ADVERTISEMENT
home / DIY लाईफ हॅक्स
या पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या मोबाईलची काळजी

या पावसाळ्यात अशी घ्या तुमच्या मोबाईलची काळजी

पावसाळा सुरू झाला आहे आणि मुसळधार पावसाने चांगलाच जोर धरला आहे. पावसाळा सुरू होण्याआधीच आपण पावसाची पूर्व तयारी करू लागतो. जसं की पावसाआधी छत्री, रेनकोटची तयारी करतो. पावसासाठी वॉटरप्रूफ बॅगची खरेदी करतो. पावसात वापरता येतील असे शूज अथवा चप्पल घेतो. पावसाळा सुरू होण्याआधी या सर्व गोष्टींची तयारी करताना एक महत्त्वाच्या गोष्टींकडे मात्र मुळीच दुर्लक्ष करू नका. ती म्हणजे पावसापासून मोबाईल सुरक्षित ठेवण्यासाठी घ्यायची काळजी. आजकाल मोबाईल ही गोष्ट सर्वांसाठीच अतिशय महत्त्वाची झाली आहे. पावसा-पाण्यात एखादा कठीण प्रसंग आला अथवा एखाद्या ठिकाणी अडकण्याची वेळ आली तर कुटुंबासोबत संवाद साधण्यासाठी मोबाईल हा एक दूतच आहे असं म्हणावं लागेल. शिवाय आजकाल अनेकांची कामे ही केवळ एका मोबाईलवर क्षणभरात पूर्ण होत असतात. अशा बहुपयोगी मोबाईलची काळजी पावसात घेणं फार गरजेचं आहे. मोबाईलचे महत्त्व आणि पावसात गॅझेट्स भिजले तर ते नादुरूस्त होतात हे लक्षात घेऊन आजकाल अनेक मोबाईल कंपन्यांनी वॉटरप्रूफ मोबाईल बाजारात आणले आहेत. मात्र जर तुमचा मोबाईल वॉटरप्रूफ नसेल तर तुम्हाला पावसात तुमच्या मोबाईलची विशेष काळजी घेणं फार गरजेचं आहे.

shutterstock

जाणून घ्या पावसात कशी घ्याल मोबाईलची काळजी

  • पावसात मोबाईल भिजू नये यासाठी आजकाल प्लॅस्टिकचे कव्हर मिळतात. तुम्ही प्रवास करताना या कव्हरमध्ये तुमचा मोबाईल ठेऊ शकता. मात्र जर तुम्हाला पर्यावरणाचे संरक्षण करण्यासाठी प्लॅस्टिक कव्हर वापरायचे नसेल तर पावसात प्रवास करताना तुमच्या बॅगमधून फोन बाहेर काढू नका.
  • पावसात प्रवास करताना फोन शर्ट अथवा पॅन्टच्या खिशात मुळीच ठेऊ नका.
  • पावसाळा सुरू होण्याआधीच तुमच्या मोबाईलमधील फोटो, व्हिडिओ, मेल, इतर माहिती आणखी एखाद्या ठिकाणी बॅकअप घेऊन ठेवा. कारण जर अतीवृष्टी, वादळ, पूर अशा परिस्थितीत अडकल्यामुळे तुमचा मोबाईल खराब झालाच तर तुमच्यासाठी महत्त्वाची असलेली माहिती तुम्हाला पुन्हा रिकव्हर करता येईल.
  • बऱ्याचदा गुगल ड्राईव्हवर माहिती सेव्ह केल्यास माहिती पुन्हा रिकव्हर करण्याचा त्रास नक्कीच कमी होऊ शकतो म्हणून तुम्ही या पर्यायाचा तुम्ही आधीच विचार करा.
  • पावसात प्रवास करताना बोलण्याची गरज असेलच तर ब्लुटूथ हेडफोनचा वापर करा.
  • वीजांचा कडकडाट होत असताना कोणतेही इलेक्ट्रॉनिक गॅझेट चार्ज करू नका.

ADVERTISEMENT

पावसात मोबाईल भिजल्यास काय कराल

  • काही कारणाने तुमचा मोबाईल जर पाण्यात भिजला तर सर्वात आधी तुमचा फोन स्वीचऑफ करा.
  • ओला झालेला मोबाईल चार्ज करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक सॉकेटला जोडू नका.
  • भिजलेला फोन कानाजवळ घेऊन अथवा हेडफोन लावून मुळीच कॉल ऐकू नका. अशा वेळी म्युजिक ऐकणं देखील धोकादायक असू शकतं.
  • भिजलेला फोन स्वीच ऑफ केल्यावर तो टीश्यू पेपर अथवा कोरड्या सुती कापडाने पुसून कोरडा करा. ज्यामुळे फोनच्या आतील भागात पाणी जाणार नाही.
  • भिजलेला फोन सुकविण्यासाठी हेअर ड्रायरचा वापर करू नका. कारण त्यामुळे फोनचे नुकसान होऊ शकते. त्याऐवजी फोन पुसून तो फॅनखाली सुकण्यासाठी ठेवा.
  • तुम्ही तुमच्या फोनमधील पाणी सुकण्यासाठी मोबाईल तांदळाच्या डब्ब्यात ठेऊ शकता. कारण तांदळामुळे मोबाईलमधील आर्द्रता शोषली जाते.
  • भिजलेला मोबाईल फोन सुकवल्यावर लगेच ऑन करू नका. कमीत कमी दोन दिवस फोन बंदच ठेवा.
  • मोबाईल दुरुस्त करणाऱ्या तज्ञांकडून मोबाईलची परिस्थिती जाणून घेतल्यावरच फोनचा पुन्हा वापर सुरू करा.

अधिक वाचा

Kitchen Tips: फ्रिजची अशाप्रकारे करा साफसफाई

कपाटातील जुन्या कपड्यांचा असाही करता येऊ शकतो वापर

प्रत्येकाला उपयोगी पडणाऱ्या 10 सोप्या ट्रीक्स

ADVERTISEMENT

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

 

16 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT