15 जून राशीफळ, कुंभ राशीला आळस झटकण्याची गरज

15 जून राशीफळ, कुंभ राशीला आळस झटकण्याची गरज

मेष : विनाकारण गुंता वाढेल

कामाच्या ठिकाणी काही अडथळे येतील पण त्याचा सामना तुम्हाला करावा लागेल. व्यवसायात मिळालेले एखादे काम रद्द होऊ शकते. सांभाळून राहा. विनाकारण गुंता वाढेल. जोडीदारासोबतचे संबंध मजबूत होतील. आरोग्याची काळजी घ्या.

कुंभ: चांगली संधी गमवाल

आज आळस आणि दुर्लक्ष करण्याच्या तुमच्या स्वभावामुळे तुम्ही चांगली संधी गमावून बसाल. कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाच्या पद्धतीवर वरिष्ठ अधिकारी नाराज होतील. विद्यार्थ्यांना अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. वाढत्या खर्चावर नियंत्रण ठेवा.आर्थिक अडचणी येऊ शकतात. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.

मीन: अडकलेला पैसा मिळेल

प्रॉपर्टी संदर्भातील वादात तुम्हाला यश मिळण्याचे संकेत आहेत. अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता आहे. प्रॉपर्टीमध्ये पैसा गुंतवण्याची योग्य वेळ आलेली आहे. तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदलाची शक्यता आहे. कुटुंबातील समस्या प्रेम आणि समजुतदारपणे सुटतील. आरोग्याची काळजी घ्या.

वृषभ: अंगदुखीचा होईल त्रास

अंगदुखीमुळे आज तुम्ही चिंतेत राहाल. संपूर्ण दिवस तुम्हाला थकवा जाणवेल. त्यामुळे खाण्यापिण्यावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबतचे संबंध अधिक दृढ होतील. समाजात मान- सन्मान वाढेल.

मिथुन : बिघडलेले संबंध होतील चांगले

आज मित्रांच्या मध्यस्थीने बिघडलेले संबंध चांगले होतील. नोकरीमध्ये नव्या जबाबदाऱ्या मिळण्याची शक्यता आहे. जोडीदाराचे प्रेम आणि सहकार्य मिळेल. कौटुंबिक संबध चांगले होऊन त्यातील गोडवा वाढेल.व्यवसायातील एका खास योजनेसाठी सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.

कर्क : गुंतागुंत सुटेल

राजकारणात सक्रीय असणाऱ्या व्यक्तींसाठी चांगला काळ आहे. विद्यार्थ्यांना मेहनतीचे फळ मिळेल. कामाच्या ठिकाणी आर्थिक फायदा होईल किंवा पदोन्नति होईल. तुम्ही आखून ठेवलेली कामे पूर्ण होतील. गुंतागुंत सुटेल. मित्रांसोबत बाहेर जाण्याचे योग आहेत

सिंह: पैशासंदर्भातील निर्णय घेऊ नका

आज व्यवसायासंदर्भातील कोणताही निर्णय घेऊ नका. कोणाशीही पैशांसंदर्भातील व्यवहार करु नका. विनाकारण धावपळ होईल. कुटुंबात तणाव वाढेल. स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थ्यांना यश मिळेल. वादापासून दोन हात दूर राहा. वाहनसंबंधी काही समस्या उद्भवण्याची शक्यता आहे.

कन्या: बाहेर जाण्याचा बेत आखाल

आरोग्यात सुधारणा होईल. आरोग्याच्या तक्रारी पुढे एक- दोन दिवसात कमी होईल. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य मिळेल. कामाच्या ठिकाणी काही खास कामांमध्ये तुम्हाला यश मिळेल. तुम्ही कोणावरतरी ठेवलेला विश्वास सार्थकी ठरेल. मित्रांसोबत कुठे तरी बाहेर जाण्याचा तुम्ही बेत आखाल.

तूळ : अनुभवी व्यक्तीची घ्यावी लागेल मदत

घरातील काही समस्या सोडवण्यासाठी कोणत्यातरी अनुभवी व्यक्तीची मदत घेणे योग्य राहील. अगदी लहान कारणामुळे तुमचा मित्र तुमच्यावर रुसण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी येऊ शकतात.आरोग्याची काळजी घ्या. आर्थिक स्थिती चांगली राहील.

वृश्चिक: स्थुल व्यक्तींना होईल त्रास

स्थुल व्यक्तींना मांसपेशी दुखीचा त्रास होण्याची शक्यता आहे. विनाकारण धावपळ होईल. समाजात सन्मान वाढेल. व्यवसायात नव्या योजनेची सुरुवात होईल. विद्यार्थीवर्गाला उच्च शिक्षणात यश मिळण्याची शक्यता आहे.

धनु: मौल्यवान भेटवस्तू मिळेल

आज तुमचा दिवस एकदम छान असेल. तुम्हाला एखादी मौल्यवान वस्तू भेट म्हणून मिळू शकते. कोणाला दिलेले पैसे परत मिळतील. व्यवसायात फायदा होईल आणि नोकरी करणाऱ्या व्यक्तींचा पगार वाढेल. संततीकडून एखादी आनंदवार्ता मिळण्याची शक्यता आहे. घरी कोणतीतरी महाग वस्तू खरेदी करण्याचा योग आहे.

मकर: वडिलांचे सहकार्य लाभेल

वडिलांचे प्रेम आणि त्यांची भावनात्मक मदत आज तुम्हाला मिळेल. कुटुंबात आनंद टिकून राहील. जुन्या मित्रांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळेल. कौटुंबिक जबाबदारी वाढेल. व्यवसाय किंवा नोकरीत कोणतीही जोखीम घेऊ नका. देण्याघेण्याचे व्यवहार करताना सावधान

हेही वाचा