21 June 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आज भाग्योदयाचा योग

21 June 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांसाठी आज भाग्योदयाचा योग

मेष - भावंडांसोबत वादविवाद होण्याची शक्यता

भावंडासोबत आज भांडण होण्याची शक्यता आहे. घरातील वृद्ध लोकांच्या निर्णयाचा मान राखा. प्रवास करणे टाळा. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. देणी-घेणी करताना सावध रहा.

कुंभ - पैशांचे नुकसान होण्याची शक्यता

आज धोका झाल्याने तुमचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. खर्च वाढल्यामुळे त्रस्त व्हाल. वारसाहक्काबाबत समस्या वाढतील. व्यवसायात समस्या येऊ शकतात. रखडलेली कामे पूर्ण कराल. आईवडीलांचे सहकार्य मिळेल.

मीन- एखाद्या जुन्या आजरापणातून सुटका मिळेल

आज तुम्हाला एखाद्या जुन्या आजारपणातून सुटका मिळेल. आर्थिक समस्या दूर होतील. घरात मंगल कार्य ठरण्याची शक्यता आहे. व्यवसायातील समस्या दूर होतील. अधिकारी तणाव वाढवतील. रखडलेली कामे पूर्ण होण्याची शक्यता

वृषभ - मन निराश राहील

जुनी पोटदुखी पुन्हा  होण्याची शक्यता आहे. मन निशांत राहील. खर्चावर नियंत्रण राखा. तुमच्या चांगल्या वागण्यामुळे एखादी व्यक्ती प्रभावित होऊ शकते. एखाद्या संस्थेकडून मानसन्मान मिळेल. विरोधक त्रास देतील. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे.

मिथुन - उत्पन्नाचे साधन वाढण्याची शक्यता

आज तुम्हाला भाग्याची चांगली साथ मिळेल. व्यवसायासाठी केलेले प्रयत्न फायदेशीर ठरतील. नोकरी व्यतिरिक्त उत्पन्नाचे साधन वाढेल. बराच काळ रखडलेली कामे मार्गी लागतील. रचनात्मक कार्यात रस वाढेल. अविवाहितांना लग्नासाठी स्थळ येण्याची शक्यता

कर्क - मैत्रीचे रूपांतर प्रेमात होण्याची शक्यता आहे

आज तुमची मैत्री प्रेमात बदलण्याचा दिवस आहे. एखाद्या प्रभावी व्यक्तिमत्त्वाशी भेट होईल. व्यवसायानिमित्त परदेशी प्रवास करावा लागेल. कामाच्या ठिकाणी उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल. जोडीदाराशी नाते दृढ होईल.

सिंह - कामाच्या ठिकाणी तणाव वाढेल

कामाच्या ठिकाणी आज ताणतणावाचे वातावरण राहील. कोणत्याही प्रकारची तडजोड करू नका. व्यवसायात चढउतार येण्याची शक्यता आहे. आई-वडिल भावनिक आणि आर्थिक सहकार्य करतील. वाहन चालवताना सावध रहा. देणी-घेणी करताना सावध रहा

कन्या - कौटुंबिक संपत्ती मिळण्याची शक्यता

कुटुंबाकडून वारसा हक्क मिळेल. आर्थिक स्थिती मजबूत होण्याची शक्यता. घरात उत्साहाचं वातावरण राहील. सामाजिक कार्यक्रमात मित्र आणि नातेवाईकांशी भेट होईल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढण्याची शक्यता आहे. कोर्टकचेरीच्या त्रासापासून सुटका

तूळ - अधिकाऱ्यांशी तणाव वाढेल

टाळाटाळ केल्यामुळे आज कामाच्या ठिकाणी तणाव वाढू शकतो. अधिकाऱ्यांसोबत तणाव वाढेल. सहकाऱ्यांसोबत चांगले वागण्याचा प्रयत्न करा. आर्थिक स्थिती चांगली होईल. पैशांसंबधीत खूशखबर मिळेल. जोडीदाराकडून भावनिक सहकार्य मिळेल.

वृश्चिक - शारीरिक थकवा आणि तणाव जाणवेल

आज एखाद्या गोष्टीमध्ये दिवसभर व्यस्त राहाल. शारीरिक थकवा आणि तणाव जाणवेल. नोकरीत वरीष्ठांचे सहकार्य मिळेल. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होण्याची शक्यता.  उत्पन्नाचे नवे साधन मिळेल. धार्मिक कार्यात रस वाढेल. जोडीदाराशी नाते मजबूत होईल.

धनु - कुटुंबाची साथ मिळेल

आज तुमची तुमच्या जोडीदाराशी भेट होईल. संकटकाळी कुटुंबाची साथ मिळेल. आरोग्य चांगले राहील. कुटुंबासोबत बाहेरगावी जाण्याचा योग आहे. कोर्टकचेरीतून सुटका होईल. आर्थिक स्थिती मजबूत होईल.

मकर- क्रीडा क्षेत्रात यश मिळेल

विद्यार्थ्यांना स्पर्धा परिक्षांमध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. क्रीडा क्षेत्रात यश मिळेल. कामाच्या ठिकाणी एखाद्या जुन्या वादातून सुटका मिळेल. मनासारखे काम केल्यामुळे उत्साह वाढेल. एखाद्या मोठ्या व्यवसायाचं काम मिळेल. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे.