28 जून 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांमधील कौटुंबिक कलह होतील दूर

28 जून 2019 चं राशीफळ, मिथुन राशीच्या लोकांमधील कौटुंबिक कलह होतील दूर

मेष - करिअरमध्ये नुकसान होण्याची शक्यता

दुर्लक्षपणामुळे करिअरमध्ये नुकसान होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी मनासारखे काम न मिळाल्यामुळे निराश व्हाल. अधिकाऱ्यांचा तणाव वाढेल. बोलताना सावध रहा. देणी-घेणी सांभाळून करा. कायदेशीर बाबतीत यश मिळेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. 

कुंभ - दुर्लक्षपणामुळे चांगली संधी गमवाल

आज तुम्ही दुर्लक्षपणामुळे चांगली संधी गमवाल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी मतभेद होतील. आर्थिक नुकसान होण्याची शक्यता. मित्रांचे सहकार्य मिळेल. एखादे काम पूर्ण झाल्यामुळे प्रतिष्ठा आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होईल.

मीन- आधुनिक सुख-साधनांंमध्ये वाढ

तुमच्या एखाद्या प्रॉपर्टीसाठी चांगला खरेदीदार मिळेल. घरात आधुनिक सुखसाधने वाढतील. धनसंपत्तीबाबत एखादी चांगली बातमी समजेल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. रचनात्मक कामात मन रमेल. रखडलेली कामे पूर्ण कराल.

वृषभ - मानसिक ताण जाणवेल

मानसिक अशांतता जाणवेल. एखाद्या गोष्टीमुळे आज तुमचे मानसिक स्वास्थ बिघडण्याची शक्यता आहे. आत्मविश्वास कमी होऊ शकतो. रखडलेली कामे पूर्ण कराल. अचानक धनलाभ होईल. विरोधकांपासून सावध रहा. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या.धार्मिक कार्यात मन रमवा. 

मिथुन - कौटुंबिक वाद मिटतील

सासरच्या मंडळींकडून एखादी आनंदवार्ता मिळेल. कौटुंबिक वाद मिटतील. व्यवहारातील एखादी मोठी समस्या दूर होईल. सगळीकडे आनंदाचे वातावरण असेल. कामाच्या ठिकाणी जबाबदाऱ्यांकडे  दुर्लक्ष करू नका. वाहन चालवताना सावध रहा.

कर्क - बिघडलेली कामे पूर्ण होतील

व्यवसायातील एखादी खास योजना यशस्वी करण्यासाठी सहकार्य मिळेल. त्यामुळे बिघडलेले काम पुन्हा नीट होईल. उत्पन्नाचे साधन वाढेल. कोर्टकचेरीतून सुटका होईल. परदेशी जाण्याचा योग आहे. सामाजिक मानसन्मान आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होईल. 

सिंह - एखाद्या तोट्याच्या व्यवसायात पैसे गुंतवू नका

एखाद्या तोट्याच्या व्यवसायात पैसे  गुंतवू नका. वाहन खर्च वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराकडून तणाव जाणवेल. कुंटुंबाबाबत एखादा कठीण निर्णय घ्यावा लागेल. रखडलेली  कामे पूर्ण कराल.

कन्या - आरोग्य चांगले राहील

व्यायाम केल्यामुळे तुमचे आरोग्य ठणठणीत राहील. दिवसभर फ्रेश वाटेल. कुंटुबात आनंद वाढेल. जोडीदारासोबत सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हाल. रखडलेली कामे पूर्ण होतील. नवीन ओळखी वाढतील. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील.

तूळ - घरातील शांतता राखा

घरातील शांतता भंग होणार नाही याची काळजी घ्या. जोडीदारावर संशय घेऊ नका. रागावर नियंत्रण ठेवा. आरोग्य चांगले राहील. कामाच्या ठिकाणी उत्कर्ष होईल. नवीन प्रोजेक्टमधून फायदा होईल. रखडलेली कामे पूर्ण कराल. 

वृश्चिक - आईच्या तब्येतीची काळजी घ्या

आज तुमच्या आईची तब्येतीची काळजी घ्या. मानसिक चिंता वाढेल. खर्च वाढण्याची शक्यता आहे. विरोधक तुमचे कौतुक करतील. व्यवसायात शासकीय लोकांकडून सहकार्य मिळेल. आरोग्याची काळजी घ्या. रचनात्मक प्रगती होईल.

धनु - एखादी धनसंपत्ती खरेदी कराल

आज तुम्ही एखादी संपत्ती खरेदी कराल. घरातील सुखसाधनांमध्ये वाढ होण्याची शक्यता. आत्मविश्वास वाढल्याने निर्णय घेणे सोपे जाईल. परदेशी जाण्याचा योग आहे. कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष करू नका.  रखडलेली कामे पूर्ण होतील.

मकर- जोडीदारासोबत गैरसमज होतील

जोडीदारासोबत आज तुमचा गैरसमज होऊ शकतो. कुंटुबासोबत बाहेरगावी जाल. मित्रांच्या मदतीने कामे पूर्ण होतील.कोर्टकचेरीपासून सुटका होतील. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील. आरोग्याची काळजी घ्या.