हातांच्या रेषा सांगतील कसं असेल तुमचं वैवाहिक जीवन, जाणून घ्या

हातांच्या रेषा सांगतील कसं असेल तुमचं वैवाहिक जीवन, जाणून घ्या

प्रत्येक मुलीला आपलं करिअर आणि लग्नाबद्दल नेहमीच प्रश्न असतो. आपलं वैवाहिक आयुष्य प्रत्येकालाच सुखकारक आणि समाधानकारक हवं असतं. पण हे जाणून कसं घ्यायचं आणि जाणून घेणं अतिशय कठीण आहे. पण बऱ्याचदा भविष्य बघताना अथवा हाताच्या रेषांवरून तुम्ही हे जाणून घेऊ शकता. हा एक प्रकारचा अभ्यास आहे. हा अभ्यास केलेल्या व्यक्ती तुम्हाला तुमच्या हाताच्या रेषा बघून याबाबत व्यवस्थित सांगू शकतात. पण हे जाणून घेण्याआधी नक्की हातांच्या रेषांचा अर्थ काय आहे हे जाणून घेऊया -

- हाताच्या अंगठ्यावरून जी रेषा हाताच्या बाजूला खाली येते त्या रेषेला जीवनरेषा अर्थात लाईफलाईन असं म्हटलं जातं

- मध्यमा अर्थात मिडल फिंगरच्या दिशेने जी रेषा जाते त्याला भाग्यरेषा असं म्हणतात, ही हाताच्या बेसपासून सुरु होते

- हाताचं पहिलं बोट हे गुरू, दुसरं बोट शनी, तर तिसरं बोट हे रवी आणि चौथं अर्थात सर्वात लहान बोट तर्जनी हे बुध ग्रहाशीसंबंधित असल्याचं सूचक आहे.

- हाताच्या तळव्यावर अगदी खाली अर्थात तर्जनीच्या समोर चंद्राचं स्थान असतं

- जीवनरेषेच्या एकदम वर अर्थात तीन रेषांच्या मध्ये जी रेषा असते ती मतिष्क रेषा असते. या रेषेच्या वर मुख्य असणारी रेषा म्हणजे हृदयरेषा आहे.

- लहान अर्थात अनामिकेच्या अगदी खाली आणि हृदयरेषेच्या वर जी रेषा आहे, त्याला विवाह रेषा म्हणतात. ही रेषा काही लोकांच्या हातावर 1 असते तर काही लोकांच्या हातावर 2 असतात. त्यामुळे या व्यक्तींची लग्नं त्याप्रमाणे होत असतात.

हाताच्या रेषेनुसार जाणून घ्या आपल्या वैवाहिक जीवनाबद्दल -

1 - हातावर एकापेक्षा जास्त विवाह रेषा असल्यास तुमचं अफेअर होण्याची शक्यता असते. तसंच असं असल्यास, दोन वेळा लग्न होण्याचीही शक्यता असते. ही रेषा जर खालच्या दिशेने झुकली असेल तर तुम्हाला तुमच्या लग्नामध्ये समस्यांचा सामना करावा लागतो.

2 - कोणत्याही व्यक्तीच्या हातावर वैवाहिक रेषा सुरुवातीलाच जर 2 शाखा दाखवत असेल तर लग्न तुटण्याचा अर्थात घटस्फोट होण्याची शक्यता असते.

3 - कोणत्याही मुलीच्या हातावर जर विवाह रेषा सुरू होताना दिव्याचं चिन्ह दिसलं तर अशा मुलीला लग्नामध्ये धोका मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. तसंच तिच्या नवऱ्याची  तब्बेत कायम खराब राहण्याची शक्यताही असते असं म्हटलं जातं.

4 - एखाद्या व्यक्तीची विवाह रेषा ही लांब असेल आणि अनामिका अर्थात चौथ्या बोटापर्यंत जाणारी असेल तर अशा व्यक्तीचं वैवाहिक जीवन अतिशय संपन्न आणि समृद्ध असल्याचं म्हटलं जातं.

5 - बुध पर्वत अर्थात करंगळीच्या दिशेने विवाह रेषा येत असल्यास मधूनच कट झाली तर अशा स्थितीत वैवाहिक जीवनात अनेक संकटांना सामोरं जाण्याची शक्यता वर्तवली जाते.

6 - विवाह रेषेच्या अंताला जर सापाच्या जिभेप्रमाणे 2 शाखा होत असतील तर दोन्ही जोडीदारांमध्ये मतभेद होण्याचे संकेत असतात.

7 - एखाद्या मुलाच्या डाव्या हातावर 2 विवाह रेषा असतील आणि उजव्या हातावर एकच असेल तर अशा व्यक्तींना आपल्या पत्नीकडून खूपच प्रेम मिळतं. अशा व्यक्तींच्या पत्नी खूपच काळजी घेतात.

8 - डाव्या हातावर 1 आणि उजव्या हातावर 2 रेषा असल्यास, पत्नी काळजी करत नाही. मुलींच्या बाबतीत हे विरुद्ध असतं. जर मुलींच्या उजव्या हातावर 2 रेषा आणि डाव्या हातावर 1 असेल तर अशा मुलींना नवऱ्याकडून भरपूर प्रेम मिळतं.

9 - दोन्ही हातावर विवाह रेषेची लांबी आणि स्थान एकप्रकारे असल्यास, पती - पत्नी एकमेकांना खूपच चांगल्या प्रकारे समजून घेतात.

10 - एखाद्या व्यक्तीची विवाह रेषा वरच्या बाजूला गेली आणि बोटापर्यंत पोहचत असेल तर अशी व्यक्तींच्या वैवाहिक जीवनात खूपच त्रास होतो. बऱ्याचदा अशा व्यक्तींचं लग्नदेखील होत नाही.

11 - विवाह रेषा आणि हृदय रेषेमधील दूरी तुमचं लग्न कधी होणार हे निश्चित करते. जर या दोन्ही रेषा एकमेकांच्या जवळ असतील तर तुमचं लग्न लवकर होण्याची शक्यता असते.