9 जून राशीफळ, मकर राशीच्या व्यक्तींना मिळेल भाग्योदयाची संधी

9 जून राशीफळ, मकर राशीच्या व्यक्तींना मिळेल भाग्योदयाची संधी

मेष : भावासोबत भांडण होण्याची शक्यता


आज भावासोबत भांडण होण्याची शक्यता आहे. घाईत आणि भावनिक होऊन घेतलेला निर्णय पश्चातापाचे कारण बनू शकते. व्यवसायात अडचणी येण्याची शक्यता आहे. नोकरीमध्ये अतिरिक्त जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे. जास्तीची मेहनत कराल. आरोग्याकडे दुर्लक्ष करु नका.


कुंभ : घाईत घेतलेला निर्णय करेल आर्थिक नुकसान


घाईत कोणताही निर्णय घेऊ नका. आर्थिक नुकसान होऊ शकते. मन अस्वस्थ राहील. नोकरीत तुमचे पद बदलण्याची शक्यता आहे. विरोधक तुम्हाला खुले आव्हान देईल. एखाद्या जुन्या समस्येवर तोडगा निघेल. एखादी धार्मिक यात्रा कराल. रचनात्मक कामात मन रमेल.


 मीन: इच्छा होतील पूर्ण


एखादा जुना आजार बरा होईल. आज तुमच्या काही इच्छा पूर्ण होतील.  फिरण्यामुळे आज तुमचे महत्वपूर्ण काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. कोणत्यातरी खास अभियानात तुम्ही यशस्वी व्हाल.अचानक धनलाभ होईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल.


 वृषभ: नियमित व्यायाम करा


आईला गुडघा आणि पाय दुखण्याचा त्रास होऊ शकतो. नियमित व्यायाम करा. प्रॉपर्टी खरेदी करणे कठीण जाईल. खर्चावर नियंत्रण ठेवण्यात यशस्वी व्हाल.काही क्षणिक लाभासाठी तुम्ही तडजोड करायला तयार व्हाल.धार्मिक कामात मन रमेल.


मिथुन: महागडी भेटवस्तू मिळण्याची शक्यता


सासरच्या व्यक्तींकडून काही महागडी वस्तू मिळण्याची शक्यता आहे. व्यावसायिक यात्रेसाठी अनुकूल काळ आहे. तुम्ही आखलेली एखादी नवी योजन यशस्वी होईल.चैनीच्या वस्तूंवर अधिक खर्च होईल. कामाच्या ठिकाणी पदोन्नति मिळेल. रचनात्मक कामातून फायदा होईल. मुलांच्या आरोग्याची काळजी घ्या


कर्क : शुभवार्ता मिळण्याची शक्यता


आज तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तींसोबत चांगला वेळ घालवाल. शुभवार्ता मिळण्याची शक्यता आहे. जोडीदारासोबत  एखाद्या मंगलकार्याला जाण्याचा बेत तुम्ही आखाल. मित्रांकडून काही गोष्टींसाठी विरोध होत असेल तर तो कमी होईल. आरोग्याच्या कुरबुरीकडे दुर्लक्ष करु नका.


सिंह: घाई करु शकते नुकसान


विद्यार्थ्यांचे अभ्यासात मन आज रमणार नाही. आज केलेली घाई तुमचे नुकसान करु शकते. एखादे कॉन्ट्रॅक्ट रद्द होण्याची शक्यता आहे. नव्या ओळखींपासून साव राहण्याची गरज आहे. नुकसान होऊ शकते.आरोग्याकडे लक्ष द्या.जोडीदाराचे सहकार्य लाभेल.


 कन्या :व्यवसाय विस्ताराती शक्यता


व्यवसाय विस्ताराची शक्यता आहे. नवे भागीदार मिळतील. आर्थिक लाभ होईल. तुमच्या कार्यशैलीमुळे तुम्हाला नोकरीत पदोन्नति मिळेल. प्रेमात त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. वाहन चालवताना काळजी घ्या.


तूळ: नोकरीत अडचणी येण्याची शक्यता


आज झालेल्या धावपळीमुळे तुम्ही थकून जाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. क्षुल्लक कारणामुळे अधिकाऱ्याशी  तू तू मैं मैं होऊ शकते. नोकरीत अडचणी येतील. जोखील उचलायला तयार रहा. विरोधक नुकसान करण्याचा प्रयत्न करतील.


वृश्चिक : कुटुंबांत कोणीतरी आजारी पडेल


कुटुंबातील एखाद्या सदस्याचे आरोग्य बिघडू शकते. खाण्यापिण्याच्या सवयी आणि दिनचर्येकडे विशेष लक्ष द्या. भावनिक होऊन काही निर्णय घ्यावे लागतील. देण्याघेण्याचे व्यवहार सुटतील. अचानक धनलाभ होईल. धार्मिक कामांमध्ये मन रमेल.


 धनु : जोडीदारासोबत मौज-मस्ती कराल


आज तुम्ही कोणाकडे तरी आकर्षित होणार आहात. जोडीदारासोबत मौज-मस्ती कराल. आज तुम्ही जे काही कराल तेथे तुमची छाप सोडाल.कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे सहकार्य लाभेल.विरोधक हार पत्करतील.राजकारणात पद वाढू शकते. आरोग्याची काळजी घ्या.


मकर: भाग्योदयाची संधी मिळेल.


भाग्योदयाची संधी मिळेल. कामाच्या ठिकाणी परिस्थिती अनुकूल राहील.व्यवसायात यश मिळेल. कोर्टकचेरीचे प्रश्न सुटतील.आत्मविश्वास आणि सामाजिक सन्मान वाढेल. कुटुंबात तणाव वाढू शकतो. रागावर नियंत्रण ठेवा.


हे ही वाचा


जाणून घ्या शरीरावरील तीळ काय सांगतात तुमच्याबद्दल


जाणून घ्या राशीनुसार कोणाला येतो पटकन राग


प्रत्येक रास कशी व्यक्त करते प्रेम