29 जून 2019 चं राशीफळ, आज मेष राशीला धनलाभ

29 जून 2019 चं राशीफळ, आज मेष राशीला धनलाभ

मेष - पैशांसंबधी चांगली बातमी मिळेल

आज तुम्हाला व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. पैशांसंबधी चांगली बातमी मिळेल. आर्थिक संकट दूर होईल. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांकडून सन्मान मिळेल. प्रिय व्यक्तीसोबत लॉंग ड्राईव्हवर जाल. रखडलेली कामे पूर्ण कराल. आत्मविश्वासात वाढ होईल.

कुंभ - जोडीदारासोबत नाते मजबूत होईल

जोडीदाराच्या भावनांचा आदर राखा. तुमच्यामधील नाते अधिक दृढ होऊ शकते. वैवाहिक जीवनातील समस्या  दूर होतील. अचानक धनलाभ होऊ शकतो. नोकरीत बदल करण्याची शक्यता आहे. मन निराश होऊ शकते. कोर्टकचेरीतून सुटका होईल.

मीन- दुर्लक्षपणा झाल्याने चांगली संधी गमवण्याची शक्यता

आज तुमच्या हातून एखादी चांगली संधी निघून जाईल. कामाच्या ठिकाणी दुर्लक्षपणा करू नका. आर्थिक स्थिती मजबूत असेल. आरोग्याची काळजी घ्या. धनसंबधी एखादी चांगली बातमी मिळू शकेल. परदेशी जाण्याचा योग आहे.

वृषभ - नवीन काम सुरू करू नका

विद्यार्थ्यांच्या मनात आज नकारात्मक विचार येऊ शकतात. नवीन काम आज सुरू करू नका. कामाच्या ठिकाणी विरोधकांचा त्रास जाणवेल. नोकरी बदलण्याचा विचार कराल. जोडीदारासोबत एखाद्या धार्मिक ठिकाणी जाण्याचा योग आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो.

मिथुन - त्वचाविकार होऊ शकतात

त्वचा विकार होण्याची शक्यता आहे. घरातून बाहेर जाताना सावध रहा. नोकरीत परिवर्तन होण्याची शक्यता आहे. विरोधक उघडपणे आव्हान देतील. एखाद्या जुन्या समस्येचे निराकरण होऊ शकेल. सामाजिक प्रतिष्ठा आणि धनसंपत्तीमध्ये वाढ होईल.

कर्क - जोडीदाराची काळजी घ्या

जोडीदाराला वेळ द्याय. मदभेद असतील तर बोलून ते दूर करा. प्रेमात बुद्धीपेक्षा मनाचा विचार आधी करा. प्रभावशाली व्यक्तीशी भेट होईल. व्यावसायिक प्रोजेक्ट फायद्याचे ठरतील. कामाच्या ठिकाणी तणावाचे वातावरण राहील.

सिंह - व्यवसायातील अडचणी दूर होतील

जोडीदाराला नोकरीधंद्यात पदोन्नती आणि मानसन्मान मिळेल. व्यावसायिक समस्या दूर होतील. रखडलेली कामे पूर्ण कराल. आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. रचनात्मक कामात प्रगती होईल. आरोग्याची काळजी घ्या.

कन्या - पैशांची गुंतवणूक करताना सावध रहा

आज पैशांची गुंतवणूक करताना सावध रहा. आर्थिक समस्या निर्माण होऊ शकतात. अचानक व्यवसायातील कामे रद्द होतील. मन निराश आणि अशांत राहील. खर्चावर नियंत्रण ठेवा. कामाच्या ठिकाणी एखादी नवीन जबाबदारी मिळेल. रचनात्मक कार्यात मन रमवा. जोडीदाराचे सहकार्य मिळेल.

तूळ - आरोग्य चांगले राहील

ताणतणाव कमी झाल्यामुळे आज तुमचे आरोग्य चांगले राहील. विचारांमध्ये सकारात्मकता आणण्याचा प्रयत्न करा. काम आणि आराम करताना समतोल साधा. कामाच्या ठिकाणी अधिकारी वर्गाचे सहकार्य मिळेल. पदोन्नती होण्याची शक्यता आहे. रखडलेली कामे पूर्ण होतील. एखादा प्रवासाचा बेत अचानक रद्द होईल.

वृश्चिक - कुटुंबिय नाराज होतील

घरात मतभेद झाल्यामुळे वातावरण नाराजीचे असेल. जोडीदाच्या भावनांची काळजी घ्या. त्याला समजून घेण्याचा प्रयत्न करा. कामाच्या ठिकाणी वाद घालणे टाळा. व्यवसायात लाभ होण्याची शक्यता आहे. रचनात्मक कार्यात प्रगती होण्याची शक्यता आहे. देणी-घेणी करताना सावध रहा.  

धनु - उष्णतेचा त्रास जाणवेल

उन्हामुळे उष्णतेचा त्रास जाणवू शकतो. त्वचेची जळजळ होईल. धनलाभाचा योग आहे. खर्च वाढू शकतो.उत्पन्नांमध्ये वाढ होईल. नोकरीत बदल होऊ शकतात. बिघडलेली कामे पूर्ण होतील. राजकारणातील जबाबदाऱ्या वाढतील.

मकर- धनसंपत्तीमध्ये वाढ होऊ शकते

व्यावसायिक वाढ आणि नोकरीत पदोन्नती मिळण्याचा योग आहे. धनसंपत्तीमध्ये वाढ होऊ शकते. घरात मंगल कार्य ठरेल. जोडीदारासोबत तणाव जाणवेल. वाहन चालवताना सावध. मित्रांमुळे त्रास होऊ शकतो.