17 जून 2017 चं राशीफळ, कुंभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभाचा योग

17 जून 2017 चं राशीफळ, कुंभ राशीच्या लोकांना अचानक धनलाभाचा योग

मेष - अचानक खर्च वाढण्याची शक्यता

आज दिवसभर थोडं सावधान राहण्याची गरज आहे. कारण तुमचा खर्च अचानक वाढू शकतो. पैशांसंबधी समस्या येऊ शकतात. कामाच्या ठिकाणी विरोधकांपासून सावध रहा. जोडीदारासोबत मंगल कार्यात सहभागी होण्याची संधी मिळेल. इतरांना मदत केल्यामुळे समाधान मिळेल.

कुंभ - अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे

आज अचानक धनलाभ होण्याची शक्यता आहे. भौतिक साधनांमध्ये वाढ होईल. वृद्ध व्यक्तींची काळजी घ्या. नवीन नातेसंबध निर्माण होतील. मित्रांसोबत व्यावसायिक प्रवासा कराल.  रचनात्मक कार्यात मन रमवा. राजकारणात जबाबदाऱ्या वाढतील.

मीन- भावंडांमधील कटूपणा वाढेल

आज तुमच्या भावंडांमध्ये भांडण होण्याची शक्यता आहे. वडिलांचे सहकार्य मिळेल. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीशी भेट होईल. नवीन प्रोजेक्टवर काम कराल. विरोधक नमतील.कायदेशीर बाबतीत यश मिळेल. धार्मिक कार्यात रस वाढेल.

वृषभ - नवीन रोजगार मिळण्याची शक्यता आहे

व्यवसायात थोडे अधिक परिश्रम घ्यावे लागतील. नवीन रोजगाराच्या संधी मिळण्याची शक्यता आहे. सुख साधनांमध्ये वाढ होईल. धार्मिक आणि सामाजिक कार्यामुळे प्रतिष्ठा वाढेल. राजकारणात सक्रियता वाढेल. प्रेमसंबधांमध्ये कलह निर्माण होऊ शकतो.

मिथुन - व्यापारात समस्या येतील

आज अचानक तुमच्या व्यवसायामध्ये समस्या येण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. पैशांसंबधी समस्या येऊ शकतात. कर्ज घेऊ नका. वाद विवाद करणे टाळा. जोडीदाराची काळजी घ्या. राजकारणात सहकार्य मिळू शकतं.

 

कर्क - आरोग्यात सुधारणा होण्याची शक्यता

आजारी वडीलांच्या तब्येतीत सुधारणा होईल. मात्र दैनंदिन कामे आणि आहाराबाबत सावध रहा. विनाकारण खर्च आणि दुर्लक्षपणा करणे टाळा. जोखिमीची कामे करण्यात तुम्हाला आज रस वाटेल. कायदेशीर समस्या मार्गी लागतील. जोडीदारासोबत नात्यातील गोडवा वाढेल. रखडलेली कामे पूर्ण कराल.

सिंह - जोडीदारासोबत नात्यातील कटूपणा दूर होईल

संतान सुख मिळेल. जोडीदारासोबत नाते सुधारेल. घरात मंगल कार्य घडेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. रखडलेली कामे पूर्ण कराल. सामाजिक मानसन्मान  आणि धनसंपत्ती वाढण्याची शक्यता आहे. आरोग्य सुधारेल

कन्या - कामाच्या ठिकाणी प्रगती होईल

विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला असेल. अभ्यासात आज त्यांचे मन चांगले रमेल. कामाच्या ठिकाणी प्रगती होण्याची शक्यता आहे. व्यावसायिक विस्तार होईल. पैसे उधार घेणे टाळा. रखडलेली कामे पूर्ण कराल. जोडीदाराशी नाते मजबूत होण्याची शक्यता आहे.

तूळ - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे

आज तुमच्या कामाच्या ठिकाणी तुमचे भांडण होऊ शकते. शिवाय आज आर्थिक नुकसान होण्याची देखील शक्यता आहे. कोर्ट-कचेरीपासून दूर रहा. मित्रांच्या सहकार्याने कामे पूर्ण कराल.राजकारणात रस वाढेल. रचनात्मक कार्यात रस वाढेल. वाहन चालवताना सावध रहा.

वृश्चिक - आरोग्य सुधारेल

आरोग्य सुधारेल. कुटुंबासोबत मजामस्ती कराल. जमा-खर्चावर नियंत्रण ठेवा. राजकारणात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. तुमच्या कौशल्याने रखडलेली कामे पूर्ण कराल. एखाद्या संस्थेद्वारा सन्मान मिळेल. जोडीदाराची भावनिक साथ मिळेल.

धनु - कुटुंबासोबत मतभेद होतील

घरातील जवळच्या लोकांशी मतभेद होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. व्यवसायात नवीन ओळखी वाढतील. एखादी महत्वाची समस्या सुटण्याची शक्यता आहे. अचानक धनलाभ होईल. धार्मिक कार्यात रस वाढेल.

 

अधिक वाचा -

तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो तुमचा आवडता 'रंग'

आळशी असतात ‘या’ राशीचे लोक, तुम्ही पण त्यातले एक आहात का

मकर- जोडीदाराची काळजी घ्या

जोडीदाराची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. मन निराश होईल. निराश मनामुळे नकारात्मक व्हाल. एखाद्या खास व्यक्तीच्या मदतीने उत्पन्नांचे साधन वाढेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. राजकारणात व्यस्त राहण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा -

जूनमध्ये जन्म घेणाऱ्या व्यक्ती असतात तरी कशा, जाणून घ्या