3 जून 2019 चं राशीफळ, कर्क राशीच्या युवांना मिळणार घवघवीत यश

3 जून 2019 चं राशीफळ, कर्क राशीच्या युवांना मिळणार घवघवीत यश

मेष - कामाकडे लक्ष द्या


कामाकडे दुर्लक्ष करू नका, तुम्हाला नुकसान होण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये तुम्हाला एखाद्या वरिष्ठाकडून वाईट वागणूक मिळू शकते. धीर ठेवून काम करा. वाद-विवाद टाळा. विद्यार्थ्यांना अभ्यासात यश मिळेल.


कुंभ - आर्थिक नुकसान होण्याची शक्यता


आज विद्यार्थ्यांचा मनासारखा अभ्यास होणार नाही. कामाच्या ठिकाणी दुर्लक्ष झाल्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. रागावर नियंत्रण ठेवा. एखाद्या बातमीमुळे मनात संभ्रम निर्माण होईल. अध्यात्माकडे तुमचा ओढा वाढेल. पार्टनरची सोबत मिळेल.


मीन- मित्रांकडून भेटी मिळतील


आयात-निर्यातीशी निगडीत व्यवहारात तुम्हाला आज लाभ होईल. मित्रांकडून तुम्हाला महागडी गिफ्ट्स मिळण्याची शक्यता आहे. संपत्ती खरेदीची योजना आखाल. आरोग्याची विशेष काळजी घ्या. पार्टनरसोबत संबंध सुधारतील. फिरायला जाण्याचा योग आहे.


वृषभ - पार्टनरच्या तब्येतीची काळजी घ्या


पार्टनरची तब्येत बिघडू शकते. त्यामुळे त्याच्या आहाराकडे आणि रूटीनकडे लक्ष द्या. ज्या कामाची तुम्हाला चिंता होती ते लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. देवाण-घेवाणीच्या व्यवहारात काळजी घ्या. खर्चात वाढ होईल. तुमच्या मुलांकडून चांगली बातमी मिळेल.


मिथुन - जूने वाद मिटतील


मित्रांबरोबर केलेले प्लॅन पूर्ण होतील. जुने वाद दूर होतील. आत्मविश्वासाने सर्व समस्यांचा सामना करा. पार्टनरशी संबंध सुधारतील. आज एखादी चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे. राजकारणातील सहभाग वाढेल.


कर्क - तरुणांना मिळेल यश


नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्या युवांना यश मिळण्याची शक्यता आहे. आज तुमची काम जलदगतीने पूर्ण होतील. आत्मविश्वासात वाढ होईल. प्रेम प्रकरणात यश मिळेल. नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल. कौटुंबिक वातावरण चांगलं राहील.


सिंह - मुलांसाठी खर्च कराल


आज कमी किंमत आहे म्हणून कोणतीही स्वस्त वस्तू खरेदी करू नका. नंतर पस्तावण्याची वेळ येऊ शकते. संततीवर अनावश्यक खर्च होण्याची शक्यता आहे. कायदेशीर प्रकरणात अडथळा येऊ शकतो. राजकारणात असणाऱ्या व्यक्तीची जवाबदारी वाढेल. रचनात्मक कार्यामध्ये प्रगती होईल.


कन्या - आरोग्यात होईल सुधारणा


आज तुम्हाला ताजंतवान वाटेल. तब्येतही चांगली राहील. पैशांबाबतच्या अडचणी दूर होतील. आत्मविश्वासात वाढ होईल. नोकरीमध्ये तुम्हाला मोठी जवाबदारी मिळण्याची शक्यता आहे. सामाजिक प्रतिष्ठा आणि संपत्ती वृद्धी होईल. संततीसाठी एखादं चांगलं काम कराल. रखडलेली काम पूर्ण होतील.


तुळ - कुटुंबातील तणावात होऊ शकते वाढ


तुमच्या एखाद्याशी असलेल्या संबंधांमुळे कुटुंबाला राग येऊ शकतो. कुुटुंबात तणावाच वातावरणही निर्माण होऊ शकतं. कामाच्या ठिकाणी सहकारी त्रास देण्याचा प्रयत्न करतील. लांबच्या यात्रेचा योग आहे. आरोग्य नीट राहील. वाहन चालवताना काळजी घ्या. मित्रांशी झालेल्या भेटीने आनंदी वाटेल.


वृश्चिक - तब्येतीची काळजी घ्या


आज तुमची तब्येत बिघडण्याची शक्यता आहे किंवा जखम होण्याचीही शक्यता आहे. जास्त विचार करणं टाळा वेळ आणि पैसे दोन्ही वाया जाऊ शकतात. कार्यक्षेत्रात प्रगती होईल. व्यावसायिक विस्ताराची शक्यता आहे. नात्यात गोडवा निर्माण होईल. लांबच्या प्रवासाला जाण्याची प्लान कराल.


धनु - व्यवसायात नफा होईल


आज व्यवसायात तुम्हाला नफा होण्याची शक्यता आहे. विरोधक माघार घेतील. रचनात्मक कार्यात प्रगती होईल. व्यावसायात महत्वपूर्ण भागीदारी होण्याची शक्यता आहे. पार्टनरची सोबत तुम्हाला आज मिळेल. वाहन जपून वापरा.


मकर- नातेवाईकांसोबत वेळ घालवाल


आजचा दिवस तुमच्यासाठी खूपच चांगला आहे. वरिष्ठ अधिकारीही तुमचं म्हणणं ऐकतील. महत्त्वाची सर्व काम सुरळीत पार पडतील. नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवाल. प्रतिष्ठीत व्यक्तीशी भेट होईल. देवाण-घेवाणीचे व्यवहार होतील.