आत्तापर्यंत तुम्ही बर्फाचा वापर पदार्थ किंवा एखाद्या सरबताला थंड करण्यासाठी केला असेल किंवा जास्तीत जास्त एखादी दुखापत झाल्यावर शेकण्यासाठी. पण आज आम्ही सांगणार आहोत की, बर्फाच्या वापरानेही तुम्ही कसं वेटलॉस (Weight Loss)करू शकता.
बरेचदा आपण बर्फाचा वापर हा पाणी थंड करण्यासाठी, सरबत बनवताना आणि चेहऱ्याला फेशियल करताना करतो. पण तुम्हाला माहीत आहे का, बर्फाचा वापर तुम्ही तुमच्या बॉडीवरील एक्स्ट्रा फॅट कमी करण्यासाठीही करू शकता. हे कळल्यावर तुम्हाला थोडा आश्चर्याचा धक्का बसला असेल ना. तुम्हाला वाटेल बर्फाने कसं फॅटबर्न (Fat Burn) करता येईल. जर तुमचं वजन जास्त असेल आणि व्यायाम करण्यानेही वजन कमी होत नसेल तर एकदा तुम्ही आईस थेरपी नक्की ट्राय करून पाहा. तुम्हाला नक्कीच फायदा होईल.
जर तुम्ही फिटनेस फ्रीक असाल तर जाहीर आहे की, तुम्हाला नेहमीच फिट दिसणं आवडत असेल. तसंही जाडेपणा हा कोणत्याही आजाराशिवाय कमी नाही. वजन कमी करण्यासाठी तुम्हाला तुमच्या आहारात संतुलन आणि व्यायामासोबतच आईस थेरपी पण ट्राय करून पाहा. आपण नेहमी पाहतो की, कधी कधी संतुलित आहार आणि नियमित व्यायाम केल्यावरही वजन कमी होत नाही. पण आपली मात्र निराशा होते. त्यामुळे आईस थेरपी तुमच्यासाठी वरदान ठरू शकते.
आईस थेरपी अगदी सोपी आहे. तुम्हाला फक्त तुमच्या शरीरावर ज्या ठिकाणी एक्स्ट्रा फॅट जमा झालं आहे, त्यावर बर्फाने शेकायचं आहे. साधारणतः आपल्या पोट, हात आणि पायाच्या भागांवर जास्त चरबी जमा होते. या भागांवर तुम्ही आईस थेरपीचा वापर करू शकता. यामुळे तुमच्या शरीरावरील फॅटही बर्न होईल आणि वजनही कमी होईल.
एका रिसर्चनुसार शरीरातील काही भागात एकाच ठिकाणी जास्त चरबी जमा होते. यामुळे तो भाग सैलसर होतो. जर तुम्ही बर्फाने शेक घेतल्यास तो सैलसरपणा कमी होईल आणि त्वचाही टोनड् होईल. त्यासोबतच त्या भागावरील चरबीही कमी होते. या थेरपीच्या वापराने त्वचेवरील टीशूज टाईट होतात. तसंच तुमची बॉडीही डिटॉक्सीफाई होते.
बारीक होण्यासाठी आईस थेरपीचा वापर करण्याआधी ती वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्यायला हवी. बाजारात आपल्याला आईसबॅग्ज्स, जेल पॅक्स आणि अनेक वस्तू मिळतील ज्यामध्ये तुम्ही बर्फ ठेवून त्याचा शेक घेऊ शकता. या थेरपीसाठी तुम्हाला दुसऱ्या कोणाचीही मदत घ्यावी लागणार नाही. तुम्ही स्वतःच आईस बॅगच्या मदतीने ही थेरपी करू शकता.
मग आता वजन कमी करण्यासाठी पुढच्या वेळी सोप्या आणि सहज करता येणाऱ्या आईस थेरपीचा वापर नक्की करून पाहा.
हेही वाचा -
वेटलॉससाठी करून पाहा 'ही' योगासनं
जलद वजन करायचं असेल कमी, तर ‘या’ 10 सवयी आवश्यक
वजन कमी करण्याआधी लक्षात ठेवा या महत्वाच्या गोष्टी
वजन कमी करण्यासाठी जमिनीवर बसून जेवणे ठरेल फायदेशीर