#MyStory: त्याच्याकडे पुन्हा जाणं माझी सर्वात मोठी चूक होती

#MyStory: त्याच्याकडे पुन्हा जाणं माझी सर्वात मोठी चूक होती

प्रेम ही अशी भावना आहे जी कधी कधी एखाद्याकडून दुखावलं गेल्यावरसुद्धा त्याच्याकडे परत जाण्याची इच्छा निर्माण करू शकते. असं म्हणतात की, जर एखाद्या गोष्टीत तुम्ही पहिल्या प्रयत्नात यशस्वी झाला नाहीतर तर पुन्हा प्रयत्न करावा. पण खरं सांगू माझ्या खाजगी अनुभवावरून तरी मला असं वाटतं की, हे सगळ्यांच्याबाबतीत खरं ठरेलच असं नाही. याबद्दलचाच अनुभव सांगत आहोत आजच्या #MyStory मध्ये. जेव्हा रीनाने तिच्या एक्स बॉयफ्रेंडकडे परत जाण्याचा धाडसी निर्णय घेतला. पण नंतर तिला या निर्णयाबाबत पश्चाताप सहन करावा लागला. तिचा अनुभव तिच्या शब्दात.

आम्ही दोघांनी एकमेकांना जवळजवळ एक वर्ष डेट केलं. प्रत्येकाच्याच नात्यात चढउतार येतात. पण बराच काळ उलटल्यानंतरही आमचं नातं मला कंप्लीट वाटत नव्हतं. त्याने मला किंवा आमच्या नात्याकडे प्रायोरिटी म्हणून पाहिलं नाही. तेव्हाच मला कळायला हवं होतं. पण आपल्या सर्वांनाच माहीत आहे की, मन काहीही ऐकून घ्यायला लगेच तयार होत नाही. मी स्वतःला आणि या नात्याला पुढे ढकलत राहिले. ज्यामध्ये बरेचदा माझ्या पेशन्सची परीक्षा झाली. मग मात्र मी हे नातं इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला. त्या ब्रेकअपनंतर मी दोन वर्ष कोणालाच डेट केलं नाही. तो काळ माझ्या आयुष्यातला बीइंग सिंगलसुद्धा चांगला काळ होता. 

सगळं सुरळीत सुरू होतं तो माझ्या आयुष्यात नसताना. पण एक दिवस त्याने पुन्हा माझ्या आयुष्यात यायचं ठरवलं. हे सगळं सुरू झालं एका रात्री आलेल्या ड्रंक डायलने. दारूच्या नशेत त्याने एकदा चुकून मला कॉल लावला. त्या रात्री काही मी त्याला सीरियसली घेतलं नाही. कारण तो कसा आहे हे मी त्या नात्यात असताना अनुभवलं होतं. पण मी खोटं बोलणार नाही, कारण का कुणास ठाऊक मला एकीकडे ते आवडलंही होतं

नंतर कळलं की, तो दारूच्या नशेत चुकून लागलेला कॉल नव्हता. त्याने दुसऱ्या दिवशी पुन्हा मला कॉल केला आणि मला खरं सांगितलं. त्याला कळून चुकलं होतं की, मीच एक अशी मुलगी आहे जिच्यासोबत तो नात्यात राहू शकतो. त्याने हे सगळं अशा रितीने सांगितलं की, मला खरंच पटलं की, त्याच्याशी माझ्यापेक्षा जास्त चांगलं कुणीच पटवून घेणार नाही. पण मला लगेचच होकार द्यायचा नव्हता. या नात्याला नवी संधी देण्यासाठी मला एक ठोस कारण हवं होतं. मला हे जाणून घ्यायचं होतं की, त्याला नक्की काय हवं आहे आणि यावेळी त्याच्यापेक्षा मला माझ्याबद्दल जास्त विचार करायचा होता. 

एक महिना त्याच्याशी खूप कठोरपणे मी वागले. पण नंतर मात्र मी विरघळले आणि त्याला सांगितलं की, मला त्याच्याबद्दल अजूनही भावना आहेत. मी त्याला अजून एक आणि शेवटची संधी द्यायला तयार आहे. त्यानेही कबूल केलं की तो यावेळी माझ्याबद्दल फारच सीरियस आहे आणि याचा पुरावा त्याने एका महिन्याच्या वागणुकीतून दिला होता. त्यामुळे मलाही वाटलं की, एखादा माणूस जर एक महिना सतत इतकं चांगलं वागतो आहे, म्हटल्यावर तो नक्कीच बदलला असेल.

पण ते वाटणं ही माझी चूक होती. असं वाटतं की, त्याने हे सर्व फक्त त्याचा ईगो सुखावण्यासाठी केलं होतं. त्याला फक्त मला पुन्हा एकदा मिळवून दाखवायचं होतं. त्यामुळे मी पुन्हा एकदा होकार देताच त्याने परत आधीसारखंच वागणं सुरू केलं आणि माझी चूक मला कळून चुकली. मला वाटलं होतं की, तो बदलला आहे. हे सर्वात मोठं असत्य होतं. तुमच्या एक्सकडे पुन्हा जाणं म्हणजे परत एकदा सुरूवातीपासून सगळं सुरू होणं. तुम्हाला जरी सगळं नव्याने सुरू झालं असं वाटतं असलं तरी एखाद्या व्यक्तीला तुम्ही कधीच बदलू शकत नाही. हे म्हणजे एखादं पुस्तक वाचताना तुम्हाला त्याचा शेवट माहीत असल्यासारखं आहे. पण त्यावेळी मला हे समजलं नाही. जितकं त्याबाबत परखडपणे मी आत्ता बोलू शकते. त्यामुळे लक्षात ठेवा एकदा घडून गेलेली गोष्ट तुम्ही कधीही बदलू शकत नाही. हा जीवनाचा महत्त्वपूर्ण धडा आहे.

माझ्याबाबत सांगायचं झाल्यास, मी पुन्हा एकदा या नात्यातून बाहेर पडले आहे. आता मी विचारांनी बरीच मॅच्युअर झाली आहे. हे कळलंय की, तुम्ही कोणत्याही व्यक्तीला बदलू शकत नाही. तुम्ही कितीही प्रयत्न केलात तरीही. ती व्यक्ती नंतर तुमच्याशी कितीही चांगली वागली तरी तिला पुन्हा तुमच्या आयुष्यात येऊ देऊ नका. या सगळ्यातून मी आता बाहेर पडले आहे आणि ते नातं तुटलं ते चांगलंच झालं. काही दिवस वाईट गेले पण आता मात्र मी मुक्त आहे.

तर ही होती रीनाची #MyStory तिच्या शब्दात. तुमच्याकडेही अशी #MyStory असेल तर आम्हाला नक्की लिहून पाठवा. तुम्हाला #POPxoMarathi वर अजून काय वाचायला आवडेल तेही आम्हाला कळवा. 

हेही वाचा -

#MyStory... आणि आमच्या रिलेशनशीपमध्ये आली ती

#MyStory : माझं पहिलं प्रेम जे कधीच….

#MyStory: तो माझ्या आयुष्यातून निघून गेला पण….