शाहरुख आणि त्याचा Handsome मुलगा आर्यन दिसणार एकाच चित्रपटात

शाहरुख आणि त्याचा Handsome मुलगा आर्यन दिसणार एकाच चित्रपटात

शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान दिवसेंदिवस Handsome दिसू लागला आहे. आणि दिसणार कसा नाही म्हणा, शेवटी तो द ग्रेट किंग खान शाहरुख खानचा मुलगा आहे. आता शाहरुखचा हाच Handsome मुलगा चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. आर्यन खान शाहरुख खान याच्यासोबत एकाच चित्रपटात दिसणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, नेमक्या कोणत्या चित्रपटात ही बाप -बेटे की जोडी पाहायला मिळणार आहे. तर एका वेगळ्या रुपात ही दोघं पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे चित्रपटातही ही दोघं खऱ्या आयुष्यातील नाते निभावणार आहे.

कोणत्या चित्रपटात दिसणार दोघे एकत्र

Instagram

आता जर तुम्ही आर्यनचा चित्रपटात कोणता रोल असेल आणि तो कसा दिसेल अशी उत्सुकता असेल तर प्रत्यक्षात आर्यन या चित्रपटात दिसणार नाही. तर त्याचा फक्त आवाज या चित्रपटात ऐकायला मिळणार आहे. तुम्हाला ‘द लायन किंग’ नावाचा चित्रपट माहीत असेल तर हा चित्रपट एका नव्या अवतारात प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या चित्रपटाच्या हिंदी डबिंगमध्ये शाहरुख आणि आर्यनची जोडी दिसणार आहे. शाहरुख यामध्ये मुफासा आणि आर्यन यामध्ये सिंबाला आवाज देणार आहे. त्यामुळे आता तुम्हाला कळलचं असेल की, ही दोघं तुम्हाला कोणत्या रुपात एकत्र दिसणार आहे ते..

या विचित्र फोटोंमुळे हे सेलिब्रिटी झाले होते चर्चेचा विषय

शाहरुखने केला फोटो शेअर

Instgram

शाहरुखने स्वत: त्याचा आणि आर्यनचा एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये दोघेही पाठमोरे बसले आहेत. त्या दोघांनी निळ्या रंगाचा टी शर्ट घातला असून या दोघांच्या टी शर्ट मागे सिंबा आणि मुफासा असे लिहिले आहे. त्यामुळे थोडी हिंट शाहरुख खानने आधीच दिली होती असे म्हणायला हवे. फादर्स डे चे औचित्य साधत शाहरुखने शेअर केलेल्या या फोटोवर चाहत्यांनी भरभरुन कमेंटस दिल्या आहेत. पण हा फोटो इंडिया विरुद्ध पाकिस्तानच्या मॅचसाठी असावा असे अनेक लोकांना वाटले. पण तसे मुळीच नव्हते हे आता कळत आहे. हा फोटो एका नव्या शुभारंभाचा होता. आता लवकरच हा चित्रपट रिलीज होणार आहे.

आर्यन म्हणून झाला तयार

स्टार किड्सची ही फळी सध्या बॉलीवूडमध्ये येताना दिसत आहे. जान्हवी कपूरने याची सुरुवात केली असून या नंतर सैफ अली खानची मुलगी सारा अली खान, चंकी पांडेची मुलगी  अनन्या पांडे, जान्हवी कपूरची बहीण खुशी कपूर देखील लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. काही वर्षांपासून अनेकांचे लक्ष शाहरुखचा मुलगा आर्यन खानकडे लागून राहिले आहे. कारण लहानपणी क्युट दिसणारा आर्यन आता Handsome झाला आहे. त्यामुळे तो कधी पदार्पण करणार अशी अनेकांना उत्सुकता आहे. द लायन किंग या चित्रपटासाठीसुद्धा आर्यन तयार नव्हता असे कळत आहे. पण संपूर्ण खान कुटुंबीय Disney चित्रपटांचे चाहते असल्यामुळे शिवाय शाहरुख या चित्रपटात असल्यामुळे आर्यन सिंबाला आवाज द्यायला तयार झाला असे कळते.

डबिंगचा अनुभव नाही नवा

Instagram

आर्यनसाठी डबिंगचा हा अनुभव काही पहिला नाही. तर या आधी देखील आर्यनने डबिंग केले आहे. 7 वर्षांचा असताना आर्यनने डिस्नीच्या इन्क्रेडिबल (Incredibles) या चित्रपटातील लहान मुलाच्या आवाजाचे हिंदी डबिंग केले होते. त्यावेळी शाहरुखने यातील लीड रोलसाठी आवाज दिला होता. तर आता ही दोघं लीड रोलमध्ये एकाच चित्रपटासाठी आवाज देणार आहेत. हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. पण तरीही सगळ्यांना डबिंग व्यतिरिक्तही आर्यनला चित्रपटात पाहायचे आहे. आता आर्यन खानला नेमकं कोणत्या चित्रपटातून लाँच करण्यात येणार आहे ते लवकरच कळेल. पण त्यासाठी थोडावेळ आणखी वाट पाहावी लागेल.