नेहमी तरूण दिसण्यासाठी जाणून घ्या टॉ 7 अँटिएजिंग सिक्रेट्स

नेहमी तरूण दिसण्यासाठी जाणून घ्या टॉ 7 अँटिएजिंग सिक्रेट्स

वाढत्या वयासह शरीराची कार्यक्षमता आणि शरीरासाठी आवश्यक असणारे मायलिन कमी होऊ लागतं त्यामुळे व्यक्तीचं वय जास्त वाटू लागतं. पण बऱ्याचदा याचं कारण आपली रोजची धावपळ आणि खराब जीवनशैली हेदेखील असतं. हल्लीच्या जीवनशैलीमुळे वयाच्या आधीच मोठे दिसायला लागतात. इथपासूनच अँटिएजिंगची समस्या सुरु होते. कोणालाही वाटत नाही की, वयापेक्षा मोठं दिसावं. प्रत्येकाला आपण वयापेक्षा लहान दिसावं असंच वाटतं. आपण नेहमी सुंदर आणि तरूण दिसावं हेच प्रत्येकाला वाटत असतं. पण असे काही सिक्रेट्स आहेत, ज्यामुळे तुम्ही नेहमी तरूण दिसू शकता. जाणून घेऊया नेहमी तरूण दिसण्यासाठी नक्की काय सिक्रेट्स आहेत -

1. नियमित व्यायाम

नियमित व्यायाम जेव्हा तुम्ही फॉलो करता तेव्हा तुम्हाला नियमित फिट राहण्यासाठी मदत मिळते. व्यायामाच्या मदतीने अनेक आजारांपासून तुम्ही दूर राहू शकता. तसंच नियमित व्यायाम केल्याने तुमचा स्टॅमिना वाढतो आणि तुमच्या मांसपेशीदेखील मजबूत होतात.

2. वेट लिफ्टिंग

बऱ्याचदा वेट लिफ्टिंग करण्यासाठी महिलांना लाज वाटते. पण तुम्हाला तुमची हाडं मजबूत हवी असतील तर तुम्हाला वेट लिफ्टिंग करणं आवश्यक आहे. पण हे करताना तुम्ही ट्रेनरची मदत घ्या. वेट लिफ्टिंग केल्याने तुमची हाडं मजबूत होतात आणि त्यामुळे एजिंगच्या समस्येपासून तुमची सुटका होते. हा उपाय एजिंगसाठी अप्रतिम आहे.

3. स्क्वॅट्स

स्क्वॅट्स मुख्य स्वरूपात मसल्स मजबूत करण्यासाठी करण्यात येते. यामुळे कॅलरीज बर्न होतात आणि तुमचे पायदेखील मजबूत होतात. त्यामुळे यावर जिममध्येदेखील भर देण्यात येतो. यामुळे स्क्वॅट्स करणंं एजिंगसाठी खूपच चांगलं आहे. एजिंग ही अशी गोष्ट आहे जी बऱ्याचदा वयाच्या आधी दिसू लागते. त्यामुळे असे व्यायाम आणि स्क्वॅट्स करून अँटिएजिंग म्हणून याचा उपयोग करून घेता येतो.

4. चालणं (वॉकिंग)

Instagram

कोणत्याही आजारावर चालणं हा एक उत्तम उपाय आहे. तुमच्या चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी करण्यासाठी चालणं हा एक चांगला उपचार आहे. तसंच चालल्यामुळे तुमच्या हृदयाचं आरोग्यही सुधारतं. पायी चालल्यामुळे डिमेन्शियाचा आजारही टळतो. त्यामुळे चालणं हा एक उत्तम एजिंगसाठी उपाय मानला जातो.

5. कंपाऊंड मूव्हमेंट

कंपाऊंड मुव्ह्ज तुमच्या शरीरासाठी अत्यंत आवश्यक आहेत. याचा फायदा असा आहे की, तुम्ही वेळेवर वर्कआऊट करू शकता. वर्कआऊट केल्यामुळे तुमचं शरीर अतिशय प्रसन्न आणि तजेलदार राहतं. तुमच्या शरीराला अशा  व्यायामाची गरज आहे.

6. योगासन

Shutterstock

तुम्हाला तुमच्या वयापेक्षा 10- 15 वर्षांनी लहान दिसायचं असेल तर योगासनासारखा उत्तम उपाय दुसरा कोणताही नाही. दररोज तुम्ही सूर्यनमस्कार, नटराज आसन, वृक्षासन, वीरासन, भुजंगासन, पच्चिमोत्तानासन, सर्वांगासन, अनुलोम विलोम आणि प्राणायाम हे सगळे योगासन आपल्या रोजच्या आयुष्यात सामील करून घ्या. योगासन केल्यामुळे शरीरामध्ये ब्लड सर्क्युलेशन नीट होतं. यामुळे तुम्हाला एजिंगपासून सुटका तर मिळतेच शिवाय तुम्हाला बऱ्याच आजारांपासूनही योगा दूर ठेवतं.

7. फेस योगा

नियमित स्वरूपात फेस योगा केल्यामुळे योग्य ब्लड सर्क्युलेशन होतं आणि तुमची त्वचादेखील टाईट होते. फेस योगा करतेवेळी चेहऱ्याची नस बऱ्याच ठिकाणांपासून खेचली जाते आणि त्यामुळे त्यामुळे सुरकुत्या पडण्याची शक्यता असते. फेस योगा केल्याने गाल, डोळे, हनुवटी, गळा आणि कपाळावरील त्वचेमध्ये सुरकुत्या येत असतील तर त्यामध्ये बदल होतो आणि सुरकुत्या न पडण्यापासून तुम्ही वाचता. तुमच्या वाढत्या वयाचा परिणाम फेस योगामुळे कमी होतो. एजिंग दिसून येत नाही.

वास्तविक आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत नक्की काय काय करायचं असा प्रश्न सगळ्यांनाच असतो. पण तरीही स्वतःसाठी वेळ काढून तुम्ही या सात गोष्टी केल्यास, एजिंगपासून तुमची सुटका होऊ शकते. तुम्हाला याचा सराव होईपर्यंत थोडासा त्रास होईल. पण त्यानंतर मात्र तुम्हाला स्वतःला बरं वाटेल आणि तुम्ही या गोष्टी नित्यनियमामने करू शकाल. शिवाय तुम्ही अनेक आजारांंपासूनही दूर राहाल. हे सर्वात जास्त महत्त्वाचं आहे.

हेदेखील वाचा - 

रोज योगा करत आहात, तर लक्षात ठेवा खास गोष्टी

फिट राहण्यासाठी करिना करते 'ही' कठीण योगासने

वेटलॉससाठी करून पाहा 'ही' योगासनं

मालदीव्सच्या सुंदर किनाऱ्यावर मलायकाचा 'हॉट' योगा