home / Sex Advice
सतत पॉर्न पाहायची लागली आहे सवय? अशी सोडता येईल ही सवय (How To Stop Watching Porn)

सतत पॉर्न पाहायची लागली आहे सवय? अशी सोडता येईल ही सवय (How To Stop Watching Porn)

पॉर्न, ब्लू फिल्म, अश्लील चित्रफित पाहण्याची अनेकांना सवय असते.पण ही सवय ज्यावेळी वाईट सवयीत बदलते. त्यावेळी मात्र तुम्हाला ती त्यावेळीच थांबवणे गरजेचे आहे. कारण जर तुम्ही ही सवय वेळीच सोडली नाहीत.तर त्याचे दुष्परिणाम तुमच्यावर होऊ शकतात. जर तुम्हालाही पॉर्न पाहण्याचे व्यसन लागले असेल तर तुम्ही आताच ही सवय सोडा. ही सवय सोडणे तुम्हाला कठीण वाटत असेल तर तुम्ही या काही टीप्स नक्की फॉलो करुन पाहा तुमची सवय तुम्हाला वेळीच सोडवता येईल.

तुमच्याही सरप्राईजचा होतोय विचका.. मग नक्कीच तुम्ही करत असाल या चुका

कोणत्या वयोगटाच्या व्यक्तींना असते सतत पॉर्न पाहण्याची सवय (Age Group Involved in Watching Porn)

shutterstock

हल्ली इंटरनेट सगळ्यांनाच उपलब्ध आहे. अगदी वाजवी दरात इंटरनेट सुविधा उपलब्ध असल्यामुळे गावांपासून ते अगदी शहरांपर्यंत वेगवेगळ्या वयोगटातील व्यक्ती याचा उपयोग करतात. इंटरनेटमुळे लोक एकमेकांना जोडली गेले हे खरे असले तरी त्याचा दुरुपयोगही होऊ लागला आहे. काही पॉर्न साईट फ्री असल्यामुळे सर्रास त्या सर्फ केल्या जातात. शाळेत जाणाऱ्या अगदी पाचवी सहावीच्या विद्यार्थ्यांपासून ते अगदी वयोवृद्धांपर्यंत सगळेच त्यांच्या फोनमध्ये पॉर्न पाहतात. त्यामुळे एक ठराविक वयोगट पॉर्न अधिक पाहते असे आपल्याला सांगता येत नाही. सेक्सकडे पॉर्नच्या नजरेने पाहण्याची सवय कोणत्याही वयात लागू शकते. पण लहानमुलांना ही सवय लागली तर त्याचा परिणाम त्याच्या वाढीवर होऊ शकतो. 

* विशेष म्हणजे पुरुषच नाही तर स्त्रियादेखील मोठ्या प्रमाणात पॉर्न पाहतात.अनेक स्त्रिया मजा म्हणून देखील पॉर्न पाहतात. पण त्यांना ही सवय लागली की, त्यांच्या आरोग्यावर विपरित परिणाम होतात.

तुम्हाला लागले पॉर्न पाहण्याचे व्यसन, जाणून घ्या लक्षणे (Symptoms of Porn Addiction)

इंटरनेटचा वापर वाढणे

shutterstock

काही व्यक्तींमध्ये अचानक असे काही बदल होतात ते तुम्हाला पटकन जाणवतात. आता काही बदल हे नेहमीच चांगले असतात. तर काही अचानक झालेले बदल हे घातक असतात.जर तुमचे पाल्य किंवा जवळची व्यक्ती सतत फोनवर किंवा कॉम्प्युटर, लॅपटॉपवर असेल तर ते काय पाहत आहेत ते बघा. कारण कधीही फोनवर नसणाऱ्या आणि अचानक त्याचा वापर करु लागणाऱ्या व्यक्ती नक्कीच काहीतरी संशयास्पद गोष्टी करत असतात. त्यांचा फोन कोणाच्या हाती लागू नये म्हणून ते सतत पासवर्ड बदलत राहतात. इतर दिवसांच्या तुलनेत त्यांचे इंटरनेट वापरणे वाढते.

लोकांशी बोलणे टाळणे (Avoid Communication )

इंटरनेटवर अधिक काळ घालवताना जर लोकांशी बोलणे एखादी व्यक्ती टाळत असेल तर तिचे मन कुठेतरी गुंतले आहे असे समजावे.ते जर तुमच्यापासून दूर आणि फोन, इंटरनेटच्या जवळ जात असतील तर मात्र तुम्ही त्यांच्याकडे लक्ष द्यायला हवे.

एकटेपणा आवडू लागणे (Love to alone)

पॉर्न पाहणाऱ्या लोकांचे जर कोणते पहिले लक्षण असेल तर हेच..या व्यक्तींना कायम त्यांचा एकांत हवा असतो. त्यांना कोणासोबत फारसा वेळ घालवायला आवडत नाही. त्यांना घरी किंवा आजूबाजूला कोणीच असलेले आवडत नाही.

इंटरनेट हिस्ट्री डिलीट करणे (Delete Internet History or Incognito Mode)

हल्ली केलेल्या गोष्टी डिलीट करुन टाकण्याची सोय उपलब्ध असल्यामुळे अनेक जण त्यांची सर्च हिस्ट्री डिलीट करुन टाकतात. आता तर incognito मोड असल्यामुळे तुम्ही कोणत्या वेबसाईट पाहता ते देखील कळत नाही. त्यामुळे जर तुमच्या घरातील व्यक्ती या मोडचा जास्त वापर करत असेल किंवा सर्च हिस्ट्री डिलीट करत असेल तर कदाचित ती या वेबसाईटना भेट देण्याची शक्यता आहे.

वेळ वाया घालवणे

जर तुमचे पाल्य किंवा घरातील इतर व्यक्ती उगाच वेळ वाया घालवत असेल तर तुम्ही तो त्याचा वेळ का घालवतो आहे ते पाहा. अनेकदा पालक मुलांना फोन देऊन मोकळे होतात. पण त्यावर ते विनाकारण वेळ घालवू लागतात.

SEX विषयी मोकळेपणाने बोलण्याबाबत महिलांना काय वाटते

पॉर्न बघण्याच्या सवयीमुळे होऊ शकतो त्रास (Effects of watching Porn)

एकटेपणा आवडू लागणे

shutterstock

पॉर्न बघण्याचे व्यसन एखाद्याला लागले की, मग त्यांना त्यांच्या आजूबाजूला कोणीच नको असते. त्यांना त्यांचा लॅपटॉप, फोनच अधिक प्रिय वाटू लागतो.त्यांना आजूबाजूला घडणाऱ्या कोणत्याच गोष्टीत रस नसतो. त्यामुळे अशी माणसं ग्रुपमधून तुटू लागतात. त्यांच्या डोक्यात केवळ पॉर्नसाठी वेळ काढणे इतकेच असते. त्यांना ते विश्व अधिक आवडू लागते. ही सवय लयाला गेली की, एकटेपणा हाच त्यांचा मित्र बनतो

निद्रानाश (Insomnia)

अभ्यासानुसार हे सिद्ध झाले आहे की, अनेक जण रात्रीच्यावेळी पॉर्न अधिक पाहतात. त्यांना रात्रीची वेळ ही अधिक योग्य वाटते. याचा परिणाम असा की, झोपेची वेळ कमी होते. काहींना यामुळे निद्रानाशाचा त्रास होतो. निद्रानाश झाल्यामुळे आरोग्याच्या अन्य तक्रारीही जाणवू लागतात.

आरोग्याच्या तक्रारी (Health Issue)

पॉर्न पाहताना निद्रानाश होतोच. पण पॉर्न पाहताना अनेक जण त्यांच्या गुप्तांगाला हात लावून समाधान मिळण्याचा प्रयत्न करतात असे करण्याचे दुष्परिणामही होऊ शकतात. काहींना या गोष्टी नीट माहीत नसल्यामुळे त्यांना या ठिकाणी जखमा देखील होऊ शकतात. जर ही सवय लहान मुलाला लागली असेल तर अकाली ते मोठे होऊ लागतात.

सतत चीडचीड होणे

पॉर्न पाहण्याची सवय तुम्हाला इतकी एकलकोंडी करते की, तुम्हाला तुमच्याविषयी कोणी काहीच बोललेले आवडत नाही. जर तुम्ही त्यांना काही क्षुल्लक बाबतीतही समजवण्याचा प्रयत्न केला तरी त्यांची चीडचीड होत राहते. 

उदा. जर तुम्ही त्यांना काही चांगले सांगायला गेलात तर त्यांना ते नको होते. ते तुमचं काहीही ऐकण्याच्या मन: स्थितीत नसतात.त्यामुळेच ते चीडचीड करतात.

अस्वस्थपणा वाढणे (Increase Restlessness)

काही वेळी ही सवय इतकी वाढते की, पॉर्न सतत पाहणाऱ्या व्यक्तीला कायम अस्वस्थ वाटत राहते. सतत काहीतरी चुकतय असं वाटू लागतं.

कामात लक्ष न लागणे

साहजिकच आहे अस्वस्थपणा वाढला की, कामात लक्ष लागणे कठीण होऊन जाते. कोणत्याही गोष्टी करण्याची इच्छा कमी होऊन जाते. काम करताना लक्ष लागत नाही. कामाऐवजी मन कुठेतरी वेगळीकडेच रमलेले असते

मनात वाईट विचार येणे (Bad Thoughts in Mind)

पॉर्नची सवय विकोपाला गेल्यानंतर तुमच्या मनात सेक्सबद्दल वाईट विचार यायला सुरुवात होते. समोरच्या व्यक्तीचे शरीर हे शरीरसुखासाठी चांगले आहे की, नाही असे देखील विचार मनात डोकावू लागतात. त्यामुळे होते असे की, तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनदेखील खराब होऊ शकतो.

पॉर्न पाहण्याची तुमची सवय अशी सोडता येईल (How to Stop Watching Porn)

जवळच्या व्यक्तीसोबत वेळ घालवा

shutterstock

ज्यावेळी तुम्हाला वाटेल की, तुम्हाला पॉर्न पाहण्याची इच्छा होत आहे. त्यावेळी तुम्ही तुमच्या मित्रांशी जवळच्या व्यक्तीशी, जर तुमची प्रेयसी किंवा प्रियकर असेल तर त्यांच्यासोबत बोला.शक्य असल्यास त्यांना भेटायला घराबाहेर पडा. ते शक्य नसेल तर  तुमच्या मनातील त्यांच्याविषयी असलेल्या चांगल्या भावनांची आठवण करा. तुमच्या भविष्याविषयी विचार करा. 

उदा. अनेकदा मन रिकामी असेल तर तुमच्या मनात पॉर्न पाहण्याचा विचार येऊ शकतो. अशावेळी तुम्ही तुमच्या जवळच्या व्यक्तीला फोन केल्याने काही वेगळे विचार तुमच्या मनात येऊ शकतात. तुमच्या मनातून पॉर्न पाहण्याचा विचार तात्पुरता जाऊ शकतो. तुमचे फोनवर काही चांगले प्लॅन बनले तर तुम्ही तो विचार करु शकता. 

शक्य असल्यास इंटरनेटचा करु नका वापर

तुम्हाला पॉर्नची सवय लागली असेल तर तुमच्यासाठी इंटरनेट हा शत्रू आहे. तुम्हाला शक्य असेल तितक्या वेळ इंटरनेटपासून दूर राहा.जर तुम्हाला इंटरनेटचे काही काम नसेल तर तुम्ही इंटरनेट बंद करुन ठेवा आणि जर इंटरनेटपासून दूर रहाणे शक्य नसेल तर मग तुम्ही चांगल्या वेबसिरीज किंवा असे काहीतरी पाहा.

स्वत:ला ठेवा व्यग्र

खाली दिमाग और खाली जगा शैतान का घर होता है… त्यामुळे पॉर्नपासून दूर राहण्यासाठी  स्वत:ला व्यग्र ठेवा. काहीतरी काम करा. तुम्ही मोबाईलमध्ये जास्त वेळ घालवणार नाही असे पाहा. एकटे राहण्यापेक्षा कायम कोणाशी तरी बोलत राहा. काहीतरी बारीक सारीक काम करत राहा. 

उदा. जर तुम्हाला फावला वेळ असेल तर एखादा हॉबी क्लास लावा. जीम लावा. तुम्ही जर दिवसभर काम करुन आणि हॉबी क्लास करुन थकाल तर मग तुम्हाला पॉर्न पाहण्याची इच्छा होणार नाही. या सगळ्या अॅक्टीव्हिटीजमुळे तुम्ही झोपून जाल किंवा तुम्हाला आराम करणे महत्वाचे वाटेल. इंटरनेटचा वापर करणे थकलेले असताना तुम्हाला करणे नको वाटेल.

सकारात्मक गाणी ऐकणे (Listen to Good And Positive Music)

प्रत्येकाकडे त्याच्या आवडीच्या गाण्यांचे कलेक्शन असते. अशी गाणी जी आपला मूड चांगला करतात. ज्यावेळी तुम्ही काही वाईट करत आहात अशी तुम्हाला जाणीव होईल त्यावेळी तुम्ही चांगली गाणी ऐका. तुम्हाला फार बरे वाटेल.

उदा. काही गाणी अशी असतात की, ज्यामुळे तुम्हाला नाचावसं वाटतं. काही गाणी तुम्हाला फारच इमोशनल करणारी असतात. तुम्ही एकदा इमोशनल झालात की, मग तुम्हाला काही काळ काहीच करावेसे वाटत नाही. त्यावेळी तुम्हाला पॉर्न ही नकोसे होते.त्यामुळे मस्त गाणी ऐका. गाणी ऐकता ऐकता तुमच्या मनातल चांगले विचार आणा. तुम्हाला तुमची सवय सोडायला मदत होईल.

पॉर्नच्या वेबसाईट फोन आणि लॅपटॉपवरुन ब्लाॅक करा

जर तुम्हाला पॉर्न पाहणे इन्स्टंट टाळायचे असेल तर तुम्ही इंटरनेट तज्ज्ञांची मदत घेऊन सगळ्या पॉर्न वेबसाईट ब्लॉक करुन टाका. म्हजणे तुमच्या डोक्याचा त्रासच कमी होईल. 

उदा. अनेक ऑफिसमध्येसुद्धा कर्मचाऱ्यांना नको त्या सवयी लागू नये म्हणून पॉर्न साईडचा समावेश केलेला असतो. त्यामुळे कोणी कितीही अशा गोष्टी पाहण्याचा प्रयत्न केला तर त्याला ते करता येत नाही. तसा प्रयत्न केल्यास त्याची माहिती मॅनेजमेंटला मिळते. त्यामुळे तुम्हीदेखील तुमच्या घरी किंवा फोनमध्ये अशी सोय करुन घ्या.

सेक्शुअल गोष्टी वाचणे करा टाळा (Avoid to Read Sexual Content)

काहींना आपल्या भावना आवरता येत नाही. Sexची भावना मनात येणे चुकीचे नाही. ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. पण पॉर्नमधील अश्लील चाळे हे तुमच्या प्रेमापेक्षा फारच वेगळे असतात. तुम्ही जर वरील सगळ्या गोष्टी करुन पाहत असाल तर आणखी एक गोष्ट करा ते म्हणजे  सेक्शुल गोष्टी वाचणे टाळा. 

उदा. पॉर्न पाहण्याची सवय सोडताना काही वेळा तुम्ही दुसरा मार्ग शोधायला बघता अशा वेळी तुमच्या वाचनात काही सेक्शुल गोष्टी आल्या तर त्या टाळा.

स्वत:वर नियंत्रण ठेवा (Control Yourself)

माणूस स्वत:च्या इच्छेशिवाय काहीही वेगळे करत नाही. त्यामुळे तुम्हाला तुमच्यावर नियंत्रण ठेवायचे आहे. जर तुम्ही ते करणे शिकाल तर तुम्हाला नक्कीच या त्रासावर मात करता येईल. नियंत्रण हाच तुमच्यावरचा इलाज आहे असे समजून तुम्ही नियंत्रण करा.

स्वत:च्या सवयी बदला (Change your Habits)

काही सवयी या वेळीच बदललेल्या चांगल्या असतात. तुमची पॉर्न बघण्याची सवय तुम्हाला बदलायची आहे. पॉर्न पाहण्यासाठी तुम्ही केलेले इतर बदल आधी तुम्हाला बदलायचे आहेत. 

उदा. जर तुम्ही यासाठी पैसा घालवत असाल तर त्यावर पैसा खर्च करणे बंद करा. मासिक, सीडी विकत घेण्याचे टाळा. 

लवकर झोपा

एकदा तुमची झोपेची वेळ चुकली की, मग अनेकांना झोप येईपर्यंत पॉर्न पाहण्याची इच्छा होते.मन घट्ट करुन तुम्ही लवकर झोपण्याला पसंती द्या. झोप येत नसेल तर 100 आकडे उलट मोजा. डोळे घट्ट बंद करुन राहा. त्यामुळे तुम्हाला झालेला निद्रानाशाचा त्रासही आटोक्यात येईल.

डॉक्टरांची घ्या मदत

सगळे प्रयत्न करुनही जर तुम्हाला तुमची सवय बदलता येत नसेल.. तुम्हाला स्वत:ला नियंत्रण मिळवता येत नसेल तर आता तुमच्यासमोर एकच पर्याय आहे. तो म्हणजे डॉक्टरांची मदत. तुम्हाला या वर डॉक्टर औषध देईलच असे नाही. पण तुम्ही तुमची समस्या सांगितल्यानंतर तुम्हाला ते चांगलं समुपदेशन करु शकतील. तुमच्या मनातून तो विचार समजून घेऊन त्यातून बाहेर पडण्यासाठी तुम्हाला ते मदत करु शकतील. हा विषय मानसशास्त्राशी जोडल्यामुळे तुम्हाला सायक्रॅटिस यात मदत करु शकतील.

रिलेशनशीपमध्ये तुमच्यासोबतही होत असेल असे तर आताच करा ब्रेकअप

FAQ

shutterstock

पॉर्न बघण्याची सवय बंद करता येऊ शकता का?

कोणत्याही सवयी या बदलता येऊ शकतात. त्यासाठी तुमचे मन तयार हवे. पॉर्न बघण्याची सवय ही देखील बंद करता येऊ शकते. यावर कोणतेही औषधोपचार नाहीत. यासाठी तुम्हाला तुमच्या मनावर नियंत्रण ठेवणे गरजेचे असते. मानसशास्त्रानुसार हे सगळे पाहणे आणि न पाहणे तुमच्या हातात असते.

पॉर्न बघण्याचा आरोग्यावर काय परिणाम होतो?

अर्थात कोणत्याही वाईट गोष्टीचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो.पॉर्न बघण्याची सतत सवय सवय तुमच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरु शकते. कारण सतत स्क्रिनकडे पाहत राहणे, पॉर्नमध्ये चाललेल्या सेक्सुअल हालचाली खऱ्या आयुष्यात करायचा प्रयत्न करणे, निद्रानाश, अस्वस्थपणा, चीडचीड या गोष्टी वाढू लागतात.

फोनवरुन पॉर्न साईट कशा ब्लॉक करता येतील

तुमच्या जवळच्या व्यक्तीला किंवा तुम्हाला पॉर्न साईट पाहण्याची सवय लागली असेल तर तुम्ही इंटरनेटवरुन काही साईट ब्लॉक करु शकता. यातील तज्ज्ञ व्यक्तींना विचारुन तुम्ही या साईट ब्लाॅक करु शकता. जर तुम्ही वायफायचा वापर करत असाल तरी देखील तुम्ही या काही साईट ब्लॉक करु शकता.

पॉर्न पाहणे ठिक आहे का?

पॉर्न पाहणे हे तिथपर्यंत ठिक आहे जोपर्यंत तुम्ही फक्त माहिती म्हणून किंवा तुमच्या पार्टनरला रिझवण्यासाठी पाहता पण काहीही कारण नसताना केवळ ते बघायला आवडते, त्यातील अश्लील चाळे जेव्हा तुम्हाला आवडू लागतात ते विश्व आवडू लागते त्यावेळी मात्र तुम्हाला याची वाईट सवय लागली आहे हे समजून जावे.

पॉर्न पाहण्याची सवय वाईट सवयीत कधी बदलते

ज्यावेळी तुम्हाला ते विश्व खऱ्या विश्वापेक्षा अधिक आवडू लागते. शिवाय ज्यावेळी पॉर्नमध्ये दाखवण्यात येणारे प्रेम विचित्र आणि घाणेरडे होते ते तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत करावेसे वाटते त्यावेळी तुमची पॉर्न पाहण्याची सवय वाईट सवयीत बदलली असे समजावे.

27 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this