कोणत्याही महिलेसाठी तिची ब्रेस्ट अर्थात स्तन हा शरीरातील भाग हा अतिशय महत्त्वाचा असतो आणि हा तिच्या शरीराचा सर्वात मोठा आकर्षणाचा बिंदू असतो. बदलत्या वेळेनुसार आता मोठे आणि उभार स्तन ही महिलांची पसंती होत चालली आहे. पण स्तनांचा आकार आणि त्याची बनावट ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. तुमचे स्तन लहान आहेत की मोठे यावर त्यांचा आकार अवलंबन नसतो. खरं तर प्रत्येक स्त्री च्या स्तनांचे वेगवेगळे प्रकार असतात हे बऱ्याच महिलांना माहीतच नसतं. स्तन हा शरीराचा महत्त्वाचा भाग आणि त्याची योग्य काळजी घ्यायला हवी. स्तन सैलसर असतील तर ते कोणालाच आवडत नाही. आपण यावेळी स्तनांचे नक्की काय प्रकार असतात आणि त्याची काळजी कशी घ्यायला हवी ते पाहणार आहोत.
स्तनांचे प्रकार - Different Types of Breasts in Marathi
स्तनांच्या निप्पल्सचे प्रकार - Types of Breast Nipples in Marathi
स्तन वाढवण्यासाठी घरगुती उपाय - How to increase Breast Size in Marathi
पुरुष आणि महिला दोघांनाही स्तन असतात. महिलांच्या स्तनांमधील ग्रंथीमुळे त्यांना आपल्या बाळांना दूध पाजता येतं. युवा अवस्थेत असताना महिलांचे स्तन वाढतात आणि विकसित होत असतात. स्तनांचे प्रमुख तीन भाग असतात. स्तन, निप्पल आणि निप्पलच्या बाहेरील गोलाकार क्षेत्र. स्तनांमध्ये हाडं नसतात. त्यामुळे लिगामेंटमुळे ते बांधून ठेवले जातात, ज्याला कूपरलिगामेंट म्हटलं जातं. त्यामुळे अधिक वजन असल्याने आणि कोणताही आधार नसल्याने स्तन शरीराच्या खालच्या बाजूला लटकत राहतात. त्यामुळे वयात आल्यानंतर स्तनांसाठी ब्रा चा उपयोग करावा लागतो. स्तन हे अतिशय मऊ असतात. त्यामुळे सेक्स करतानाही आकर्षक स्तन पुरुषांना आवडतात.
तुम्हाला हे तर माहीत आहेच की, जगभरातील महिलांच्या स्तनांचे वेगवेगळे आकार आणि प्रकार असतात. पण हे स्तन आपल्या शरीरामध्ये कसे विकसित होतात हे जाणून घेणंदेखील तितकंच गरजेचं आहे. जाणून घेऊया स्तनांचा विकास कसा होतो -
तुम्हाला जर वाटत असेल की, सर्व महिलांचा स्तनांचा आकार हा एकसारखा असतो तर तुमचा हा गैरसमज आहे. तसंच जाहिरातींमध्ये दाखवण्यात आलेला स्तनांचा आकार हा तुम्हाला योग्य वाटत असेल तर तसंही नाही. असं तर स्तनांचा एखादा आकार ही त्याची परिभाषा आहे असं कधीच होत नाही. आपल्याला माहीत असलेल्यापेक्षा कितीतरी अनेक स्तनांचे प्रकार आहेत. लहान, मोठे, मध्यम आकाराचे, केसांसह, केस नसलेले हे अतिशय सामान्य प्रकार आहेत. बनावट आणि निप्पल्सचेदेखील अनेक प्रकार आहेत.
आपल्याला फक्त गोलाकार स्तन माहीत असतात. पण वास्तविक महिलांचे स्तन हे सात प्रकारचे असतात. पण वाढत्या वयानुसार आणि असंतुलित हार्मोनच्या कारणांमुळे यामध्ये साधारण नऊ प्रकारच्या स्तनांची आम्ही तुम्हाला माहिती सांगणार आहोत.
असिमेट्रिक या शब्दाचा अर्थ आकारामधील असमानता. या तऱ्हेच्या स्तनांच्या आकारामध्ये दोन्ही स्तन समान नसतात. यामध्ये एकाचा आकार दुसऱ्यापेक्षा थोडा मोठा असतो. महिलांच्या बाबतीत हे खूपच कॉमन आहे. अर्थात हे अंतर जास्त नसतं. त्यामुळे ब्रा व्यवस्थित फिट होतात. हे फक्त तुमच्या माहितीसाठी आहे. यामुळे तुमच्या स्तनांना कोणत्याही प्रकारच्या त्रासाला सामोरं जावं लागत नाही.
टिप्स- जर तुमचे स्तन असिमेट्रिक आकाराचे असतील तर तुमच्यासाठी पॅडेड ब्रा जास्त चांगली आहे
या तऱ्हेचे स्तन असणाऱ्या महिला या स्पोर्ट्स पर्सन आहेत असं अजिबातच नाही. वास्तविक या स्तनांमध्ये टिश्यूचं प्रमाण कमी असतं आणि मसल्स जास्त असतात. ज्याचा अर्थ असा आहे की, तुमचे स्तन हे अतिशय मजबूत आहेत. अन्य महिलांच्या तुलनेत तुमचे स्तन हे अतिशय मजबूत असल्याचं समजलं जातं.
टिप्स - तुमचे स्तन हे अॅथलीट आकारामध्ये असतील तर तुम्ही स्पोर्ट्स ब्रा वापरू शकता
याच्या नावाप्रमाणेच स्तनांचा आकार असतो. बेलच्या आकाराचे स्तन हे वरच्या बाजूला थोडे पातळ असतात आणि खालच्या बाजूने थोडेसे जाड असतात. बेलप्रमाणेच याचा आकार असतो.
टिप्स - तुमचे स्तन जर बेलच्या आकाराप्रमाणे असतील तर तुम्हाला अशी ब्रा घालायला हवी जी तुमच्या स्तनांना खालच्या बाजूने आधार देईल.
या स्वरूपाच्या स्तनांमध्ये कॉमन स्तनांपेक्षा अधिक अंतर असतं आणि निप्पल्स समोर असण्याऐवजी किनाऱ्यावर पॉईंटेड असतात. त्यामुळे दोन स्तनांमध्ये बरंच अंतर निर्माण होतं. तसंच अशा स्वरूपाचे स्तन हे सामान्यतः मोठ्या आकाराचे असतात.
टिप्स - तुमच्या स्तनांचा आकार साईड सेट असेल तर तुम्ही प्लंज ब्रा वापरू शकता
छोटे स्तन असण्याचा अर्थ असा नाही की, ते पातळ असतात. सामान्यतः या स्तनांमध्ये निप्पल्स हे खालच्या बाजूला असतात. या स्तनांच्या बाबतीत निप्पल्स हे खालच्या बाजूला झुकलेले असतात. तसंच हे खालच्या बाजूला असल्यामुळे पूर्णतः खालच्या बाजूला ओढले जात नाही. त्यामुळे या स्तनांचा आकार हा सिलेंड्रिकल असतो. असे स्तन हे जास्त लांब आणि थोडे ब्रॉड आकाराचे असतात.
टिप्स - तुमचे स्तन जर स्लेडर शेपमध्ये असतील तर तुम्ही प्लंज अथवा वायरलेस ब्रा वापरू शकता
या स्तनांचा आकार गोल असून हे स्तन थोडे पातळही असतात. याचा आकार टिअर ड्रॉपसारखा असतो. यामध्ये निप्पल्स थोडेसे झुकलेले असतात. असा आकार असणं हे अतिशय कॉमन आहे.
टिप्स - तुमचे स्तन जर टिअर ड्रॉप आकाराचे असतील तर तुम्ही कोणत्याही तऱ्हेची ब्रा घालू शकता
तुमच्या डोक्यामध्ये स्तनांच्या आकाराचं चित्र फिक्स झालेलं असतं आणि हे स्तन त्याच प्रकारचे असतात. वरपासून ते खालपर्यंत एकसमान असून निप्पल्स समोरच्या दिशेने असतात. असे स्तन एकदमच गोलाकार असतात.
टिप्स - तुमचे स्तन राऊंड शेप असतील तर तुम्हाला नॉर्मल ब्रा घालता येते
या स्वरूपाचे स्तन नावाप्रमाणेच अगदी रिलॅक्स्ड असतात. या स्तनांमधील टिश्यूज अतिशय सैलसर असल्यामुळे स्तन शरीराच्या खालच्या बाजूला झुकलेले असतात.
टिप्स - तुमचे स्तन रिलॅक्स्ड आकाराचे असतील तर तुम्हाला क्लासिक टी - शर्ट ब्रा घालायला हवी
या स्वरुपाच्या स्तनांमधील दोन्ही निप्पल हे एक दुसऱ्याच्या बाजूला इशारा करताना. अर्थात एक निप्पल पूर्व बाजूला तर दुसरे निप्पल हे पश्चिम बाजूला असतं. त्यामुळेच या स्तनांचा असे नाव देण्यात आले आहे.
टिप्स - तुमचे स्तन ईस्ट- वेस्ट शेप मध्ये असल्यास, तुम्हाला टी- शर्ट ब्रा घालणं हा चांगला पर्याय आहे
आपण वेगवेगळ्या आकाराच्या स्तनांबद्दल जाणून घेतलं पण तुम्हाला माहीत आहे का की, निप्पल्सचेही अनेक प्रकार असतात. यामध्ये सॉफ्ट अर्थात मऊ, टणक, संवेदनशील, केसाळ आणि केसांशिवाय असे प्रकार असतात. जाणून घेऊया निप्पल्सचे किती प्रकार आहेत -
उभार आलेले निप्पल्स (Protruding)
सपाट (Flat)
पफी (सुजलेल्यासारखे) (Puffy)
आतल्या बाजूला झुकलेले (Inverted)
एकतर्फी आतल्या बाजूला झुकलेले ( Unilateral Inverted)
बंपी (Bumpy)
केसाळ (Hairy)
वाजवीपेक्षा जास्त उभार आलेले (Supernumerary)
काही महिलांचे स्तन व्यवस्थित विकसित होत नाहीत. त्यामुळे दुसऱ्या महिलांचे स्तन पाहून त्यांना वाईट वाटत असतात. काही महिलांना स्तनांचा आकार वाढवण्यासाठी औषधं घ्यावी लागतात आणि काही महिला तर काही महिला महागातले उपचारही करतात. पण अशा उपचारांना बऱ्याचदा काहीही फरक पडत नाही. तुम्हाला तुमचे स्तन आकर्षिक हवे असतील तर तुम्ही या सगळ्या फाल्तू उपचारांच्या मागे लागू नका. आम्ही तुम्हाला अशा काही सोप्या टिप्स देत आहोत, ज्यामुळे तुम्ही तुमचे स्तन वाढवण्यासाठी स्वतःचीच मदत करू शकता.