6 जून 2019 चं राशीफळ, कर्क राशीच्या लोकांना व्यवसायात यश

6 जून 2019 चं राशीफळ, कर्क राशीच्या लोकांना व्यवसायात यश

मेष - कठीण काळात वडीलांची साथ मिळेल


प्रिय व्यक्तीशी मनातील गुजगोष्टी करा. नात्यातील तणाव दूर होईल. कठीण काळात वडीलांची चांगली साथ मिळेल. कामाच्या ठिकाणी महत्त्वाच्या जबाबदाऱ्या पूर्ण कराल. आत्मविश्वासात वाढ होईल. व्यावसायिक व्यवहार मित्रांच्या सहकार्यांने पूर्ण कराल. आत्मविश्वासात वाढ होईल. प्रवासाचे संकेत आहेत.


वृषभ - कामाच्या ठिकाणी काही बदल होण्याची शक्यता आहे


कामाच्या ठिकाणी काही बदल होऊ शकतात. व्यावसायिक व्यवहार अचानक रद्द होऊ शकतात. घरातील समस्यांमुळे वातावरण खराब होऊ शकेल. जोडीदारासोबत मंगल कार्यात सहभागी व्हाल. मित्रांशी  भेट होईल.


मिथुन -  वडिलोपार्जित संपत्ती मिळेल


वडिलांकडून प्रॉपर्टीचा हक्क मिळेल. व्यावसायिक विस्तार होण्याची शक्यता आहे. नवीन तंत्रज्ञानाचा फायदा होईल. कामाच्या ठिकाणी जबाबदारी वाढेल. आर्थिक लाभ होईल. नवीन वाहन खरेदी कराल. जोडीदारासोबत बाहेरगावी जाण्याचा योग आहे.


कर्क - व्यावसायिक संबध दृढ होतील


आजचा दिवस तुमच्यासाठी आव्हानात्मक असेल. व्यावसायिक सबंध दृढ होतील. मानसिक ताण जाणवेल. कोर्ट-कचेरीचा सामना करावा लागेल. जोडीदाराच्या वागण्यामुळे मन निराश होईल. भावनिक निर्णय बदलण्याची शक्यता आहे. मित्रांकडून सहकार्य मिळेल.


सिंह - मन अशांत राहील


आज मनात नकारात्मक विचार येतील. मन निराश राहील. जोडीदाराचे सहकार्य लाभेल.  नोकरीत बदल होण्याची शक्यता आहे. आर्थिक स्थिती मजबूत होईल. कुटुंबात सुख-सुविधांमध्ये वाढ होईल. परदेशी जाण्याची संधी मिळेल.


कन्या - कुटुंबासाठी आज सुखाचा काळ


आज तुमचा दिवस तुमच्या प्रिय व्यक्तीसोबत सुखाचा असेल. एखादी आनंदवार्ता समजेल. एखाद्या खास व्यक्तीशी ओळख होईल. आरोग्याबाबत सावध राहण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी नवीन संधी मिळेल. व्यवसायात फायदा होईल. धार्मिक कार्यांत रस वाढेल.


तूळ - नोकरीचा शोध संपेल


आज विद्यार्थ्यांसाठी दिवस चांगला असेल. नोकरीचा शोध संपेल. एखाद्या नवीन गोष्टीचा शोध लावाल. व्यावसायिक योजना पूर्ण होतील. नवीन प्रोजेक्ट मिळेल. जोडीदारासोबत भांडण होण्याची शक्यता आहे.


वृश्चिक - अनमोल गोष्ट चोरीला जाईल


आज नात्यात कोणतीच देवाण-घेवाण करू नका. नातेसंबध बिघडण्याची शक्यता आहे. एखादी मौल्यवान गोष्ट चोरीला जाण्याची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांशी वाद होऊ शकतो. वादविवाद करणे टाळा. रखडलेली कामे पूर्ण होतील. राजकारणात रस वाढेल.


धनु - जोडीदाराचे आरोग्य सुधारेल


जोडीदाराच्या आरोग्यात सुआरणा होईल. मुलांच्या जबाबदाऱ्या  पूर्ण कराल. मित्रांसोबत बाहेरगावी जाण्याचा बेत आखाल. उत्पन्नाच्या साधनांमध्ये वाढ होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्य मिळेल. आत्मविश्वास वाढण्याची वाढेल.


मकर- जोडीदारासोबत ताण वाढेल


आज एखाद्याचे अनाहूतपणे बोलणे तुम्हाला निराश करण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा ताण त्यामुळे वाढेल. वाहन चालवताना सावध रहा. रचनात्मक कामात रस वाढेल. देणी-घेणी सावधपणे करा. आई-वडिलांचे सहकार्य मिळेल. धार्मिक कार्यात रस वाढेल.


कुंभ - आरोग्याबाबत निराश व्हाल


आज आरोग्या बिघडल्यामुळे त्रस्त व्हाल. व्यवसायात चढ-उतार येतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल. शिक्षणासाठी घरापासून दूर जाल. जोडीदाराचा तणाव वाढेल. कौटुंबिक जबाबदाऱ्या वाढतील.


मीन - संपत्ती वाढण्याचे योग आहेत


आज तुमच्या धनसंपत्ती वाढण्याची शक्यता आहे. धनलाभाचे योग आहेत. राजकारणातील आकांक्षा पूर्ण होतील. शैक्षणिक क्षेत्रात यश मिळेल. एखाद्या कार्यात यश मिळाल्याने सामाजिक मान मिळेल. कुटुंबासोबत परदेशी जाण्याचा योग आहे.