्यामुळे अशा क्लासेसमध्ये तुमच्या मनातील प्रश्न विचारून तुम्ही स्वतःला प्रशिक्षित करून घेऊ शकता. कारण प्रत्येक कुटुंबाची एक फॅमिली हिस्ट्री असते. ज्यानुसार तुम्हाला तुमच्या केस स्टडीचा अभ्यास करावा लागतो. काही गोष्टी आधीच माहीत असतील तर त्या गोष्टींचा पुढे गेल्यावर त्रास वाटत नाही. 

बर्थ प्लॅन तयार करा (Write a Birth Plan)

गर्भधारणा ही नेहमी प्लॅनिंग करूनच करायला हवी. अचानक गर्भधारणा झाल्यास सर्व गोष्टींचे नियोजन बिघडू शकते. यासाठी योग्य प्लॅन करून गर्भधारणा झाल्यावर बाळाचा बर्थ प्लॅन तयार करा. जसं की आई बाबा दोघांनाही बाळ हवे आहे का, बाळाला जर मोठे भावंड असेल तर त्याला कसं हाताळणार, प्रेगनन्सीमध्ये कोणत्या गोष्टी तुम्हाला टाळायच्या आहेत. प्रसूती नैसर्गिक हवी की सी सेक्शन, नोकरीबाबत कोणता निर्णय घ्यायचा आहे, बाळाच्या जन्मानंतर कसं नियोजन असेल, आईला असलेल्या आरोग्य समस्या या सर्व गोष्टींचा विचार करून योग्य प्लॅनिग करा. ज्यामुळे तुमचे पुढील नऊ महिने त्रासदायक होणार नाहीत.यासाठी तुम्ही प्रेगनन्सी केअर टिप्स (Pregnancy Care App in Marathi) चा वापर करू शकता. 

ADVERTISEMENT

गरोदरपणात करावयाचं हेल्थ चेकअप (Prenatal Care Checkups)

गर्भधारणा कन्फर्म झाल्यावर फर्स्ट स्टेप आहे त्वरीत योग्य डॉक्टरांचा सल्ला घेणं. कारण त्यामुळे तुमचे आणि तुमच्या बाळाचे आरोग्य कसे आहे ते तुम्हाला समजू शकते. गर्भारपण तीन टप्प्यामध्ये असते पहिल्या महिन्यापासून तिसऱ्या महिन्यापर्यंतच्या काळाला पहिली तिमाही असं म्हणतात. चौथ्या महिन्यापासून सहाव्या महिन्यापर्यंतच्या काळाला दुसरी तिमाही असं म्हणतात. तर सातव्या महिन्यापासून डिलिव्हरीच्या काळाला तिसरी तिमाही असं म्हणतात. पहिल्या आणि तिसऱ्या तिमाहीमध्ये गरोदर महिलांची विशेष काळजी (Anc Mother Care in Marathi) घेण्याची गरज असते. यासाठीच संपूर्ण गरोदरपणात डॉक्टरांच्या सल्लानुसार औषधोपचार आणि आवश्यक टेस्ट करणं खूप गरजेचं आहे. या काळात ठराविक महिन्यात तुम्हाला काही ब्लड टेस्ट आणि सोनोग्राफी नियमित कराव्या लागतात. सोनोग्राफीच्या मदतीने बाळाचे ठोके आणि स्थिती योग्य आहे का हे समजू शकते. कधी कधी एखाद्या व्हिटॅमिन अथवा पोषक तत्त्वाचा अभाव असल्यास डॉक्टर तुम्हाला औषधांच्या मदतीने त्यावर उपाययोजना सूचवू शकतात. शिवाय नियमित तपासणी केल्यामुळे तुमचे वजन नियंत्रित आहे का आणि तुमच्या बाळाचे योग्य पोषण होत आहे का हे देखील समजू शकते.

गरोदरपणात गरजेच्या व्हिटॅमिन्स (Take a Prenatal Vitamin)

गरोदरपणात तुम्हाला तुमच्या आणि बाळाच्या दोघांच्या पोषणाची योग्य काळजी घ्यावी लागते. प्रेगनन्सीमध्ये शरीराला पोषण मिळण्यासाठी जास्तीच्या व्हिटॅमिन्सची गरज असते. बऱ्याचदा आहारातून असे व्हिटॅमिन्स मिळताच असं नाही. जर व्हिटॅमिन्सचा अभाव झाला तर बाळाच्या वाढ आणि विकासावर त्याचा परिणाम होतो. यासाठी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार योग्य वेळीच व्हिटॅमिन्स घेण्यास सुरूवात करावी. ज्यामुळे तुम्ही हेल्दी बाळाला जन्म देऊ शकता. 

Pregnancy Care Tips In Marathi

प्रेगन्सीमध्ये काळजी घेण्यासाठी टिप्स – During Pregnancy Care Tips In Marathi

गरोदपणातील काळजी (Pregnancy Care In Marathi) घेण्यासाठी या काळात या आणखी काही टिप्स नक्कीच तुमच्या फायद्याच्या ठरतील. 

व्यायाम (Exercise)

सुखरूप गरोदरपण आणि सुलभ प्रसूतीसाठी गरोदरपणी आवश्यक शारीरिक हालचाल करणं फार महत्त्वाचं आहे. यासाठी तुम्ही गरोदर आहात आजारी नाही हे नेहमी लक्षात ठेवा. उगाचच सतत पडून राहणे अथवा कोणतीच कामे न करणे यामुळे बाळाच्या जन्माच्या वेळी प्रॉब्लेम होऊ शकतो. जर तुमचे आणि बाळाचे आरोग्य ठणठणीत असेल तर तुम्ही गरोदरपणी हलके व्यायाम नक्कीच करू शकता. तज्ञांच्या मदतीने योगासने आणि प्राणायम केल्यामुळे तुमचा प्रसूती काळ सुलभ होऊ शकतो. दिवसभरात तीस मिनीटे निरोगी आयुष्यासाठी जरूर द्या. यासाठी तुम्ही चालण्याचा आणि  पोहण्याचा व्यायामदेखील करू शकता. यासाठी जाणून घ्या गरोदरपणात करायचे व्यायाम | Pregnancy Madhe Karayche Vyayam यासोबतच आम्ही दिलेल्या इतर प्रेगनन्सी टिप्स  (Pregnancy Tips In Marathi) फॉलो करा.

ADVERTISEMENT

पौष्टीक आहार (Eat Healthy Foods)

गरोदरपणात तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक पोषणाची गरज असते. या काळात तुमच्या आहारात कॅल्शियम, फॉलिक अॅसिड, लोह आणि प्रोटीन्सचा समावेश  असणं गरजेचं आहे. मॉर्निंग सिकनेसमुळे अनेक गरोदर महिला सकाळी नास्ता करणे टाळतात. मात्र हे चुकीचे आहे कारण आता तुम्हाला तुमच्या बाळाच्या आरोग्याचीदेखील काळजी घ्यायची आहे. मॉर्निंग सिकनेस टाळण्यासाठी सकाळच्या नास्त्यामध्ये दूध,रस असे द्रवपदार्थ न घेता पोहे, पोळी, पराठा असे पदार्थ खा. हा त्रास तुम्हाला फक्त सुरूवातीचे काही महिने जाणवतो. त्यानंतर तुम्ही तुमच्या आहाराची काळजी घ्यायलाच हवी. गरोदर महिलांनी हिरव्या भाज्या आणि ताज्या फळे खाण्यावर भर द्यावा. दुसऱ्या आणि तिसऱ्या  तिमाहीमध्ये तुम्ही कोणता आहार घेता याचा परिणाम तुमच्या बाळाच्या वाढीवर दिसून येत असतो. फळे, भाज्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स असतात. शिवाय हिरव्या पालेभाज्यांमधून तुम्हाला फॉलिक अॅसिड मिळू शकते. यासाठी पौष्टीक आणि संतुलित आहार घ्या. बदाम, अक्रोड, जर्दाळू अशा सुकामेव्यामुळे बुद्धी तल्लख होते. ओमेगा 3 अॅसिड यातून तुम्हाला मिळू शकतात.स्ट्रॉबेरी, ब्लू बेरी अशा बेरीज मध्ये विविध प्रकारचे व्हिटॅमिन्स असतात. गरोदरपणी तुम्हाला आणि तुमच्या बाळाला कॅल्शियमची गरज असते. दूध आणि दुधाच्या पदार्थांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम, व्हिटॅमिन डी आणि प्रोटिन्स असतात. यासाठी तुमच्या आहारात दूध, दही, योगर्ट, पनीर, चीज अशा गोष्टींचा समावेश जरूर करा. म्हणूनच जाणून घ्या जाणून घ्या गरोदरपणात काय खावे | Pregnancy Diet Chart In Marathi

हायड्रेट राहा (Stay Hydrated)

गरोदरपणात नाळेवाटे तुमच्या बाळाचे पोषण होत असते. ज्यामुळे तुमच्या शरीराला पुरेशा ऑक्सिजनची गरज असते. तुमच्या बाळाचे शरीर गर्भजल पिशवीत सुरक्षितपणे वाढत असते. सहाजिकच अशा वेळी तुमच्या शरीराला जास्तीत जास्त हायड्रेट राहण्याची गरज आहे हे ओळखा. बाळाच्या वाढीसोबत तुमच्या पोटाचा आकार वाढत असल्यामुळे तुम्हाला या काळात बद्धकोष्ठता, थकवा, मुळव्याध असे त्रास जाणवू शकतात. यासाठी जर तुम्ही पुरेसं पाणी पित असाल तर या समस्या हाताळणं तुलनेने सोपं जातं. जर पाणी पिण्याचा कंटाळा येत असेल तर सरबत, पेयं, लिंबू पाणी, नारळपाणी याचा समावेश आहारात करा. 

पुरेशी झोप घ्या (Get Plenty of Sleep)

गरोदरपण हे आजारपण नसलं तरी या काळात पुरेसा आराम करणं गरजेचं आहे. कारण गरोदरपणात तुमच्या शरीरात अनेक बदल होत असतात. या बदलांना सामोरं जाण्यासाठी तुम्हाला शारीरिक आरामाची गरज असू शकते. शिवाय या काळात अती दगदग झाल्यास आरोग्य समस्या निर्माण होऊ शकतात. जर डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला असेल तर पुरेशी बेड रेस्ट जरूर घ्या. गरोदरपणात योग्य काळजी (Pregnancy Care In Marathi) घेतल्याने गरोदरपण आणि प्रसूती दोन्ही सुखरूप पार पडतात. जाणून घ्या Pregnancy Madhe Kase Zopave | गरोदरपणात कसे झोपावे

धुम्रपान आणि मद्यपान टाळा (Avoid Smoking And Drinking)

अनेक महिलांना ताणतणावर दूर करण्यासाठी धुम्रपान आणि मद्यपानाची सवय असते. पार्टी कल्चरच्या अधीन गेल्यामुळे धुम्रपान आणि मद्यपान सध्या लोकांच्या जीवनशैलीचा भाग झाल्या आहेत. मात्र जर तुम्ही आई होण्याचा निर्णय घेत असाल तर आता तुम्हाला या गोष्टी दूर ठेवणं गरजेचं आहे. धुम्रपान आणि मद्यपानाचा तुमच्या बाळाच्या आरोग्यावर चुकीचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे आता तुम्ही प्रत्येक कृती सावधपणे आणि बाळाच्या आरोग्याच्या दृष्टीने हिताची आहे का हे तपासूनच करायला हवी. 

ADVERTISEMENT

सावधपणे प्रवास करा (Travel Smart)

जर तुम्ही नोकरी करत असाल तर गरोदरपणी तुम्हाला प्रवास करावाच लागतो. मात्र या काळात प्रवास करताना रिक्क्षा, बाईकवरून जाणे टाळा. खड्डे असलेले रस्ते आणि धक्कादायक ठिकाणी प्रवास न केलेलाच बरा. पहिले तीन महिने आणि शेवटचे तीन महिने म्हणजेच पहिली आणि तिसरी तिमाही सावधपणे प्रवास करणे फायद्याचे ठरेल. नोकरी व्यतिरिक्त शहरबाहेर प्रवास करण्याआधी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा. कारण अति दगदग या काळात तुमच्या आणि तुमच्या बाळाच्या आरोग्यासाठी योग्य नाही. त्यामुळे नोकरीतील प्रवास आणि बाहेरगावी प्रवासाचा विचार करूनच प्रेगनन्सीचा निर्णय घ्यावा. 

स्वच्छता राखा (Hygiene Care)

या काळात स्वच्छतेची काळजी घेणं देखील फार गरजेचं आहे. कारण फूड अथवा इतर इनफेक्शनचा थेट तुमच्या बाळावर परिणाम होऊ शकतो. यासाठी बाहेरचे अथवा प्रकिया केलेले पदार्थ खाणे टाळा. बाहेर जाताना घरातील पाण्याची बाटली सोबत ठेवा. घरात शक्य तितकी स्वच्छता ठेवण्याचा प्रयत्न करा. त्याचप्रमाणे प्रेगन्सीमध्ये तुमचे वजन आणि पोटाचा घेर वाढत जातो. त्यामुळे या काळात खास मॅर्टनिटी ड्रेस वापरणं सोयीचं ठरू शकेल. शिवाय गरोदरपणात घट्ट कपडे घातल्यामुळे तुम्हाला खूप घाम  येतो. ज्यामुळे त्वचेच्या समस्या वाढू शकतात. शिवाय अशा कपड्यांमध्ये तुमच्या रक्तदाब आणि श्वसनक्रियेवर चुकीचा परिणाम होऊ शकतो. तुम्ही निवडलेले कपडे सुती असतील याची काळजी घ्या. ज्यामुळे हवा खेळती राहील आणि अति घामामुळे तुम्हाला त्रास होणार नाही. 

गर्भसंस्कार (Garbh Sanskar)

गरोदरपणी तुम्ही जे विचार करता त्याचा तुमच्या बाळावर परिणाम होत असतो. असं म्हणतात गर्भातील बाळावर आईकडून संस्कार घडत असतात.  तिसऱ्या महिन्यापासून बाळाचे अनेक अवयव विकसित होत असतात. ज्यामुळे तुम्ही जे काही करता ते तुमच्या बाळाला समजत असते. नाक, डोळे, मेंदू आणि ह्रदय विकसित झाल्यामुळे त्याचा भावनिक विकास या काळात होत असतो.  यासाठीच या काळात आईच्या आचार, विचारांवर नियंत्रण असणं गरजेचं आहे. बाळावर गर्भात योग्य संस्कार करण्याचा उत्तम उपाय म्हणजे बाळाला गर्भसंस्कार देणे. यासाठी या काळात गर्भ संस्कार कोर्सेस आणि गर्भ संस्कार पुस्तके वाचण्यावर भर द्या. तुम्ही जसे विचार करता तसे तुमच्या बाळावर संस्कार होत असतात. यासाठी या काळात सतत चांगले आणि सकारात्मक विचार करा. नेहमी तुमचं बाळ सर्वगुणसंपन्न आणि बुद्धिमान होणार असा विचार सतत करा. 

Pregnancy Care Tips In Marathi

प्रसूतीनंतर काळजी घेण्यासाठी टिप्स – Postpartum Care Tips In Marathi

गरोदरपणाआधी आणि गरोदरपणात जशी तुम्ही स्वतःची आणि बाळाची काळजी (Pregnancy Care In Marathi) घेतली अगदी तशीच काळजी तुम्हाला बाळंतपणानंतरही घ्यावी लागते. यासाठी फॉलो करा या टिप्स

ADVERTISEMENT

तुमच्या शरीराला पूर्ववत होण्यास मदत करा (Help Your Body Heal)

गरोदरपण आणि बाळंतपण हे दोन्ही टप्पे प्रत्येक स्त्रीसाठी कष्टाचे असतात. कारण या संपूर्ण प्रवासात तिच्या शरीरात आणि मनात अनेक बदल होतात. बाळंतपणानंतर शरीर पूर्ववत होण्यास थोडा वेळ जातो. कारण नऊ महिन्यात झालेले शारीरिक बदल झटपट पूर्ववत होत नाहीत. प्रसूती नैसर्गिक आहे की सी सेक्शन यावरही अनेक गोष्टी अवलंबून असतात. शरीर पूर्वीसारखं दिसावं असं तुम्हाला कितीही वाटत असलं. तरी शरीराची झीज भरून निघण्यासाठी पुरेसा वेळ आणि मनोबल राखण्याची गरज असते. यासाठीच या काळात स्वतःच्या शरीरावर आणि मनावर प्रेम करा. शरीराची योग्य काळजी घ्या आणि ते पूर्ववत होण्यासाठी थोडा वेळ द्या.

जास्तीत जास्त आराम करा (Get as Much Rest As Possible)

गरोदरपणात सुरुवातीचे आणि शेवटचे काही महिने शरीरात होत असलेल्या अनेक बदलांमुळे तुम्हाला शांत झोप लागत नाही. प्रसूतीकष्ट आणि अचानक वाढलेल्या जबाबदारीच्या ओझ्याने तुम्ही आणखी थकता. म्हणूनच बाळंतपणानंतर तुम्हाला स्वतःची काळजी घेण्याची आणि त्यासाठी पुरेसा आराम करण्याची गरज असते. प्रसूतीनंतर होणारा शारीरिक त्रास कमी करण्यासाठी झोप गरजेची असते. यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुमचं बाळ झोपेल तेव्हा तुम्ही देखील झोपा. 

इतरांची मदत घेण्याचा संकोच करू नका (Seek and Accept Help)

बाळाचे संगोपन ही आईची प्राथमिक जबाबदारी आहे. मात्र असं असलं तरी बाळ फक्त तुमचंच नाही, त्याच्या बाबांनी, आजीआजोबा आणि घरातील इतर मोठ्या लोकांनी बाळाला काही वेळ सांभाळण्यास काहीच हरकत नाही. यासाठी बाळंतपणानंतर काही दिवसतरी तुम्हाला इतरांची मदत घेण्याचा संकोच वाटता कामा नये. मानसिक स्वास्थ राखण्यासाठी तुम्ही निशंकोच इतरांची मदत या काळात घेऊ शकता. ज्यामुळे तुम्हाला तुमच्यासाठी थोडा वेळ काढता येईल.

शारीरिक हालचाल करा (Keep Moving)

बाळंतपणानंतर एकाच जागी बसून अथवा झोपून राहिल्यामुळे तुमच्या शरीरातील स्थुलपणा वाढू शकतो. म्हणूनच काही दिवसांनंतर योग्य शारीरिक हालचाल आणि व्यायाम करण्याची शरीराला गरज असते. आठवड्यानंतर दररोज अथवा दिवसाआड तुम्ही कमीत कमी चालण्याचा व्यायाम करू शकता. घरात, बागेत चालण्यामुळे तुमच्या शरीराची योग्य हालचाल होते. लगेचच कठीण व्यायाम करू नका मात्र एका महिन्यानंतर हळू हळू प्राथमिक व्यायाम, योगासने आणि प्राणायम करण्यास काहीच हरकत नाही. तीन महिन्यानंतर तुम्ही तुमची सर्व दैनंदिन कामे करण्यास सुरुवात करायला हवी. तरंच तुम्ही बाळंतपणानंतर पुन्हा पहिल्यासारखं दिसू लागाल. 

ADVERTISEMENT

पौष्टीक खा (Eat Well)

बाळंतपणानंतर तुम्ही जे खाणार तेच तुमच्या दुधातून तुमच्या बाळाला मिळणार. यासाठी या काळात आहाराकडे नीट लक्ष द्यायला हवं. जर तुम्हाला या काळात स्वयंपाक करणं शक्य नसेल तर एखाद्या तज्ञ कुक अथवा अनुभवी व्यक्तीची मदत घ्या. मात्र चुकूनही या काळात अपथ्यकारक पदार्थ खाऊ नका. पौष्टीक आणि संतुलित आहार घेतल्याने तुमचे शरीर पूर्ववत होण्यास मदत होते. शिवाय तुमच्या बाळाचे आरोग्यही सुरक्षित राहते.

मानसिक आरोग्य जपा (Check on Your Mental Health)

बाळंतपणानंतर स्त्रीच्या शरीरात अनेक हॉर्मोनल बदल होतात. ज्याचा परिणाम तिच्या मानसिक स्वास्थावर होण्याची शक्यता असते. गरोदरपण, प्रसूती, बाळंतपण, बाळाचे संगोपन अशा अनेक महत्त्वाच्या गोष्टींचा प्रवास करता करता कधी कधी मन निराश होण्याची शक्यता असते. कारण या काळात पूर्वीसारखं तिला वागता येत नाहीत, स्वतःच्या आवडीनिवडी बाजूला ठेवाव्या लागतात. बाळाच्या आगमनाचा आनंद असतो मात्र त्याच्या संगोपनाची जबाबदारी वाढलेली असते. एवढी मोठी जबाबदारी पेलवण्यास आपण सक्षम आहोत का असं सतत मनाला वाटत असतं. यासाठीच या काळात नवमातेने सकारात्मक विचार आणि चांगल्या लोकांच्या संगतीत राहण्याची गरज असते. बाळंतपणानंतर येणारे नैराश्य टाळण्यासाठी वेळीच तज्ञ्जांचा सल्ला घ्यावा. ज्यामुळे मानसिक संतुलन राखण्यास मदत होईल. यासाठी जाणून घ्या मातृत्वानंतरचे मानसिक आरोग्य, नैराश्याची कारणे आणि उपाय (Postpartum Depression In Marathi)

प्रेगनन्सी टिप्स बाबत प्रश्न – FAQs

प्रश्न –  नैसर्गिक पद्धतीने गरोदर राहण्यासाठी काय उपाय करावे ?

उत्तर – स्त्री आणि पुरूषांच्या मिलनातून गर्भधारणा होणं ही नैसर्गिक प्रकिया आहे. मात्र असं असलं तरी बदलती जीवनशैली, वाढते प्रदूषण आणि चुकीचा आहार, विहार यामुळे अनेक जोडप्यांना गर्भधारणेत अडचणी येतात. असं असल्यास तुम्ही वैद्यकीय मदत घेऊन आणि औषध-उपचार करून आई- बाब होऊ शकता. मात्र जर तुम्हाला नैसर्गिक पद्धतीने गरोदर व्हावं असं वाटत असेल तर तुमच्या जीवनशैलीत योग्य ते बदल करा.

प्रश्न – गरोदरपणात महिलांनी नोकरी करावी का ?

उत्तर – गरोदरपण हे आजारपण नसून हा स्त्रीच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा आहे. सहाजिकच गरोदरपणात तुम्ही तुमची दैनंदिन कामे आणि नोकरी नक्कीच करू शकता. काही ठराविक बाबतीत काळजी घेऊन या काळात नोकरी करण्यास काहीच हरकत नाही.

ADVERTISEMENT

प्रश्न –  गरोदरपणी किती वजन वाढणे योग्य आहे ?

उत्तर – प्रत्येकीचे वजन, शारीरिक रचना, आरोग्य यानुसार गरोदरपणात तिचे वजन किती असावे हे ठरू शकते. तुमचे डॉक्टर तुमच्या आणि बाळाच्या आरोग्याची स्थिती पाहून ते सांगू शकतात. मात्र गरोदरपणात स्त्रीचे अंदाचे दहा ते पंधरा किलो वजन वाढू शकते.

प्रश्न – गरोदरपणात सेक्स करणे सुरक्षित आहे का ?

उत्तर – गरोदरपणात सेक्स करावा की नाही याबाबत अनेकांची अनेक मते असू शकतात. काहींच्या मते जर तुमची आरोग्य स्थिती चांगली असेल आणि बाळाला कोणताच धोका नसेल तर दुसऱ्या तिमाहीमध्ये सेक्स करण्यास काहीच हरकत नसते. मात्र ही गोष्ट प्रत्येकाच्या बाबतीत वेगळी असू शकते. यासाठी डॉक्टरांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरेल.

Conclusion – गरोदरपणाआधी- नंतर Pregnancy Tips In Marathi, Pregnancy Care In Marathi, बाळंतपणानंतर काळजी घेण्यासाठी सांगितलेल्या या काही टिप्स तुमच्या आरोग्यासाठी आणि बाळाच्या योग्य विकासासाठी खूप महत्त्वाच्या आहेत. या टिप्स तुम्हाला कशा वाटल्या आणि त्याचा तुम्हाला काय फायदा झाला हे आम्हाला कंमेट मधून जरूर सांगा.

27 Apr 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT