ADVERTISEMENT
home / DIY सौंदर्य
‘या’ विचित्र 12 ब्युटी टिप्स देतील तुम्हाला सुंदर लुक

‘या’ विचित्र 12 ब्युटी टिप्स देतील तुम्हाला सुंदर लुक

आजकाल बघावं तिथे तुम्हाला ब्युटी, हेअर, मेकअप या सगळ्याचे हॅक्स अर्थात कशी काळजी घ्यावी काय करावं हे सर्व वाचायला मिळतं. इतकंच नाही तर इतके ब्युटी ब्रँड बाजारामध्ये आहेत की, नक्की काय वापरू आणि काय नको यामध्येही गोंधळून जायला होतं. इतकं सगळं वाचल्यानंतर आणि बघितल्यानंतर नक्की या टिप्सचा उपयोग होतो की, नाही? या टिप्स करून पाहिल्या तर आपण सुंदर दिसू का? असे प्रश्न नक्कीच पडतात. पण आम्ही तुमच्यासाठी ज्या टिप्स घेऊन आलो आहोत, त्या नक्कीच सुंदर दिसण्यासाठी काम करतात कारण या टिप्स आम्ही करून पाहिल्या आहेत. तसंच तुम्ही या करून पाहिल्यानंतर आम्हाला नक्कीच थँक्स म्हणू शकता. कदाचित या वाचल्यानंतर तुम्हाला विचित्र वाटेल. पण हा टिप्स नक्कीच तुम्हाला सुंदर दिसायला मदत करतील.

1. आयशॅडो लावल्याने केस दिसतील थिक

Shutterstock

काही जणींचे केस पातळ असतात. मग अचानक कुठे बाहेर जायचं म्हटलं आणि केस थोडे थिक दिसायला हवे असतील तर नक्की काय करायचं असा प्रश्न निर्माण होतो. पण हा प्रश्न अगदी एका टिचकीत सोडवता येतो. तुमच्या केसांना सूट होईल अशा रंगाचं आयशॅडो क्यू टिप अथवा लहान ब्रशला लाऊन घ्या आणि तुम्ही तुमच्या केसांच्या मुळांना लावा आणि मेन पार्टिंग करा. ही ब्युटी टिप तुम्ही करून पाहिलीत तर तुम्हाला नक्कीच फरक दिसून येईल.

ADVERTISEMENT

2. हील्सला आरामदायक बनवतील पँटी लायनर्स

ऐकायला थोडं विचित्र वाटत असलं तरी हे नक्कीच काम करतं.  तुम्हाला जर हिल्स घालणं खूप आवडत असेल पण तुमच्या पायाला खूप घाम येत असेल तर हिल्स तुमच्या पायातून घसरते. अशा वेळी तुम्ही हिल्समध्ये पँटी ठेऊन मग घाला आणि मग कमाल बघा.

3. टूथब्रश देईल केसांना चांगला व्हॉल्युम

Shutterstock

ही एक एकमद सोपी आणि पटापट ब्युटी टीप आहे. तुम्हाला तुमच्या केसांचा काही भाग टीझ करायचा असेल तर तुम्ही टूथब्रशचा वापर करू शकता. टूथब्रश केसांमध्ये स्लाईड करा आणि तोपर्यंत टीझ करा जोपर्यंत तुम्हाला हवा तसा व्हॉल्युम केसांना मिळत नाही. हे करणं अतिशय सोपं आहे. त्यासाठी तुम्हाला सतत ब्युटी पार्लरमध्ये जायची गरज नाही.

ADVERTISEMENT

4. बेबी पावडरने होतील लॅशेस थिक

लांबसडक, पूर्ण आणि थिक लॅशेससाठी आता महाग मस्कारा खरेदी करायलाच हवा असं काही नाही. कारण तुम्ही बेबी पावडरचा वापर करूनदेखील तुमचे लॅशेस थिक दाखवू शकता. ही ब्युटी टीप तुम्हाला नेहमी कामी येईल. आपल्या आवडत्या मस्काराचा 1-2 कोट लावा आणि मग बेबी पावडर घ्या आणि आपल्या पूर्ण लॅशेस याने कोट करा. लॅशेस एकदम पांढऱ्या व्हायला हव्यात. त्यानंतर पुन्हा मस्काराचे 1-2 कोट लावा. यानंतर तुमच्या लॅशेस चांगल्या दिसतील.

5. बूटांचा घाण वास दूर करतील टी – बॅग्ज

Shutterstock

तुम्ही आणि तुमच्या आजूबाजूचे जर तुमच्या शूजच्या घाणीने त्रस्त असतील अथवा खूप गरमी आणि घाम आल्यामुळे जर बूटांमधून घाण येत असेल तर, काही वेळेसाठी तुम्ही बूटांमध्ये टी – बॅग्ज ठेऊन द्या. बॅग्ज बूटांमधील घाण शोषून घेतील आणि हे बूट ओडर फ्री (Odour Free) होतील.

ADVERTISEMENT

6. कॅलामाइन लोशन देतं चमकदार त्वचा

तुमची त्वचा जर खूप तेलकट असेल तर ही ब्युटी टीप खास तुमच्यासाठी आहे. मेकअप लावण्यापूर्वी आपल्या चेहऱ्यावर कॅलामाईन लोशन लावा. हे तुमच्या चेहऱ्यावर प्रायमरप्रमाणे काम करतं. पूर्ण दिवस तुम्ही तुमचा मेकअप हे लावून टिकवू शकता आणि तुमचा चेहरा ऑईलफ्री आणि चमकदार राहातो.

7. वॅसलिन देतो तुम्हाला सुगंध

Shutterstock

तुमचं परफ्युम बऱ्याच वेळापर्यंत राहावं असं तुम्हाला वाटतं का? तर तुम्ही आपल्या हातांना पल्स पॉईंटवर लावा आणि मग त्यावर परफ्युम स्प्रे करा. वॅसलिन परफ्युम जास्त वेळेपर्यंत राहातं. त्यामुळे पूर्ण दिवस तुम्ही परफ्युम लावून सुगंधित राहू शकता.

ADVERTISEMENT

8. पेपरमिंट ऑइलपासून मिळेल सेक्सी पाऊट

आपल्या लिप ग्लॉसमध्ये पेपरमिंट ऑईलचे 1-2 थेंब (यापेक्षा अधिक थेंब घेऊ नयेत) घ्या आणि मग लिप ग्लॉस लावा. तुमचे ओठ काही वेळातच सुंदर आणि आकर्षित दिसू लागतील. ही अतिशय सोपी आणि असरदार ब्युटी टीप आहे.

9. रेड लिपस्टिकने दूर होतील आयबग्ज आणि काळी वर्तुळं

Shutterstock

आपल्या डोळ्यांखाली लाल अथवा ऑरेंज रेड लिपस्टिकचा एक लेअर लावा आणि त्यावर कन्सीलर लावून ब्लेंड करा. काही वेळातच या ब्युटी टीपमुळे काळी वर्तुळं आणि आयबग्ज निघून जातील. एखादी जादू झाल्याप्रमाणे लाल लिपस्टिकचा यावर उपयोग होतो.

ADVERTISEMENT

10. फाटलेल्या ओठांवर लावा ग्रीन टी

ही ब्युटी टीप फाटलेल्या ओठांसाठी अतिशय उपयुक्त आहे. ग्रीन टी मुळे ओठांवर खूपच चांगला परिणाम होतो. तुमच्या ओठांवर डँप ग्रीन टी बॅग साधारण 5 मिनिट्स ठेवा आणि मग याची जादू पाहा.

11. आर्ममपीटमधील घाम काढून टाकण्यासाठी वापरा पँटी लाईनर

उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही स्लीव्ह्ज टॉप घालता तेव्हा तुमच्या काखेत घाम येतोच. या घामाचे डाग तुमच्या कपड्यांवरही राहतात. अशावेळी पँटीलाईनरचा उपयोग होतो. टॉप घालण्याआधी पहिल्यांदा तुम्ही स्लीव्ह्जच्या भागामध्ये एकदम पातळ पँटी लाईनर चिकटवा आणि 15-30 सेकंद दाबून ठेवा आणि त्यानंतर टॉप घाला. तुम्ही जर छोटी स्लीव्हजचे कपडे घालणार असाल तर पँटी लाईनर अर्ध कापून घ्या जे तुमच्या स्लीव्ह्ज दिसू शकतील. फक्त लाईनर सर्व घाम शोषून घेणार आणि आपले कपडे एकदम फ्रेश दिसतात.

12. टूथब्रश तुमचे फ्लाईवेज काढून टाकतील

चेहऱ्याच्या आसपास असणारे फ्लाईवेज तुमचा सारा लुक खराब करतात. यापासून निपटण्यासाठी तुम्हाला एक टूथब्रशवर हलकासा हेअरस्प्रे शिडकावा लागेल आणि मग केसांवर त्याचा फवारा मारा. असं केल्यामुळे तुमचे फ्लाईवेज व्यवस्थित होतील आणि तुमचे केसही बिघडणार नाहीत.

हेदेखील वाचा – 

ADVERTISEMENT

प्रियांका चोप्राचा फिटनेस, डाएट आणि ब्युटी मंत्रा जाणून घ्या

सौंदर्य खुलविण्यासाठी फॉलो करा ’20’ आयुर्वेदिक ब्युटी टीप्स

ह्या ‘5’ स्कीन केअर प्रोडक्ट्सशिवाय अपूर्ण आहे तुमचं ब्युटी रुटीन

ग्लिसरीनच्या वापराने मिळवा सुंदर त्वचा

ADVERTISEMENT
20 Jun 2019

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT