ADVERTISEMENT
home / Fitness
कावीळ ची लक्षणे

कावीळ ची लक्षणे आणि घरगुती उपचार (Kavil Symptoms In Marathi)

साधारण पावसाची सुरुवात झाली की,कावीळ डोकं वर काढायला सुरुवात होते. पावसाळ्यात आणि पावसाळ्यानंतर काविळीचे रुग्ण वाढतात. दूषित अन्न किंवा पाण्याचे सेवन केल्याने हा बाजार बळावण्याची शक्यता अधिक असते. कावीळला संस्कृतमध्ये ‘कामीण’ असे म्हणतात. त्याचा अपभ्रंश करत त्याला कावीळ असे नाव पडले. कामला या शब्दाचा अर्थ सर्व इच्छा नाहीसा करणारा आजार असा आहे. कावीळ याला ‘हिपेटायटस बी’ असे म्हणतात. कावीळ कितीही दिवसात बरी होते. त्या आधी तुम्हाला काविळीची लक्षणे (kavil che lakshan), कारणे, घरगुती उपाय आणि आयुर्वेदीक उपाय यांच्याबाबत माहिती हवी. जाणून घ्या काविळीविषयी सगळे काही

काविळीची लक्षणे कोणती ? (Kavil Symptoms In Marathi)

तुम्हाला कावीळ झाली की नाही हे ओळखायचे असेल तर त्याची काही लक्षणे देखील आहेत. तुम्हाला ताप आला असेल पण तुम्हाला तुमच्या तापाची लक्षणे वेगळी वाटत असतील तर तुम्हाला त्याची लक्षणे देखील माहीत हवी. जाणून घ्या काविळीच्या या लक्षणाविषयी

थकवा जाणवणे (Feeling Restless)

feeling tired

ताप आल्यानंतर थकवा येणे अगदी स्वाभाविक असते. पण तुम्हाला सौम्य ताप आहे पण तुम्हाला सतत थकवा जाणवत असेल तर तुम्हाला कावीळ असण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे याची योग्यवेळी चाचणी करणे गरजेचे आहे.

बद्धकोष्ठतेचा वारंवार त्रास होणे (Constipation)

बद्धकोष्ठतेचा त्रास देखील कावीळ झाल्यानंतर वारंवार होऊ लागतो. पोटात खडे होऊ लागतात. पोट साफ होत नाही.या काळात पोटाची चयापचय क्रिया बिघडलेली असते. त्याचा परिणाम तुमच्या पोटावर होतो आणि तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास होऊ लागतो.

ADVERTISEMENT

लघवी पिवळी होणे (Yellow Urine)

कावीळमध्ये रक्तातील लाल पेशींचे रुपांतर बिलीरुबीनमध्ये होते. त्यानंतर त्याचे रुपांतर बाईलमध्ये त्यांचे रुपांतर होते.ते लघवीच्या मार्गे शरीराबाहेर टाकले जाते. बिलीरुबीनचे प्रमाण वाढल्यामुळेच लघवी पिवळी होते. हे प्रमाण अधिक वाढले तर लघवी गडद पिवळी होऊ लागते.

वाचा – Causes Of Hepatitis In Marathi

सतत उलट्या होणे (Vomiting)

vomiting

जर तुम्ही ताप साधा आहे असा समजून घरगुती इलाज करत राहिलात तर तुम्हाला काही दिवसांनी उलट्या होण्याचा त्रास होऊ शकतो.कावीळमध्ये उलट्या होणे अजिबात चांगले नाही. जर तुम्हाला या काळात उलट्या झाल्या तर तुम्ही तातडीने त्यावर इलाज करुन घेणे आवश्यक आहे.

वाचा – मुंग्या येणे कारण (Mungya Yene In Marathi)

ADVERTISEMENT

पोटाच्या वरील भागात दुखणे (Stomach Pain)

पोटात पित्ताशयाचे खडे झाल्यामुळे पोटदुखीचा त्रास कावीळ झाल्यामुळे होते. कावीळ झाल्यानंतर अधून मधून पोट दुखत राहते.

वरचेवर सौम्य ताप येणे (Mild Fever)

कावीळ झाल्यानंतर तुम्हाला वरचेवर ताप येत राहतो. काहींना ताप आला आहे असे म्हणता अंग थंड पडते. पुन्हा ताप येतो. त्यामुळे वरचेवर सौम्य ताप येऊ लागतो.

झपाट्याने वजन कमी होणे (Weight Loss)

कावीळमध्ये काहीही खाण्याची इच्छा मरुन जाते. त्याचा परिणाम तुमच्या आरोग्यावर होतो. तुमचे वजन झपाट्याने कमी होते. त्यामुळे तुम्हाला अधिक अस्वस्थ वाटते. वजन घटविण्यासाठी उत्कृष्ट आहेत बाबा रामदेवचे काही घरगुती उपाय. तुम्ही याचादेखील वापर करून घेऊ शकता.

नखं आणि त्वचा पिवळी पडणे (Change In Skin Color)

yellow skin jaundice

कावीळ संपूर्ण शरीरात भिनल्यानंतर त्याची लक्षणे दिसू लागतात. तुमची नख इतवेळी गुलाबी दिसतात. पण कावीळ झाल्यानंतर तुमची नखं आणि त्वचा पिवळी दिसू लागतात.   

ADVERTISEMENT

डोळे पिवळे दिसणे (Pupil Color Turns Yellow)

ज्या प्रमाणे तुमची नखं आणि त्वचा पिवळी पडते अगदी त्याच प्रमाणे तुमचे डोळेही काविळीमध्ये पिवळे दिसू लागतात. कावीळ तपासण्यासाठी तुमचे डोळे आणि नखचं तपासली जातात. त्यामुळेच तुम्हाला कावीळ झाली हे लक्षात येते.

                                                       वाचा – Signs of Hookworm Infection In Marathi

लगेच द्या डॉक्टरांना भेट (Visit Doctor Immediately)

जर तुम्हाला ताप असेल आणि वर सांगितलेली सारी लक्षणे तुम्हाला तुमच्यामध्ये दिसत असतील तर तुम्ही तातडीने त्यावर इलाज करणे आवश्यक आहे. तुम्हाला झालेला आजार कावीळच आहे याची खात्री करुन घेण्यासाठी तातडीने तुम्ही डॉक्टरांकडे जा आणि चाचण्या करुन घ्या तरच तुम्हाला त्याचे लवकरात लवकर निदान करता येईल. कावीळवर लसी उपलब्ध असून एकदा आजाराचे निदान झाल्यानंतरच त्यावर औषधोपचार सुरु करता येतात.

कावीळ होण्याची कारणे (Causes Of Jaundice In Marathi)

कावीळ  हा आजार पावसाळ्यात डोकं वर काढतो हे अनेकांना माहीत असेल पण या काळात नेमके काय बदल होतात जे कावीळ होण्यासाठी कारणीभूत असतात. शिवाय कावीळ होण्यामागे नेमकी कोणती कारणे असतात ती जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

अस्वच्छ पाण्याचे सेवन (Unhygienic Food And Water)

कावीळ हा आजार पावसाळ्यात डोकं वर काढतो. या दिवसाच काविळीच्या रुग्णांमध्ये वाढ झालेली दिसते. कावीळ हा संसर्गजन्य आजार असून अस्वच्छ पाण्याचे सेवन केल्यानंतर हा आजार होण्याची शक्यता अधिक असते. पावसाच्या दिवसात अनेक ठिकाणी दूषित पाण्याची समस्या असते. तुमची प्रतिकारशक्ती कमी असेल आणि तुम्ही कुठेही पाणी पित असाल तर तुम्हाला याचा त्रास होण्याची शक्यता अधिक असते.

junk food

बाहेरचे अति खाणे (Eating More Junk Food)

जर तुम्हाला बाहेर खायची सवय असेल तर कावीळ बळावण्यासाठी ते एक कारण बनू शकते. पावसात बाहेरच्या पदार्थांमध्ये वापरण्यात आलेले पाणी तुम्हाला त्रासदायक ठरु शकते. तुम्ही जर सतत बाहेरचे पदार्थ या दिवसात खात असाल तर तुम्ही अधिक काळजी घेणे गरजेचे असते.

मद्यपानाची सवय (Drinking Alcohol)

मद्यपानाच्या अति सेवनामुळे देखील तुमच्या यकृताला सूज येऊ शकते. त्यामुळे देखील तुम्हाला कावीळ होऊ शकते. जर तुम्ही मद्याचे अधिक सेवन करत असाल तर हे देखील कावीळचे कारण ठरु शकते. त्यामुळे तुम्हाला कावीळ झाल्यानंतर मद्यपान करु नका असे सांगितले जाते.

मलेरिया, टायफाईडनंतर होऊ शकते कावीळ (After Malaria And Typhoid)

मलेरिया आणि टायफाईडनंतर तुमच्या पेशी कमी होतात. अशावेळी तुम्हाला कावीळ होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे तुम्हाला काळजी घेणे आवश्यक असते.

ADVERTISEMENT

वाचा – हर्निया म्हणजे काय ? (Hernia Meaning In Marathi)

कावीळ घरगुती उपचार (Kavil Var Gharguti Upay)

काविळीचे निदान झाल्यानंतर तुम्हाला काही घरगुती उपायही कावीळ कमी करण्यासाठी केले जातात. हे घरगुती उपाय फारच सोपे आणि सहज उपलब्ध होणारे आहे. त्यामुळे तुम्ही हे उपाय करुन पाहू शकता. यांचा कोणताही विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर होत नाही.

उसाचा रस (Sugarcane Juice)

sugarcane juice

अनेकांना उसाचा रस आवडतो. इतरवेळीही हा रस आवर्जून प्यायला जातो. पण कावीळ झाल्यानंतर उसाचा रस प्यायला सांगितला जातो. काविळीसाठी उसाचा रस हा अत्यंत गुणकारी आहे. जर तुमच्याकडे उस असेल तर तुम्ही उस चावून खाऊ शकता. पण जर तुमच्याकडे उसाचे तुकडे नसतील तर तुम्ही उसाचा रस पिऊ शकता. उसाच्या रसामुळे तुमच्या शरीरात उष्णता निर्माण होते आणि रक्त तयार होण्याची प्रक्रिया सुरु होते. शिवाय तुमची रोग प्रतिकार शक्ती वाढते. त्यामुळे कावीळ झाल्यानंतर 3 ते 4 ग्लास उसाचा रस नक्की प्यावा.

टोमॅटोचा रस (Tomato Juice)

टोमॅटोचा रसही काविळीवर गुणकारी असतो. रोज सकाळी उठून तुम्ही एक पेलाभर टोमॅटोचा रस प्यावा. टोमॅटोचा रस नुसता पिणे शक्य नसेल तर त्यात मीठ आणि मिरपूड घालावे. त्यामुळे तोंडाला चव येईल.

ADVERTISEMENT

मुळ्याचा रस (Raddish Juice)

वर सांगितल्याप्रमाणे काविळीमध्ये काहीही खाण्याची आणि पिण्याची इच्छा मरुन जाते. पण या दिवसात शरीराला उर्जा मिळण्यासाठी तुम्हाला चांगला आहार घेण्याची देखील गरज असते. पण या दिवसात भूक लागत नाही. म्हणूनच तुम्ही मुळ्याचा रस आहारात घेणे आवश्यक असते. मुळ्याची पाने खुडून त्याचा रस प्यायलाने तुमचे पोट साफ होते आणि तुम्हाला भूक लागते. त्यामुळे किमान एक ग्लासभर तरी मुळ्याचा रस प्यावा.

जाणून घ्या चिकनगुनिया लक्षणे (Chikungunya Symptoms in Marathi)

पपईच्या पानांचा रस (Papaya Juice)

पपईच्या पानांचा रस हा अनेक आजारांवर गुणकारी आहे. पपईची कोवळी पाने वाटून हा रस केला जातो. पपईच्या पानांमध्ये रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याची क्षमता असते म्हणूनच तुम्ही पपईच्या पानांचा रस या दिवसात घ्यावा असा सल्ला दिला जातो. लक्षात ठेवा यासाठी तुम्हाला पपईची कोवळी पाने यासाठी निवडायची आहे.

लिंबाचा रस (Lemon Juice)

lemon juice

काविळीमध्ये तुमच्या यकृताला त्रास होतो. यकृताचे कार्य पूर्ववत आणि चांगले करण्यासाठी लिंबाचा रस मदत करु शकते म्हणून तुम्ही दिवसातून 2 ते 3 वेळा लिंबाच्या रसाचे सेवन करावे. तुम्हाला आराम पडेल.

ADVERTISEMENT

भिजलेले मनुके (Soaked Raisin)

तुमच्या शरीरातील उर्जा वाढण्याचे काम ड्रायफ्रुट करु शकते. त्यातल्या त्यात ड्रायफ्रुटमधील मनुके कावीळीसाठी चांगले असतात. काळे मनुके रात्रभर पाण्यात भिजवून सकाळी ते खा. काविळीनंतर साधारण 15 ते 20 दिवस  मनुक्यांचे सेवन करा.

तुळशीची पाने (Basil Leaves)

तुळशीच्या पानातील औषधी तत्व कावीळ बरी करण्यासाठी चांगले असतात. त्यामुळे तुम्ही शक्य असल्यास या दिवसात पाने चावून खावी. एकावेळी तुम्ही 7 ते 8 पाने चावून खाऊ शकता. त्यामुळे तुम्हाला बरे वाटेल. शिवाय कावीळ कमी होण्यास मदत होईल.

आवळ्याचा रस (Aamla Juice)

काविळीवर आवळ्याचा रस गुणकारी असतो. कावीळ झाल्यानंतर एकदा तरी आवळ्याच्या रसाचे सेवन करावे.

आयुर्वेदीक उपचार पद्धती (Ayurvedic Remedies For Jaundice In Marathi)

कावीळीवर काही आयुर्वेदीक उपायही फार चांगल्या पद्धतीने कार्य करतात. हे उपाय अगदी सहज करता येण्यासारखे असतात. शिवाय हे पदार्थ अगदी सहज उपलब्धही असतात. त्यांचा कोणताही विपरीत परिणाम शरीरावर होत नाही. 

ADVERTISEMENT

कुटकी (Kutki)

कुटकी ही एक हिमालयातील वनस्पती आहे. कावीळ झाल्यानंतर तुमची भूक मरते. अशावेळी भूक वाढवण्याचे काम कुटकी हे करते. बाजारात कुटकी चूर्ण मिळते. ज्याची चव थोडी तिखट आणि कडू असते. ही पूड तुम्ही पाण्यात घालून खाऊ शकता.

कुमारी आसव (Kumari Aasav)

तुमच्या शरीरात रक्त वाढवण्याचे काम कुमारी आसव करते. कुमारी आसव काढा स्वरुपात मिळते. डॉक्टरांना विचारुन तुम्ही याचे सेवन करु शकता. साधारण 15 ते 20 मिली इतकेच याचे सेवन करायचे असते याच्या सेवनामुळे तुमचा बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.

kadha ayurvedic

आरोग्यवर्धिनी वटी (Aarogyavardhini Vati)

आरोग्यवर्धिनी वटी ही देखील कावीळवर उत्तम इलाज आहे. आरोग्यवर्धिनी वटी ही गोळ्यांच्या रुपात मिळते. या आयुर्वेदीक औषधाचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे तुम्ही ही घेऊ शकता. याशिवायही आरोग्यवर्धिनीवटीने भरपूर फायदे आहेत.

गुडुची पावडर (Guduchi Powder)

गुडुची पावडर म्हणजेच गुळवेळ. हल्ली बाजारात गुळवेलची पावडर बाजारात मिळते. त्याचा थेट काढा करुन तुम्ही पिऊ शकता. कावीळ व्यतिरिक्त इतरही आजारांवर गुळवेळ किंवा गुडुची पावडर उपयुक्त आहे.

ADVERTISEMENT

कावीळ झाल्यावर काय खावे आणि काय खाऊ नये (Food To Eat And Avoid In Jaundice)

कावीळ झाल्यानंतर काही पथ्य पाळावी लागतात. ताप उतरल्यानंतर आणि कावीळ बरी झाल्यानंतर साधारण 15 दिवस तरी तुम्हाला साधा आहार घेणे आवश्यक असते. काही गोष्टी तुम्हाला आवर्जून खायच्या असतात तर काही गोष्टी तुम्हाला या काळात अजिबात खायच्या नसतात. काय खावे आणि काय टाळावे याची यादी खास तुमच्यासाठी

हे खावे (Food To Eat)

कावीळ झाल्यानंतर काय खावे या पदार्थांची यादी जाणून घेऊया.

भरपूर भाज्या (Green Leafy Veggies)

green veggies

तुमच्या पोटाचे आरोग्य या दिवसात बिघडलेले असते. त्यामुळे तुम्हाला थोडासा हलका आहार घेणे आवश्यक असते. या दिवसात शक्य असेल तर हिरव्या पालेभाज्यांचे भरपूर सेवन करा. भाज्यांमुळे तुमचे पोट साफ होण्यास मदत होते. शिवाय तुमच्या शरीराला आवश्यक असणारे घटक देखील भाज्यांमधून मिळतात.

फायबर असलेले पदार्थ (Fiber Contain Food)

तुम्हाला उर्जा मिळण्यासाठी फायबर युक्त पदार्थ देखील तुमच्या शरीरात जायला हवे. ओट्स, कॉर्नफ्लेक्स असे पदार्थ तुम्ही आवर्जून या दिवसात खा.

ADVERTISEMENT

फळं (Digestive Fruit)

या दिवसांमध्ये काहीही खाण्याची इच्छा नसते. पण तुमच्या शरीरात काहीतरी चांगले जावे असे वाटत असेल तर तुम्ही फळं खाऊ शकता. कावीळमध्ये तुम्हाला कोणतीही फळं खाण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे तुम्ही फलाहार या दिवसात आवर्जून घ्यायला हवा. उदा. पपई आणि आंबा यांसारखी फळं तुम्ही खायला हवी. ज्यामुळे तुमची पचनशक्ती वाढेल.

पाणी किंवा हर्बल टी (Water Or Herbal Tea)

या दिवसात तुम्हाला थोडेसे थकलेले वाटत असेल आणि तुम्हाला चहा प्यायची इच्छा असेल तर अशा दिवसात रोजचा चहा न पिता हर्बल टी प्या. म्हणजे तुम्हाला थोडा आराम मिळेल. तुमच्या शरीरात जितके पाणी जाईल तितके चांगले.

दूध आणि दूधाचे पदार्थ (Milk And Milk Product)

milk and milk product

दूध आणि दुधाचे पदार्थ तर तुम्ही आवर्जून कावीळ झाल्यानंतर खायला हवे. दुधाचे पदार्थ म्हणजे पनीर, चीझ असे खाल्ल्याने तुम्हाला प्रोटीन देखील मिळते.त्यामुले तुमची इच्छा नसेल तरी अगदी थोडे का असेना तुम्ही खा!

हे खाऊ नये (Food To Avoid)

कावीळच्या काळामध्ये तुम्ही काही पदार्थ हे टाळायला हवेत. हे पदार्थ कोणते ते आता जाणून घेऊया.

ADVERTISEMENT

मासांहारी पदार्थ (Fish, Mutton, Chicken)

fish fry

तुमचे पोटाचे आरोग्य बिघडल्यामुळे तुम्हाला या दिवसात हलका आहार घेणेच महत्वाचे असते. म्हणूनच या दिवसात तुम्ही मासांहारी पदार्थ अजिबात खाऊ नका. यामुळे तुम्हाला बद्धकोष्ठतेचा त्रास जास्त होऊ शकतो.

तेलकट पदार्थ (Oily Food)

तेलकट पदार्थांचे सेवनही या दिवसात चांगले नाही. कारण या पदार्थांच्या सेवनामुळेदेखील तुम्हाला त्रास होऊ शकतो.

उदा. चायनीज, वडा, तेलकट पदार्थ अशा पदार्थांचे सेवन तुम्ही करु नका.

साखरेचे सेवन (Sugar Intake)

साखरेचे सेवन जर तुम्ही करत असाल तर या दिवसात करु नका. कारण साखरेमुळे तुम्ही केलेल्या डाएटवर पाणी फिरेल. जर तुम्हाला फारच गोड खायची इच्छा असेल तर तुम्ही गोड फळं खा. पण साखर किंवा साखर असलेले पदार्थ खाऊ नका.

ADVERTISEMENT

अतिरिक्त मीठ आणि सोडिअम (Salt And Sodium)

मीठाचे अतिरिक्त सेवन देखील या कालावधीत चांगले नाही. मीठ असलेले पदार्थ म्हणजे चीप्स किंवा असे काही पदार्थ तुम्ही या काळाच न खाल्लेले बरे

दारुचे सेवन (Intake Alcohol)

दारुचे सेवनही या कालावधीत चांगले नाही. कारण त्यामुळे तुमच्या यकृताला सूज येण्याची शक्यता असते. म्हणून या दिवसात दारुचे सेवन टाळा.

FAQ’s

1. कावीळ जलदगतीने बरा होऊ शकते का?

जर तुम्ही वेळेवर उपचार सुरु केले तर कावीळ ही बरी होऊ शकते. पण साधारण 10 ते 15 दिवस कावीळ बरी होण्यासाठी लागतो. तुम्हाला लवकरात लवकर बरे व्हायचे असेल तर तुम्ही पथ्य पाळायला हवे.

ADVERTISEMENT

2. काविळीवर घरगुती उपाय कोणते? 

कावीळ झाल्यानंतर डॉक्टरी इलाजासोबत काही घरगुती उपाय सुचवले जातात. या घरगुती उपायांमध्ये तुम्हाला उसाचा रस, लिंबाचा रस,नारळपाणी, ड्रायफ्रुट अशा काही गोष्टी आहारात घेता येतात. ज्यामुळे कावीळ उतरण्यास मदत होते.

3. काविळीवर आयुर्वेदीक उपचारपद्धती आहेत का?

अनेक आयुर्वेदीक दुकानात कावीळसाठी काही वनस्पती मिळतात. त्यांचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने देखील कावीळ बरी होऊ शकते. तुमच्या जवळच्या आयुर्वेदीक दुकानात तुम्हाला आम्ही सांगितलेल्या औषधी वनस्पती मिळू शकतात.

ADVERTISEMENT

4. कावीळ बरी होण्यासाठी किती कालावधी लागू शकतो? 

कावीळचा ताप हा साधारण एक आठवडा तरी असतो. ताप उतरल्यानंतरही त्याचा परिणाम असतो. काहींना महिनाभर याचा त्रास होत राहतो. म्हणजे डोळे पिवळे दिसतात किंवा थकवा जाणवतो. तर काहींना हा त्रास 6 महिने इतका देखील होऊ शकतो.त्यामुळे प्रत्येक व्यक्तीवर याचा परिणाम अवलंबून असतो. त्यामुळे त्याचा ठराविक असा कालावधी तुम्ही सांगू शकत नाही.

5. कावीळ झाली हे तुम्हाला घरच्या घरी कळू शकते का? 

कावीळची काही खास लक्षणे आहेत. ज्यामुळे तुम्हाला कावीळ झाली हे कळू शकते. कावीळच्या लक्षणांमध्ये बद्धकोष्ठता, उलट्या, थकवा, नखं त्वचा पिवळी पडणे अशी काही लक्षणे दिसतात.

ADVERTISEMENT

You Might Like These

थायरॉईडच्या उपचारपद्धती

पायाचं दुखणं कसं टाळालं

मधुमेहावर करता येतील असे काही सोपे घरगुती उपाय

ADVERTISEMENT
06 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT