25 जून 2019 चं राशीफळ, मकर राशीला आज अमुल्य भेट मिळण्याची शक्यता

25 जून 2019 चं राशीफळ, मकर राशीला आज अमुल्य भेट मिळण्याची शक्यता

मेष - नातेसंबंध दृढ होतील

संकटकाळी मित्र आणि नातेवाईक मदत करतील. प्रियजनांशी असलेले गैरसमज दूर होतील. टीकेपासून दूर रहा. बोलताना सावध रहा. नोकरीमधील जबाबदाऱ्या कमी होतील. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. धार्मिक कार्यात रस वाढेल.

कुंभ - विद्यार्थ्यांनी आळस करू नका

आज तुमच्या आत्मविश्वासात कमी जाणवेल. आळस केल्यामुळे अभ्यासात मन रमेल. संयम राखा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. सामाजिक जीवनात भागिदारीचा फायदा होईल. सामाजिक सन्मान आणि धनात वाढ होईल.

मीन- एखादी दुखापत होऊ शकते

जोडीदाराच्या आरोग्याची काळजी घ्याल. एखादी दुखापत होऊ शकते. मुलांकडून आनंदवार्ता मिळेल. नोकरीत बदल होऊ शकते. मेहनतीचे पूर्ण फळ मिळेल. वाढणाऱ्या खर्चांमुळे नवीन काम शोधावे लागेल. रखडलेले काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.

वृषभ - क्रीडा क्षेत्रात रस वाढेल

आज विद्यार्थ्यांना अभ्यासासोबत खेळात रस वाढण्याची शक्यता आहे. कामात यश मिळेल. उत्पन्नाचे नवे साधन मिळेल. हरवलेला आत्मविश्वास वाढेल. वाहन चालवताना सावध रहा. मनोरंजनाची संधी मिळेल. आरोग्याबाबत सावध रहा.

मिथुन - व्यवसायात तोटा होण्याची शक्यता

अती खर्चामुळे आर्थिक संकट येण्याची शक्यता. व्यवसायात तोटा होण्याची शक्यता. उधारी घेऊ नका. पैशांची देणी घेणी करताना सावध रहा. कौटुंबिक तणाव वाढेल. विनाकारण वाद घालू नका. आत्मविश्वास कमी होईल. वाहन चालवताना सावध रहा.

कर्क - आरोग्य चांगले राहील

आरोग्याची काळजी घ्या. रोजगार सफळ होईल. नवीन प्रोजेक्ट मिळू शकेल. नवीन लोकांमुळे व्यवसायात यश मिळेल. विद्यार्थ्यांना आनंदवार्ता मिळेल. जोडीदाराशी नाते मजबूत होईल. धार्मिक कार्यात रस वाढेल.

सिंह - कुटुंबकलह होण्याची शक्यता

मित्र आणि कुटुंबातील नात्यात कटूपणा येतील. वादविवादापासून दूर रहा. रखडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होतील. देणी-घेणी करताना साववध रहा. वाहन चालवताना सावध रहा. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल.

कन्या - उन्हामुळे त्वचेच्या समस्या होतील

उन्हामुळे त्वचेच्या समस्या निर्माण होतील. अर्धवट राहिलेली कामे पूर्ण कराल. एखाद्या आनंदाच्या बातमीमुळे उत्साह वाढेल. खर्चावर नियंत्रण ठेवा. जोडीदारासोबत नातेसंबध चांगले होतील. व्यवसायामुळे विविध क्षेत्रातील ओळखी वाढतील. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

तूळ - नवीन प्रोजेक्ट मिळेल

व्यवसायात वाढ होण्याची शक्यता आहे. नवीन प्रोजेक्ट मिळतील. व्यवसायात नवीन ओळखी वाढतील. तुमच्या कौशल्यामुळे नोकरीत प्रगती होईल. विद्यार्थ्यांसाठी शुभ काळ आहे. आत्मविश्वास वाढेल. प्रेमात त्रिकोण निर्माण होईल.

वृश्चिक - प्रेमसंबध मजबूत होतील

कुंटुबात आनंदाचे वातावरण राहील. बिघडलेले नातेसंबंध चांगले होतील. एखाद्या मित्राशी भेट होईल. गैरसमज करू नका. सन्मान आणि धनसंपत्तीत वाढ होईल. प्रोफेशनल करिअरमध्ये लाभ होण्याची शक्यता. नवीन वाहन खरेदी कराल.

धनु - कामाच्या ठिकाणी समस्या वाढतील

आज कामाच्या ठिकाणी तुमच्या समस्या अधिक वाढण्याची शक्यता आहे. आर्थिक जोखीम घेऊ नका. व्यवसायानिमित्त प्रवास करावा लागेल. मात्र प्रवास करताना सावध रहा. धार्मिक कार्यात रस घ्या. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

मकर- एखादी अमुल्य भेट मिळेल

सासरच्या लोकांकडून एखादी महागडी वस्तू भेट मिळेल. जोडीदारासोबत सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. बिघडलेली कामे पूर्ण होतील. आर्थिक स्थिती मजबूत होईल. राजकारणातील जबाबदारी वाढेल. आरोग्य आणि प्रतिष्ठेची काळजी घ्या.

अधिक वाचा 

जाणून घ्या कोणत्या राशीचे लोक असतात ‘श्रीमंत’

या राशींचे जोडीदार असतात जास्तच केअरिंग, प्रत्येक लहानसहान गोष्टींची घेतात काळजी

राशीनुसार निवडा तुमचे करिअर (Choose career according your zodiac in Marathi)