22 जून 2019 चं राशीफळ, कर्क राशीला होणार धनलाभ

22 जून 2019 चं राशीफळ, कर्क राशीला होणार धनलाभ

मेष - आरोग्य सुधारेल

जीवनशैलीत बदल केल्यामुळे तुमचे आरोग्य सुधारेल. प्रवास करण्यासाठी योग्य काळ आहे. उत्पन्नाचे साधन वाढण्याची शक्यता आहे. कुटुंबातील वातावरण आनंदी राहील. जोडादारोसोबत नाते दृढ होईल. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील.

कुंभ - विद्यार्थ्यांचे मन रमेल

आज तुमच्या करिअरच्या आड येणारे अडथळे दूर होतील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन रमेल. कामाच्या ठिकाणी उन्नती होईल. व्यवसायात यश मिळेल. आत्मविश्वास वाढेल. मित्र अथवा मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल.

मीन- उत्पन्न कमी होण्याची शक्यता

आज तुमच्या उत्पन्नामध्ये कमी होण्याची शक्यता आहे. नवीन प्रॉपर्टी घेण्याचा विचार पुढे ढकला. खर्चावर योग्य नियंत्रण ठेवा. विरोधक त्रास देण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी वाद होऊ शकतात. कुटुंबाकडून भावनिक आणि आर्थिक सहकार्य मिळेल. मित्रमंडळी मदत करतील.

वृषभ - आज मुलांची चिंता सतावेल

प्रिय व्यक्तीला धोका देणे अथवा धोक्यात ठेवणे योग्य नाही. नातेसंबध दूरावण्याची शक्यता आहे. मुलांची चिंता आज तुम्हाला सतावेल, कामाच्या ठिकाणी विरोधकांचा त्रास होईल. कोर्ट-कचेरीपासून सुटका होईल. रखडलेली कामे पूर्ण होतील.

मिथुन - लहान सहान आजारपणे त्रास देतील.

आज तुम्हाला एखादे लहान-सहान दुखणे त्रास देईल. आहाराबाबात काळजी घ्या. एखादं जुनं प्रोजेक्ट अचानक पुन्हा सुरू होण्याची शक्यता आहे. कामाच्या  ठिकाणी पदोन्नती होऊ शकते. खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत रोमॅंटिक व्हाल.

कर्क - एखादी चल-अचल संपत्ती खरेदी कराल

एखादी संपत्ती खरेदी करण्याचा निर्णय घ्याल. व्यावसायिक कामे लवकर पूर्ण होऊ शकतात. आर्थिक लाभ होण्याची शक्यता. कामाच्या ठिकाणी पदोन्नती होऊ शकते. जोडीदारासोबत परदेश यात्रा कराल. रचनात्मक कार्यात वाढ होईल. देणी-घेणी सांभांळून करा.

सिंह - जुन्या प्रियकर अथवा प्रेयसीची भेट होईल

आज तुमची अचानक तुमच्या पूर्व प्रेमीशी भेट होऊ शकते. भावंडाच्या मदतीने व्यवसायात वाढ होऊ शकते. कौटुंबिक वातावरण आनंदाचे असेल. जोडीदारासोबत बाहेरगावी जाण्याचा बेत आखाल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या - विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात रमणार नाही.

आज विद्यार्थ्यांचे मन अभ्यासात लागणार नाही. व्यवसाय अथवा नोकरीत समस्या येतील. आहाराची काळजी घ्या. मुलांकडून आनंदवार्ता समजतील. जोडीदाराच्या भावनांचा मान राखा. वाहन चालवताना सावध रहा.

तूळ - नवीन व्यवसाय सुरू कराल

आज तुम्ही एखाद्या नव्या व्यवसायाला सुरूवात कराल, उत्पन्नाचे साधन वाढेल. सासरच्या मंडळींकडून एखादी मौल्यवान भेटवस्तू मिळेल.  कुटुंबात भावनात्मक वातावरण निर्माण होऊ शकतो. तब्येत बिघडण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण कराल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

वृश्चिक - एखादे काम अचानक रद्द होण्याची शक्यता

व्यवसायातील एखादे प्रोजेक्ट बंद पडण्याची शक्यता आहे. महत्त्वपूर्ण कामाचा आळस करू नका. अधिकाऱ्यांसोबत तणाव निर्माण होऊ शकतो. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. पालकांची कर्तव्य पूर्ण कराल. धार्मिक कार्यात रस घ्याल.

धनु - पायात चमक भरण्याची शक्यता

पायात अचानक चमक भरण्याची शक्यता आहे. तब्येतीची काळजी घ्या. मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. व्यवसायात चढ-उतार होतील. कामाच्या ठिकाणी वातावरण आनंदाचे राहील.

मकर - घरात वातावरण आनंदाचे

व्यवसायात एखादी वडीलधारी व्यक्ती तुम्हाला मदत करेल. घरातील वातावरण आज प्रेमाचे आणि उत्साहाचे असेल. कौटुंबिक समस्या दूर होतील. प्रतिष्ठित लोकांची भेट होईल. व्यावसायिक वृद्धी होण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी आनंदाचे वातावरण असेल.

अधिक वाचा

12 राशीमध्ये चार राशी असतात जास्त बलशाली

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)