‘या’ कारणासाठी आलिया भटला सोडावं लागलं ब्रम्हास्त्रचं शूटिंग अर्धवट

‘या’ कारणासाठी आलिया भटला सोडावं लागलं ब्रम्हास्त्रचं शूटिंग अर्धवट

रणबीर कपूर आणि आलिया भट 'ब्रम्हास्त्र' चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सध्या त्यांच्या या आगामी चित्रपटाच्या चर्चा अगदी जोरात सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच रणबीर आणि आलिया ब्रम्हास्त्रच्या टीमसोबत या चित्रपटाच्या शूटिंगसाठी वाराणसीला गेले होते. वाराणसी मध्ये आणखी चार दिवस शूटिंग शेड्यूल करण्यात आलं होतं. मात्र ब्रम्हास्त्रच्या शूटिंग दरम्यान असं काही घडलं की त्या दोघांना पुन्हा मुंबईत परत यावं लागलं. नुकतेच त्या दोघांचे मुंबईत परत आल्याचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

काय घडलं ब्रम्हास्त्रच्या शूटिंग दरम्यान

वाराणसीमध्ये ब्रम्हास्त्रचं शूटिंग सुरू असताना अचानक आलिया भटची तब्येत बिघडली. शूटिंग दरम्यान आलियाच्या पोटात दुखू लागलं. आलिया आणि रणबीर ब्रम्हास्त्रच्या एका गाण्याचं शूटिंग करत असताना तिच्या पोटात दुखायला लागलं. पोटात भयंकर वेदना होत असतानादेखील आलिया त्या गाण्याचं शूटिंग करण्यास तयार होती. मात्र दिग्दर्शक अयान मुखर्जीने आलियाची तब्येत बिघडल्यामुळे शूटिंग रद्द करून आलियाला मुंबईत परत जाण्याची परवानगी दिली. आलिया भटला स्टमक इनफेक्शन झालं आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार मुंबईत आल्यावर आलिया लगेच तिच्या डॉक्टरांकडे चेकअपसाठी गेली होती. डॉक्टरांनी आलियाला यावर काही दिवस घरी आराम करण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे आता आलिया आणि रणबीरला ब्रम्हास्त्रच्या एका गाण्याच्या शूटिंगसाठी पुन्हा वाराणसीत जावं लागणार आहे. रणबीर आणि आलिया नोव्हेंबरमध्ये या गाण्याच्या शूटिंगसाठी वाराणसीमध्ये जातील असा अंदाज आहे.

instagram

ब्रम्हास्त्र धर्मा प्रॉडक्शनचा बिग बजेट चित्रपट

ब्रम्हास्र हा करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शनचा एक सुपरहिरो ड्रामा चित्रपट आहे. अर्थातच या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये भव्य दिव्य सेट आणि अॅक्शनची धमाल असणार आहे. या शिवाय चित्रपटात सुपर वीएफएक्स इफेक्टदेखील असणार आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन अयान मुखर्जी करत आहेत. या चित्रपटात आलिया- रणबीरसोबत अमिताभ बच्चन, नागार्जुन आणि मोनी रॉय यांच्या प्रमुख भूमिका आहेत. काही दिवसांपूर्वीच रणवीर आणि आलियाचे ब्रम्हास्त्रच्या सेटवरील चित्रीकरणा दरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. मात्र आता हे शूटिंग अर्धवट टाकून आलियाला परत मुंबईत यावं लागलं आहे.

instagram

ब्रम्हास्त्रसाठी रणबीरही घेतोय विशेष मेहनत

ब्रम्हास्त्रमध्ये रणबीर कपूर मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटात तो पुराणातील एक काल्पनिक अॅक्शन हिरो साकारणार आहे. यात त्याचे नाव शिवा असे असून तो यासाठी बरीच मेहनत घेताना दिसत आहे. हा चित्रपट बिग बजेट असल्यामुळे सगळ्याच गोष्टी अगदी बिग बजेट आहेत. काही दिवसांपूर्वी अयान मुखर्जीच्या दिग्दर्शनाखाली चित्रपटासाठी तयारी करतानाचा रणबीरचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. आलिया भटने हा व्हिडिओ रेकॉर्ड केला होता आणि अयान मुखर्जीने हा व्हिडिओ त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर केला होता.

चित्रपटाच्या प्रमोशनसाठी निवडला होता अनोखा फंडा

ब्रम्हास्त्रच्या फर्स्ट लुकच्या प्रमोशनसाठीदेखील कुंभ मेळ्याचे स्थान निवडण्यात आले होते. महाशिवरात्रीचे औचित्य साधून आलिया-रणबीर आणि अयान मुखर्जी हे तिघे कुंभ मेळ्यात पोहचले होते. तेथे पोहोचल्यानंतर त्यांनी महाआरती केली आणि तब्बल 150 ड्रोन एकाचवेळी हवेत उडवून त्याचे एक ब्रम्हास्त्र तयार करण्यात आलं होतं. या निमित्ताने चित्रपटाचा लोगो लाँच करण्यात आला होता. शिवाय 150 ड्रोनच्या मदतीने आधी ब्रम्हास्त्र हे नाव तयार करण्यात आले. अशा अनोख्या प्रकारे चित्रपटाचे नाव ड्रोनच्या माध्यमातून जाहीर करण्यात आले. कुंभ मेळ्यात पहिल्यांदाच अशा प्रकारे एखाद्या चित्रपटाच्या नावाचे अनावरण करण्यात आलं होते.

आणखी वाचा 

रणवीर सिंह ठरतोय नंबर वन सेलिब्रेटी ब्रॅंड

ब्रम्हास्त्र'ची तयारी जोरात, व्हिडिओ झाला व्हायरल

लेक कोमोला का गेले होते रणबीर-आलिया

फोटोसौजन्य- इन्साग्राम