ADVERTISEMENT
home / Natural Care
ओठांवरील लिपस्टिक काढण्याच्या या आहेत योग्य पद्धती

ओठांवरील लिपस्टिक काढण्याच्या या आहेत योग्य पद्धती

दिवसाच्या शेवटी मेकअप काढण्याची सर्वसाधारण सगळ्यांनाच सवय असते. चेहरा खराब होईल या भीतीने आपण मेकअप काढतो.पण ज्यावेळी तुम्ही हेवी मेकअप करत नाही. पण लिपस्टिक लावता त्यावेळी तुम्ही तुमच्या चेहऱ्यावरील लिपस्टिक कशी काढता. कारण लिपस्टिक हा देखील तुमच्या मेकअपचा एक महत्वाचा भाग आहे. लिपस्टिक पुसट झाली किंवा ती काढण्याची गरज काय असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकी करताय.कारण तुम्ही ओठांना लावलेली लिपस्टिक जर काढली नाही तर तुमचे ओठ काळे पडू शकतात.

मॉश्चरायझर

shutterstock

जर तुमच्याकडे मेकअप रिमुव्हर नसेल तर तुम्ही मॉश्चरायझरचा उपयोग करुन तुमच्या ओठांवरील लिपस्टिक काढू शकता. तुम्हाला तुमचे रोजचे वापरातील मॉश्चरायझर घेऊन ओठांवर चोळायचे आहे. थोडासा मसाज करुन तुम्हाला टिश्यू पेपरने लिपस्टिक पुसून काढायची आहे.ओठांवर सध्या काही नसेल तरी सुद्धा तुम्ही जर अशा पद्धतीने ओठ स्वच्छ केले. तर असलेली लिपस्टिक निघेलच शिवाय तुमचे ओठ मुलायम होतील.

ADVERTISEMENT

बॉडीलोशनचे फायदे आहेत भरपूर.. जाणून घ्या तुमच्या त्वचेला काय होऊ शकेल फायदा

बेबी ऑईल

shutterstock

तुमच्या त्वचेसाठी बेबी ऑईल हे सगळ्यात उत्तम आहे. तुम्हाला मॉश्चरायझर लावायचे नसेल तर तुम्ही तुमच्या ओठांना बेबी ऑईल लावून देखील तुमचे ओठ स्वच्छ करु शकता. बेबी ऑईल लावल्यानंतर तुम्ही ओठांवर मसाज केला तरी तुमच्या ओठांवरील लिपस्टिक निघेल. एखादी लिपस्टिक ही फारच टिकाऊ असेल तर पटकन निघत नाही. अशावेळी तुम्हाला तुमचे तोंड लाल करायचे नसेल तर तुम्ही बेबी ऑईल लावून अगदी सावकाशपणे ओठांवरील लिपस्टिक काढू शकता.

ADVERTISEMENT

फेस वाईप

हल्ली अनेक जण फेस वाईप वापरतात. तुम्हाला पटकन लिपस्टिक काढायची असेल तर तुम्ही फेस वाईपचा वापर देखील करु शकता. फेसवाईपने देखील तुमची लिपस्टिक निघू शकते. त्यामुळे तुम्ही फेसवाईपचा वापर करुन तुम्ही तुमची लिपस्टिक काढू शकता.

फेसवाईप वापरताना लिपस्टिक काढायची आहे म्हणून ओठ चोळायला घेऊ नका. आधी व्हाईपने ओठ ओले करुन घ्या. मग हळूहळू लिपस्टिक काढायला घ्या

त्वचेची अशी काळजी घ्याल तर तुमचीही त्वचा राहील छान

मेकअप रिमुव्हर

ADVERTISEMENT

shutterstock

हल्ली अनेक ब्रँडचे मेकअप रिमुव्हर बाजारात मिळते. या मेकअप रिमुव्हर लिक्वीडमध्ये Essential ऑईलचा वापर केलेला असतो. त्यामुळे याचा वापर केल्यानंतर लिपस्टिक तुमच्या ओठांवरुन पटकन निघते.

उन्हाळ्यात त्वचेची काळजी घ्या अशी

खोबरेल तेल

घरात अगदी सहजपणे उपलब्ध असणारी गोष्ट म्हणजे खोबरेल तेल. याचा उपयोग करुनही तुम्ही तुमच्या ओठांवरील लिपस्टिक काढू शकता. खोबरेल तेल वापरल्यामुळे तुम्हाला कोणतेही नुकसान होत नाही. त्यामुळे तुम्ही अगदी सहज लिपस्टिक काढू शकता

ADVERTISEMENT

हेही ठेवा लक्षात

  • लिपस्टिक काढताना तुम्ही जर तेल वापरत असाल तर तुम्ही त्या तेलानेच ओठांना मसाज करा. तुमच्या ओठांवरील डेट स्किनही निघून जाईल.
  • चांगल्या क्वालिटीचे मेकअप रिमुव्हर तुम्ही तुमच्या ओठांसाठी निवडा.
  • रोज रात्री तुमच्या ओठांवरील लिपस्टिक काढायला विसरु नका.
  • तुमच्या ओठांना रोजचा मसाज मिळाल्यामुळे तुमची ओठांवरील डेड स्किनही निघून जाते.
  • लिपस्टिक एका फटक्यात निघत नसेल तर तुम्ही घाईघाईने ती काढायला जाऊ नका.त्यामुळे तुम्हाला जखमही होऊ शकते.

त्यामुळे आता रोज रात्री तुम्ही तुमची लिपस्टिक काढायला विसरु नका.

वाचा – बॉडी लोशन कसे कार्य करते

19 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT