#RainySpecial : असा करा पावसाळा एन्जॉय

#RainySpecial : असा करा पावसाळा एन्जॉय

पावसाळा असा ऋृतू आहे ज्यामध्ये एखादी बोअरिंग व्यक्तीसुद्धा पाऊस एन्जॉय करायला तयार होते. त्यातच पावसाळा तुमच्या पार्टनर किंवा फ्रेंड्ससोबत अनुभवायची मजा काही औरच आहे. म्हणूनच आम्ही तुमच्यासाठी खास लिस्ट तयार केली आहे, पावसाळ्यातल्या खास एन्जॉयमेंटसाठी (Ideas for enjoying monsoon).  

Instagram

1. लाँग ड्राईव्ह

पाऊस सुरू होताच निसर्गाच्या सानिध्यात जावंस वाटतं. मस्तपैकी पडणारा पाऊस, मोकळा रस्ता, हिरवागार निसर्ग आणि सोबतीला तो मग अजून काय हवं आयुष्यात. आपल्या नशिबाने मुंबईजवळ अनेक अशी ठिकाणं आहेत जिथे तुम्ही जाऊन पावसाळ्याचा आनंद घेऊ शकता. मग ते कर्जतजवळील भिवपुरी रोड असो वा नेरळ.

Instagram

2. पूल पार्टी आणि रेन डान्स

जर तुमची बाहेर जाण्याची इच्छा नसेल किंवा शक्य नसेल तर नो प्रोब्लेम. कॉलेज बंक करा आणि एखाद्या जवळच्या रिसॉर्टमध्ये जाऊन फ्रेंड्ससोबत पूल पार्टी आणि रेन डान्स एन्जॉय करा. आहे ना मजेदार आयडिया.

3. मूव्ही मॅरेथॉन

तुम्हाला अगदीच बाहेर जायचं नसेल तर मग मस्तपैकी उशी घ्या, घरातले लाईट डीम करा, आवडता मूव्ही लावा आणि पॉपकॉर्नचा आस्वाद घ्या.

4. चहा, कॉफी आणि बरंच काही

Instagram

पावसात भिजून झाल्यावर गरमागरम कॉफी मिळाली तर. मनसोक्त भिजून झाल्यावर त्याला किंवा तुमच्या गँगला घेऊन एखाद्या कॅफेत किंवा आवडत्या चहावाल्याकडे जाऊन चहा-कॉफीचा आस्वाद घ्या. गप्पांचा फड आपोआपच रंगेल.

5. शॉपिंग

शॉपिंगला कोणताही सिझन किंवा वेळ काळ नसतो. मुख्य म्हणजे पावसाळ्याच्या दिवसात अनेक ठिकाणी सेलही असतो. मग काय पावसाळ्याची शॉपिंग राहिली असेल तर ती करून घ्या.

6. रेनी वॉक

Instagram

तुम्ही ठाण्यात राहता का किंवा गोरेगावला. प्रश्न अश्यासाठी कारण ठाणेकर असाल तर उपवनला जाऊन छान रेनवॉक घेता येईल किंवा गोरेगावकर असाल तर आरेमधला निसर्ग अनुभवत रेनी वॉक घेता येईल. एखाद्या जवळच्या बागेत किंवा समुद्रकिनारीही तुम्ही जाऊ शकता. मुंबईकरांना खरंतर रेनी वॉक घेण्यासाठी अनेक जागा आहेत. एका छत्रीतले दोघं किंवा गरमागरम भुट्टा आणि भजीचा आस्वाद घ्या.

7. रोमँटीक कँडल लाईट डीनर

तुम्हाला जर कुकींगची आवड असेल तर घरच्याघरी एखादा मस्त मेन्यू ठरवून रोमँटीक कँडल लाईट डीनर प्लॅन करा. सेटेंड कँडल्स, चविष्ट जेवण, कोसळणारा पाऊस आणि आवडती कंपनी आहे ना मस्त प्लॅन. तसंही पावसाळ्याच्या दिवसात बाहेरून जेवण ऑर्डर केल्यास ते येईपर्यंत थंड तरी झालेलं असतं किंवा ट्रॅफीकमुळे ऑर्डर यायला उशीर तरी होतो.  

8. कलानंद

पावसाळ्यात अजून एक गोष्ट तुम्हाला सहज करता येईल ती म्हणजे कलेचा आस्वाद. नाही कळलं का… थोडं निरिक्षण केलंत तर पावसाळ्याच्या दिवसात लोकं बाहेर जाणं टाळतात. त्यामुळे अशा पावसाळी दिवसात एखाद्या आर्ट गॅलरी किंवा फोटोग्राफी एक्झिबिशनला तुम्ही भेट देऊन आरामात तिथल्या कलेचा आस्वाद घेऊ शकता. हा पर्याय इनडोअर अॅक्टीव्हीटी आवडणऱ्यांसाठीही चांगला आहे.

9. पुस्तक प्रेम

Instagram

बाहेर कोसळणारा पाऊस आणि हातात आवडत्या लेखकाची कादंबरी किंवा आवडत्या कवीचा कवितासंग्रह. त्यातच जर तुमचा पार्टनर तुमच्यासोबत असेल तर क्या कहने. मग पुस्तक, पाऊस आणि कंपनी एन्जॉय करा.

10. आठवणींची सफर

वरीलपैकी काहीही करायची इच्छा नसल्यास ही गोष्ट मात्र तुम्हाला नक्की करावीशी वाटेलच. जर तुम्ही घरी असाल तर जुने अल्बम काढून तो काळ पुन्हा अनुभवू शकता. एखादा नवा प्लॅन आखू शकता.