#surprise मिळालेले कोणाला आवडत नाही.( आम्ही चांगल्या #surprise बाबत बोलतोय बरं का) अगदी लहान #surpriseही तुमच्या आयुष्यात आनंद आणत असतात. #surprise हे कोणीही कोणाला देऊ शकते. प्रत्येकवेळी हे #surprise प्रियकराने प्रेयसीला किंवा प्रेयसीने प्रियकराला दिलेले नसते. तर सासूने -सुनेला, सुनेने-सासूला, घरातील एखाद्या लहान व्यक्तीला. आजीला अगदी कोणालाही हे #surprise कोणीही कधीही देऊ शकते. तुम्हाला #surprise द्यायला आवडते पण तुम्ही केलेल्या प्लॅनचा नेहमीच विचका होतो ? मग तुम्ही कुठेतरी चुकताय. कारण तुमच्या #surprise चा विचका होण्यासाठी तुम्हीच जबाबदार आहात. तुम्ही #surprise देताना नेमंक काय करायला हवे आणि काय टाळायला हवं हे तुम्हाला माहीत हवं. या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुमचा प्लॅन कधीच होणार नाही फ्लॉप
नाते दृढ करणाऱ्या या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला माहीत हव्या
#surprise प्लॅन करताना या सवयी तुम्हाला तर नाहीत ना
आता काही जण असे असतात की, #surprise ची सगळी मजा स्वत:हून घालवतात. ते काय चुका करतात ते आधी पाहूया
- सांगून देऊ नका #surprise
खूप जणांना आधीचा अनुभव असतो किंवा त्यांना भीती असते की, आपण दिलेले #surprise एखाद्याला आवडले नाही तर… हा विचार करुनच आयत्यावेळी विचका होऊ नये म्हणून ते ज्याला #surprise द्यायचे. त्यालाच सगळे विचारुन करतात. त्यानुसारच ते वेळा, गिफ्ट किंवा एखादा प्लॅन याची आखणी करतात.. त्यामुळे होतं असं की, ते #surprise राहात नाही. समोरची व्यक्ती जवळची असली की, ती तुमची ती गोष्ट समजून घेते आणि आनंद मानून घेते. त्यामुळे पहिली चूक जर तुम्हाला टाळायची असेल तर ती म्हणजे कोणालाही #surprise देताना ते सांगून देऊ नका.
उदा. माझ्या नवऱ्याला #surprise फार आवडतात. त्याच्या वाढदिवसाला मी नेहमी वेगळं काहीतरी वेगळं प्लॅन करायचा विचार करते. पण मला त्याला सांगितल्याशिवाय मला चैनच पडत नाही. म्हणूनच मी त्याला सगळ्या गोष्टी सांगून करते. पहिले काही वर्ष त्याने सगळे समजून घेतले. पण आता मी कितीही काहीही प्लॅन केलं तर त्याला त्यात काहीच विशेष वाटत नाही. गेली 2 ते 3 वर्ष तो ऑफिमधून आधीच सुट्टी घेतो. त्यामुळे आता मला #surprise प्लॅन करायचे की,नाही असा प्रश्न पडतो.
आता तुम्हीच विचार करा तुम्ही जर ज्याला #surprise द्यायचे त्याला सतत सगळ्या गोष्टी विचारुन करत असाल तर त्याला त्याचा आनंद कसा मिळेल. तो खोटे हसू चेहऱ्यावर आणण्याशिवाय काहीच करु शकत नाही.
….आणि आमच्या नात्यात झाली तिची एंट्री
- दिलेल्या #surprise करु नका अपमान
अनेकांंना एखादी गोष्ट आवडली नाही की, लगेचच सांगायची सवय असते. स्पष्ट बोलणे ही चांगली सवय आहे. पण #surprise च्या बाबतीत ही गोष्ट दुसऱ्याचे मन दुखावू शकते. कारण जर तुम्हाला आणलेली एखादी भेटवस्तू पाहून तुम्ही नाक मुरडले तर ( मानवी स्वभावानुसार मनात नसले तरी एखाद्या गोष्टीवर प्रतिक्रिया पटकन देण्याची सवय अनेकांना असते) तर समोरच्याला वाईट वाटू शकते.
उदा. मी ज्या घरी लग्न करुन गेले. त्या घरी मुली नसल्यामुळे माझ्या सासूबाई माझ्यावर मुलीसारख्या प्रेम करायच्या. मुलीसाठी करायच्या राहून गेलेल्या हौसमौज त्या माझ्याकडून करुन घेतात. मग माझा वाढदिवस असला नसला तरी त्या मला काहीना काही आणून देतात. त्या नेहमी मला जे आणून देतात ते मला आवडतचं असं नाही. कारण#surprise पण त्यांचा अपमान मला करायचा नसतो. त्यामुळे त्या ज्या आणतात ते मी त्यांच्यासाठी एकदा तरी वापरते. मी माझ्या अनुभवातून आणि नाते टिकवण्यासाठी हे शिकले आहे की कोणीही दिलेल्या #surprise चा अपमान करु नये.
- मला #surprise देता येत नाही
मला #surprise देता येत नाही असे अनेकांना बोलताना तुम्ही पाहिले असेल. जगात कोणतीच गोष्ट अशक्य नाही. मग #surprise ही काय मोठी गोष्ट आहे का? पण एखादी गोष्ट करायची नसेल तर खूप जण ही कारणं देऊन मोकळी होतात. अशा लोकांकडून काही मागण्याचाही अनेकांना कंटाळा येतो. अशा लोकांकडे कालांतराने लोक दुर्लक्ष करु लागतात. अशा लोकांनी काहीही केलेले इतरांना आवडत नाही. त्यामुळे तुम्ही जर असे बोलत असाल तर तुम्ही आताच तुमची ही सवय बदला. तुमच्याकडून समोरच्या व्यक्तीला फार मोठे काही नको असते. त्यांना तुम्ही दिलेले लहानातील लहान #surprise सुद्धा आवडू शकते.
उदा. माझ्या बॉयफ्रेंडला माझ्यासाठी बऱ्याच गोष्टी करायच्या असतात. पण तो कोणतेही प्लॅन करण्याआधीच मला #surprise देता येत नाही असे सांगून हात वर करतो. त्यामुळे आमच्या दोघांच्या आयुष्यातील खास दिवस साजरे करताना मलाच सगळी जबाबदारी घ्यावी लागते. ज्यामुळे मला कधीकधी #surprise प्लॅन करण्याचा कंटाळा येतो. त्याने स्वत:हून अगदी लहान #surprise जरी कघी प्लॅन केले तरी मला आनंद होईल.
shutterstock
असे करा #surprise प्लॅन
shutterstock
#surprise हे नेहमीच खास व्यक्तीसाठी केले जाते. हे अशा व्यक्तीसाठी केले जाते. त्याला तुम्ही खूप चांगले ओळखता त्यामुळे अशा व्यक्तींसाठी #surprise प्लॅन करताना या गोष्टी लक्षात
खूप काही करण्यापेक्षा योग्य तेच करा
तुम्ही काय घेणार आहात हे प्रत्येकवेळी महत्वाचे नसते. तर तुम्ही त्या दिवसात त्या व्यक्तीला किती आनंद देणार आहात ते महत्वाचे आहे. त्यामुळे खूप काही करायला जाता आणि चूक होते. हे टाळा तुम्हाला इतरांचा योग्य सल्ला मिळणार असेल तर ठिक नाहीतर तुमचा निर्णय तुम्हीच शांतपणे घ्या.
आधीच करुन घ्या माहिती
समजा तुम्ही एखादा सरप्राईड बर्थडे प्लॅन करणार असाल तर तुम्हाला ज्याचा वाढदिवस आहे. त्याची त्या दिवसाची दिनचर्या माहीत करुन घेता यायला हवी. त्यासाठी तुम्हाला थोडी मेहनत घ्यावी लागेल. पण तितकी तुमच्या खास व्यक्तीसाठी घ्यायलाच हवी. म्हणजे तुमच्या #surprise चा होणारा विचका होणार नाही.
सेटवर एकमेकांच्या प्रेमात पडलेल्या या कलाकारांचे सध्या काय आहे रिलेशनशीप स्टेटस
shutterstock
जागेची निवड करताना
तुम्हाला जर खूप मोठी #surprise पार्टी अरेंज करायची असेल तर तुम्हाला त्यासाठी योग्य जागा निवडणे गरजेचे असते. जागा निवडताना समोरच्याची आवड लक्षात घेऊन तुम्ही त्याची अरेंजमेंट करा म्हणजे तुम्हाला आयत्यावेळी समोरच्याला आवडेल की नाही याची भीती वाटणार नाही.
shutterstock
प्रत्येकवेळी मोठ्या #surprise च्या फंद्यात पडू नका
तुमच्या जवळच्या व्यक्तीला तुम्ही काही मोठे, ग्रँड करावे असे कधीच वाटत नाही. तर तुम्ही त्यांच्यासाठी काहीतरी अगदी लहानातील लहान गोष्ट करावी असे वाटते.त्यामुळे #surprise चा मोठा बेत करण्यापेक्षा लहान पण साधा सोपा प्लॅन करा.म्हणजे त्रास होणार नाही.
आता या काही गोष्टी तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमच्या #surpriseचा विचका होणार नाही.