19 जून 2019 चं राशीफळ, तूळ राशीच्या लोकांना आज संधीचे सोने करण्याची गरज

19 जून 2019 चं राशीफळ, तूळ राशीच्या लोकांना आज संधीचे सोने करण्याची गरज

मेष - अचानक लाभाच्या संधी मिळतील

आज तुमचा दिवस आनंदाचा असेल. वारंवार लाभाच्या संधी मिळतील. एखाद्या खास व्यक्तीसाठी खर्च कराल. आत्मविश्वास वाढेल. पर्यटन आणि मनोरंजनाचे सुख मिळेल. राजकारणात रस वाढेल. आरोग्याची काळजी घ्या. मित्रांच्या मदतीने बिघडलेली कामे पूर्ण कराल.

कुंभ - जोडीदारावर संशय घेऊ नका

विनाकारण जोडीदारावर संशय घेऊ नका. तुमच्या रागावर नियंत्रण ठेवा. कोणत्याही नात्यात झटकन विश्वास ठेवणे महागात पडेल. मुलांविषयी चिंता वाढेल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढू शकतात. देणी-घेणी करताना सावध रहा.

मीन - आईच्या आरोग्याची काळजी घ्या

आज तुम्हाला तुमच्या आईच्या तब्येतीची काळजी घेण्याची गरज आहे. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. अधिक खर्च झाल्याने चिंता वाढेल. व्यवसायात समस्या येऊ शकतात. वादविवाद करणे टाळा. धार्मिक कार्यात रस वाढेल. प्रवास करणे टाळा.

वृषभ - नवीन प्रेमसंबध निर्माण होतील

आज तुमच्या नव्या प्रेमप्रकरणाला सुरूवात होऊ शकते. संकटाच्या काळी आई-वडील मदत करतील. व्यवसायात भागिदारी लाभदायक ठरेल. कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाकडून मदत मिळेल. नवीन ओळखी वाढतील. रखडलेली कामे पूर्ण कराल.

मिथुन - विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमणार नाही

आज तुम्हाला नोकरी अथवा व्यवसायात समस्या येतील. विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाही. मूडमध्ये अचानक बदल होईल. रखडलेली कामे पूर्ण कराल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. वाहन चालवताना सावध रहा. आरोग्याची काळजी घ्या. 

कर्क - कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता आहे.

कौंटुंबिक संपत्तीचा हक्क मिळेल. व्यवसायाच्या नव्या योजना सफळ होतील. हरवलेला आत्मविश्वास परत मिळेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. परदेशात जाण्याचा योग आहे. मुलांकडून आनंदवार्ता  मिळतील.

सिंह - कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देतील.

विद्यार्थ्यांना अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी विरोधक त्रास देतील. सावध रहा. घाई घाईत काम करू नका. चुक होण्याची शक्यता आहे. जोडीदाराच्या भावनांचा सन्मान राखा. आर्थिक परिस्थितीत सुधारणा होईल. रचनात्मक कामामुळे प्रसिद्धी  मिळेल.

कन्या - आरोग्य बिघडण्याची शक्यता

आज बाहेरचे कोणतेही पदार्थ खाऊ नका. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी समस्या निर्माण होतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. रखडलेली कामे पूर्ण होतील. विद्यार्थ्यांंना मेहनतीचे फळ मिळेल. नातेवाईकांच्या लहान-लहान गोष्टींचा राग करू नका.

तूळ - प्रपोज करायला उशीर करू नका

आज तुम्ही तुमच्या जोडीदाराला एखादी भेटवस्तू देऊन खूश करू शकता. आज प्रिय व्यक्तीला प्रपोज करण्यासाठी चांगला दिवस आहे. आरोग्याची काळजी घ्या.कामाच्या ठिकाणी चांगले सहकार्य मिळेल.

वृश्चिक - रोजगाराच्या नव्या संधी मिळतील

रोजगाराच्या नव्या संधी खुल्या होतील. व्यवसायात विस्तार होण्याची शक्यता आहे. घरातील वातावरण उत्साहाचे असेल. जोडीदाराशी तुमचे नाते सुदृढ होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल. सामाजिक सन्मान आणि धनवृद्धी होण्याची शक्यता आहे.

धनु - एखादी मौल्यवान गोष्ट हरवण्याची शक्यता

आज तुमची एखादी मौल्यवान गोष्ट हरवू शकते. व्यावसायिक योजनांची चिंता वाढेल. उत्पन्न आणि खर्चात समतोल राखा. आर्थिक परिस्थितीबाबत समस्या येतील. नात्यातील कटूपणा कमी होईल. नवीन संबंध निर्माण होऊ शकतात.

मकर-  आरोग्यसमस्या डोकं वर काढतील

आज तुम्हाला आरोग्याबाबत समस्या जाणवतील. एखाद्या खास व्यक्तीसोबत ओळख मिळेल. व्यवसायात फायदा होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील. अचानक धनलाभ होईल. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. रचनात्मक कार्यांत वाढ होईल.

अधिक वाचा -

तुमच्या स्वभावाबद्दल काय सांगतो तुमचा आवडता 'रंग'

यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा 'या' गुडलक वास्तू टीप्स (Goodluck Vastu Tips)

या राशीच्या व्यक्ती असतात Romanceसाठी नेहमीच तयार