रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टीप्स

रागावर नियंत्रण ठेवण्यासाठी फॉलो करा 'या' सोप्या टीप्स

प्रत्येकाला राग हा येतोच. मात्र रागावर नियंत्रण ठेवणं सर्वांनाच जमतं असं नाही. काही लोक पटकन रागावतात आणि लवकर शांतही होतात. काहींचा राग मात्र लवकर शांत होणं कठीण असतं. राग अनावर झाला की त्या माणसाचा चेहरा लाल होतो, अंगाचा थरकाप उडतो, बोलण्यावर नियंत्रण राहत नाही. या सर्व गोष्टींमुळे रक्तदाबामध्ये झटकन बदल होतो. ज्याच्या परिणाम तुमच्या शरीर आणि मन स्वास्थावर होऊ शकतो. शिवाय रागाच्या भरात अशी माणसं नको ते निर्णय घेतात. ज्यामुळे शेवटी त्याच व्यक्तीचं नुकसान होऊ शकतं. अती रागामुळे माणसं नैराश्याच्या अधीन गेल्याची अनेक उदाहरणे आहेत. यासाठी रागावर नियंत्रण मिळवणं गरजेचं आहे.

shutterstock

राग अनावर होणं म्हणजे नेमकं काय ?

माणसाच्या आयुष्यात सुख आणि दुःख या दोन्ही गोष्टी वाट्याला येत असतात. सुखाने माणूस जसा आनंदी होतो तसा एखादी गोष्ट मनाविरूद्ध झाल्यास तो दुःखी होतो. काहीजण मनातील दुःख दाबून ठेवतात आणि त्यांच्या मनातील ही भावना कधी कधी अचानक नको त्या पद्धतीने बाहेर येते. सहनशक्ती कमी असणं हे राग येण्याचं प्रमुख कारण असतं. बऱ्याचदा माणसाचा अहंकारदेखील पटकन राग येण्यामागे कारणीभूत असतो. सतत चिडचिड करणं, एखाद्याचं ऐकून न घेता त्याला प्रतिक्रिया देणं, समोरच्या व्यक्तीला हवं तसं बोलणं ही राग नियंत्रित नसल्याची काही उदाहरणे आहे. मात्र सहनशक्ती कमी असल्यामुळे काही वेळा या रागाचे अगदी भयंकर रूप समोर येतं. यालाच राग अनावर होणं असं म्हणतात. राग अनावर होण्यासाठी एखादी लहान गोष्ट कारणीभूत असली तरी त्यामागे अनेक मोठमोठ्या गोष्टी कारणीभूत असू  शकतात. राग येण्यामागे त्या माणसाचे संगोपन कसे झाले आहे, त्याच्या आयुष्यात भूतकाळात घडलेली एखादी घटना अथवा कामाचा ताण-तणावदेखील कारणीभूत असू शकतो. एका संशोधनानुसार 65 टक्के नोकरी करणारी माणसे कामाच्या ताणामुळे पटकन रागावतात. तर 32 टक्के लोक नातेसंबधातील ताणामुळे रागवतात. थोडक्यात राग येणं ही जरी एक मानसिक अवस्था जरी असली तरी त्याचा परिणाम तुमच्या शरीर आणि मन या दोन्हीवर होतो. मानसशास्त्रानुसार राग अनावर झाल्यामुळे माणसाची सारासार बुद्धी काम करेनाशी होते. सतत रागावणाऱ्या माणसांना ह्रदयरोग, मानसिक आजार होऊ शकतात. यासाठी रागावर वेळीच नियंत्रण ठेवणं गरजेचं आहे.

shutterstock

राग नियंत्रित ठेवण्यासाठी सोप्या टीप्स

 • ज्या गोष्टीमुळे तुमच्या मनात रागाच्या भावना येतात त्या गोष्टींपासून दूर रहा
 • राग येण्यास सुरूवात झाल्यावर एक ते शंभर अंक मागच्या दिशेने मोजण्यास सुरूवात करा
 • राग येण्यास सुरूवात झाल्यावर दीर्घ श्वास घ्या आणि मनातून प्रार्थना अथवा चांगले विचार करण्याचा विचार करा
 • लगेच एखादा विनोदी चित्रपट बघा अथवा पुस्तक वाचा
 • एखादे शांत आणि सौम्य संगीत ऐका
 • रागात एखादी कृती करण्याआधी परिणामांचा विचार करा
 • लोकांसमोर ओरडून राग बाहेर काढण्यापेक्षा त्या रागाचा एखाद्या चांगल्या कामासाठी सदुपयोग करा.
 • मानसोपचार तज्ञांची मदत घ्या
 • कुटुंब अथवा प्रेमळ व्यक्तीचा फोटो अथवा चेहरा बघा
 • एखाद्या जवळच्या व्यक्तीजवळ मन मोकळं करा.
 • एखाद्या गोष्टीवर रागावून प्रतिक्रिया देण्यापेक्षा त्या गोष्टीवर विचार करून मगच योग्य तो निर्णय घ्या.
 • तुमच्या एखाद्या छंदावर लक्ष केंद्रित करा
shutterstock

रागावर नियंत्रण मिळविण्यासाठी जीवनशैलीमध्ये काय बदल कराल

 • इतरांकडून आग्रह आणि अपेक्षा कमी ठेवा. ज्यामुळे तुम्हाला इतरांचा पटकन राग येणार नाही.
 • नियमित व्यायाम आणि योगासने करा. ज्यामुळे तुमचे शरीर निरोगी आणि मन शांत राहील.
 • दिवसभरात कमीत कमी तीस मिनीटे मेडीटेशन करा. कारण मेडीटेशन अथवा ध्यान केल्यामुळे तुमच्या रागावर तुम्हाला नियंत्रण राखण्यास मदत होईल.
 • लहान-सहान गोष्टींकडे दुर्लक्ष करा.
 • कमी आवाजात  आणि नम्रपणे बोलण्याचा सराव करा.
 • श्वासावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करा
 • ताण-तणावापासून जास्तीत जास्त दूर राहण्याचा प्रयत्न करा.
 • प्राणी अथवा पशुपक्ष्यांच्या सहवासात रहा ज्यामुळे तुमच्या मनातील उदारता वाढेल
 • एखाद्या सामाजिक संस्थेसाठी समाज कार्य करा.
 • वर्षातून दोनदा कुटुंब अथवा मित्रमंडळींसोबत बाहेरगावी फिरण्यास जा.
 • जास्तीत जास्त निसर्गाच्या सानिध्यात राहण्याचा प्रयत्न करा.
 • लहान मुलांबरोबर वेळ घालवा. कारण लहान मुलांमधील निरागसता तुम्हाला राग कमी करण्यासाठी फायदेशीर ठरेल.

अधिक वाचा

आनंदी जीवन जगण्यासाठी या '10' गोष्टी अवश्य करा

मानसिक ताणाला दूर ठेवण्यासाठी करा 'हे' सोपे उपाय (How to Relieve Mental Pressure in Marathi

तुमच्या आयुष्यातील तणावा (Stress )ला करा बाय-बाय (How To Reduce Stress In Marathi)

फोटोसौजन्य- इन्स्टाग्राम आणि शटरस्टॉक