14 जूनचं राशीफळ, वृषभ राशीला कुटुंबाची मिळणार साथ

14 जूनचं राशीफळ, वृषभ राशीला कुटुंबाची मिळणार साथ

मेष - आईबाबांची काळजी घ्या

आज तुमच्या आईला पायाच्या दुखण्याचा त्रास होऊ शकतो. व्यवसायात तुमची रखडलेली काम पूर्ण होतील. नोकरीमध्ये तुम्हाला वरिष्ठांची मदत मिळेल. तणाव दूर होईल. देवाण-घेवाण करण्याच्या व्यवहारात सावधनता बाळगा. पार्टनरच्या भावना समजून घ्या.

कुंभ - उत्पन्नाचे स्त्रोत वाढतील

तुमच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते. अडकलेले पैसे अचानक मिळण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांची मदत मिळेल. मित्रांसोबत फिरायला जाण्याचा योग आहे. कुटुंबासोबत चांगला वेळ घालवाल. एखाद्याला मदत करण्याची संधी मिळेल.

मीन- नकारात्मक विचार टाळा

विद्यार्थ्याच्या मनांमध्ये नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. त्यामुळे काळजी घ्या. आळस झटका आणि दुर्लक्ष करू नका. व्यवसायांमध्ये तांत्रिक प्रयोगांमुळे त्रास होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांशी मतभेद टाळा.

वृषभ - कुटुंबाची मिळणार साथ

आज जर तुम्हाला एखादं लक्ष्य साध्य करायचं असल्यास कुटुंबाची साथ मिळेल. घरात एखादं मंगल कार्य ठरेल. सहकाऱ्यांशी व्यवहार केल्याने सामाजिक प्रतिष्ठेत वृद्धी होईल. व्यवसायात लाभ होईल. न्यायालयीन प्रकरण मार्गी लागतील.

मिथुन - निर्धारित लक्ष्य पूर्ण करण्यात यशस्वी व्हाल

आज तुम्हाला तुमचं निर्धारित लक्ष्य प्राप्त करण्यात यश मिळेल. कार्यक्षेत्रांमध्ये बौद्धिक क्षमतेचा लाभ घ्याल. विद्यार्थ्यांची अभ्यासातील रूची वाढेल. विदेश यात्रेचा योग आहे. रचनात्मक कार्यामुळे तुमची लोकप्रियता वाढेल. देवाण-घेवाणाच्या व्यवहारात यश मिळेल.

कर्क - तुमची एखादी महागडी वस्तू हरवू शकते

आज पैशांसंबंधी तुम्हाला एखादी अडचण येऊ शकते. तुमच्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्या. चोरी होण्याची शक्यता आहे. व्यवसायातील होणार काम अचानक लांबणीवर जाईल. जास्त पैसे खर्च करूनही फायदा होणार नाही. पण कर्ज घेणं टाळा. पार्टनरकडे दुर्लक्ष करू नका.

सिंह - पार्टनरची चांगली साथ मिळेल

पार्टनरच्या सहयोगाने तुमचं मन आनंदी राहील. कुटुंबात खेळीमेळीचं वातावरण राहील. व्यवसायासाठी आखलेल्या एखाद्या योजनेत यश मिळेल. तुमच्या संततीकडून तुम्हाला एखादी आनंदवार्ता मिळू शकते. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेत यश मिळेल.

कन्या - वडिलांशी होऊ शकतात मतभेद

तुमच्या जवळच्या व्यक्तींच्या वागण्यामुळे तुम्हाला आज त्रास होईल. वडिलांशी तुमचे आज मतभेद होण्याची शक्यता आहे. मनात निराशा आणि असंतोष जाणवेल. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देऊ शकतात. आरोग्याकडे लक्ष द्या. धार्मिक कार्यात सहभाग घ्याल.

तुळ - दुखणं डोकं वर काढेल

कोणत्या तरी अनाहूत भयामुळे तुमच्या मनात भीती राहील. एखाद्या दुखण्यामुळे तुम्हाला त्रास सहन करावा लागेल. छोटी-मोठ्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. विद्यार्थ्यांना स्पर्धेत यश मिळेल. जुनी प्रकरण मार्गी लागतील. आर्थिक स्थिती मजबूत राहील.

वृश्चिक - अचानक धनलाभ होईल

उच्च शिक्षणासाठी चांगली संधी मिळेल. अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तार कराल. राजकारणात रस घ्याल. रखडलेली काम पूर्ण होतील. सामाजिक प्रतिष्ठेत वाढ होईल. पार्टनरशी संबंध बिघडतील.

धनु - व्यवसायात मिळेल भावाची साथ

व्यवसायात तुम्हाला आज भावाची साथ मिळेल. विद्यार्थ्यांचं मन आज अभ्यासात रमेल. पार्टनरसोबत एखाद्या सामाजिक कार्यक्रमात सहभाग घ्याल. सासरकडच्यांकडून एखादी चांगली बातमी मिळेल.

मकर- व्यवसायात चढ-उतार जाणवेल

विद्यार्थ्यांनी नको त्या कामात वेळ घालवू नये. आपल्या दैनंदिन आहार आणि दिनचर्येवर लक्ष द्या. व्यवसायांमध्ये चढ-उतार जाणवेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी तणाव वाढेल. देवाणघेवाणीच्या व्यवहारात काळजी घ्या. राजकारणात जबाबदारी वाढू शकते.